Category Archives: कोकण रेल्वे

कराड ते चिपळूण रेल्वे मार्गाचे नक्की काय झाले? विरोधकांचा प्रश्न आणि सरकारचे उत्तर…

   Follow us on        

मुंबई – पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराडपासून कोकणाला जोडणाऱ्या कराड-चिपळूण या नव्या रेल्वे मार्गाबाबत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण, योगेश सागर, शेखर निकम, नाना पटोले, डॉ. देवराव होळी यांनी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे कामाबाबतची लक्षवेधी मांडत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची कराड ते चिपळूण प्रकल्पाची संकल्पना अनेक वर्षे चर्चेत आहे. २०१२ साली तत्कालीन आघाडी  मंत्रिमंडळाने हा प्रकल्प केंद्र सरकारने 50 तर राज्य सरकारने 50 टक्के खर्च करून अमलात आणावा असा निर्णय घेतला. त्याला मान्यता देत निधीही देण्याची घोषणा केली. मात्र, काही दिवसांनी हा प्रकल्प 26 टक्के कोकण रेल्वे व 74 टक्के व्यावसायिक शापूरजी पालनजी कंपनीने करावा, असा निर्णय घेतला गेला. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला आले. त्यांच्या हस्ते भुमिपुजन पण केले.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे-बंगळूर हा महामार्ग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औदयोगिक प्रकल्प आहेत. आणि कोकण जरी अविकसित असला तरी या याठिकाणी मोठी जलसंपदा, बंदरे आहेत. पुढे सरकारने समृद्धी महामार्गालाप्राधान्य द्यायचे ठरवले. मात्र, या रेल्वे मार्गाला कमी लेखण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी हा प्रकल्प रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सातारा जिल्ह्यातील आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्याचा त्याचा विचार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या प्रकल्पासाठी काही त्रुटी आहेत त्या दूर करून मुख्यमंत्री शिंदे या रेल्वेमार्गाला चालना देणार का?असा प्रश्न अधिवेशनात चव्हाण यांनी उपस्थित केला. 

या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे म्हणाले की  कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रास जोडणाऱ्या चिपळूण – कराड रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल.

श्री. भुसे पुढे  म्हणाले की, कराड- चिपळूण नवीन रेल्वे लाईन प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र शासनाचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला असून 7 मार्च 2012 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी या प्रकल्पाची किंमत 928.10 कोटी रुपये होती, त्यानुसार राज्य शासनाची 50 टक्के हिश्श्याची रक्कम 464.05 कोटी इतकी होती तर केंद्र शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम पुढील तीन वर्षात द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. या दरम्यान कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारीत अंदाजित रक्कम 3 हजार 196 कोटी झाली.

रेल्वे मंत्रालयाने सहभाग धोरण 2012 अंतर्गत चिपळूण- कराड रेल्वेमार्गास संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यास मंजुरी दिली. या उपक्रमात मेसर्स शापूरजी पालनजी यांची भागीदार म्हणून निवड करण्यात आली आणि भविष्यकालीन संयुक्त उपक्रम म्हणून कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांचे दरम्यान प्रत्येकी 26 टक्के आणि 74 टक्के या प्रमाणात सहभाग निश्चितीचा करार करण्यात आला. दरम्यानच्या काळात हा प्रकल्प व्यवहार्य नसून या प्रकल्पामध्ये शापूरजी पालनजी कंपनी सहभागी होणार नसल्याचे कंपनीने pस्पष्ट केले .  यानंतरच्या काळात केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी राज्य शासनाने या मार्गाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्य शासनाने 80 टक्के भार उचलावा, असे राज्य शासनास कळविले. मात्र राज्यासमोरील परिस्थिती पाहता समप्रमाणात केंद्र आणि राज्याने आर्थिक सहभाग उचलावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली, यावर केंद्राकडून अद्याप काही कळविण्यात आलेले नसल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.

संबधित बातमी >कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्ग; घोडे नेमके अडले कुठे?

महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून कराड – चिपळूण आणि वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी – कोल्हापूर या रेल्वे प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचा समावेश पिंकबुक मध्ये करण्यात आला आहे. कराड – चिपळूण रेल्वेमार्गासाठी पुन्हा एकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

   

 

Block "ad1" not found

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग बनवला जावा – खा. सुप्रिया सुळे

नवी दिल्ली : बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुचवला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. याचा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होणार असून यासाठी येथील दळणवळण व्यवस्था मजबूत आणि लोकांच्या सोयीची असणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
असा मार्ग झाला तर पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके, खडकवासला विधानसभा मतदार संघ तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाच्या औद्योगिक आणि इतर विकासाला चालना मिळू शकेल. हा मार्ग पुणे – मिरज – बंगळूर या मार्गाला देखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा असून तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करुन याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
या आधीही कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. कराड ते चिपळूण तसेच कोल्हापूर ते वैभववाडी लोहमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी कोल्हापूर ते वैभववाडी या लोहमार्गाला मंजुरी मिळाली आहे पण निधीअभावी त्याचे काम अजूनही चालू झाले नाही आहे.

कोकणरेल्वे मार्गावर चालणार्‍या दुरांतो एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल.

Konkan Railway News :गाडी नंबर 12284 / 12283 H. Nizamuddin – Ernakulam Jn. – H. Nizamuddin Duronto Weekly Express या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. या गाडीचे स्लीपरचे ६ डबे एसी डब्यांमध्ये परावर्तीत केले जाणार आहे. ५ थर्ड एसी आणि १ सेकंड एसी डबे त्या जागी जोडले जाणार आहेत.

हा बदल दिनांक गाडी क्रमांक 12284 H. Nizamuddin – Ernakulam Jn या गाडीसाठी दिनांक 22 जुलै 2023 पासून तर 12283 H. Nizamuddin – Ernakulam Jn या गाडीसाठी दिनांक 25 जुलै 2023 पासून अंमलात आणला जाणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या गाडीला पनवेल आणि रत्नागिरी येथे थांबा आहे. 

या गाडीच्या सध्याची डब्यांची संरचना

स्लीपर – 09 + थ्री टायर एसी – 05 + टू टायर एसी – 01  + फर्स्ट एसी – 01 + जनरेटर कार – 02 + पॅन्ट्री कार – 01असे मिळून एकूण 19 LHB  डबे

सुधारित संरचना

स्लीपर – 03 + थ्री टायर एसी – 10 + टू टायर एसी – 02  + फर्स्ट एसी – 01 + जनरेटर कार – 01 + पॅन्ट्री कार – 01 + एसएलआर – 01 असे मिळून एकूण 19 LHB  डबे

हेही वाचा – कोकणातील ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; भरवणार ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’

कोंकणरेल्वेला माकडांपासून ‘असाही’ त्रास; उपायासाठी करावे लागणार लाखो खर्च…..

Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे १००% विद्युतीकरण झाले असून जवळपास सर्व गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्यात येत आहेत. पण या बदलामुळे रेल्वे समोर काही नव्या समस्या निर्माण झाल्या आहे. त्यातील एक समस्या म्हणजे या मार्गावरील माकडांपासून होणारा त्रास.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर या विभागातील OHE पोर्टल्स तसेच मास्ट्स यावर माकडे चढून उड्या मारू लागल्याने या विभागात विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावर रेल्वे गाड्या चालतात त्या रेल्वेच्या ओव्हर हेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू असल्याने रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे.

कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतांची बागेंची नासधूस करून या माकडांनी शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. आता त्यांचा त्रास कोकण रेल्वे मार्गावर होताना दिसत आहे. आता यावर उपाय म्हणून या भागात अँटी क्लाइंबिंग उपकरणे कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत. त्यासाठी रेल्वेतर्फे निविदा देखिल काढण्यात आली आहेत. सुमारे 6 लाख 62 हजार 663 रुपये इतक्या अंदाजीत खर्चाची ही निविदा आहे

