Category Archives: गणेश चतुर्थी २०२३

”पुढच्या वर्षी लवकर या.. ” बाप्पाला निरोप देण्यासाठी साकारले गेले आकर्षक वाळूशिल्प

वेंगुर्ले: गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील सर्वात मोठा सण. दिवाळी पेक्षाही मोठया उत्साहाने हा सण साजरा केला जातो. तसेच हा सण म्हणजे अनेक कलाकारांना आपली कला एक संधीच असते जणू. मूर्ती शिल्पकार, मखर कलाकार आणि भजनी गायक या संधीचा लाभ घेऊन आपल्या कला सादर करताना दिसतात. आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध कलाकार रविराज चिपकर यांनी या गणेशोत्सवात आपली कला सादर केली आहे. सागरतीर्थ समुद्र किनारी गणपतीला भावपुर्ण निरोप देताना रविराज चिपकर यांनी प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे साकारलेले वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आज संध्याकाळी भाविकांनी अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे जड अंतःकरणाने करत आहेत. याच धर्तीवर प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विसर्जनाला घेऊन जाणाऱ्या गणपतीचे वाळू शिल्प उभारले आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणीही केली आहे. हे शिल्प सर्वच भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Loading

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रेल्वेच्या उद्यापासून ६ विशेष गाड्या

Konkan Railway News :गणेशोत्सवासाठी कोकणात गावी गेलेल्या गणेश भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी उद्यापासून एकूण 6 विशेष मेमू सेवा चालविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मडगाव ते पनवेल सेवा

1)गाडी क्रमांक 07104 मडगाव – पनवेल ही विशेष गाडी उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मडगाव या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे.

2)परतीच्या प्रवासात ही गाडी सोमवार दिनांक 02 ऑक्टोबर रोजी पनवेल या स्थानकावरून रात्री 21:10 वाजता निघून दुसर्‍या दिवशी सकाळी 09:30 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचणार आहे.

खेड ते पनवेल सेवा

3)गाडी क्रमांक 07106 खेड – पनवेल विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबर या दिवशी दुपारी 15:15 वाजता खेड या स्थानकावरून निघणार असून संध्याकाळी 20:30 वाजता पनवेल स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)

4)गाडी क्रमांक 07105 पनवेल – खेड विशेष अनारक्षित मेमू ही विशेष गाडी दिनांक 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या दिवशी रात्री 21:10 वाजता पनवेल या स्थानकावरून निघणार असून रात्री 01:10 वाजता खेड या स्थानकावर पोहोचणार आहे. (दोन सेवा)

या गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून एकूण 8 कोचसहित चालविण्यात येणार आहेत.

Loading

गणेश विसर्जनात मगरींचे विघ्न; उपाययोजना करण्याची होत आहे मागणी

खेड : खेड शहरातील जगबुडी नदीमध्ये अनेक मगरींचा  वावर असल्याने दीड दिवसाचे गणपती विसर्जन करताना येथील विसर्जन कट्टा मंडळाच्या सदस्यांना आपला जीव मुठीत धरून गणरायाचे विसर्जन करावे लागत होते. या मगरींना पळवून लावण्यासाठी नदीमध्ये फटाक्यांचे बॉम्ब फोडून त्यांना पळवून लावावे लागले.

याची दखल वनविभागाने (Forest Department) घेऊन पाच दिवसाच्या गणपती विसर्जनामध्ये (Konkan Ganeshotsav) कोणती अडचण येऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीत अनेक छोट्या मोठ्या मगरी पावसाच्या पाण्यामुळे आल्या आहेत. त्या येथील प्रवाहात मुक्त फिरताना दिसत असल्याने अनेकांनी जगबुडी नदीत उतरणे बंद केले आहे.

 

Loading

Train No. 10105 | डब्यांवर लिहिलेल्या चुकीच्या क्रमांकामुळे चाकरमन्यांची गाडी चुकली

मुंबई :चार महिने अगोदर कसेबसे आरक्षित तिकीट मिळवायचे, नाही मिळाल्यास  दुप्पट तिप्पट भावाने दलालांकडून तिकीट विकत घ्यायचे आणि शेवटी रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे गाडी चुकणाऱ्या प्रवाशांनी आपल्या त्रासाबद्दल नेमकी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न विचारण्याची वेळ या दोन दिवसांत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर यायला लागलीआहे.
रेल्वेच्या अशाच भोंगळ कारभारामुळे काल ४ ते ५ प्रवांशांची गाडी चुकल्याचा प्रकार घडला आहे.  विनोद सुरेशराव मोरे यांच्याकडे दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस-ट्रेन क्रमांक १०१०५ या गाडीची कन्फर्म तिकिटे होती. त्या गाडीवरील ट्रेन क्रमांक ठराविक बोगिंवर चुकीचा टाकला आहे. या चुकीमुळे त्यांच्यासहीत सुमारे ४ ते ५ कन्फर्म तिकीट असलेल्या कुटुंबीयांची ही ट्रेन काल १६ तारखेला चुकली.
दिवा – सावंतवाडी गाडीचा गाडीवरील १०१०५ क्रमांक नमूद करून ही चूक सुधारावी. सोबत काल रेल्वे कडूनही या गाडीबाबत ठराविक कालांतराने उद्घोषणा करून प्रवाशांना सूचित करणे गरजेचे होते ते मी अर्धा तिथे उपस्थित असूनही झालेले नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे.
रेल्वे प्रशासन यावर्षी गणेशोत्सवासाठी दरवर्षी प्रमाणे अतिरिक्त गाड्या चालवत आहे. मात्र यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. महत्वाच्या स्थानकावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची उद्घोषणा Announcement योग्य प्रकारे केली जात नाही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाच्या स्थानकावर प्रवासी मदत कक्षाची उभारणी करणे आवश्यक होते. मात्र तशी काहीच सोय न केल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.

