konkan Railway News :कोंकण रेल्वेमार्गावर धावणारी अजून एक गाडी आता आरामदायक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) सहित धावणार आहे. १९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर हि गाडी २० डिसेंबर पासून नव्या लाल, पांढऱ्या रूपासह रुळावर धावताना दिसणार आहे. सध्या हि गाडी IRS डब्यांसहित चालवली जात आहे.
ह्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत पण खालीलप्रमाणे बदल केला आहे.
जनरेटर कार – ०१ + एसलआर – ०१ + सेकंड सीटिंग – ०३ + स्लीपर – ०८ + थ्री टायर एसी – ०६ + टू टायर एसी – २ + पॅन्टरी कार – ०१ असे मिळून एकूण २२ डबे
ह्या गाडीचे मडगाव पर्यंतचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थिवीम आणि मडगाव
एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोच ची वैशिष्ट्ये
LHB Coach
एलएचबी कोच प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रशस्त असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित असतात.
मजबूत आणि वजनाने हलके असल्यामुळे गाडीचा वेगही वाढतो.
इतर कोचच्या तुलनेत एलएचबी कोचची लांबी ही १.५ मी. जास्त असल्याने त्यात स्लीपर आणि थ्री टायर एसी डब्यात ८ बर्थ जास्त बसतात तर टू टायर एसी डब्यात ४ बर्थ जास्त बसतात. त्यामुळे अधिक प्रवासी क्षमता.
अधिक सुरक्षित- अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाही त्यामुळे कमी हानी होते.
Konkan Railway News:डिसेंबर महिन्यातील पर्यटन हंगाम, कोकणातील जत्रेला जाणाऱ्या कोकणवासीयांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01427 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.
Konkan Railway News : पर्यटनाचा हंगाम, तळकोंकणातील जत्रेचा हंगाम तसेच कोकण मार्गावरील गाडयांना गर्दी होत असल्याने कोंकण रेल्वेने ह्यावर उपाय म्हणून कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक माहितीसाठी ww.enquiry.indianrail.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्यात यावी. प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.
Konkan Railway News :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे, अनेक ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने ह्या महामार्गाने वाहतूक करणे खूपच गैरसोयीचे झाले आहे. ह्या सर्वात कोकणातील उद्योजकांना कोकण रेल्वेने एक दिलासादायक बातमी दिली आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरापासून रत्नागिरीपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कंटेनर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत असा दृष्टिकोन रेल्वेने ठेवला असून पहिली कंटेनर ट्रेन २९ नोव्हेंबर २०२२ रोजी रत्नागिरी स्थानकातून सोडण्यात येणार आहे. या सुविधेचा व्यापाऱ्यांकडून लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून केले गेले आहे. ह्या सुविधेंचा लाभ कोकणातील स्थानिक उद्योजकांना होणार आहे. मालाची वाहतूक अधिक वेगवान आणि कमी खर्चात करण्यासाठी ह्या सेवेचा लाभ घेता येईल. कोकणात उत्पादित उत्पादने मुंबईतील जेएनपीटी बंदरातून जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. येथील उत्पादनेही त्यांच्या गुणांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच जगभरात प्रचंड मागणी असते. मुंबई गोवा हायवे वाहतुकीस योग्य नाही आहे. त्यावरुन वाहतूक करताना दमछाक होते आणि वेळही अधिक लागतो. रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जेएनपीटी आणि रत्नागिरी दरम्यानचा हा प्रवास सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाने कंटेनर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमध्ये चाळीस फूट आणि वीस फूट लांबीचे कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निर्यातीसाठी वातानुकूलीत आणि कोरडे कंटेनरही यामध्ये वापरले जाणार आहेत. मालाची वाहतूक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी कोकण रेल्वेची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोकणातून होणाऱ्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
पेण: आपल्या विविध मागण्याकरिता आणि पेण रेल्वे स्थानकात सध्याच्या गैरसोयी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून आणून देण्यासाठी माझं पेण आणि रेल्वे प्रवासी सन्मान समिती तर्फे पुढील महिन्यात ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
ह्या मागण्यांमध्ये मुख्य मागणी म्हणजे ह्या स्थानकाला काही गाड्यांचे थांबे मिळवणे हि असली तरी अजून काही मागण्या आहेत. पेण तालुका हा जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून त्याची लोकसंख्या सुमारे २ लाखापेक्षा जास्त आहे. पेण तालुक्यातून मुंबई,नवी मुंबई, पनवेल, माणगाव, रोहा आणि इतर ठिकाणी नोकरी, शिक्षण तसेच व्यापाराच्या कारणासाठी नियमित प्रवास करतात. त्याचप्रमाणे काही मोठ्या कंपन्या पण तालुक्यात आहेत. सुबक मूर्तीसाठी पेण तालुका पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. हे रेल्वे स्थानक मुंबई गोवा हायवे च्या जवळ आहे. ह्या सर्व गोष्टी अनुकूल असताना पेण ह्या रेल्वे स्थानकाला रेल्वे प्रशासनाकडून योग्य सन्मान भेटत नाही आहे अशी ह्या समितीची तक्रार आहे.
१. कोरोना पूर्व काळात पेण स्थानकात थांबणारी दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५/१०१०६) ह्या गाडीला पेण, कासू, नागोठणे, रोहा येथे पूर्ववत थांबा मिळावा.