मत्स्यगंधा एक्सप्रेस २५ वर्षाची होणार; रौप्यमहोत्सव साजरा केला जाणार

Konkan Railway News|कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान 741 किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी  पहिली प्रवासीसेवा गाडी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या मे महिन्यामध्ये २५ वर्षाची होणार आहे. ट्रेन क्रमांक १२६१९/६२० मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरु सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेसला १ मे १९९८ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान ए.बी. वाजपेयी आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ही गाडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला समर्पित केली होती. 
ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटकातील मंगळूर स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस मुंबई ते मंगळूर दरम्यानचे १,१८६ किमी अंतर १६ तासांत पूर्ण करते. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला येथील मासेमारी उद्योगाशी निगडीत मत्स्यगंधा हे नाव दिले गेले आहे.
कुंदापुरा रेलू प्रयाणिकारा हितरक्षण समिती (कर्नाटक) या निमित्ताने या गाडीचा रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोकण रेल्वेचा प्रवास, सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना यावर चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्याची समितीची योजना आहे. 

रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर अनिश्चित कालावधीसाठी रद्द..

KONKAN RAILWAY NEWS:रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणाऱ्या 10101 रत्नागिरी-मडगाव आणि 10102 मडगाव-रत्नागिरी या गाड्या अनिश्चित कालावधीसाठी रद्द केल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
 याआधी  रेल्वे प्रशासनाने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे या गाड्या दिनांक 31/03/2023 पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत अनिश्चित कालावधीपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अभियांत्रिकी कारणासाठी या गाड्या रद्द ठेवण्यात येणार आहेत असे कोंकण रेल्वेने जाहीर केले आहे.
दुपारी दिवा येथून सुटणारी दिवा – रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे  रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्‍या प्रवाशांना ही गाडी सोयीची होती. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

दिवा – रत्नागिरी पॅसेंजर गाडीच्या वेळापत्रकात बदल; १५ तारखेपासून नवीन वेळापत्रक

रत्नागिरी | कोंकण रेल्वे मार्गावर दिवा ते रत्नागिरी दरम्यान चालविण्यात येणाऱ्या ५०१०३ – दिवा रत्नागिरी पॅसेंजर या गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हे बदल दिनांक १५/०३/२०२३ रोजी अंमलात आणण्यात येणार आहेत. 
 

वेळापत्रकामध्ये पुढील बदल करण्यात आलेले आहेत.

Station सध्याची वेळ  सुधारित वेळ (०९/०६/२०२३ पर्यंत) सुधारित वेळ (१०/०६/२०२३ पासून- पावसाळी वेळापत्रक)
Diva Jn. 15:20 17:50 17:50
Panvel 15:50 18:30/18:33 18:30/18:33
Apta 16:12 18:55/18:56 18:55/18:56
Jite 16:24 19:08/19:09 19:08/19:09
Pen 16:37 19:19/19:20 19:19/19:20
Kasu 16:50 19:30/19:31 19:30/19:31
Nagothane 17:03 19:43/19:44 19:43/19:44
Roha 17:25 20:07/20:12 20:07/20:12
Kolad 17:47 20:24/20:25 20:24/20:25
Indapur 17:59 20:35/20:36 20:35/20:36
Mangaon 18:12 20:45/20:46 20:45/20:46
Goregaon Road 18:24 20:56/20:57 20:56/20:57
Veer 18:36 21:05/21:06 21:05/21:06
Sape Wamne 18:46 21:15/21:16 21:18/21:19
Karanjadi 18:56 21:25/21:26 21:30/21:31
Vinhere 19:11 21:34/21:35 21:44/21:45
Diwankhavati 19:29 21:42/21:43 21:58/21:59
Kalambani Budruk 19:39 21:53/21:54 22:12/22:13
Khed 19:59 22:03/22:04 22:23/22:24
Anjani 20:15 22:15/22:16 22:41/22:42
Chiplun 20:40 22:30/22:35 23:00/23:05
Kamathe 21:00 22:49/22:50 23:21/23:22
Sawarda 21:12 22:58/22:59 23:34/23:35
Aravali Road 21:25 23:09/23:10 23:49/23:50
Kadavai 21:35 23:19/23:20 23:55/23:56
Sangameshwar Road 21:45 23:33/23:34 00:20/00:21
Ukshi 22:10 23:45/23:46 00:50/00:51
Bhoke 22:40 00:08/00:09 01:20/01:21
Ratnagiri 00:35 00:35 02:00
   

ऐन गर्दीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी सोडलेल्या दोन अतिरिक्त गाड्या रद्द.

