Category Archives: देश

Tatkal Booking Time Changed: रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंग वेळेत बदल होणार?

   Follow us on        
Tatkal ticket timing changed: रेल्वेच्या तात्काळ आरक्षण वेळेत बदल झाला असल्याची माहिती सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित viral होत आहे. या माहिती प्रमाणे एसी श्रेणीसाठी (AC Classes) तात्काळ आरक्षणासाठी सध्याची वेळ जी सकाळी, १० वाजता आहे ती सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. तर नॉन-एसी क्लास म्हणजे स्लीपर, सेकंड सीटिंग श्रेणीच्या आरक्षणाची सध्याची वेळ जी सकाळी ११ वाजताची आहे ती बदलून दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या माहितीप्रमाणे येत्या दिनांक १५ एप्रिल पासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.
मात्र समाज माध्यमावर व्हायरल होत असलेला हा संदेश खोटा असल्याची माहिती समोर येत आहे. Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) ने तात्काळ आरक्षणात असा कोणताही बदल करण्यात येणार नसून हा संदेश फेक असल्याचे जाहीर केले आहे.  “एक्स”  वरील अधिकृत खात्यावर या आशयाची पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MP Salary Hike: खासदारांचा पगार वाढला; इतर भत्ते आणि पेन्शनमध्येही कमालीची वाढ

   Follow us on        

नवी दिल्ली: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या पगारात वाढ केली आहे. खासदारांच्या पगारासोबतच इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. त्यामुळे खासदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे.

संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी एक नोटिफिकेशन काढले. या नोटिफिकेशननुसार, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये प्रति महिना झाला आहे. त्याचबरोबर, दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २,५०० रुपये झाला आहे.

खासदारांच्या पगारात वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती, ती आता ३१,००० रुपये प्रति महिना मिळणार आहे. ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे, त्यांना मिळणारी जास्तीची पेन्शन २,००० रुपयांवरून २,५०० रुपये झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. याआधी,एप्रिल २०१८ मध्ये खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये बदल करण्यात आला होता.

 

New Traffic Rules Fine: ट्रॅफिक नियम मोडणे आता परवडणार नाही… दंडाचे नवीन दर जाहीर..

   Follow us on        

New Traffic Rules Fine : बेदरकार वाहतूक करून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जरब बसवण्यासाठी सरकारने आता कडक पाऊले उचलली आहेत. दिनांक 1 मार्च 2025 पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडलेल्या गुन्हेगारांना वाढीव दंड, संभाव्य तुरुंगवास आणि अनिवार्य समुदाय सेवेसह कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल. वाहतूक नियम दंडात आता दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीचे उद्दिष्ट निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या वर्तनांना आळा घालणे आणि देशभरातील रस्ते सुरक्षा वाढवणे हे आहे.

नियमभंग करुन वाहन चालवल्याबद्दलच्या दंडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सुरुवातीला, अशा गुन्ह्यांसाठी 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत दंड आकारला जात होता. आता नवीन नियमांनुसार, प्रथमच नियम मोडणारांसाठी 10 हजार रुपयांपर्यंत दंड वाढला आहे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. ज्यांच्या नियमभंग करुन वाहन चालवताना वारंवार पकडले जाणाऱ्यांसाठी, दंडाची रक्कम 15 हजारांपर्यंत वाढली आहे. तर दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ही होऊ शकतो.

असे असणार सुधारित आहे दंड

वैध परवाना किंवा विमा यासारख्या आवश्यक कागदपत्रे नसताना वाहन चालवल्यास अनुक्रमे 5 हजार आणि 2 हजार रुपये दंड आकारला जाईल.

याच नियमभंगाची पुनरावृत्ती करणाऱ्यांना अतिरिक्त दंड बसू शकतो, त्यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो

विशेष म्हणजे, प्रदूषण प्रमाणपत्र (PoC) नसल्याबद्दलचा दंड 10 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. संभाव्यत: सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

ओव्हरलोडिंग वाहनचालकांकडून जर नियमभंग झाला तर पूर्वी 2 हजार रुपये दंड होता, परंतु आता तो 20 हजारांपर्यंत वाढला आहे.

अल्पवयीन मुलांसंदर्भात वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणात दंड आणखीनच कठोर करण्यात आला आहे. त्यांना 25 हजारांचा दंड, तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही असा नियम आहे

मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल सुधारित दंडामध्ये आता 10 हजार रुपये दंड आणि पहिल्या गुन्ह्यासाठी 15 हजार रुपये आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10,000 रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाचा समावेश आहे.

हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास 1,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना निलंबन

वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास दंडाची रक्कम 5 हजार रुपये झाली आहे.

वैध कागदपत्रांशिवाय वाहन चालवल्यास लायसन्स नसल्यास 5 हजार रुपये आणि विमा नसल्यास 2 हजार रुपये दंड होऊ शकतो.

