


Konkan Railway:सीमावर्ती भागातील मराठी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना आता कोकण रेल्वे प्रशासन सुद्धा त्यांच्यावर अन्याय करत असल्याचे सिद्ध झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर पूर्वी चालणारी कारवार- रत्नागिरी गाडी बंद करून कोकण रेल्वेने कारवारच्या मराठी माणसावर अन्याय केला असल्याची खंत कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी व्यक्त केली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसचा अतिरिक्त भार कमी व्हावा म्हणून या गाडीला समांतर अशी दुसरी गाडी असावी अशी वारंवार मागणी व्हायला लागली व कोकणकन्याला पर्याय म्हणून कारवार ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (आताची मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस) सुरू करण्यात आली होती. परंतु सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री झाल्यानंतर या गाडीचा थेट मेंगलोर पर्यंत या गाडीचा विस्तार केला गेला.
कारवार या शहरांमध्ये 80 टक्के मराठी लोक राहतात त्यांची मूळ कुलदैवता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. जसे गोव्यामध्ये मराठी तसेच कारवार मधले मराठी हे मूळचे मराठीच आहेत. मेंगलोर पर्यंत विस्तार केला गेलेल्या या गाडीचा कारवार वासियांना कोणताही फायदा होत नाही कारण मेंगलोर पासून कारवारला गाडी येईपर्यंत त्याची जनरल डबे फुल झालेले असतात. इथे पण “केला तुका झाला माका” अशी परिस्थिती आहे.
या गाडीला दक्षिणेकडे मेंगलोर पर्यंत आता दोन थांबे वाढवले परंतु सावंतवाडीला मात्र थांबा दिला जात नाही इथेही अन्याय. ही गाडी मराठी माणसांचीच होती ती थेट मेंगलोरला नेली आहे. मुळात कोकण रेल्वे ही सुद्धा महाराष्ट्रापुरती सीमित होती परंतु जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे कोकण रेल्वेचा मेंगलोर पर्यंत विस्तार करण्यात आला. पण त्यामुळे ज्या महाराष्ट्राने कोकण रेल्वेसाठी पन्नास वर्षे वाट बघितली त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना अनेक सीमावर्ती मराठी माणसांच्या तोंडाला आता कोकण रेल्वेने पाने पुसल्यासारखीच आहेत. आता सीएसटी मेंगलोर गाडीला कारवार साठी स्वतंत्र डबा जोडण्यात यावा व सीमावर्ती कारवारच्या मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर पत्रकाद्वारे केली आहे.
Konkan Railway: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत पालक पिकनिकचं प्लानिंग करतात. तर अनेक पालक हे आपल्या मुलांसोबत गावी जात असतात. यामुळे दैनंदिन रेल्वे सेवेवर अधिक भार येतो आणि गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होते. उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर अजून काही उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ०६/०४/२०२५ ते ०४/०५/२०२५ पर्यंत दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन. साप्ताहिक विशेषांक लोकमान्य टिळक (टी) येथून ०७/०४/२०२५ ते ०५/०५/२०२५ पर्यंत दर सोमवारी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21:40 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
गाडी क्रमांक ०११०४ चे आरक्षण दिनांक ०२/०४/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल.
रत्नागिरी:निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या श्री कुलस्वामिनी भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
१३ मार्च रोजी रात्रौ हुताशनी पोर्णिमेला वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी पूजन करून होळी प्रज्वलित केली. १४ मार्च रोजी सकाळी श्री कुलस्वामिनी भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ, शेणी व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजाऱ्यानी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतली. गावच्या पुजाऱ्यानी (गुरवानी) मंदिरातून चांदीने मढविलेली पालखी सजवून “कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी” या देवतांची रुपी लावून मंदिरा व होमा समोरील मानाच्या नूतन सहाणेवर आसनस्थ केली. सकाळी ९ वाजता ढोल, ताश्यांच्या गजरात, वाजंत्र्यासह होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थांनी होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण केले. होमाभोवती पालखीची प्रदक्षिणा घालून “भैरी- केदाराच्या चांगभलं” असे म्हणत पालखी उंचावून उपस्थित भाविकांना उत्साहवर्धक वातावरणात दर्शन देण्यात आले तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सुवासिनींनी सहाणेवर पालखीतील देवींच्या आस्थेने ओट्या भरल्या व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला प्रज्वलीत करण्यात आलेल्या ह्या होळीला “‘भद्रेचा शिमगा'” असे संबोधले जाते, कारण या दिवशी भद्रा करण असते. हुताशनी पौर्णिमेला घराघरांतून पूरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात आली. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा “छबिना” काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्रौ मंदिरात आणण्यात आली. छबिन्याच्या वेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी केली व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. वाडी- वाडीतील सुवासिनींनी छबेन्याच्या वेळी ठिकठिकाणी पालखीतील देवतांची आरती करुन ओट्या भरल्या. गावचा छबेना भक्तिमय आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात व आनंदात पार पडला.
