Category Archives: कोकण

कोकण रेल्वेमार्गावर शनिवारी धावणार एकेरीमार्गी विशेष गाडी

Konkan Railway News 18/01/2022 :कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वे मध्यरेल्वेच्या साहाय्याने कोंकण रेल्वेमार्गावर मुंबई सीएसमटी ते मडगाव दरम्यान एक एकेरीमार्गी गाडी चालवणार आहे.
Train No. 01471   Mumbai CSMT –  Madgaon  Jn. Special 
ही विशेष गाडी मुंबई सीएसमटी येथून शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री ००:२०  वाजता सुटेल ती मडगाव जंक्शन येथे दिवशी दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल.
.
ह्या गाडीचे थांबे 
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,सावंतवाडी रोड, करमाळी
डब्यांची रचना
एकूण १७  डबे =  स्लीपर – १५  +  एसलआर – ०२
या गाडीचे वेळापत्रक
Station Name Arrival Time
C SHIVAJI MAH T 00:20
DADAR 00:32
THANE 01:12
PANVEL 02:05
ROHA 03:25
KHED 04:44
CHIPLUN 05:03
RATNAGIRI 06:30
KANKAVALI 08:45
SAWANTWADI ROAD 09:20
KARMALI 10:46
MADGAON 12:15
या गाडीच्या अधिक माहितीसाठी www.enquiry indianrail.gov.in ह्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन कोकणरेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.
टीप: गाडीची वेळ रात्री ००:२० आहे. आरक्षण अर्ज भरताना आणि प्रवासाचा प्लॅन करताना त्याची नोंद घ्यावी.
या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

Loading

माघी गणेशोत्सवासाठी एसटीच्या मुंबई ते पाली दरम्यान विशेष फेऱ्या

पेण: २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून  मुंबई ठाणे ह्या शहरांतून पालीसाठी दहा जादा गाड्या सोडण्याचा  निर्णय घेतला आहे. या जादा गाड्यांसाठी प्रवाशांनी आजच आपले आरक्षण निश्चित करण्याचे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अष्टविनायकांपैकी एक स्थान असणाऱ्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी माघी गणेशोत्सवाला मोठी यात्रा भरत असते. त्यातच यंदा २५ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा होत असल्याने दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने या यावर्षी दरवर्षी पेक्षा भक्तांची जास्त गर्दी अपेक्षित आहे. याचा विचार करून एसटी महामंडळाने दहा जादा गाड्या मुंबई-ठाणे ह्या शहरातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच दहा गाड्यांव्यातिरिक्त पेण आगारातील चार बसेस, रोहा आगारातील दोन बसेस, अलिबाग आगारातील दोन बसेस आणि कर्जत आगारातील दोन बसेस अशा एकुण आणखी दहा बसेस पाली बस स्थानकातून लोकल प्रवासासाठी सज्ज ठेवण्याचा निर्णय देखील एसटी महामंडळाने घेतला आहे.

जादा गाड्यांचा प्रवाशांनी पुरेपूर वापर करून घ्यावा आणि आपले आरक्षण लवकरात लवकर निश्चित करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या आरक्षणासाठी प्रवाशांनी एमएसआरटीसी मोबाईल ॲप आणि msrtc च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन आरक्षण निश्चित करावे असे एसटी महामंडळाकडून सूचित करण्यात आले आहे.

(Also Read >महाराष्ट्रात लवकरच दिसणार आहेत महिला एसटी बसचालक….)

महामंडळाच्या जादा गाड्या

24 जानेवारी
ठाणे ते पाली (17: 00 वाजता)
मुंबई ते पाली (17:00 वाजता)
बोरिवली ते पाली (17: 00वाजता)

25 जानेवारी
ठाणे ते पाली ( 5:30 वाजता)
मुंबई ते पाली (6:00 वाजता)
बोरिवली ते पाली (6:00 वाजता)

26 जानेवारी
पाली ते ठाणे ( 15: 00 वाजता)
पाली ते ठाणे ( 16: 00 वाजता)
पाली ते मुंबई ( 17:00 वाजता)
पाली ते बोरिवली ( 18:00 वाजता)

(Also Read>चिपळूणला लोककला महोत्सवाचे आयोजन..)

Loading

चिपळूणला लोककला महोत्सवाचे आयोजन..

रत्नागिरी: चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वतीने चिपळूणमध्ये लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या लोककला महोत्सवाचा शुभारंभ सोहळा होणार आहे.

कोकणातील लोप लावत चाललेल्या सर्व प्रकारच्या लोककला, खाद्य संस्कृती आणि पर्यटन संस्कृतीचा जागर दिनांक ५ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणाऱ्या अनुभवायला मिळणार आहे.

पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत चा लोककला आणि खाद्य संस्कृतीचा समावेश देखील या लोककला महोत्सवात असणार आहे.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत लोककला महोत्सवाचे स्वागाध्यक्षपद तर संयोजन समिती अध्यक्ष म्हणून डॉ तानाजीराव चोरगे हे जबाबदारी सांभाळणार आहेत

पुढील महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोककला महोत्सवाला होणार सुरवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली

या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

 

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्लॅक पँथरचा वावर…..