 

HSRP Number Plate: सावधान! हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नोंदणी करण्यासाठी आपण वापरत असलेली वेबसाइट बनावट तर नाही ना? बनावट आणि खऱ्या वेबसाइटच्या नावांची यादी ईथे वाचा…

   Follow us on        

HSRP Number Plate Update: राज्यामध्ये हाय सिक्योरिटी नंबर प्लेट राज्य सरकारने अनिवार्य केली आहे. येत्या 30 एप्रिलपासून राज्यामध्ये वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक असणार आहे. यानंतर तुम्ही हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावली नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक झाल्यामुळे अनेकांनी या नंबर प्लेट लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता यामध्येही अडथळे येत असल्याचं दिसतंय. सायबर गुन्हेगारांनी यामध्ये आपला डाव साधला आहे.

हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सरकारने एक वेबसाइट दिली आहे. मात्र सायबर गुन्हेगारांनी येथेही अनेक बनावट वेबसाइट तयार केल्याचं आढळतंय. यावरुन ते सर्व सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. यामुळे तुम्हीही ऑनलाइन एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी करत असाल तर सावध व्हा.

तुम्ही जेव्हा तुमच्या वाहनांची नोंदणी करता तेव्हा ती वेबसाइट ही परिवहन विभागाची अधिकृत वेबसाइट आहे की नाही याची खात्री करा. कारण शुल्काच्या बहाण्याने वाहन चालकांची मोठी फसवणूक केली जातेय.

बनावट संकेतस्थळांची (वेबसाईट्स) नावे

1-https://bookmyhssp.in/maharashtra.html

2-https://bookedmyhsrp.com/registration

3- https://www.bookmehsrp.com

4- https://bookingmyhsrp.com

5- https://indnumberplate.com

6- https://hsrprto.in

अधिकृत संकेतस्थळांची नावे

  1. https://mhhsrp.com
  2. https://hsrpmhzone2.in
  3. https://maharashtrahsrp.com

टीप: ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून नागरिकांत जागरूकता आणावी.

Odisha: बालासोर येथे एक्स्प्रेसला अपघात

   Follow us on        

Railway Accident: ओडिशामधील बालासोर येथे न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घातल्याची माहिती समोर आली आहे. बालासोर जिल्ह्यातील सबीरा पोलीस ठाण्याजवळ ही ट्रेन रुळांवरून उतरल्याचे सांगण्यात येत आहे. रुळावरून उरल्यावर ही ट्रेन एका विजेच्या खांबावर आदळली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाहीत.

दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ही ट्रेन नेमकी कशी काय रुळांवरून उतरली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल.

दरम्यान, न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळांवरून उतरल्यानंतर ट्रेनमधील प्रवासी बाहेर आले. त्यामुळे अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे काही अधिकारी आणि पोलीस अपघातस्थळी पोहोचले. त्यानंतर घसरलेल्या ट्रेनला रुळावर आणून वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; १८ जणांचा मृत्यू 

   Follow us on        

Delhi Railway Station Stampede: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या महिन्याभरापासून महाकुंभमेळा सुरू असून, दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे.

ही चेंगराचेंगरी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर झाली. ही घटना, रात्री ९:५५ वाजता घडली. खरंतर, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.या घटनेबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.”

Fact Check:कोविड काळापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना असलेली सवलत रेल्वे पुन्हा चालू करणार?

   Follow us on        

Senior Citizen Concession:भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना कोविड काळापूर्वी तिकीट दरांमध्ये देत असलेली सवलत पुन्हा चालू करणार असल्याची बातमी सर्वत्र प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय रेल्वेने कोविड-19 उपायांचा एक भाग म्हणून मार्च 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती बंद केल्या होत्या. आर्थिक अडचणींमुळे या सवलती पुनर्स्थापित करण्याची कोणतीही योजना नाही, असे सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे. IRCTC पोर्टल हे देखील दर्शविते की ज्येष्ठ नागरिकांना सामान्य प्रवाशांप्रमाणेच भाडे आकारले जाते. याव्यतिरिक्त, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये या सवलती पुनर्संचयित करण्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे बातमी मध्ये केलेला दावा खोटा आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत वारंवार स्पष्ट केले आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पुन्हा सुरू करण्याची कोणतीही योजना नाही, सन २०२२ मध्ये या भूमिकेचा पुनरुच्चार केला गेला. त्यांनी यावर भर दिला की भारत सरकार आधीच रुग्णांना प्रवास खर्चाच्या अंदाजे ५०% अनुदान देते विद्यार्थी आणि अपंगांना तिकीट दरांत सवलत देते. साथीच्या रोगानंतर प्रवाशांच्या एकूण महसुलात झालेली घट लक्षात घेता या सवलती ज्येष्ठ नागरिकांना देणे व्यवहार्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एप्रिल 2023 मध्ये, जेव्हा ज्येष्ठ नागरिक सवलती पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर आणला गेला, तेव्हा न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. शिवाय, डिसेंबर २०२४ मध्ये, जेव्हा लोकसभेत हाच मुद्दा उपस्थित केला गेला तेव्हा वैष्णव यांनी उत्तर दिले की भारत सरकारने प्रवाशांच्या सर्व श्रेणींसाठी (ज्येष्ठ नागरिकांसह) प्रदान केलेले एकूण अनुदान सध्या ₹ 56,993 कोटी आहे. याव्यतिरिक्त, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत पुनर्स्थापित करण्याच्या कोणत्याही योजनेचा उल्लेख नाही.

