Konkan Railway News: एप्रिल महिन्यात कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने एलटीटी ते थिवीम दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Train no. 01185 Lokmanya Tilak (T) – Thivim Special
दिनांक १५/०४/२०२३ ते २९/०४/२०२३ दरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार,बुधवार आणि शनिवार या दिवशीं ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि सकाळी ११:३० वाजता थिवीम या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01186 Thivim – Lokmanya Tilak (T) Special
दिनांक १६/०४/२०२३ ते ३०/०४/२०२३ दरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार,गुरुवार आणि रविवार या दिवशीं ही गाडी थिवीम स्थानकावरुन संध्याकाळी १६:०४ वाजता सुटेल आणि पहाटे ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
Konkan Railway News:कोकण रेल्वेने ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांमधील तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिन देण्यात येणार असल्याची माहिती कोकणरेल्वेने दिली आहे. याआधी मंगलोर, कन्याकुमारी, नेत्रावती, राजधानी एक्स्प्रेस, दुरोतो, एर्नाकुलम या गाड्यांसाठी ही सुविधा वापरली जात होती.
कोकण रेल्वेतील तिकीट परीक्षकांना (टीटीई) कागदावर छापलेला आरक्षण तक्ता बाळगावा लागणार नाही. आरक्षण स्थिती तपासण्यासाठी आणि पुढील आरक्षण स्थितीची माहिती देण्यासाठी, तिकीट तपासण्यासाठी आणि सीट वाटप करण्यासाठी आता कागदी तक्त्याची गरज भासणार नाही. या मशिन रेल्वे सर्व्हरशी जोडल्या जाणार आहेत. ज्यामध्ये एक 4G सिम कार्ड असणार आहे. याद्वारे तिकीट, सीट संदर्भातील प्रत्येक अपडेट कळण्यास मदत होणार आहे.
एचएचटी उपकरण हे रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. एचएचटी उपकरणात फक्त एका क्लिक वर किती रिकाम्या सीट आहेत याची माहिती होणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीच्या आणि RAC च्या प्रवाशांना तिथे सीट मिळणे शक्य होणार आहे.
एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिनची वैशिष्ट्ये
रेल्वे सुटल्यानंतर, कोणतेही तिकीट रद्द झाल्यास, पर्यवेक्षकांना माहिती मिळेल.
Konkan Railway News: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १४ एप्रिलपासून अतिरिक्त व्हिस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे.
कोकणात जाताना लागणारे धबधबे , नद्या, दऱ्या, बोगदे, हिरवीगार शेतं यांचे विहंगम दृश्य व्हिस्टाडोममधून बघत प्रवास करणे लोकांच्या जास्त पसंतीस उतरले आहेत. त्यामुळेच तेजसला व्हिस्टाडोमचा अतिरिक्त डबा लावण्याची मागणी वाढली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. या बदलानंतरतेजस एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच, ११ एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आणि दोन लगेज कोच आणि एक जनरेटर-कम-ब्रेक व्हॅन अशी रचना असेल.
मध्य रेल्वेने २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा विस्टाडोम कोच जोडला . प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये दुसरा विस्टाडोम जोडला. विस्टाडोम डब्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडण्यात आला. त्यानंतर डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस ,पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात आला.
व्हिस्टाडोम कोचमध्ये एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, विद्युतीयरित्या चालणारे स्वयंचलित स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे, विशेष दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे आणि सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली शौचालये हि वैशिष्ट्ये आहेत. तीन बाजूंना मोठ्या काचेच्या खिडक्या असलेली व्ह्यूइंग गॅलरी हे या डब्यांचे सर्वात मोठे आकर्षण आहे, रेल्वे अधिकार्यांच्या मते, आणि प्रवाशांना त्यातून छायाचित्रे आणि सेल्फी काढणे आवडते.
Konkan Railway News: कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने उन्हाळी हंगामादरम्यान मुंबई पुण्यावरून अजून काही अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यआधी पण या मार्गावर काही विशेष गाड्या सोडल्या आहेत त्यात या अतिरिक्त गाड्यांमुळे भर पडणार आहे.
