Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वे मार्ग विद्युतीकरण – अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज

संग्रहित फोटो
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे. नाण्याची दुसरी बाजू अशी की विद्युतीकरणामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा आवाज येत नाही. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना नागरिकांचा किंवा प्राण्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हे अपघात टाळण्यासाठी  जे गाव रेल्वे ट्रॅकच्या लगत आहेत अशा गावांना रेल्वे प्रशानाने जाळी बसवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
या आधी गाड्या डिजेल इंजनवर चालायच्या. त्यामुळे त्याचा आवाज मोठा असायचा पण आता आवाज कमी येतो. रेल्वे चालक हॉर्न वाजवतात पण त्यावर पण काही मर्यादा येतात.  रेल्वे पटरीवरून जाते वेळी व येते वेळी विजेवर चालणाऱ्या ट्रेनचा आवाज येत नसल्यामुळे नागरिक व गुरा घोरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

Loading

बयाणा येथे मध्यरेल्वेचा विशेष ब्लॉक; कोंकणरेल्वे मार्गावरील ‘या’ गाड्या रद्द

Konkan Railway News:बयाणा येथे होणाऱ्या  प्री-नॉनइंटरलॉक,नॉनइंटरलॉक कार्यसाठी मध्य रेल्वेने एक विशेष  ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक साठी या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. या ब्लॉकमुळे कोंकणरेल्वे मार्गावरील खालील दर्शवलेल्या गाड्या दिलेल्या दिवशी रद्द करण्यात आलेल्या आहेत.
  • 22655 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक २२/०२/२०२३
  • 22656 – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक २४/०२/२०२३
  • 22633 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, २२/०२/२०२३
  • 22634 – कोयंबटूर एक्सप्रेस, २४/०२/२०२३
  • 22653 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, २५/०२/२०२३
  • 22654 – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस,  २७/०२/२०२३
   

Loading

प्रवाशांना खुशखबर; नागपूर-मडगाव या विशेष गाडीला मुदतवाढ

Konkan Railway News:प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत चालविण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला जुलै -२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.

 

नियमित वेळापत्रक

01139/Nagpur – Madgaon Bi-weekly Special 
आठवड्यातून दर बुधवार आणि शनिवारी धावणारी हि गाडी २५/०२/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती ती ०७ जून २०२३ पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. 

01140/Madgaon – Nagpur Bi-weekly Special 
आठवड्यातून दर शुक्रवार आणि रविवारी धावणारी हि गाडी २६/०२/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती ती ०८ जून २०२३ पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.

पावसाळी वेळापत्रक

या गाड्या १० जून २०२३ ते ०२ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहेत. 

01139/Nagpur – Madgaon Bi-weekly Special 
ही गाडी १० जून २०२३ ते ०१ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार गाडी नागपूर स्थानकावरून दुपारी १५:०५ ला निघेल ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:४५ ला मडगाव स्थानकावर पोहोचेल.

01140/Madgaon – Nagpur Bi-weekly Special 
ही गाडी ११ जून २०२३ ते ०२ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार हि गाडी मडगाव स्थानकावरून संध्याकाळी १९:०० वाजता निघेल ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:३० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, शेंगाव, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवीम तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

या गाडीला 2 Tier AC – 01,  3 Tier AC – 04,  Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत. 

अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आलेले आहे.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

Loading

खुशखबर! कोकण रेल्वेमार्गावरील ‘या’ विशेष गाडीचा जून -२०२३ पर्यंत विस्तार…..

संग्रहित फोटो

KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा जून -२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.

02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special

आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३१/०३/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०२ जून २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.

02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special

आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०३/०४/२०२३  पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०५ जुन २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.

या गाड्यांचे मडगावपर्यंत कोकणातील थांबे 

  1. पनवेल,रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,कुडाळ, थिवीम, मडगाव

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्ग; घोडे नेमके अडले कुठे?