सारांश, भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत दिल्याचा दावा खोटा आहे.

मार्च २०२० कोविडमुळे लॉकडाऊन लागला होता. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद करण्यात आली. त्या अगोदर ज्येष्ठ नागरिक महिला प्रवाश्यांना 50 टक्के सवलत दिली जात होती तर पुरुष आणि तृतीयपंथीय प्रवाशांना ४० टक्के सवलत दिली जात होती.

Western Railway: हमाल दरांवरून होणारे वाद टाळण्यासाठी रेल्वेची नामी शक्कल

   Follow us on        
मुंबई: अनेकदा रेल्वे स्थानकावर हमालीच्या दरांवरून हमाल आणि प्रवाशांत वाद होतात. यावर उपाय म्हणून  रेल्वे स्थानकांवरील पश्चिम रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता मुंबई सेंट्रल टर्मिनससह काही प्रमुख स्थानकांवर हमालांचे दर डिजिटल डिस्प्लेवर (टीव्ही) प्रदर्शित करण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना हमाल सेवेसाठी अधिकचे पैसे देण्याची वेळ येणार नाही. हा उपक्रम हळूहळू सर्व रेल्वे स्थानकांवर लागू करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर लावण्यात आलेल्या डिजिटल डिस्प्ले स्क्रीनवर जाहिरातींसोबतच रेल्वेशी संबंधित महत्त्वाची माहितीही दाखवली जाते. सध्या या टीव्हीवर हमालांच्या सेवेसाठी अधिकृत दरपत्रक प्रदर्शित केले जात आहे. यामुळे प्रवाशांना हमालीच्या दराबाबत अधिक स्पष्टता मिळत आहे.उदाहरणार्थ, जर एखाद्या हमालाने दरपत्रकापेक्षा अधिक शुल्क मागितले, तर प्रवाशांना लगेचच टीव्हीवरील अधिकृत दर दाखवता येतात. तसेच, ज्या प्रवाशांना हमालांकडून अधिक शुल्क आकारले जात असल्याचे जाणवेल, ते अधिकृत तक्रार नोंदवू शकतात.
पारदर्शकतेसोबत कमाई टीव्हीवर जाहिराती दाखविण्यासाठी रेल्वे ५ वर्षांचा करार करते. या कराराच्या लायसन्स फीच्या स्वरूपात रेल्वेला कोट्यवधींचा महसूल मिळतो. उदाहरणार्थ, मुंबई सेंट्रल स्थानकावर ४४ डिजिटल डिस्प्ले स्क्रीन लावण्यात आले असून, या माध्यमातून रेल्वेला वार्षिक ४१ लाख रुपये तर पाच वर्षांमध्ये २ कोटी २० लाख रुपये महसूल मिळाला आहे.

प्रयागराज कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; १४ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती, शाही स्नान रद्द

   Follow us on        

Mahakumbh Stampede Prayagraj : कुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानापूर्वी म्हणजेच मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या त्रिवेणी संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 14 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत, आखाडा परिषदेने शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. पण तरीही नदीच्या काठावर अजूनही लोकांची तुफान गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगमावर पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. साधू आणि संत लोकांना संगम परिसरात न जाण्याचं आवाहन करत आहेत.

13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे १५ कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केलं आहे. आज म्हणजेच बुधवारी मौनी अमावस्येला 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील गर्दी कमी ठेवण्याचं मोठं आवाहन यंत्रणांसमोर असणार आहे.

 

 

दिल्लीत खेलरत्न पुरस्कारांचे वितरण; कोण-कोणत्या खेळाडूंना भेटला सन्मान? यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले.

भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी यांना मानाचा अर्जुन पुरस्कारदेण्यात आला, तसेच जागतिक दर्जाचे भारतीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार आज नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला

1. डी गुकेश (बुद्धिबळ)

2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)

3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)

४. मनू भाकर (शूटिंग)

 

यांना अर्जुन पुरस्कार मिळाला

1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)

2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)

3. नीतू (बॉक्सिंग)

4. स्वीटी (बॉक्सिंग)

5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)

6. सलीमा टेटे (हॉकी)

7. अभिषेक (हॉकी)

8. संजय (हॉकी)

9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)

10. सुखजित सिंग (हॉकी)

11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)

12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)

13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)

14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)

15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)

16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)

17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)

18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)

19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)

20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)

21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)

22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)

23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)

24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)

25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)

26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)

27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)

28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)

29. सरबज्योत सिंग (शूटिंग)

30. अभय सिंग (स्क्वॉश)

31. साजन प्रकाश (पोहणे)

32. अमन (कुस्ती)

 

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
  • मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

  • सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
  • दीपाली देशपांडे (शूटिंग)
  • संदीप सांगवान (हॉकी)

 

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
  • अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search