रत्नागिरी| होळीसाठी रेल्वेने गावी जाणार्या चाकरमान्यांचा त्रास वाढवणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी या मार्गावर सोडण्यात आलेल्या 2 गाड्या रद्द केल्या आहेत.
पुढील दोन गाड्या दिनांक 09/03/2023 ते 12/03/2023 दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत.
01597 मेमू ट्रेन रोहा येथून चिपळूण साठी सुटणारी रोहा – चिपळूण अनारक्षित मेमू
01598 मेमू चिपळूण येथून रोहा या स्थानकासाठी सुटणारी चिपळूण – रोहा अनारक्षित मेमू
दिवा स्थानकावरून रोहा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार्या गाडीचा विस्तार करून या गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील ईतर गाड्यांमध्ये होणारी गर्दी विभागली जात असताना रेल्वे प्रशासनाने अचानक या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
मुंबई |शनिवार दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समिती यांच्या वतीने दादरमध्ये कोकणवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न तसेच ‘कोकणच्या विकासाची दिशा’ या विषयी चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दादर पूर्व-नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्राध्यापक सुरेंद्र गावसकर सभागृहात हा मेळावा होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या तसेच तांत्रिकदृष्टय़ा त्रुटी असलेल्या कामामुळे या रस्त्याने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे सगळी वाहतूक पुणे-कोल्हापूरमार्गे होत असल्यामुळे कोकणवासीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुळात बांधकामात त्रुटी असल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही अपघातांची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे ऑडिट करावे तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मेळाव्यात करण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी मोठय़ा संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जनता दलाचे प्रभाकर नारकर आणि कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग |शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या अवैध दारूची महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे.मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ८ हजारांच्या दारुसह ४ लाखाची गाडी मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (३६, रा.अदालट्टी, ता. अथणी, बेळगांव ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांनी आंबोली तपासणी नाक्यावर केली. यात गोवा बनावटीच्या इम्पेरियल ब्ल्यू ब्रँडच्या बाटल्यांचे नऊ बॉक्स जप्त करण्यात आले. तर या प्रकरणी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची शेवरलेट एन्जॉय ( के ए – २३ एन ३६३५) ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
रत्नागिरी : प्रगतीमुळे विज्ञानामुळे माणसाचं आयुष्य वाढला. असं म्हणतात. पण यामुळे नद्या प्रदूषित झाल्या जंगला उध्वस्त झाले, कारखान्यांनी हवा प्रदूषित केली.
कोकणात असे गाव आहे जेथे स्वातंत्र्यानंतरही गेली 73 वर्ष रस्ता नव्हता. या गावात रुग्णाला डोलीतून खाली सात आठ किलोमीटर डोंगर उतरून दवाखान्यात आणावे लागत होते. अगदी दोन वर्षांपूर्वी या गावात पहिल्यांदा रस्ता आला.
अतिशय साधी मातीची घरे, तथाकथित कोणताही विकास नाही, निसर्ग पूरक जीवनशैली, हायब्रीड आणि केमिकल यांचा रोजच्या जगण्याशी काही संबंध नाही, कोणतेही प्रदूषण नाही, म्हटले तर अविकसीत पण जीवनशैलीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आणि प्रगत असे हे रत्नागिरीतील लांजा या तालुक्यातील गाव म्हणजे माचाळ.
या गावात 105 वर्षाचे आजोबा आणि शंभर वर्षाच्या आजी हे दांपत्य राहते. या गावात अनेक वृद्ध माणसे 80/ 90 /95 वर्षाची आपल्याला भेटतील.
समृद्ध जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दोन दिवस आपण माचाळला येऊन राहिले पाहिजे. हे कोकणातील पहिले हिल स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी इको हिल स्टेशन निसर्ग समृद्ध पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचं ठरवलं.
निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांनी येथे येऊन राहावं आणि या गावातील निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यातून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित व्हावी अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. याच साठी माचाळ महोत्सव 2023 आयोजित करत आहोत. अकरा व बारा मार्च हा विशेष महोत्सव आयोजित होत आहे
येथील निसर्ग समृद्ध जीवनशैली लोककला उत्सव यांचा अनुभव निसर्गप्रेमी पर्यटकांनी सहपरिवार घ्यावा अशा स्वरूपाची संकल्पना आहे अर्थात मर्यादित पर्यटकांना या पर्यटन केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरीक संघ, आणि स्थानिक कार्यकर्त्यांची टीम संपूर्ण नियोजन करत आहे.
रत्नागिरी | मुंबई गोवा हायवे व रत्नागिरी नागपूर हायवे साठी अनेकांच्या जागा चौपदरी करण्यासाठी गेल्या त्यामुळे अनेकांना आपले मूळ घरे पाडावी लागली होती काहींनी हीं जुनी घर पाडून सुरक्षित अंतरावर आपली नवीन घरे उभी केली मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील करंजारी येथील ठाकूर यांनी आपला बंगला नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने आहे त्या अवस्थेत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
करंजारी येथील ठाकूर यांचा बंगला चौपदरीकरणात जात होता तो बंगला आता शंभर फूट मागे सरकविला जाणार आहे त्यासाठी चेन्नई येथील कंपनीला हे कंत्राट देण्यात आला असून या कंपनीने आपले काम सुरू केले आहे कंपनीने बंगल्याच्या खाली खाली खोदाई करून त्याखाली जॅक व लोखंडी अँगल लावून हा मूळ बंगला हळूहळू सरकवण्याचे काम सुरू केले आहे त्यामुळे कुठलीही मोडतोड न करता आहे त्या अवस्थेत बंगला मागे नेला जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे पहिल्यांदाच बंगला मागे नेण्याची घटना आहे त्यामुळे हे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करीत आहेत.
