Category Archives: कोकण रेल्वे
संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे,
सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती




Changes in Ganpati special trains: गणपती उत्सवासाठी सोडण्यात आलेल्या काही विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विशेष गाड्यांना या स्थानकांवर थांबे न दिल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती व या स्थानकांवर थांबे देण्यात यावे अशी मागणी केली गेली होती. सुबक गणेशमूर्ती साठी प्रसिद्ध असलेल्या पेण स्थानकावर गणपती विशेष गाड्यांना थांबा न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावे लागेल. दुसरीकडे फक्त एका नियमित गाडीला थांबा असलेल्या झाराप स्थानकावर किमान विशेष गाड्यांना तरी थांबे मिळावेत अशी मागणी झाली आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांना येथे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे
गाडी क्रमांक ०११५३/०११५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११६७/०११६८ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११८५/०११८६ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११६५/०११६६ लोकमान्य टिळक (टी)- कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११७१/०११७२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे
गाडी क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल या विशेष गाडीला झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे खालील दोन विशेष गाड्यांच्या सेवेच्या कालावधीत काही बदल करण्यात आले आहेत.
गाडी क्र. ०११५४ रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी आणि गाडी क्र. ०११६८ कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या दोन्ही गाड्यांचा कालावधी ०२/०९/२०२४ ते १९/०९/२०२४ असा सुधारित करण्यात आला आहे. याआधी तो ०१/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ असा होता.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Additional Trains for Ganesha Festival: गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वे तर्फे या आधी घोषणा केलेल्या गाड्या व्यतिरिक्त अजुन पाच गाड्यांची घोषणा केली आहे. पुणे /पनवेल /मुंबई एलटीटी ते रत्नागिरी दरम्यान या गाड्या धावणार असून त्याचा फायदा गणेशोत्सवा दरम्यान होणारी गर्दी कमी होण्यासाठी होणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने या गाड्यांना हिरवा कंदील दिल्यानंतर या गाडय़ाचे आरक्षण आणि ईतर माहिती जाहीर करण्यात येईल. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या विशेष गाड्या म्हणुन चालविण्यात येणार आहेत.
१) ०१४४५/०१४४६ पुणे – रत्नागिरी – पुणे विशेष (एकूण २ फेर्या)
गाडी क्रमांक ०१४४५ विशेष पुणे येथून मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४६ विशेष रत्नागिरी येथून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५ , जनरेटर व्हॅन – ०१, आणि एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे
२) ०१४४१/०१४४२ पनवेल -रत्नागिरी – पनवेल विशेष
गाडी क्रमांक ०१४४१ विशेष पनवेल येथून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४२ विशेष रत्नागिरी येथून मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १७:५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ०१:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५ , जनरेटर व्हॅन – ०१, आणि एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे
३) ०१४४७/०१४४८ पुणे – रत्नागिरी – पुणे विशेष (एकूण ४ फेर्या)
गाडी क्रमांक ०१४४७ विशेष पुणे येथून शनिवार दिनांक ०७ आणि १४ सप्टेंबर आणि रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४८ विशेष रत्नागिरी येथून रविवार दिनांक ०८ आणि १६ सप्टेंबर रोजी १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४ , सेकंड स्लीपर – ११ जनरल – ०४, आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २२ डबे
४) ०१४४३/०१४४४ पनवेल -रत्नागिरी – पनवेल विशेष (एकूण ४ फेर्या)
गाडी क्रमांक ०१४४३ विशेष पनवेल येथून रविवार दिनांक ८ आणि १५ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४४ विशेष रत्नागिरी येथून शनिवार दिनांक ७ आणि १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी १७:५० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ०१:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४ , सेकंड स्लीपर – ११ जनरल – ०४, आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २२ डबे
५) ०१०३१/०१०३२ एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी विशेष (एकूण ८ फेर्या)
गाडी क्रमांक ०१०३१ विशेष एलटीटी येथून दिनांक ६,७,१३,१४ सप्टेंबर रोजी रात्री २०:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०३२ विशेष रत्नागिरी येथून दिनांक ७,८,१४,१५ सप्टेंबर रोजी सकाळी ०८:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:१५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६ , सेकंड स्लीपर – ०८ जनरल – ०३, आणि एसएलआर- ०१, जनरेटर व्हॅन – ०१ असे मिळून एकूण २१ LBH डबे
समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
Follow us on



चिपळूण दि. २४ जुलै: निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम यांच्यासोबत आज कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची विविध मागण्यांसाठी आज भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संतोष कुमार झा यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे वचन दिले असल्याचे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.
संगमेश्वर स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता येथे काही 9 गाड्यांना थांबा मिळावा अशी आमची मागणी होती. आमदार निकाम सर यांच्यामुळे या बैठकीचा योग जुळून आला असून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या वतीने मी त्यांचे तसेच श्री झा साहेबांचे आभार मानतो. संगमेश्वरला लवकरच किमान 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळेल अशी आशा आज निर्माण झाली आहे. या प्रसंगी आमदार आदरणीय शेखर सर, ग्रुपच्या वतीने श्री दीपक पवार, संतोष पाटणे, समीर सप्रे, अशोक मुंडेकर, सुशांत फेपडे आदी उपस्थित होते अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.
संगमेश्वर मध्येच या तीन गाड्याना थांबा मिळण्याची दाट शक्यता
▪️1) 110099/11000 LTT मडगांव LTT
▪️2) 19577/19578 जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस
▪️3)20909/20910 कोचिंवेल्ली पोरबंदर एक्सप्रेस
समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
पत्रकार संदेश जिमन यांनी समाज माध्यमातून नेहेमीच संगमेश्वर, चिपळूण येथील रेल्वे प्रवाशांसाठी आवाज उठवला आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मागच्या वर्षी नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळवून दिला होता. त्यांच्या कार्याचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते आणि प्रवासी संघटनेंकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. सामान्य जनतेचा आवाज प्रशासनाकडे पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा उत्तम वापर कसा करता येईल याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी आणि सोयींसाठी आमदार शेखर निकम नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. रेल्वे प्रश्नासंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघात एक उत्तम नेतृत्व लाभले असल्याची जनतेची भावना आहे.

