Category Archives: कोकण रेल्वे
कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या म्हैशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती.या घटनेमुळे आधीच विस्कटलेले रेल्वेचे रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशींचे मृतदेह बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
Konkan Railway News :काल पनवेल स्थानकाजवळ झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे या मार्गावरून जाणार्या एक्सप्रेस गाड्यांची वाहतुक विस्कळीत झाली आहे. अजून पर्यंत या मार्गावरील वाहतुक विस्कळित असून ती पूर्वपदावर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीन डबे या मार्गावरून बाजूला करण्याचे काम चालू आहे.
या अपघातामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत तसेच काही गाड्या अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत.
मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.
शनिवारी रात्री सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस आज पहाटे सुटणार होती. मात्र तिला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1) दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 10103 CSMT-madgaon mandvi exp
2) दिनांक 30/09/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 01165 LTT mangluru exp, JCO 30/9/23
3) आज दिनांक 01/10/2023 रोजी प्रवास सुरू करणारी 01171 CSMT Sawantwadi exp-
पुणे मिरज मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या
1) दिनांक 30/09/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 12133 CSMT Mangluru exp-
2)दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 12051 CSMT Madgoan Janashatabdi Exp.
आरंभ स्थानकावरून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेल्या गाड्या.
काल दिनांक 30/09/2023 रोजी प्रवास सुरू करणारी 20111 CSMT Madgaon exp आज सकाळी 11:05 वाजता आपला प्रवास सुरू करेल.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1)दिनांक 01/10/2023 रोजी सुटणारी 01151 CSMT Madgaon exp- पनवेल या स्थानकावरून सुटेल.
2)दिनांक 30/09/2023 रोजी प्रवास सुरू केलेली 01172 Sawantwadi CSMT exp ही गाडी आपला पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.
Konkan Railway News :गणेशोत्सवासाठी कोकणात गावी गेलेल्या गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी उद्यापासून एकूण 6 विशेष मेमू सेवा चालविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मडगाव ते पनवेल सेवा
1)गाडी क्रमांक 07104 मडगाव – पनवेल ही विशेष गाडी उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मडगाव या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे.
2)परतीच्या प्रवासात ही गाडी सोमवार दिनांक 02 ऑक्टोबर रोजी पनवेल या स्थानकावरून रात्री 21:10 वाजता निघून दुसर्या दिवशी सकाळी 09:30 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचणार आहे.
खेड ते पनवेल सेवा
3)गाडी क्रमांक 07106 खेड – पनवेल विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर या दिवशी दुपारी 15:15 वाजता खेड या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)
4)गाडी क्रमांक 07105 पनवेल – खेड विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या दिवशी रात्री 21:10 वाजता पनवेल या स्थानकावरून निघणार असून रात्री 01:10 वाजता खेड या स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)
या गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून एकूण 8 कोचसहित चालविण्यात येणार आहेत.
Kokan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिलेत. दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच चालविण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.
कर्नाटकच्या किनारपट्टीवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसल्याचे कटील यांनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. मंगळुरु आणि गोवा दरम्यानच्या किनारपट्टीचा भाग देशाच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण आहे. हा प्रदेश निसर्गसौंदर्य, समृद्ध वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखला जातो. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर या भागात कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही कटील यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळुरू रेल्वे क्षेत्राचा दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर रेल्वे विभागाच्या प्रशासकीय आणि प्रादेशिक अधिकारक्षेत्रात समावेश करण्याची विनंती खासदार कटील यांनी वैष्णव याना केली होती. मंगळुरू रेल्वे क्षेत्राला दक्षिण रेल्वेने सावत्र वागणूक दिल्याने त्याचा पुरेसा विकास झालेला नाही, असेही कटील म्हणाले.
ही वंदे भारत एक्सप्रेस चालू झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा विस्तार होणार आहे. तसेच ही एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे. यापूर्वी मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात आली आहे.