Category Archives: कोकण रेल्वे
Konkan Railway News: दिवाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मध्यरेल्वेच्या सहकार्याने दिवाळी हंगामात आठवड्यातुन तीन दिवस धावणारी एक दिवाळी स्पेशल गाडी चालविणार आहे.
Train No. 01129 / 01130 Lokmanya Tilak (T) – Thivim – Lokmanya Tilak (T) Special (Tri-Weekly) :
ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train No. 01129 Lokmanya Tilak (T) – Thivim – Special (Tri-Weekly) :
दिनांक 01/11/2023 ते 29/11/2023 शनिवार, सोमवार आणि बुधवार या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:15 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता थीवी या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01130 Thivim- Lokmanya Tilak (T) – Special (Tri-Weekly) :
दिनांक 02/11/2023 ते 30/11/2023 रविवार , मंगळवार आणि गुरुवार या दिवशी ही गाडी थीवी या स्थानकावरुन संध्याकाळी 15:00 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे , राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.
डब्यांची संरचना
फर्स्ट एसी – 01, टू टायर एसी + फर्स्ट एसी (एकत्रित) – 01 +थ्री टायर एसी – 04 + सेकंड स्लीपर – 09 + जनरल – 04+ एसएलआर व अन्य – 02 असे मिळून एकूण 21 डबे
आरक्षण
Trains no. 01130 Thivim – Lokmanya Tilak या गाडीचे आरक्षण परवा दिनांक २७ ऑक्टोबर 2023 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत.
Mice in Train’s Pantry: मुंबई-गोवा ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पॅन्ट्रीमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ उंदीर खात असल्याचा व्हिडीओ एका रेल्वे प्रवाशाने शूट केला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानेतर रेल्वेतील कॅटरिंग सेवांची स्वच्छता आणि सुरक्षिततेचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रविवारी एलटीटी-मडगाव ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. मध्य रेल्वेने देखील या व्हिडीओची पुष्टी केली आहे. मात्र, ट्रेनमधील खानपान सेवा हाताळणाऱ्या आयआरसीटीसीच्या एजन्सीने मध्य रेल्वेवर ठपका ठेवत लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला येथील रेल्वे यार्डमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई एलटीटी – मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये उंदरांचा सुळसुळाट#centralrailway #RailMinIndia#konkanrailway pic.twitter.com/ykdmBAFbJI
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) October 20, 2023
रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडीत सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल ), आर. के.हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरूप बागुई यांच्यासह विविधविभागातउल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाला देखील पुरस्कार देऊन सन्मानित भ करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेने गेल्या १२-१८ महिन्यांत मिळवलेल्या कामगिरीची माहिती खालीलप्रमाणे दिली
- आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासी महसूल – ₹962.43 कोटी
- आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल – ₹736.47 कोटी
- आतापर्यंतचा सर्वाधिक प्रकल्प महसूल – ₹3274. 70 कोटी
- आतापर्यंतचा सर्वाधिक एकूण महसूल – ₹५१५२.२३ कोटी
- आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा – ₹२७८.९३ कोटी
- रत्नागिरी येथे कोल्ड स्टोरेज आणि एकात्मिक पॅक हाऊसचे बांधकाम करण्यासाठी महाप्रीटसोबत करार करण्यात आला.
- मे 2023 मध्ये, BSNL सोबत एक करार करण्यात आला, ज्या अंतर्गत BSNL ने 31 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जी फायबर ऑप्टिक लाईनच्या नूतनीकरणासाठी राखून ठेवली जात आहे.
राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.