होमाच्या दिवशी व्यापाऱ्यांनी कुरमुर्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, मिठाई, सरबत, आइस्क्रीम तसेच विविध प्रकारची खेळणी अशी नाना तऱ्हेची दुकाने थाटली होती.
रूढी परंपरे प्रमाणे १५ रोजी पालखी प्रथम तळेवाडीतील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली व नंतर निम्मेगाव येथील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली. तदनंतर निम्मेगाव येथील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली व अशा प्रकारे १६ रोजी तळेवाडी – दत्तवाडी १७ रोजी लिंगेश्वरवाडी, १८ रोजी राधाकृष्णवाडी येथे नेण्यात आली. १९ तारखेला पालखी कुंभरवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली. त्याच दिवशी पालखी संध्याकाळी परत मंदिरात आणून रुढी परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करुन “धुळवड” (रंगपंचमी) साजरी करण्यात आली, यालाच “शिंपणे” असे म्हणतात. यावेळी अनेक ग्रामस्थांनी मंदिरात गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली. शिंपणे झाल्यावर पालखी पुनश्च कुंभरवाडीतील उर्वरीत घरे घेण्यासाठी नेण्यात आली.
२० रोजी तांदळेवाडी-गुरववाडी व खांबेवाडी, २१ रोजी दत्तवाडी (हनुमान नगर), २२ रोजी वेतकोंडवाडी, २३ रोजी भारतीवाडी, २४ रोजी तांबडवाडी आणि २५ रोजी सुतारवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली.
प्रत्येक घरात राखणेचे, पूजेचे श्रीफळ पालखीत अर्पण करण्यात आले, तसेच माहेरवाशिणीनी व सासरवाशिनिणी ओट्या भरल्या. काही ठिकाणी नवस करण्यात आले तर काही ठिकाणी नवस फेडण्यात आले. पुजाऱ्यानी रूढी परंपरेप्रमाणे देवतांस “आर्जव” घातले. गोडाधोडाचे नैवद्य दाखविण्यात आले. पालखी वाहणाऱ्या सेवकांस “भोई” असे संबोधले जाते. तसेच पुजारी, भोई, ताशावाला व ढोलवाला बांधवांना स्वखुशीने बक्षीस देण्यात येते त्यास ”पोस्त”असे संबोधले जाते.
घरोघरी पालखी नेण्यात येते यास *भोवनी* असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास अनेक चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित होते. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ करण्यात आली. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी (सेवेसाठी)उपस्थित राहिले होते.
सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल, ताशा वाजविण्यात आला. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधवानी पालखीसोबत ताशा वाजवीला , अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता सुतारवाडीतील घरे झाल्यावर मंगळवार दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी (कांदल) रुपी भंडारुन करण्यात आली. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
राखले पावित्र्याचे भान!
वाढविले संस्कृतीची शान!!
ठेवले उत्सवांचे भान!
केला देवतांचा सन्मान!!
आपले:- ग्रामस्थ श्री क्षेत्र टेरव.
संकलन :- श्री सुधाकर राधिका कृष्णाजीराव कदम, ( विशेष कार्यकारी अधिकारी) राधाकृष्णवाडी, श्री क्षेत्र टेरव.
सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.
🔘 आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने सुटणार
Follow us onKonkan Railway :ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा एकदा कोकण रेल्वे मार्गावर विघ्न निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाण खवटी येथे ओव्हरहेड वायर आज मंगळवारी संध्याकाळी ६-६.१५ वाजण्याच्या सुमारास तुटली. यामुळे मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्यांवर परिणाम झाला. दोन्ही गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत . मात्र याची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ उपाय योजना सुरु करण्यात आल्या. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुटलेली ओव्हर हेड वायर जोडण्यात आली होती. फिट सर्टिफिकेट मिळून काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ होतील असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.
या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील केवळ दोन गाड्यांचे वेळापत्रक काही मिनिटांसाठी विस्कळीत झाले आहे. मात्र अन्यथा उर्वरित गाड्या नियमित वेळेत धावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबून आहे तर गोव्याच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस ला रोहा स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.