सिंधुदुर्ग | मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वे जोडणारा प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मागील दहा वर्षांपासून रखडला आहे.  या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली असून त्याचा समावेश 2011-12 च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला होता. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही सादर केला होता. प्रस्तावित  सर्वेक्षणानुसार कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग व्यवहार्य असल्याची नोंद आहे.  मात्र त्यावर अद्याप कोणतेही काम झालेले नाही. हा रेल्वे मार्ग झाल्यास हा 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे.
काय आहेत अडथळे?
या मार्गाचे काम कठीण असले तरी कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यास वेळ लागणार नाही. कारण असे कठीण कामे कोकण रेल्वे मंडळाने या आधी केली आहेत. पण हा  प्रकल्प कोकण रेल्वेकडे न देता मध्य रेल्वेमार्फत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.  सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे निधीचा. या मार्गास रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य शासनाकडून निधी मंजूर होत नाही आहे.२०१७ च्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३४३८.४९ कोटी एवढा आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के निधी रेल्वे मंत्रालय आणि उर्वरित महाराष्ट्र सरकार देणार आहे. २०१६ च्या अर्थसंकल्पातील  २५० कोटीची तरतूद वगळता अजूनपर्यंत कोणतीही तरतूद त्या पुढच्या अर्थसंकल्पात केली गेली नाही आहे.  निधीअभावी फक्त सर्वेक्षण वगळता कोणतेही काम चालू झाले नाही आहे. या मार्गाकरिता  683 हेक्टर भूसंपादन गरजेचे आहे, पण अजूनपर्यंत काहीच भूसंपादन झाले नाही आहे. २०१८ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कामास गती देण्याचा प्रयत्न केला गेला होता. २०२२ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण त्यानंतर काहीच प्रगती झाली नाही. मिळाल्या फक्त पुढच्या तारखा!
या रेल्वेमार्गाचा फायदा 
कोल्हापूर आणि कोकणातील उद्योग, व्यापार वाढीच्यादृष्टीने हा रेल्वेमार्ग उपयुक्त आहे. 107 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या या तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. कोल्हापुरातील शेती व इतर पूरक उत्पादने बाय रोड पाठवायची ठरवल्यास प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. येथील कंटेनरना न्हावाशेवा बंदरामध्ये चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्याचे भाडे भरावे लागते. मात्र हाच माल जयगडच्या बंदरापर्यंत रेल्वेने पोहचवला तर तो लवकर पाठवता येऊ शकेल. त्याचबरोबर या बंदराचा दुहेरी फायदाही होऊ शकतो. या बंदरावर कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लँटमध्ये १५ टक्के कोळसा वापरता येऊ शकतो. तसेच येथील इंडस्ट्रिजसाठीही हा कोळसा मिळू शकेल. सध्या कोल्हापुरात आणण्यात येणारा कोळसा ट्रक वाहतुकीने कारखान्यांपर्यंत आणणे प्रचंड खर्चिक आहे. रेल्वेचा हा नवीन मार्ग सुरु झाल्यास आयात व निर्यात व्यवसायासाठी मोठा फायदा होऊ शकतो. कमी खर्चामध्ये ही वाहतूक होऊ शकते.

Loading

नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस आजपासून ‘या’ तारखेपर्यंत पनवेलपर्यंत धावणार….

मुंबई : लोकमान्य टिळक स्टेशन येथील ७ नंबरच्या रेल्वे वॉशिंग पिट लाईनच्या दुरुस्तीसाठी मध्यरेल्वे एक ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ दरम्यान ३५ दिवसांसाठी असेल. या ब्लॉक मुळे कोंकणरेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या दोन गाड्या पनवेल पर्यंत चालविण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे 

16346 – तिरुअनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावर संपेल.

16345 – लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१२:४५) सुरू होईल.

12620 – मंगळूरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ पनवेल स्थानकावर संपेल.

12619 –लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूरु सेंट्रल  मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१६:२२) सुरू होईल.

(हेही वाचा >शिगमोत्सवासाठी कोंकणरेल्वेची चेअर कार विशेष गाडी…आरक्षण १४ फेब्रुवारी पासून सुरु…)

 

Loading

मंगला एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना; जाणून घ्या कोंकण रेल्वेमार्गावरील इतर गाड्यांची सध्याची स्थिती

 

संग्रहित फोटो

KR News 12/02/23  2:45 PM : :दिवाणखवटी स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्यामुळे कोकणरेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगला एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडून तिला मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.

सध्या हातात आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

गाडीचे नाव स्थानक  वेळ  विलंब
NGP-MAO SPECIAL KADAVAI 14:36 05:10
MRDW-YPR EXP SPL KUNDAPURA 14:35 00:00
CSMT-MAO MANDOVI EXPRESS SGMSHVR 14:28 01:52
MAO-CSMT MANDOVI EXPRESS BHOKE 14:32 00:00
DIVA SWV EXPRESS BHOKE 14:34 00:35
SWV DIVA PASS SAVARDE 14:40 01:40
PUNE-ERS POORNA EXPRESS ANKOLA 14:28 00:00
MAO-LTT EXP VERNA 14:22 01:21
NZM-ERS MANGALA LKSDP EXP KUDAL 14:35 00:31
KCVL-SGNR EXP ADAVALI 14:36 00:00
LTT-TVC NETRAVATI EXP INDAPUR 14:40 00:08
MAO-NZM RAJDHANI EXPRESS SGMSHVR 14:28 00:09

Updated on 14:45

Loading

कोकण रेल्वची वाहतूक विस्कळीत. मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड

संग्रहित फोटो

KR News 12/02/23  1:10 PM : दिवाणखवटी स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्याने २ तासापासून गाडी उभी आहे त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या अन्य गाड्याच्या वेळापत्रकावर परिमाण झाला आहे. नवीन इंजिन आणून वाहतुक पूर्ववत करण्यासाठी कोंकण रेल्वेचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

(Also Read > वारिसे प्रकरण आणि संतापलेला ‘रानमाणूस’ )

