Konkan Railway News: कोकणवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 13 एप्रिल पासून सुरू होणार आहे.
एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११८७/०११८८ आणि एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११२९/०११३० या दोन्ही गाड्यांचे आरक्षण उद्या सकाळी रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आहे.
अनारक्षित गाडीचे काही डबे आरक्षणासाठी उपलब्ध
एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११२९/०११३० ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची चालविण्यात येणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने या गाडीचे काही डबे (सेकंड सिटींग) आरक्षणासाठी उपलब्ध करून दिले असल्याचे जाहीर केले आहे.
रत्नागिरी :मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअर कार श्रेणीचे खेड ते मडगाव (341 किमी) चे एकूण प्रवासी भाडे ११८५ रुपये इतके आहे, तर मुंबई – गांधीनगर या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्याच श्रेणीचे बोरिवली ते वडोदरा दरम्यानचे, जवळपास तेवढ्याच अंतराचे (३६२ किमी) भाडे ९९५ रुपये एवढे आहे. म्हणजे जवळपास २०० रुपयाचा फरक आहे. एकाच देशातील दोन समान गाड्यांच्या समान श्रेणीच्या प्रवासी भाड्यात एवढा फरक का हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीतच नाही तर इतरही गाड्यांच्या प्रवासीभाड्यात हा फरक येतो. असे का? कोकण रेल्वेचा प्रवास महाग आहे का? हे प्रश्न सहाजिकच पडतात. चला मग याचे उत्तर शोधूया.
रोहा ते ठोकूर हा विभाग कोकण रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड KRCL या कंपनीच्या अखत्यारीत येतो. कोकण रेल्वे मार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात खर्च आला होता. मोठं मोठी पूल, बोगदे आणि इतर गोष्टीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. या खर्चाचा आकडा 3,555 कोटी रुपये एवढा आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी कोकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार रोहा ते ठोकूर दरम्यानचे अंतर प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ४०% वाढवून दाखवून त्याप्रमाणात प्रवास भाडे आकारले जाऊ लागले. प्रवासी तिकिटांवर पण हेच अंतर छापले जाऊ लागले. उदाहरणार्थ रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते मडगाव हे खरे अंतर ५८१ किलोमीटर एवढे आहे. मात्र प्रवाशांकडून हे अंतर ७६५ किलोमीटर असे दाखवून त्याचप्रमाणे भाडे आकारले जात आहे. यात रोहा ते मडगाव हे अंतर ४४० किलोमीटर एवढे आहे मात्र तिकीट आकारताना हे अंतर ६१६ एवढे दाखवून भाडे आकारण्यात येते.
खरे तर एकदा प्रकल्प निर्मितीचा खर्च वसूल झाला की अशा प्रकारची अतिरिक्त भाडे आकारणी बंद करून प्रचलित दराने भाडे आकारणी सुरु करण्याची गरज होती. कोकण रेल्वे गेली २५ वर्षे हे अतिरिक्त भाडे आकारत आहे. साहजिकच कोकण रेल्वे निर्मितीचा खर्च वसूल झालाच असेल मात्र KRCL ने ही वाढीव भाडे आकारणी चालूच ठेवली आहे. कठीण भौगोलिक स्थितीमुळे मोठा देखभाल खर्च होत असल्याने ही वाढीव आकारणी चालू ठेवली असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
सर्व गाड्यांना लागू
या कारणामुळे कोकण रेल्वे नेटवर्कमधून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे भाडे वाढलेल्या अंतरावर मोजले गेले. उदाहरणार्थ, मंगळुरु सेंट्रल ते मुंबई एलटीटी अशी मत्स्यगंधा एक्सप्रेस एकूण 882 किमी अंतर पार करते, ज्यापैकी ठोकूर आणि रोहा दरम्यानच्या 760 किमी प्रवासासाठी वाढीव भाडे आकारले जाते. जर तुम्हाला मुंबई सीएसएमटी ते कणकवली पर्यंत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मडगाव पर्यंतचे प्रवास भाडे रेल्वे ला द्यावे लागते यावरून कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास इतर विभागातील रेल्वेच्या प्रवाशांशी तुलना करता महागाच म्हणावा लागेल.
मुंबई,दि. ११ एप्रिल:उन्हाळी हंगामासाठी प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्यरेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ०८ एप्रिल ते ०९ जून पर्यंत या मार्गावर २ विशेष साप्ताहिक गाड्यांच्या जात येत एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत.
१) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११८७/०११८८
गाडी क्र. ०११८७ एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
ही गाडी दिनांक १८ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर गुरुवारी मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११८८ थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
परतीच्या प्रवासात दिनांक १९ एप्रिल ते ७ जूनपर्यंत थिविवरून दर शुक्रवारी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे:
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२ एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३ , थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०२
२) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११२९/०११३०
गाडी क्र. ०११२९ एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
ही गाडी दिनांक २० एप्रिल ते ८ जूनपर्यंत दर शनिवारी मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११३० थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
परतीच्या प्रवासात दिनांक २१ एप्रिल ते ९ जूनपर्यंत थिविवरून दर शुक्रवारी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२ आयसीएफ कोच: सेकंड सीटिंग (जनरल) – २०, एसएलआर – ०२
Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर अजून २ गाड्या; एकूण ३२ फेऱ्या – Kokanai
Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत आरवली रोड ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) Train no. 12617 Ernakulam – H. Nijamuddin Express
या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज. – रत्नागिरी विभागादरम्यान 1 तास 45 मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा जो उमेदवार प्रवासी संघटनेच्या मागण्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Follow us on
सावंतवाडी दि. ०७ एप्रिल: कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत, टर्मिनस व्हावे, टर्मिनस ला प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशा प्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी लोकसभा निवडणुकीतील जो उमेदवार जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल. आतापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुतोंडी भुमिका मांडली आहे यापुढे तशी भूमिका चालणार नाही असा इशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व सचिव मिहीर मठकर यांनी दिला आहे.