२. कोरोना काळात सामान्य Passenger गाडयांना लावलेले अधिक तिकीट दर पूर्ववत करण्यात यावेत.
३. रोहा – पनवेल – रोहा या मार्गावर मेमू गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि त्या नियमित वेळापत्रकानुसार असाव्यात.
४. पेण दिवा पेण मेमू शनिवार आणि रविवार देखील सुरु राहावी.
५ यादीतील किमान ५ एक्सप्रेस गाडयांना पेण येथे थांबा देण्यात यावा.
याचप्रमाणे स्थानकावर अतिरिक्त तिकीट खिडकी, तिकीट तपासणीस नेमण्यात यावा असे रेल्वेच्या हितासाठी काही मागण्या पण आहेत.
ह्या सर्व मागण्या दिनांक १०.१२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात नाहीतर दिनांक ११.१२.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा “माझं पेण” आणि “रेल्वे प्रवासी सन्मान समिती” ने दिला आहे.
Konkan Railway News :१२०५१/१२०५२ मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस हि चाकरमान्यांना मुंबईमधून कोकणात आणि कोकणातून मुंबईला कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवणारी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. एवढेच नाही तर ह्या एक्सप्रेस ने त्याच दिवशी कोकणात जाऊन पुन्हा मुंबईला येते असे ह्या गाडीचे वेळापत्रक आहे. सकाळी मुंबई सीएसमटी स्थानकावरून सकाळी ५.१० वाजता सुटणारी हि एक्सप्रेस मडगावला त्याच दिवशी दुपारी १४.१० ला पोचते. परतीच्या प्रवासात हि गाडी मडगाव स्थानकावरून १४.४० ला सुटून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे २३.३० ला पोहोचते. त्यामुळे ह्या गाडीला कोकणवासीयांची पहिली पसंदी आहे.
पण अलीकडच्या काही दिवसात हि गाडी नेहमीच उशिरा धावत असल्याचे दिसत आहे. कोकणातून मुंबईला येताना प्रवाशांना खूप मनस्ताप करावा लागत आहे. ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हि गाडी रात्री १.३० / २.०० च्या दरम्यान पोचत असल्याने उपनगरीय लोकल्स ने पुढचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. कारण ह्या वेळेला उपनगरीय रेल्वे गाड्या बंद असतात, त्यामुळे दूर जाणाऱ्या प्रवाशांना सकाळच्या पहिल्या ट्रेन चे प्रतीक्षा करावी लागते किंवा इतर महागड्या पर्याय निवडावा लागतो.
पावसाळी वेळापत्रक होते तेव्हा कोकण रेल्वे दोन स्वतंत्र गाड्या ह्या मार्गावर चालवीत असे, त्यामळे हि समस्या येत नसे. हि गाडी वेळेवर असे. आता १२०५१ जी गाडी दुपारी १४.१० ला पोहोचते तीच गाडी १४.४० ला १२०५२ परतीच्या प्रवासाला सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई वरून मडगाव ला जाणारी गाडी जर उशिरा गेली तर त्याचा परिणाम तेथून मुंबईसाठी सुटणाऱ्या १२०५२ गाडी वर होतो आणि उगमस्थानावरूनच हि गाडी उशिरा निघते. त्यामुळे दोन स्वतंत्र गाड्या वापरण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
Konkan Railway News :कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली आहे.यामुळे मध्यरात्रीपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सर्व गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या.
मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. कोकण रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिकऐवजी डिझेल इंजिनची उपलब्धता करून हळूहळू एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात येत आहेत. तरीही अद्यापही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानंच सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Konkan Railway News :रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख सर्व स्थानकांचे लवकरात लवकर सुशोभिकरण करण्याची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करा, तसेच कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्ते काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज शुक्रवारी दिले. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी व कणवकवली येथे सुसज्ज रेल्वे पोलिस ठाणे उभारण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचनाही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. मंत्री चव्हाण यांच्या निर्णयामुळे कोकणवासियांना मोठया प्रमाणात दिलासा मिळणार असून लवकरच कोकण रेल्वेची स्थानके व परिसराचा कायापालट होणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.
कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणा-या रस्त्यांचे मजबूतीकरण, नुतनीकरण, तसेच स्थानकांचे सुशोभिकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोकण रेल्वचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलिस अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांचे उत्कृष्टरित्या सुशोभिकरण व अत्याधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांना उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध होतात. याच धर्तीवर कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांचे सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्याच्या सुचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. तसेच, कोकण रेल्वे प्रशासनाने सुशोभिकरणासंदर्भात पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरील कोचुवेळी येथे यार्ड च्या कामा निमित्त कोकण रेल्वे मार्गावर चालणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. हे काम दिनांक ०८ डिसेंबर ते १२ डिसेंबर ह्या दरम्यान होणार आहे.
खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
गाडी क्रमांक १२२०२ दि ०८ डिसेंबर व ११ डिसेंम्बर
गाडी क्रमांक १२२०१ दि ०९ डिसेंबर व १२ डिसेंबर
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे कोकण रेल्वेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
Konkan Railway News: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या काही काही गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या Three Tier AC श्रेणीचे 2 अतिरिक्त कोच सहित चालविण्यात येणार आहे.