सध्या हातात आलेल्या माहितीनुसार मडगावच्या दिशेने जाणाऱ्या खालील गाड्या उशिराने धावत आहेत…
10103 – मांडवी एक्सप्रेस – करंजाडी येथे आहे
10105 – सावंतवाडी दिवा एक्सप्रेस – अंजनी स्थानकावर उभी आहे

Loading

शिगमोत्सवासाठी कोंकणरेल्वेची चेअर कार विशेष गाडी…आरक्षण १४ फेब्रुवारी पासून सुरु…

Konkan Railway News 10/02/2023 : होळी सणाकरिता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या साहाय्याने या मार्गावर एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  
Train no. 09193 Surat – Karmali Superfast / 09194 Karmali – Surat Special on Special Fare (Weekly): 
ही गाडी सुरत आणि करमाळी ह्या स्थानकांदरम्यान विशेष शुल्कासह यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 09193 Surat – Karmali Superfast Special on Special Fare (Weekly): 
दिनांक ०७/०३/२०२३ मंगळवारी  ही गाडी सुरत या स्थानकावरुन संध्याकाळी  १९:५०  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:२५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09194 Karmali – Surat Superfast Special on Special Fare ( Weekly)
दिनांक ०८/०३/२०२३ रोजी  बुधवारी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन संध्याकाळी  १६:२०  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता सुरत  या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वापी, वलसाड, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,   कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम,
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 14 + एसी चेअर कार – 01 असे मिळून एकूण 17   डबे
आरक्षण 
गाडी क्र. 09194 या गाडीचे आरक्षण १४/०२/२०२३ पासून सर्व टिकेट्स खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 
वेळापत्रक
Sr. No. Station Name Train. No.9193 ⇓ Train No.9194 ⇑
1 SURAT 19:50 08:00
2 VALSAD 20:50 07:05
3 VAPI 21:12 06:38
4 PALGHAR 22:19 04:58
5 VASAI ROAD 23:10 04:15
6 BHIWANDI ROAD 23:40 03:00
7 PANVEL 00:50 Next Day 02:15
8 ROHA 02:20 01:15
9 MANGAON 02:53 00:02 Next Day
10 KHED 04:00 22:40
11 CHIPLUN 04:20 21:38
12 SAVARDA 04:40 21:16
13 ARAVALI ROAD 04:52 21:04
14 SANGMESHWAR 05:06 20:46
15 RATNAGIRI 06:00 20:00
16 ADAVALI 06:34 19:20
17 VILAVADE 06:48 19:04
18 RAJAPUR ROAD 07:10 18:44
19 VAIBHAVWADI RD 07:24 18:30
20 NANDGAON ROAD 07:42 18:12
21 KANKAVALI 07:56 17:56
22 SINDHUDURG 08:12 17:42
23 KUDAL 08:26 17:30
24 SAWANTWADI ROAD 09:00 17:08
25 THIVIM 09:24 16:38
26 KARMALI 10:25 16:20
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.inga या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. 

Loading

दिवा-सावंतवाडी या गाडीसह अजून १२ गाड्या विद्युत इंजिनावर धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे १००% विद्युतीकरण करण्याचा निर्धार केला गेला आहे. याआधी बहुतेक गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून दिवा सावंतवाडी या गाडीसह एकूण १२ गाड्या विद्युत इंजिनासह चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील गाड्या विद्युत इंजिनासह चालविण्यात येणार आहेत.

अनु. क्र.गाडीचा नंबर आणि नाव या तारखेपासून
1 Train no. 12223 Lokmanya Tilak (T) - Ernakulam Jn. (Bi-Weekly) Express 14/02/2023
2 Train no. 12224 Ernakulam Jn. - Lokmanya Tilak (T) (Bi-Weekly) Express 15/02/2023
3 Train no. 22150 Pune Jn. - Ernakulam Jn. (Bi-Weekly) Express 15/02/2023
4 Train no. 22149 Ernakulam Jn. - Pune Jn. (Bi-Weekly) Express 17/02/2023
5 Train no. 11099  Lokmanya Tilak (T) - Madgaon Jn. (04 days a week) Express 18/02/2023
6 Train no. 11100 Madgaon Jn. -  Lokmanya Tilak (T) (04 days a week) Express 18/02/2023
7 Train no. 12133 Mumbai CSMT - Mangaluru Jn. (Daily) Express 16/02/2023
8 Train no. 12134 Mangaluru Jn.- Mumbai CSMT (Daily) Express 17/02/2023
9 Train no. 10105 Diva - Sawantwadi Road (Daily) Express 12/02/2023
10 Train no. 10106 Sawantwadi Road - Diva (Daily) Express 13/02/2023
11 Train no. 50107 Sawantwadi Road - Madgaon Jn. (Daily) Passenger 12/02/2023
12 Train no. 50108 Madgaon Jn. - Sawantwadi Road (Daily) Passenger 13/02/2023

(Also Read > रत्नागिरीकरांचा एसटी प्रवास होणार आरामदायक… बीएस ६ प्रणालीच्या २१ बस आगारात दाखल..)

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search