



Konkan Railway: महाकुंभमेळ्यासाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडीच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्र. ०११९२ / ०११९१ उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष या गाडीला स्लीपर श्रेणीचे २ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ होणार आहे. प्रवाशांनी या गाडीला दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात आली आहे.
गाडी क्र. ०११९२ उडुपी – टुंडला जं. महाकुंभ विशेष ही गाडी सोमवार, १७/०२/२०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून सुटेल आणि टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी १३:०० वाजता (बुधवार) पोहोचेल.
गाडी क्र. ०११९१ तुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष गाडी तुंडला जंक्शन येथून गुरुवार, २०/०२/२०२५ रोजी सकाळी ०९:३० रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी १८:१० वाजता (शनिवार) उडुपीला पोहोचेल.
ही गाडी बरकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वरा, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जंयपुरी, माणिकपूर, मणिकपूर, मणिकपूर प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
या गाडीच्या डब्यांची सुधारित रचना : एकूण 22 कोच : दोन टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 12 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.