आता लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनस ला उघड पाठिंबा देणार्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं, जाहीरनाम्यात रेल्वे स्थानक टर्मिनस विषय घ्यावा. टर्मिनस साठी आंदोलन छेडले गेले, टर्मिनस भूमिपूजन झाले आणि नऊ वर्ष रखडले आहे. टर्मिनस ला विरोध आणि बाजू घेणारे आज एकत्र आहेत. रेल्वेमंत्री यांना भेटल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आश्वासन दिले होते. मात्र प्रवाशांची गैरसोय होत आहे याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे..
कोणतीही निवडणूक असली तर कोकणातून राजकारणी लोकांना चाकरमान्यांची आठवण येते. मग काय गावातून फोनवर फोन जातात कि तुझे नाव येथील वोटिंग लिस्ट वर आहे, मतदानाला येऊन आम्हाला सहकार्य कर. मात्र त्याच चाकरमान्यांच्या कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या खडतर प्रवासाशी राजकारणी लोकांना देणे घेणे नाही. अशा वेळी निवडणुकीतच आपल्या मागण्या पूर्ण करण्याची संधी चाकरमान्यांनी सोडू नये,
Konkan Railway News: उन्हाळी हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेतून मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर एक लांब पल्ल्याची विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण २४ फेऱ्या होणार आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे
01463/01464 एलटीटी-कोचुवेली साप्ताहिक विशेष (एकूण 24फेऱ्या)
01463 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 11.04.2024 ते 27.06.2024 पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून संध्याकाळी 4:00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 08:45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 साप्ताहिक विशेष 13.04.2024 ते 29.06.2024 पर्यंत दर शनिवारी कोचुवेली येथून दुपारी 4:20 वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी रात्री 09.50 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.
आरक्षण:उन्हाळी विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 08.04.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल अशी मध्य रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
Konkan Railway News:या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षंहीच्या उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष प्रवासी भाड्यावर:
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक ०७/०४ /२०२४ ते ०५/०६/२०२४ पर्यंत दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक ०८/०४/२०२४ ते ०६/०६/२०२४ पर्यंत गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Konkan railway news :रेल्वेने जुन्या प्रकारातील ICF डब्यांसह धावणाऱ्या गाड्या आता आधुनिक प्रणालीच्या लिंके हॉफमन बुश (एलएचबी) मध्ये रूपांतरित करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वेमार्गावरून जुन्या प्रकारातील डब्यांसह धावणारी अजून एक लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी आता लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डब्यांसह धावणार आहे. गाडी क्रमांक १६३३७/१६३३८ ओखा एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस ही गाडी या महिन्याच्या ५ तारखेपासून एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
वेगवान प्रवासासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इंटिग्रल कोच फॅक्टरी या जुन्या प्रकारातील डब्याचे रुपांतर एलएचबी डब्यात केले जात आहे. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात ही प्रक्रिया सुरू असून, शेकडो रेल्वेगाड्या एलएचबी डब्यांसह धावत आहेत. आता कोकण रेल्वेवरील एलएचबी डबे असलेल्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.
गाडी क्रमांक १६३३७ ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस दिनांक ८ एप्रिलपासून ओखा येथून तर गाडी क्रमांक १६३३८ एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस दिनांक 5 एप्रिलपासून एर्नाकुलम येथून एलएचबी डब्यांसह धावणार आहे. एक्सप्रेस गाड्यांना एलएचबी डबे जोडल्याने रेल्वे गाड्यांच्या डब्याच्या रचनेत थोडा बदल झाला आहे. सुधारित डब्यांच्या संचनेनुसार वातानुकूलित द्वितीय श्रेणी २ डबे, वातानुकूलित इकॉनॉमी तृतीय श्रेणीचे ३ डबे, १२ शयनयान डबे, सामान्य २ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर डबा एक, पॅन्ट्री कार एक असे एकूण २२ डबे असणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
कणकवली, दि.०१ : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी आज कणकवलीतून रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली. उद्या त्याला येथील न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्या तरूणाला सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. त्या तरूणाने आयआरसीटीसी ॲपवरून रेल्वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर रेल्वे तिकीटे काढून देणाऱ्या त्या संशयित तरूणाची माहिती घेऊन सोमवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.
रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त समजल्यानंतर शहरातील इतर तिकीट विक्री एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान रेल्वे तिकीट विक्री आणि बुकींग प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून संशयित तरूणाची चौकशी सुरू आहे. तिकीट बुकिंग साठी वापरला जाणारा मोबाईल, कॉम्प्युटर आदी साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयित अधिक चौकशी करून त्याला मंगळवारी न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
मुंबई : कोकण रेल्वेचे KRCL व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे या पदावरूंन निवृत्त झाल्याने त्या जागी आता संतोष कुमार झा हे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
संतोष कुमार झा यांनी लखनौ विद्यापीठातून (भूविज्ञान) एम.एससी. आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथून एमबीए (मार्केटिंग) केले आहे. ऑपरेशन्स, पायाभूत सुविधा नियोजन आणि व्यवसाय विकास क्षेत्रात २८ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले झा यांनी भारतीय रेल्वेच्या प्रमुख विभागांचे संचालन केले आहे. रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात तसेच मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब, साइडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.