अशा शिफ्टिंग करिता अंदाजे किती खर्च येतो? इमारत शिफ्टिंग करणाऱ्या कंपन्या इमारत लिफ्टिंग आणि इमारत शिफ्टिंग तसेच इमारतीची दिशा बदलणे या मुख्य सेवा देतात. इमारत लिफ्टिंग म्हणजे घर काही फूट वर उचलणे. या मध्ये घर जास्तीत जास्त १० फुटांपर्यंत वर उचलेले जाते. साहजिकच घराचे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आणि किती जुने आहे या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आमच्या प्रतिनिधेने दिल्लीतील एका कंपनीशी संपर्क साधला असता ३ फुटापर्यतच्या लिफ्टिंग करण्यासाठी साधारणपणे ४०० ते ५०० रुपये प्रति चौरस फूट खर्च येईल असे सांगण्यात आले. इमारत शिफ्टिंग बद्दल विचारले असता जर १००० चौरस फुटाचे घर १५ ते २० फूट सरकावायचे असेल तर साधारणपणे १० ते १५ लाख खर्च येतो. साहजिकच घराच्या बांधकामाच्या स्वरूपानुसार खर्च कमी जास्त येतो.
Holi Special Trains News | 03 Mar 2023 |प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या स्थानकावरुन रात्री ००:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी सकाळी ०९:०० वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01152 Ratnagiri – Mumbai CSMT Special
दिनांक ०६/०३/२०२३ सोमवार या दिवशी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन सकाळी ०६:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन सकाळी १०:०० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:२०वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01153 Panvel – Ratnagiri
दिनांक ०५/०३/२०२३ रविवार व ०८/०३/२०२३ बुधवार या दिवशी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल व ती रात्री ०० :२० वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल व ती दुसया दिवशी सकाळी ०४:१० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01155 Panvel – Sawantwadi Road Special:
दिनांक ०५/०३/२०२३ रविवार व ०८/०३/२०२३ बुधवार या दिवशी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी ०७:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०९/०३/२०२३ गुरुवार या दिवशी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन सकाळी ०६:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
मुंबई : देशामध्ये महत्त्वाच्या काही शहरां दरम्यान सुरू केलेली वंदे भारत एक्सप्रेस आता कोकण रेल्वे मार्गावर मुंबई गोवा या दोन शहरांदरम्यान लवकरच सुरू होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई- गोवा या मार्गावरील विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे दिल्याची माहिती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.
कोकणासह ठाणे जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मुंबईत भाजपाच्या आमदारांनी भेट घेतली. या आमदारांमध्ये सर्वश्री प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, गणपत गायकवाड, प्रसाद लाड आदींचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी कोकणातील प्रवाशांसाठीचे विविध मुद्दे मांडले.
कोकणातील प्रवाशांचा प्रवास वेगाने होण्यासाठी शिर्डी व सोलापूरप्रमाणेच गोव्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदारांनी केली. त्यावेळी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दानवे यांनी दिले.
रेल्वे राज्यमंत्रि रावसाहेब दानवे यांच्याकडे केलेल्या इतर काही मागण्या.
`वन प्रॉडक्ट, वन स्टॉल’ प्रकल्पानुसार कोकण रेल्वेतील प्रकल्पग्रस्त व्यक्ती वा त्यांच्या वारसांना स्टॉल द्यावेत
शेतकऱ्यांसाठी प्रत्येक स्थानकात फिरता स्टॉल असाव
कोकण रेल्वेमार्गावरील सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्म व गाडीमधील उंची समान ठेवावी.
रेल्वे पुलामुळे महाड येथे पूरस्थिती निर्माण होत असल्याबद्दल उपाययोजना करावी.
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे
काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.
या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Holi Special Train | 02/03/2023 : कोकण रेल्वेमार्गावर होळीसाठी एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train no.01592 Madgaon Jn.- Lokmanya Tilak (T ) One Way Special
ही गाडी मंगळवारी दिनांक 07/03/2023 रोजी मडगाव या स्थानकावरून सकाळी 08:45वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनला त्याच दिवशी रात्री 21:50 वाजता पोहोचेल.
Holi Special Trains News |01 Mar 2023 | शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणार्या भाविकांना एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वे च्या सहाय्याने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक ०२/०३/२०२३ व ०९/०३/२०२३ (गुरुवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01188 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
दिनांक ०३/०३/२०२३ व १०/०३/२०२३ (शुक्रवार) या दिवशी ही गाडी करमाळी टर्मिनस या स्थानकावरुन संध्याकाळी १६:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता मंगळूरु या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी मंगळूरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल..
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी रोहा या स्थानकावरुन सकाळी ११:०५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:२० वाजता चिपळूण या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01598 Chiplun – Roha MEMU Special
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी चिपळूण या स्थानकावरुन दुपारी १३:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:१० वाजता रोहा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
माणगाव, वीर, सापे वामने, कारंजाडी, विन्हेरे, आणि खेड
डब्यांची संरचना
12 मेमू कोच
प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.