Category Archives: कोकण

गणेशभक्तांना कोकण रेल्वेची अजून एक खुशखबर. ह्या गाडीचा विस्तार…

दिवा – रोहा- दिवा ही पॅसेंजर ट्रेन गणेशोत्सव कालावधीत चिपळूणपर्यंत चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने मध्य रेल्वे शी समन्वय साधून घेतला आहे.

सध्या ६१०११ /६१०१२ ही पॅसेंजर गाडी दिवा ते रोहा आणि रोहा ते दिवा अशी चालत आहे. हीच गाडी पुढे रोहा ते चिपळूण आणि चिपळूण ते रोहा ०११५७/०११५८ ह्या नंबरने चालविण्यात येणार आहे.

०११५७ ही गाडी रोह्यातून सकाळी ११.०५ ला सुटेल ती चिपळूणला दुपारी १.२० ला पोहोचेल. ०११५८ ही गाडी ३.४५ ला चिपळूण येथून सुटून १६.१० ला रोह्याला पोहोचेल.

माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड ह्या स्टेशन वर ह्या गाड्या थांबतील.

सदरगाडी १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर पर्यंत चालविण्यात येणार आहे. ह्या गाडीला ८ MEMU (डबे) असतिल.

 

Loading

३५० वर्षांचा ‘मावळा’ हरपला…

होय ३५० वर्ष! ज्याने शिवकाळ अनुभवला, ज्याने दस्तुखुद छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास अनुभवला तो इतिहासाची साक्ष देणारा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराच्या परिसरातील व आता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाजवळ अखंड ३५० वर्षापेक्षा जास्त निधड्या छातीने उभा असणारा अवाढव्य असा हो हो मावळाच म्हणावं लागेल असा वृक्ष म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या काळातील आंब्याचे झाड. याच आंब्याच्या ढोळी मध्ये शिवकालीन शस्त्र सापडली होती. या आंब्याला येणाऱ्या साखरे प्रमाणे गोड अंब्यामुळे पंचक्रोशीत या आंब्याच्या झाडाला साखरगोटी म्हणूनही ओळख होती.


उमरठ येथे येणाऱ्या प्रत्येक नरवीर प्रेमींनी हे आंब्याचे झाड आणि त्याच्या ढोलीत सापडलेली तलवार आणि दांडपट्टा पाहिला असेल.


गेले काही दिवस होणाऱ्या पावसा बरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने आज आज हा आंब्याचा वृक्ष कोलमडून पडला. सुदैवाने जवळपास कोणी नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतू स्मारक परिसराला असणाऱ्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा मावळा हरपल्याची भावना गावकरी व्यक्त करत आहेत…

साभार – सह्याद्रीच्या पाऊलखुणा

 

Loading

कोकणातील ह्या जिल्ह्यांना पुढील ५ दिवस अतिदक्षतेचा इशारा.

मुंबई – पुढील पाच दिवसांत कोकणात पडणाऱ्या पावसासाठी प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा तर्फे पत्रक जाहीर केले आहे.

११ ते १४ जुलै पर्यंत पालघर जिल्ह्याला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

रायगडला १२ आणि १३ तर रत्नागिरी जिल्ह्याला १२ जुलैला अतिदक्षतेचा इशारा आहे.

वरील जिल्ह्यांना बाकीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.

ठाणे आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा ह्या ५ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईला ११ आणि १५ जुलै सोडून बाकीच्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे.

 

 

Loading

आंबोलीत मद्यधुंद तरुणांची हुल्लडबाजी. प्रशासनाचे दुर्लक्ष?

 

आंबोली हे जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू मानला जातो. पावसाळ्यात धबधबे आणि निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी राज्यातून आणि आजूबाजूच्या राज्यातून पर्यटक भेट देत असतात. ह्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने स्थानिकांना रोजगार प्राप्त होत आहे.

आज हल्ली मद्यधुंद तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे हे ठिकाण बदनाम होत आहे. मोठ मोठ्याने ओरडणे, एकमेकांना नको त्या भाषेत शिवीगाळ करणे रस्त्यात नाचून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे असे प्रकार वाढले आहेत. ह्या सर्व प्रकारांमुळे महिला आणि कुटुंबासमवेत भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. आणि ह्या प्रकारांना आता आळा नाही घातला तर पुढे काहीतरी गंभीर घटना घडण्याची शक्यता पण नाकारता येत नाही.

आमच्या माहितीनुसार महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस असतात पण त्यांची संख्या कमी असते. जिल्हा प्रशासनाने ही संख्या खासकरून सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार आणि रविवार ह्या दिवशी वाढविली पाहिजे. त्याचप्रकारे ह्या दिवशी एक गस्तपथक नेमले पाहिजे जेणेकरून सर्व ठिकाणांवर नजर ठेवता येईल.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणुन घोषित झाला आहे. इथल्या निसर्गामुळे पर्यटक ईथे आकर्षित होतो. पर्यटन व्यवसायात आता अनेक तरुण उतरले आहे. प्रशासनाने अशा प्रकारच्या गोष्टींना घातला नाही तर त्याचा फटका प्रत्यक्षरित्या पर्यटनाला आणि अप्रत्यक्षपणे ह्या व्यावसायिकांना बसेल हे निश्चित.