Loading

कोकणातील गणेशभक्तांना उद्यापासून टोलमाफी; इथे मिळणार पास

मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. मुंबई – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 01 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज दिनांक 15 सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागानं शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार उद्या 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत गणेशभक्तांना पथकरातून सूट मिळेल.

असे मिळतील पास

टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023′ , ‘कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास दिले जाणार आहेत. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचं नाव असेल. हे पास गणेशभक्तांना पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी व आरटीओ कार्यालयात मिळतील. संबंधित ठिकाणी हे पास पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत याची काळजी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभागानं घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी देखील हाच पास ग्राह्य धरण्यात येईल.

पोलीस व परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना सरकारनं केल्या आहेत.

Loading

दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा प्रवास गारेगार होणार; तात्पुरत्या स्वरूपात जोडले जाणार दोन ‘थ्री टायर एसी’ चे डबे

Kokan Railway News : गणेशोत्सवासाठी दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर  ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत महिन्याभरासाठी बदल केला आहे. या गाडीला दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. या बदलामुळे या गाडीच्या जनरल डब्यांची संख्या 14 वरुन 12 होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार

1)गाडी क्रमांक 50108 मडगाव – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.

2)गाडी क्रमांक 10105 दिवा – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी – मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.

कोकण विकास समितीने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला किमान एक एसी डबा जोडण्यात यावा यासाठी कोकण रेल्वेकडे मागणी केली होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे.

 

Loading

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारले जाणार

Mumbai Goa Highway :दिनांक १५ सप्टेंबर पूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल असे आज मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा उद्घाटन आणि वृक्षारोपण प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र

मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे ९०% काम पूर्ण झाले आहे. सध्या काँक्रिटीकरणाच्या या कामातील महत्त्वाचा क्युरिंग पिरियड सुरु आहे.तो येत्या दोन दिवसांत पूर्ण करून वाहतुक सुरू करून देण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आणि विशेषतः वाहन चालकांच्या सोयीसाठी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. याठिकाणी चहा-पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, पोलीस मदत कक्ष, वाहनचालकांसाठी आराम कक्ष अशा अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत असे ते म्हणालेत.

कशेडी बोगद्यामुळे वेळेची बचत होणार.

कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. अशा या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

Loading

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर; ‘या’ गणपती विशेष गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जाणार

Konkan Railway News :गणेश चतुर्थी सण जवळ येत आहे; चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मध्य रेल्वे आणि पाश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडून प्रवाशांची सोय केली आहे. तरीही या फेर्‍या अपुऱ्या पडताना दिसत आहेत. या कारणास्तव या मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्‍या काही विशेष गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. 

खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित चालविण्यात येणार आहेत. 

1)01155/01156 दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी – एकूण 36 फेऱ्या  (अप आणि डाऊन) 

ही गाडी एकूण 8 डब्यांसह चालविण्यात येणार होती तिचे 4 डबे वाढविले असून ही गाडी आता 12 डब्यांसहित चालविण्यात येणार आहे. 

2) 01165/01166 मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – एकूण 16 फेर्‍या  (अप आणि डाऊन) 

ही गाडी एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे. 

3) 01167/01168 एलटीटी – कुडाळ विशेष सेवा – एकूण 24 फेर्‍या  (अप आणि डाऊन) 

ही गाडी सुद्धा एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे.

या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीत आरक्षण असणार्‍या प्रवाशांचा फायदा होणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे 

कोकण विकास समितीच्या मागणीला यश

दिवा-चिपळूण, दिवा-रत्नागिरी या मेमू गाड्यांच्या डब्यांची संख्या 16 करावी अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली होती. त्यांची मागणी अंशतः का होईना, ती मान्य करून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे.

 

Loading

गणेश चतुर्थी २०२३: अपुरी सुविधा उपलब्ध असणार्‍या रेल्वे स्थानकांवर गरज आहे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीची

वाचकांचे व्यासपीठ :कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथील गर्दीवर नियंत्रणासाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीकरिता स्वयं सेवक, स्वयंसेवी संस्था यांनी पुढे आले पाहिजे.गणपती विसर्जन ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था सेवा देतात. अनिरुद्ध अकॅडमी, संत निरंकारी मिशन ,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान असे अनेक संस्था आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी व निर्माण झाल्यानंतर सेवा देतात. त्याच धर्तीवर कोकण गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांसाठी मदत होईल. कोकणातील रेल्वे स्टेशन बस स्थानके येतील सेवा सुविधांचा अभाव आहे .काळजी घेणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांची भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम ही पण एक गणपती बाप्पा चरणी सेवा अर्पण होईल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि पनवेल या स्थानकावर गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. गर्दी आणि नियोजनाअभावी अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे कोकणातील स्थानकांवरील अपुऱ्या सुविधांमुळे येणार्‍या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो अशा वेळी स्वयंसेवी संस्थांनी यात लक्ष घालून मदत केल्यास कित्येक चाकरमानी प्रवाशांचा त्रास नक्किच कमी होईल. 

 भालचंद्र माने.नेरूळ, नवी मुंबई.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक; गणपती स्पेशल गाडी उशिराने धावणार

Konkan Railway News :  कोकण रेल्वे मार्गावर गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी मडगाव ते कुमठा दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉकमुळे मडगाव पर्यंत धावणाऱ्या गाड्यांपैकी एका गणपती स्पेशल गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
खालील गाडी या दिवशी उशिराने धावणार आहे.
Train no. 09057 Udhna – Mangaluru Jn. Special  
दिनांक 13 सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते मडगाव दरम्यान १०५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना याची नोंद घेण्याची विनंती केली असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search