दिनांक १५/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन रात्री ०१:१० वाजता सुटेल आणि दुपारी १४:३५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01456 Karmali – Lokmanya Tilak (T)
दिनांक १५/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी वरुन संध्याकाळी करमाळी स्थानकावरून १६;२० वाजता सुटेल आणि पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
2) Train No. 01049 Pune Jn. – Ernakulam Jn. Superfast & Train No, 01050 Ernakulam Jn. – Pune Jn. Special (Weekly):
Train No. 01049 Pune Jn. – Ernakulam Jn. Special (Weekly):
दिनांक १३/०४/२०२३ ते २५/०५/२०२३ दरम्यान दर गुरुवारी ही गाडी पुणे या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १८:५० वाजता एर्नाकुलम या स्थानकावर पोहोचेल.
Train No, 01050 Ernakulam Jn. – Pune Jn. Special (Weekly):
दिनांक १४/०४/२०२३ ते २६/०५/२०२३ दरम्यान दर शुक्रवारी ही गाडी एर्नाकुलम या स्थानकावरुन रात्री २३:२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ०२:४५ वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – 06 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 22 LHB डबे
आरक्षण
गाडी क्र. ०१४५६ करमाळी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीचे आरक्षण दिनांक १०/०४/२०२३ रेल्वेच्या सर्व टिकेट्स खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर खुले होणार असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Konkan Railway News :प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोंकण रेल्वेमार्गावर पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने उधना ते मंगुळुरु दरम्यान एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचे आरक्षण आज दिनांक 10/04/2023 पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि सर्व अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर खुले होणार आहेत.
Train no. 09057 / 09058 Udhana Jn – Mangaluru Jn – Udhana Jn Weekly Special on Special Fare
Train no. 09057 Udhana Jn – Mangaluru Jn
ही गाडी दिनांक १२ एप्रिल ते ०७ जून पर्यंत दर बुधवारी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058 – Mangaluru Jn – Udhana Jn
ही गाडी दिनांक १३ एप्रिल ते ०८ जून पर्यंत दर गुरुवारी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५ वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09057 Udhana Jn – Mangaluru Jn या गाडीचे आरक्षण आज दिनांक 10/04/2023 पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि सर्व अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.
Konkan Railway News | मंगळुरू ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस अशी वन-वे सुपरफास्ट विशेष गाडी शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी सोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०६००७ मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) वन वे सुपरफास्ट स्पेशल मंगळुरू जंक्शन येथून 08/04/2023, शनिवार रोजी 18:10 वाजता सुटणार असून ती ट लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी 13:15 वाजता पोहोचेल.
ही गाडी एकूण 19 कोचसह धावणार आहे. टू टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 01 कोच, स्लीपर – 06 कोच, जनरल – 09 डबे, SLR – 02. अशा डब्यांच्या रचनेसह धावणार आहे.
Konkan Railway News | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला प्रत्येकी एका फेरीसाठी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा मडगाव या गाडीला हापा येथून सुटताना 05 एप्रिल रोजी तर मडगाव ते हापा दरम्यान धावताना 07 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडला जाईल. याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेलीदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला पोरबंदर येथून सुटताना 06 एप्रिल रोजी तर कोचुवेली येथून सुटताना 09 रोजी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे. रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास या मार्गावरील सर्वच गाड्या आता विद्युत इंजिनसह धावत आहेत. विद्युत इंजिनामुळे इंधनावर होणार्या खर्चावर मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे या वाचणार्या पैशांतून या मार्गावरील विकासाची कामे करणे रेल्वेला शक्य होणार आहे. त्याशिवाय डिझेल इंजिनामूळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण टाळता येणार आहे.