रत्नागिरी| होळीसाठी रेल्वेने गावी जाणार्‍या चाकरमान्यांचा त्रास वाढवणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी या मार्गावर सोडण्यात आलेल्या 2 गाड्या रद्द केल्या आहेत. 

पुढील दोन गाड्या दिनांक 09/03/2023 ते 12/03/2023  दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. 

01597 मेमू ट्रेन रोहा येथून चिपळूण साठी सुटणारी रोहा – चिपळूण अनारक्षित मेमू 

01598 मेमू चिपळूण येथून रोहा या स्थानकासाठी सुटणारी चिपळूण – रोहा अनारक्षित मेमू

दिवा स्थानकावरून रोहा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार्‍या गाडीचा विस्तार करून या गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील ईतर गाड्यांमध्ये होणारी गर्दी विभागली जात असताना रेल्वे प्रशासनाने अचानक या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. 

संबंधित बातमी >खुशखबर| होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर मेमू ट्रेनसह अजून ६ विशेष गाड्या…

 

आंबोली पोलिस तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू जप्त

सिंधुदुर्ग |शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या अवैध दारूची महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे.मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाख ८ हजारांच्या दारुसह ४ लाखाची गाडी मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (३६, रा.अदालट्टी, ता. अथणी, बेळगांव ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांनी आंबोली तपासणी नाक्यावर केली. यात गोवा बनावटीच्या इम्पेरियल ब्ल्यू ब्रँडच्या बाटल्यांचे नऊ बॉक्स जप्त करण्यात आले. तर या प्रकरणी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची शेवरलेट एन्जॉय ( के ए – २३ एन ३६३५) ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

 

रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी धावणार होळी विशेष गाड्या….

Holi Special Trains News | 03 Mar 2023 | प्रवाशांचा वाढता  प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
1) Train no. 01151/ 01152 Mumbai CSMT – Ratnagiri – Mumbai CSMT Special  :
Train no. 01151 Mumbai CSMT – Ratnagiri  Special  
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई  या स्थानकावरुन रात्री ००:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी सकाळी ०९:०० वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01152  Ratnagiri – Mumbai CSMT Special  
दिनांक ०६/०३/२०२३ सोमवार या दिवशी ही गाडी  रत्नागिरी  या स्थानकावरुन सकाळी ०६:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा (RN), माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर रोड, 
डब्यांची संरचना
स्लीपर – 18 + एसलआर – 02 असे एकूण 20  डबे
2) Train no. 01154 / 01153 Ratnagiri – Panvel – Ratnagiri Special: 
Train no. 01154 Ratnagiri – Panvel 
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी रत्नागिरी या स्थानकावरुन सकाळी १०:०० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:२०वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01153  Panvel – Ratnagiri
दिनांक ०५/०३/२०२३ रविवार व ०८/०३/२०२३ बुधवार या दिवशी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल व ती रात्री  ०० :२० वाजता रत्नागिरी या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
रोहा (RN), माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर रोड, 
डब्यांची संरचना
स्लीपर – 18 + एसलआर – 02 असे एकूण 20  डबे
3) Train no. 01155 / 01156 Panvel – Sawantwadi Road – Panvel Special: 
Train no. 01155 Panvel – Sawantwadi Road Special: 
दिनांक ०४/०३/२०२३ शनिवार व ०७/०३/२०२३ मंगळवार या दिवशी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी १८:२० वाजता सुटेल व ती दुसया दिवशी सकाळी ०४:१० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01155 Panvel – Sawantwadi Road Special: 
दिनांक ०५/०३/२०२३ रविवार व ०८/०३/२०२३ बुधवार या दिवशी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी  ०७:४५  वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा,आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची संरचना
स्लीपर – 18 + एसलआर – 02 असे एकूण 20  डबे
4) Train no. 01158 Ratnagiri – Lokmanya Tilak (T) Special : 
दिनांक ०९/०३/२०२३ गुरुवार या दिवशी ही गाडी  रत्नागिरी  या स्थानकावरुन सकाळी ०६:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस,मुंबई  या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे
डब्यांची संरचना
स्लीपर – 18 + एसलआर – 02 असे एकूण 20  डबे
प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्‍यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search