गोव्या वरून मुंबईला निघालेली मांडवी एक्सप्रेस उशिरा धावत असल्याने आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने म्हणजे रात्री एक वाजून तीस मिनिटाने सुटणार आहे.
Konkan Railway: मुंबई सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉक च्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या वाढीव ब्लॉक मुळे काही गाड्यांचा प्रवास अलीकडच्या स्थानकांवर संपवण्यात येणार (Short termination) आहे. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे
गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत ठाणे स्थानकावर संपविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक २२१२० मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.
![]()
ठाणे: कोकण रेल्वे मार्गावर गणेशोस्तव २०२५ साठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान “धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस” गाडी सेवा सुरू करण्यासंबंधीचे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्यावतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काल दिनांक २२ मार्च रोजी सुपूर्त केले.
मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे स्थानक गणले जाते. त्यातच ठाणे येथील सर्वेसर्वा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे ठाणे, हे ठाणे वासियांसाठी श्रद्धास्थान आहे. आणि ठाणे स्थानकातून कोकण रेल्वे मार्गावर जाणारे-येणारे कोकणवासी यांचे प्रवासी स्थानक ही आहे. दैनंदिन कोकणवासीय, कोकण प्रवासी या स्थानकातून कोकणात मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. गाड्यांची संख्या मुबलक प्रमाणात असली तरी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महोदय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे कार्य ठाणे शहरास नवीन नाही. आपले सर्वतोपरी योगदान आणि समाजकार्यात मोठ्या प्रमाणात समाजसेवा घडवीत ठाण्यातील जनतेत आपले अढळ स्थान ठामपणे प्रखरतेने उमटवले होते ना आहेच ते न मिटण्यासारखे आहे. अशा थोर समाज सेवकास खरी आदरांजली देण्याकरिता गेली सतत तीन (३) वर्षे करीत असलेली मागणी ठाण्यातील लहानातल्या लहान संघटनेपासून राज्य पातळीवरील संघटना, कोकणवासिय, कोकण रेल्वे प्रवासी यांच्या जोरदार आणि प्रचंड मागणीनूसार कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजि ठाणे संघटना आपणांकडे सदर विषयांतर्गत निवेदन सादर करीत या वर्षांतरी कोकण वासियांना “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस गाडी चा लाभ घेता येईल हीच अपेक्षा आहे. अशा आशयाचे निवेदन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)प्रमुख सल्लागार राजू कांबळे, अध्यक्ष सुजित लोंढे, सहसचिव अजिंक्य नार्वेकर, सल्लागार निलेश चव्हाण आणि संपर्कप्रमुख प्रमोद घाग, नामदेव चव्हाण सभासद साहिल सकपाळ हनुमंत निकम उपस्थित होते
यापूर्वीही कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)यांच्या वतीने खासदार नरेश मस्के, खासदार संजीव नाईक, मा. खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर यांना भेटून या मागणी संबधी निवेदने देण्यात आली आहेत. यावर्षी या मागणीचा विचार करण्यात येवून “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस यावर्षीच्या गणेशोत्सवात धावेल अशी आशा संघटनेने व्यक्त केली आहे.

![]()
Konkan Railway 07:45 PM:
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्थानका जवळ ओव्हरहेड सपोर्ट वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. परिणामी (पेअरींग गाड्या उशिराने धावत असल्याने) मुंबईहून गोव्यासाठी सुटणार्या दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २३ मार्च रोजी पहाटे ४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.
एलटीटी मुंबई या स्थानकावरून दिनांक २३ मार्च रोजी ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी २३ मार्च रोजी सकाळी ०४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.
Konkan Railway 06:15 PM:
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हरहेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली होती. वायर तुटल्याने मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.
आता ही वायर जोडण्यात आली असून रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या गाड्या अजूनही सुमारे दोन ते तीन उशिराने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सध्याची स्थिती.. (06:15 pm)
सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर पोहोचली असून ती सुमारे ४ तास उशिराने धावत आहे तर मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकावरून नुकतीच निघाली असून ती सुमारे चार तास उशिराने धावत आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आताच आडवली स्थानकावर आली असून ती सुमारे साडेतीन तास उशिराने धावत आहे. मडगाव एलटीटी सिंधुदुर्ग स्थानकावर असून ती तीन तास उशिराने धावत आहे.
Content Protected! Please Share it instead.