पण या विद्युतीकरणामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या मार्गावरील अनेक गावे रेल्वेरूळा मुळे दोन भागात विभागली आहेत. घर रूळाच्या एका बाजूला तर शाळा आणि शेती एका बाजूला. त्यामुळे रूळ ओलांडल्या शिवाय गावकर्यांकडे पर्याय नाही आहे. कारण या मार्गावर पलीकडे जाण्यासाठी ब्रिज नाही आहेत. असले तरी ते खूप अंतरावर आहेत. याआधी गाड्या डिझेल इंजिनावर धावत होत्या त्यामुळे गाड्यांचा मोठा आवाज येत असे. या आवाजामुळे ग्रामस्थ किंवा वन्य प्राणी सावध होत असत. पण आता त्याप्रमाणात आवाज येत नाही त्यामुळे रूळांवर अपघात वाढत असल्याचे दिसत आहेत. वन्य आणि पाळीव प्राणी तसेच नागरिकांचा बळी जाण्याच्या बातम्या आजकाल मोठ्या प्रमाणावर ऐकण्यास मिळत आहेत.
वन्यप्राणी रूळांवर येवू नये यासाठी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस कुंपण बांधणे गरजेचे आहे. व्यवहार्य दृष्टीने पाहता सर्वच ठिकाणी पादचारी पूल बांधणे शक्य नाही पण ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रूळ ओलांडले जाते अशा ठिकाणी असे पूल किंवा भुयारी मार्ग बांधणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग– कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकातून सुटणारी ट्रेन क्र. ११००३ दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यास कोकण रेल्वेने मंजुरी दिली आहे. या बदलामुळे प्रवाशांचा जवळपास १ तास वाचणार आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक कोकण प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.सध्या ही गाडी सावंतवाडी रोड मळगाव स्थानकातून सायंकाळी ७ वाजून १० ( १९.१०) मिनिटांनी निघत आहे. या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यात येत असून ती रात्री ८ वाजता निघणार आहे.
1) गाडी क्र. 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस चे वेळापत्रक
2) गाडी क्र. 11003 दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस च्या वेळापत्रकात जास्त बदल झालेले नाही आहेत. ही गाडी सावंतवाडी स्थानकावर येण्याच्या वेळेत बदल झाला आहे. ही गाडी १०.४० च्या जागी १०.२५ ला पोहोचणार आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Konkan Railway News:उन्हाळी सुट्टीकरिता गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने उन्हाळी हंगामादरम्यान काही अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पुणे-सावंतवाडी, पनवेल- सावंतवाडी,पनवेल-करमाळी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 01211 / 01212 Pune Jn. – Sawantwadi Road – Pune Jn. Special (Weekly):
Train no. 01211 Pune Jn. – Sawantwadi Road Special (Weekly)
दिनांक ०२/०४/२०२३ ते ०४/०६/२०२३ दरम्यान दर रविवारी ही गाडी पुणे या स्थानकावरुन रात्री २१:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01212 Sawantwadi Road – Pune Jn.Special (Weekly)
दिनांक ०५/०४/२०२३ ते ०७/०६/२०२३ दरम्यान दर बुधवारी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी १०:१० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:५५ वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01216 Sawantwadi Road – Panvel Special (Weekly)
दिनांक ०३/०४/२०२३ ते ०५/०६/२०२३ दरम्यान दर सोमवारी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी १०:१० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २० :३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01215 Panvel – Sawantwadi Road Special (Weekly)
दिनांक ०४/०४/२०२३ ते ०६/०६/२०२३ दरम्यान दर मंगळवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २१:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०३/०४/२०२३ ते ०५/०६/२०२३ दरम्यान दर सोमवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २१:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01214 Karmali – Panvel Special (Weekly)
दिनांक ०४/०४/२०२३ ते ०६/०६/२०२३ दरम्यान दर मंगळवारी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २०:३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01463 Lokmanya Tilak (T) – Kanniyakumari Special (Weekly)
दिनांक ०६/०४/२०२३ ते ०१/०६/२०२३ दरम्यान दर गुरुवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या स्थानकावरुन संध्याकाळी १६:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २३:२० वाजता कन्याकुमारी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01464 Kanniyakumari – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
दिनांक ०८/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी कन्याकुमारी या स्थानकावरुन दुपारी १४:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१ :५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 17 डबे
आरक्षण
गाडी नंबर 01211 , 01216 ,01213 या गाड्यांचे आरक्षण दिनांक ३१/०३/२०२३ रोजी रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर चालू होतील असे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.