चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयात एक मोलाची भर पडली आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची श्रीलक्ष्मीनारायणची मूर्ती संग्रहालयासाठी मिळाली आहे. ही मूर्ती ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील सुभाष अनंत काळे यांच्या अनेक पिढया पूजेत होती. मनुष्यरूपी गरुडावर आरूढ असलेल्या चतुर्भुज भगवान श्रीविष्णू आणि वामांगी बसलेली लक्ष्मी अशा प्रतिमेला ‘लक्ष्मीनारायण’ अशी संज्ञा आहे
काळे यांनी ही मूर्ती वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे आणि मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांनी बदलापूरला जाऊन काळे कुटुंबीयाची भेट घेतली. धनंजय चितळे यांनी मूर्तीची पंचोपचारे उत्तरपूजा करून ही मूर्ती स्वीकारली. चारशे वर्षांपूर्वीची गंडकी शिळेतील ही मूर्ती ५५ सेंटीमीटर उंच आणि ३५ सेंटीमीटर रुंद आहे. गरूडावर बसलेल्या विष्णूच्या डाव्या बाजूला लक्ष्मी असून दोन्ही हात जोडलेल्या गरूडाच्या चेहऱ्यावर अत्यंत विनम्र भाव आहेत. गरुडाच्या जोडलेल्या हातात गदा व दंडाभोवती सर्पवेढा आहे. श्रीविष्णू व लक्ष्मी सालंकृत आहे. भगवान श्रीविष्णू सायुध सिद्ध आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ आहे.
या श्रीलक्ष्मीनारायण मूर्तीमुळे संग्रहालयात आलेल्या समृध्दी वाढली असल्याच्या भावना संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Holi Special Train | 02/03/2023 : कोकण रेल्वेमार्गावर होळीसाठी एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. ही गाडी मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train no.01592 Madgaon Jn.- Lokmanya Tilak (T ) One Way Special
ही गाडी मंगळवारी दिनांक 07/03/2023 रोजी मडगाव या स्थानकावरून सकाळी 08:45वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस या स्टेशनला त्याच दिवशी रात्री 21:50 वाजता पोहोचेल.
Holi Special Trains News |01 Mar 2023 | शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणार्या भाविकांना एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वे च्या सहाय्याने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक ०२/०३/२०२३ व ०९/०३/२०२३ (गुरुवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01188 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
दिनांक ०३/०३/२०२३ व १०/०३/२०२३ (शुक्रवार) या दिवशी ही गाडी करमाळी टर्मिनस या स्थानकावरुन संध्याकाळी १६:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता मंगळूरु या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी मंगळूरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल..
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी रोहा या स्थानकावरुन सकाळी ११:०५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:२० वाजता चिपळूण या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01598 Chiplun – Roha MEMU Special
दिनांक ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी चिपळूण या स्थानकावरुन दुपारी १३:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:१० वाजता रोहा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
माणगाव, वीर, सापे वामने, कारंजाडी, विन्हेरे, आणि खेड
डब्यांची संरचना
12 मेमू कोच
प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी कोकणचा हापूस व इतर राज्यातील मिळून ११०४३ पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ४०० ते १ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांमध्ये या वर्षी आंब्याचे पीक मुबलक आले आहे. प्रत्येक वर्षी मार्चपासून नियमित आवक सुरू होत असते. परंतु, या वर्षी फेब्रुवारीमध्येच आवक सुरू झाली आहे. सोमवारी देवगड व इतर ठिकाणांवरून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ४ ते ८ डझन पेटीची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे. बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल अशी चिन्हे आहेत. आवक वाढू लागली आहे. मार्चमध्ये आवक अजून वाढून दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला केरळ राज्याप्रमाणे प्रमाणे कोकणात सुद्धा हाऊसबोट आणि बॅकवॉटर टुरिझम चा अनुभव घेता येणार आहे.
कोकणातील दाभोळ येथील एक तरुण सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने बनवलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल.
आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात. बॅकवॉटर टुरिझम ची ही त्याची एक नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे.
रत्नागिरी : झरेवाडी नजीक टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. अज्ञात वाहनाने हुल दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.रत्नागिरी येथून बारामती कडे जाणाऱ्या मच्छी वाहतुकीचा बोलेरो टेम्पो मोठ्या वाहनाने हूल दिल्याने अवघड वळणावर सकाळी साडे सहाच्या सुमारास कठड्यावर आदळला. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पुणे येथून रत्नागिरी येथे मच्छी घेऊन आलेला बोलेरो टेम्पो कंपनीमध्ये मच्छी उतरवून परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला. यावेळी स्थानिकांनी मदत करत बोलेरो गाडीला बाहेर काढण्यात मदत केली.
रत्नागिरी: जिल्ह्याच्या गुहागर किनाऱ्यावर बुधवारी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे.
‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ नामकरण
टॅगिंग केलेल्या कासवांपैकी एक-मादी बाग या भागात सापडल्याने तिचे नाव ‘बागेश्री’ ठेवण्यात आले, तर गुहागर या नावावरून दुसरीचे नाव ‘गुहा’ असे ठेवण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील कासव-मित्र तृशांत भाटकर यांनी दिली आहे.
पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या कासवांचे टॅगिंग झाले होते. पश्चिम किनाऱ्यावर गेल्या वर्षी (२५ जानेवारी २०२२) पहिल्यांदाच उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीला मंडणगड (वेळास), आंजर्ले (दापोली) या किनाऱ्यावरील प्रत्येकी एका कासवाला ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर आणखी तीन कासवांना ट्रान्सलेटर बसवून तेही गुहागरमधून सोडले होतो. ते मादी कासव श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर हे ट्रान्सलेटर त्यांच्या ठिकाणाचे संकेत उपग्रहाला पाठवल्यानंतर त्यांच्या अधिवासाची माहिती अभ्यासकांना मिळत होती. सहा-सात महिन्यांनंतर अचानक माहिती येणे बंद झाले होते. यंदाच्या वर्षी कासवांना पुन्हा ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय), कांदळवण कक्ष, वन विभागाने घेतला.
टॅगिंग का केली जात आहे?
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या कासवांबद्दल काही गूढ गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यात या कासवांच्या स्थलांतराचा पॅटर्न कोणता? ती कुठून येतात? कोणत्या ठिकाणी जास्त वेळ राहतात? याशिवाय आपणास माहित नसलेल्या अनेक गोष्टी समजू शकतील.
कशी केली जाते टॅगिंग
टॅगिंग करण्यासाठी किनारपट्ट्यावर आलेले योग्य वजनाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादीकासव निवडले जाते. टॅगिंग उपकरणाचे वजन या कासवांच्या प्रवासास त्रासदायक ठरू नये यासाठी एक नियम ठरविण्यात आलेला आहे. उपकरणाचे वजन कासवांच्या वजनाच्या ३% पेक्षा जास्त असू नये. निवडलेल्या मादीचे कवच साफ करून एका विशिष्ट गमाने उपकरण चिटकवले जाते आणि त्यावर निळा रंग देण्यात येतो. सुमारे ७ ते ८ तासांनी हा गम सुकल्यावर त्या मादीस समुद्रात सोडण्यात येते.
या उपकरणाला एक बटण असते. जेव्हा कासव श्वास घेण्यास समुद्राच्या पृष्ठभागावर येते तेव्हा या बटनावरचा दाब कमी होऊन बॅटरी कार्यन्वित होते आणि हे उपकरण सेटेलाईटला सिग्नल पाठवते. त्यामुळे या कासवाचे स्थान (Live Location) माहिती होण्यास मदत होते.
रत्नागिरी: ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी भारमानामुळे बंद होताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा ग्रामीण भागात एसटीला कमी भारमान मिळत असल्याने अनेक फेऱ्या बंद करण्याची वेळ एसटी विभागावर आली आहे त्यातून महामंडळाने पर्याय काढण्याचे ठरवले असून आता ग्रामीण भागात मोठ्या बसेस ऐवजी मिनी बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी रत्नागिरीच्या एसटी विभागाला नवीन पन्नास मिनी बसेस देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
सुरुवातीला या 50 मिनी बसेस कंत्राटी पद्धतीने एसटी विभागाला पुरवण्यात येणार आहेत त्यानंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या बसेस मध्ये आणखी वाढ करण्याचा विचार महामंडळाकडून करण्यात येणार आहे.
मिनी बस चा प्रयोग आता शहरात यशस्वी होताना दिसत आहे. मोठ्या बसशी तुलना केल्यास या बसचा प्रवास जलद आणि कमी खर्चिक होतो. या बसेस ताफ्यात आल्यास व्यवस्थापनाच्या दृष्टीने लवचिकता पण येईल. कमी भारमान असलेल्या गावी मिनी बस सोडल्यास एसटीला तोटाही होणार नाही.
संगमेश्वर : तालुक्यातील मुरडव येथे बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल जीवन संपवलं आहे. रिया रमेश नावले (वय १७, मुरडव-नावलेवाडी) अस या मुलीचं नाव आहे. मुरडव नावलेवाडी येथील रिया रमेश नावले ही बारावीची विद्यार्थिनी आहे. नुकताच तिने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. तिचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला आहेत. आई, आजी कामावर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नसताना तिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रियाने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Holi Special Trains | प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोंकण रेल्वेमार्गावर ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी कोंकण रेल्वे मार्फत काही अतिरिक्त गाड्या सोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोकणात शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आरामदायक होईल हे नक्की
1) Train no. 09057 / 09058 Udhana Jn – Mangaluru Jn – Udhana Jn Special on Special Fare
Train no. 09057 Udhana Jn – Mangaluru Jn
ही गाडी दिनांक ०१/०३/२०२३ (बुधवार), ०५/०३/२०२३ (रविवार) या दिवशी ही गाडी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058 – Mangaluru Jn – Udhana Jn
ही गाडी दिनांक ०२/०३/२०२३ (गुरुवार), ०६/०३/२०२३ (सोमवार) या दिवशी ही गाडी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५ वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
दिनांक ०५/०३/२०२३ (बुधवार) मंगळुरूसाठी प्रस्थान करणारी आणि दिनांक ०६ /०३/२०२३ (गुरुवार) परत येणाऱ्या गाडीच्या डब्यांची स्थिती
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 22 डबे
2) Train no. 09412 / 09411 Ahmedabad – Karmali – Ahmedabad Jn Special on Special Fare
Train no. 09412 Ahmedabad – Karmali
ही गाडी दिनांक ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी ०९:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:२५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411 – karmali – Ahmedabad
ही गाडी दिनांक ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता अहमदाबाद या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 05+ स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 24 डबे
आरक्षण
गाडी क्रमांक 09411 या गाडीचे आरक्षण दिनांक २६/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.