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी रमाईनगर परिसरात काल काळ्या Black Panther वाघाचे दर्शन घडल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल येथील ग्रामस्थ गुरू परब आपल्या शेतात जात असताना त्यांना हा दुर्मिळ जातीचा काळा वाघ दिसला.

गेल्या वर्षी कुडाळ तालुक्यातील गोवारी ह्या गावात काळ्या वाघाचा सव्वा वर्षाचा बछडा एका विहिरीत सापडला होता. सावंतवाडी तालुक्यात या आधी पण ब्लॅक पँथर दिसून आल्याने ह्या जातीच्या वाघाचे अस्तित्त्व परिसरात निश्चित झाले आहे.

कुडाळ येथील गोवारी गावात सापडलेला काळ्या वाघाचा बछडा

Loading

कुणकेरी येथे आजपासून दशावतार नाट्यस्पर्धा

सिंधुदुर्ग : कुणकेरी येथे कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळाच्या वतीने आज दिनांक १५ जानेवारीपासून जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ७ दिवस चालणार असून त्याची सांगता शनिवार दिनांक २१ जानेवारीला होणार आहे.
ह्या स्पर्धेत संध्याकाळी ७ ते १० ह्या वेळेत खालील दशावतार नाटक कंपन्या आपले प्रयोग सादर करतील.
दिनांक  नाटक कंपनी  नाट्यप्रयोग
१५/०१/२०२२ हेळेकर दशावतार नाट्यमंडळ(कारिवडे)  भीमकी हरण
१६/०१/२०२२ अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ.(म्हापण)  कुर्मदासाची वाडी
१७/०१/२०२२ खानोलकर दशावतार नाट्यमंडळ(खानोली)  अखेरचा कौरव
१८/०१/२०२२ माउली दशावतार नाट्यमंडळ(डिंगणे)  कृती विकृती
१९/०१/२०२२ भावई दशावतार नाट्यमंडळ (कुणकेरी)  देवी करनाई महिमा
२०/०१/२०२२ चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ(चेंदवण)  महारथी कर्ण
२१/०१/२०२२ वाव्हळेश्वर दशावतार नाट्यमंडळ(तेंडोली)  वृक्षविरहित फळ

(Also Read > गोठवून टाकणार्‍या थंडीचा परीणाम कोकणरेल्वेवर..पेण नजीक रेल्वे रुळाला तडे..)

कोकणातील सण आणि उत्सवांच्या नियमित अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सएप्प ग्रुप मध्ये सामील व्हा 👇🏻

Loading

गोठवून टाकणार्‍या थंडीचा परीणाम कोकणरेल्वेवर..पेण नजीक रेल्वे रुळाला तडे..

Konkan Railway News :  राज्यातील वाढणार्‍या थंडीचा परिमाण आता कोकण रेल्वे वर होऊ लागला आहे. कोकण रेल्वेमार्गावर मडगाव पेण नजीक काल सकाळी रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग थंडीमुळे तुटल्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परीणाम झाला होता. रेल्वे कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात टळला.

(Also Read >हातिवली(राजापूर) येथील ग्रामस्थांना दिलासा….१२ किमी अंतरावरील वाहनांना टोलमाफी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेणवरून पनवेलला जाणार्‍या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना सदर प्रकार सकाळी 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान आढळला. याबाबत रेल्वे कर्मचार्‍यानी रेल्वेच्या अधिकार्‍यांना तातडीने सूचित केले.

रेल्वे अधिकार्‍यांनी तातडीने सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटणारी रोहा-दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानकानजीक थांबविले. यानंतर मडगाव-नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी 6.45 ला सुटणारी पेण-दिवा मेमु रेल्वे व मँगलोर-मुंबई रेल्वे या चार गाड्यांना रोखण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. सकाळी 7.30 वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. 10 ते 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या. थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रकार घडत असतात, अशी माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आली.

(Also Read >सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार

Loading

हातिवली(राजापूर) येथील ग्रामस्थांना दिलासा….१२ किमी अंतरावरील वाहनांना टोलमाफी

Mumbai Goa Highway News:जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हातिवली येथील टोलनाक्यावर टोलवसुली केली जाऊ नये असे निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित एजन्सीला दिले आहेत. तसेच ह्या टोल नाक्यापासूनच्या १२ किलोमीटर अंतरावरील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल असे पण त्यांनी जाहीर केले आहे.
मागे ह्या टोलनाक्यावर टोलवसुली चालू झाली होती. ह्या वसुलीस स्थानिक ग्रामस्थानकडून मोठा विरोध झाला होता,  स्थानिक ग्रामस्थांनी आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मिळून ह्याविरोधातआंदोलन केले होते, त्यामुळे हि टोलवसुली थांबवली होती. आता पुन्हा ही टोलवसुली चालू करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप करून जोपर्यंत या  महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली केली जाऊ नये असे स्पष्ट आदेश त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार

सिंधुदुर्ग:केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बीएसएनलचे ११० मोबाईल टॉवर मंजूर केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेलिकम्युनिकेशनचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश 
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना नोव्हेंबर महिन्यात पत्र दिले होते. त्या पत्रात त्यांनी जिल्ह्यासाठी १०३ टॉवरची मागणी केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता मोबाईल टॉवरची असलेली गरज लक्षात आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी मागणी केलेल्या १०३ टॉवरला मंजुरी मिळालेली आहे.
हे टॉवर खालील गावात उभारले जातील 
कणकवली तालुका 
नाटळ,कासवण तळवडे, शिरवळ,नागवे ओसरगाव, आशिया, सातरल कासरल, कळसुली,शिवडाव, भरणी, आयनल,साकेडी,तरंदळे, शिवडाव, पियाळी, वरवडे, कासार्डे दाबाचीवाडी, शिडवणे, लोरे ,करंजे
वेंगुर्ले तालुका 
पाल,रेडी,परुळे,कर्ली, रेवस,दाभोली,भोगवे, चिपी, वांयगणी, मोचेमांड,सागरतीर्थ, आरवली, सोनसुरे ,आसोली, अनसुर, खानोली, कोचरा, शिरोडा,केरवाडा,वजराट, मठ कानकेवाडी, आडेली,म्हापण, वेतोरे, वेंगुर्ले शहर.
वैभववाडी तालुका 
कुंभवडे, नावळे,गडमट, हेत, वेंगसर
सावंतवाडी तालुका 
तळवणे , कुंभारगाव, निरवडे, असनिये, दानोली, निगुडे, आरोस,आंबोली, न्हावेली,
देवगड तालुका 
कोर्ले, देवगड रामेश्वर, मालेगाव, ओंबळओं तोरसोले, दहिबाव, रेंबावली,
कुडाळ तालुका 
पोखरण, अनाव घोटगे, आवळेगाव, जांभवडे पावशी, बिबवणे.
मालवण तालुका 
देवली,कुमामे, कट्टा, कुणकवळे, नांदुरुख, पेंडुर-मोगरणे, आंबेरी-सडा,श्रावण,गोठणे – सावंतवाडी, पेंडूर, चाफेखोल, असगणी, वराड, हिर्लेवाडी, कातवड, कोळंब, न्हिवे, नांदोस, पळसम -डींगेडीं गेवाडी, हेदुळ, कसाल, देवबाग, तळगाव-पडवे, मठ बुद्रुक,देवली.
दोडामार्ग तालुका 
घोटगे, साटेली भेडशी, पिकुळे, परमे, पंतुरली,वाझरे-गिरोडे,
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पत्र 👇🏻

Loading

कोकण रेल्वेमार्गावरील एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन या गाडीला अतिरिक्‍त डबे

संग्रहित फोटो
Konkan Railway News | 12/01/2023:  कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एर्नाकुलम – निजामुद्दीन-एर्नाकुलम (२२६५५ / २२६५६) या गाडीला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.  हि गाडी थ्री टायर एसी श्रेणीच्या दोन अतिरिक्त कोच सहित चालविण्यात येणार आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे या गाडीच्या एकूण डब्यांची संख्या एकूण २२ झाली आहे.
खालील तारखेपासून हा बदल करण्यात येणार आहे.
२२६५५  – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक  : १८/०१/२०२३ बुधवारपासून
२२६५६  – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक  : २०/०१/२०२३ शुक्रवारपासून
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील (महाराष्ट्र) थांबे
रत्नागिरी,पनवेल,वसई रोड आणि डहाणू रोड

Loading

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर

आधीच मुंबई गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत असताना त्यात कंत्राटदार कंपनीच्या चुकीमुळे होणार्‍या अपघातांची भर पडताना दिसत आहे.

Mumbai Goa Highway News :आज मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने डोंगर कापत असताना निसटलेला एक भला मोठा दगड चक्क रस्त्यावर आला. सुदैवाने त्यावेळी कोणतेच वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. ह्या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी ह्या प्रकारामुळे धास्तावले आहेत.

(हेही वाचा >सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार)

मागेच अशा दुर्लक्षामुळे येथे असे दोन प्रकार घडले आहेत. एक असाच मोठा दगड निसटून पायथ्याशी वसलेल्या बौद्धवाडीतील एका घराची भिंत फोडून घुसला. सुदैवाने घरी कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये घर मालकांस नुकसान भरपाई कंत्राटदार कंपनीकडून दिली गेली. त्यानंतर घाटात संरक्षक भिंती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भिंती उभारलेल्या असतानाच गेल्या शनिवारी डोंगर कापत असतानाच निसटलेला दगड एका घराजवळ येवून पडला. यात तेथील साहित्याची मोडतोड होवून नुकसान झाले असले तरी मोठी दुर्घटना मात्र टळली.

(Also Read>सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दुसरी रिक्षाचालक होण्याचा मान वेंगुर्ल्याच्या हेमलता हिला..

ह्या सर्व प्रकारांवरून ह्या कामादरम्यान होणारी सुरक्षेच्या उपयोजनांकडे होणारे दुर्लक्ष समोर आले आहे. कंपनी सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search