 

Loading

परशुराम घाट वाहतुकीसाठी १२ तारखेपर्यंत बंद

जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांनी आज काढलेल्या परिपत्रकानुसार परशुराम घाट १२ तारखेपर्यंत बंद राहणार असे जाहीर करण्यात आले आहे. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ आणि ११६ नुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे
ह्या आधी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग ९ जुलै पर्यंत बंद ठेवण्यात आला होता, पण आता तो कालावधी आजून वाढवला आहे .
ह्या आदेशानुसार हा घाट वाहुतुकीसाठी १२ जुलै रात्री १२ वाजेपर्यत पूर्णपणे बंद राहील. सदर कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चीरणी – आंबडस – चिपळूण या पर्यायी मार्गे योग्य होईल असा अभिप्राय कायकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण- रायगड यांनी दिला असल्यामुळे त्यानुसार पर्यायी वाहतूक वाळविणेस अभिप्राय आहे असे कळविण्यात आलेले आहे. तसेच जड वाहनांची वाहतूक मुंबई-पुणे व माणगाव- ताम्हाणे मार्गे वळविण्यास विनंती करण्यात आलेली आहे.

Loading

आषाढी वारीच्या टोलमुक्ती साठी अर्ज कसा कराल? महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक जारी.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पंढरपूर येथे येणाऱ्या व पंढरपूर येथून जाणाऱ्या पालख्या, वारकरी व भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.

गणेश चतुर्थी दरम्यान दिल्या जाणार्‍या टोल मुक्तीच्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ह्या वर्षी वारकऱ्यांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ०७.०७.२०२२ ते १५.०७.२०२२ पर्यंत ही टोलमुक्ती देण्यात येणार आहे.

ह्या परिपत्रकासोबत टोलमुक्ती साठी लागणाऱ्या स्टिकर्सची उपलब्धता याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्टिकर साठी कराव्या लागणाऱ्या अर्जाचा नमुना जोडला आहे.

Loading

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या.

कोकण रेल्वेने आज गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष फेर्‍या चालवण्याचे आज जाहीर केले आहे.

मागच्या आठवड्यात जाहीर केलेल्या विशेष गाडय़ांची बूकिंग फूल झाली त्यामुळे ह्या गाड्यांच्या स्वरुपात प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध होईल.

 

 

LTT THOKUR EXPRESS  (01153)
 

दिनांक १३.०८.२०२२ ते ११.०९.२०२२ दरम्यान ही गाडी रोज चालवली जाईल. ही गाडी रात्री २२.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई वरून निघेल ती ठोकूर, मंगलोरला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.३० वाजता पोहोचेल.

 

डब्यांची स्थिती   1 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 5 General + 4 AC (3A) + 2 SLR = एकूण २४ डबे  

 

 

THOKUR LTT  EXPRESS  (01154)
 

दिनांक १४.०८.२०२२ ते १२.०९.२०२२ दरम्यान ही गाडी रोज चालवली जाईल. ही गाडी संध्याकाळी ठोकूर, मंगलोरवरून ७.३० वाजता निघेल ती दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईला पोहोचेल.

 

डब्यांची स्थिती   1 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 5 General + 4 AC (3A) + 2 SLR = एकूण २४ डबे  

 

ह्या गाड्या  ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्णा रोड,कुमता,मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
 
 
 
 
आरक्षण आणि इतर माहितीसाठी  www.enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्या.
 
 

 

Loading

घरगुती गॅस सिलिंडर च्या किमतीत आज पुन्हा वाढ.

मुंबई – आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ केली आहे.

आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता मुंबईत १०५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

देशातील चार मोठ्या शहरांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये एका सिलेंडरसाठी १०५३ रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये, तर चेन्नईमध्ये १०६८.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

५ Kg च्या घरगुती गॅस सिलिंडर वर ही वाढ १८ रुपयांनी झाली आहे

Loading

कोकणातील जिल्ह्यांना पुढील ४ दिवसांसाठी भारतीय हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याने राज्यातील पुढील ५ दिवसात होणाऱ्या पावसाचा अंदाज जाहीर करत महाराष्ट्रातील कोकणातील आणि कोकण लागत जिल्ह्याना अति दक्षतेचा इशारा दिला आहे.
आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर आणि सातारा ह्या जिल्ह्याना अतिदक्षतेचा इशारा होता.
दिनांक ६ आणि ७ रोजी बुधवारी रायगड, रत्नागिरी,कोल्हापूर आणि सातारा ह्या जिल्ह्याना अतिदक्षतेचा इशारा आहे. सिंधुदुर्ग, मुंबई , ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्यांना Orange अलर्ट दिला आहे. ८ तारखेला हा अलर्ट कायम आहे पण पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट मधील जिल्ह्यात सामील केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संबधित जिल्हाधीकाऱ्यांना आपली आपली आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1544252287521935360?t=KCKyBFZKqgRr_bCOifhHsA&s=19

Loading

कोकणात पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस.. भारतीय हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

कोकण किनारपट्टीवर पुढील ५ दिवसांत मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस होणार आहे असे IMD (भारतीय हवामान खाते) ने जाहीर केले आहे.

ऑरेंज अलर्ट४ जुलै रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.५ जुलै रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.६ जुलै रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

यलो अलर्ट३ जुलै ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.४ आणि ५ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.६ जुलै मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1543522010617319428?t=JWDetSWiYkNLsAhtaXBD5Q&s=19
 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search