Category Archives: कोकण रेल्वे




कोल्हापूर: बेळगाव-चंदगड सावंतवाडी रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालीन. रेल्वे मंत्र्यांना लवकरच भेटून निधी आणण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खा. धनंजय महाडिक यांनी बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
बेळगाव-चंदगड, सावंतवाडी रेल्वे हा रेल्वे मार्ग ११४.६ कि.मी.चा असून जवळपास १८०५ करोडचा खर्च अपेक्षित आहे. या रेल्वे मार्गाचा सर्व्हे रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या रेल्वे मार्गामुळे चंदगड, आजरा व गडहिंग्लज या तालुक्याचा विकास अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण विभाग रेल्वे मार्गाने देशाशी जोडला जाईल. या संदर्भात कोल्हापूर, बेळगावचे खासदार यांना प्रत्यक्ष भेटून संघर्ष समितीने निवेदने दिली आहेत.
खा. महाडिक यांना नेसरी येथे बेळगाव, चंदगड, सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विजयकुमार दळवी, भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर, चंदगड पंचायत समितीचे माजी सभापती बबनराव देसाई, संघर्ष समितीचे सरचिटणीस रवी नाईक, एकनाथ वाके आदी उपस्थित होते.
Short Termination of Trains at Thane & Dadar station. pic.twitter.com/aHbXddaILw
— Konkan Railway (@KonkanRailway) January 1, 2025
नागपूर येथून मडगावला जाताना ही गाडी (गाडी क्र. ०११३९) दुपारी १२.५६ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल, तर मडगाव वरून नागपूर येथे जाताना (गाडी क्र. ०११४०) रात्री २१.४८ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल.




Special Trains: नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी हजरत निजामुद्दीन आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल या दरम्यान चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०४०८२/०४०८१ हजरत निजामुद्दीन -तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल:
गाडी क्रमांक ०४०८२ हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस २८ डिसेंबर २०२४ (शनिवार) रोजी हजरत निजामुद्दीन येथून १९.२० वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी १९.४५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४०८१ तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस तिरुअनंतपुरम सेंट्रलवरून ३१ डिसेंबर २०२४ (मंगळवार) रोजी ०७.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.
डब्यांची रचना: एसी टू टायर कोच -०५ , एसी थ्री टायर कोच- १० , जनरल सेकंड क्लास कोच-०२ , सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन) -०१ आणि लगेज कम ब्रेक व्हॅन- ०१
या गाडीला कोकणात पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी या मोजक्याच स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे.
या गाडीच्या वेळा आणि थांब्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत
या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक २५ डिसेंबर रोजी सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.




मुंबई: आजची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते पनवेल दरम्यान तिच्या नियमित मार्गावरून वळविण्यात आली. या कारणाने पुढे तिचा गोव्याला जाणारा प्रवास ९० मिनिटे उशिराने झाला.
कोकणात जाणारी ही गाडी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकाकडे जाण्याऐवजी सकाळी ६:१० वाजता कल्याण मार्गावरून निघाली.
या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील मुंबई लोकल सेवेवरही परिमाण झाला आणि या दरम्यानच्या लोकल गाड्यांनी लेटमार्क लावला.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिवा जंक्शनवरील कोकणात जाणार्या गाड्यांचा मार्गावर म्हणजे डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.
ट्रेनने नियोजित मार्गावरून मार्ग बदलल्यानंतर, ती कल्याण स्टेशनला रवाना झाली आणि दिवा जंक्शनवर परत फिरविण्यात आली आणि दिवा-पनवेल मार्गावर मडगावकडे परत प्रवास सुरू केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नीला म्हणाले की, सकाळी ६:१० ते ६:४५ पर्यंत कल्याणकडे जाण्यापूर्वी ही गाडी दिवा जंक्शनवर सुमारे ३५ मिनिटे थांबली होती.
जून २०२३ मध्ये सुरू झालेली प्रीमियम सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून सकाळी ५:२५ वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.




पणजी: जैसलमेर येथे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यासाठी ९ हजार ७०० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याची मागणी नोंदविली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, पश्चिम घाटाचे संवर्धन आणि राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटकांसाठी त्यांनी सहाय्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासाठी गोवा राज्यातर्फे त्यांनी निवेदन सादर केले आहे.
रेल्वेसाठी ५ हजार कोटींचे साकडे
कोकण रेल्वे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना (मंगळूर ते मुंबई) जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे दुहेरीकरण काही भागांतच पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपयांचे विशेष साहाय्य मंजूर करावे. जुने गोवे तसेच पेडणे येथे १९९२-१९९७ दरम्यान बांधलेल्या जुन्या बोगद्यांची स्थिती धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सलग संपर्कासाठी नवीन बोगद्यांच्या बांधणीसाठी दीड हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे अत्यावश्यक बनले आहे. सध्या वीर ते मडगाव दरम्यान एकपदरी मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी असूनही गाड्या वाढविणे शक्य होत नाही. याचा परिमाण कोकण आणि गोवा राज्याच्या विकासावर पर्यटनावर होत आहे. या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र अजूनपर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला नेहमीच डावलले गेले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी आता लोकप्रतिनिधींकडून आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. केंद्राची आणि चार राज्याची भागीदारी असलेल्या कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला गोवा राज्याने या आधीच आपली संमत्ती दर्शवली आहे.