Category Archives: देश

Railway Updates: भारतीय रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ: २६ डिसेंबरपासून नवे दर लागू होणार

   Follow us on        

​नवी दिल्ली:भारतीय रेल्वेने आपल्या प्रवासी भाड्यात बदल (Rationalisation) करण्याची घोषणा केली असून, हे नवे दर २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत. रेल्वेने वाढता परिचालन खर्च आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी हा निर्णय घेतला आहे.

​भाडेवाढीचे मुख्य तपशील:

​रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासाच्या अंतराप्रमाणे आणि श्रेणीनुसार दरवाढ खालीलप्रमाणे असेल:

​उपनगरीय रेल्वे (Suburban): लोकल रेल्वेच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

​मासिक पास (MST): मासिक पासच्या दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही.

​पॅसेंजर (Ordinary Class): २१५ किमी पर्यंतच्या प्रवासासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही. २१५ किमी पेक्षा जास्त अंतरासाठी १ पैसा प्रति किमी या दराने वाढ होईल.

​मेल/एक्स्प्रेस (Non-AC): या श्रेणीसाठी २ पैसे प्रति किमी भाडेवाढ करण्यात आली आहे.

​एसी क्लास (AC Class): एसी श्रेणीतील प्रवासासाठी सुद्धा २ पैसे प्रति किमी जादा मोजावे लागतील.

​उदाहरणादाखल: जर एखादा प्रवासी नॉन-एसी कोचमधून ५०० किमीचा प्रवास करत असेल, तर त्याला केवळ १० रुपये अधिक द्यावे लागतील.

​का घेतली ही दरवाढ?

​वाढता खर्च: रेल्वेच्या मनुष्यबळाचा खर्च १,१५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून पेन्शनचा खर्च ६०,००० कोटी रुपये झाला आहे. २०२४-२५ मध्ये एकूण परिचालन खर्च २,६३,००० कोटी रुपये इतका आहे.

​सुविधा आणि सुरक्षा: सुरक्षितता सुधारणे आणि नेटवर्क विस्तारण्यासाठी लागणारा निधी उभारणे हा यामागील उद्देश आहे.

​अपेक्षित उत्पन्न: या भाडेवाढीमुळे रेल्वेला या वर्षी सुमारे ६०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

​रेल्वेने स्पष्ट केले आहे की, जरी भाड्यात थोडी वाढ झाली असली तरी, गरिबांवर आणि दररोज प्रवास करणाऱ्यांवर याचा मोठा बोजा पडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

​कोकण रेल्वेचे दुहेरीकरण झाल्याशिवाय कोकणचा विकास अपूर्ण; खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेत वेधले लक्ष

   Follow us on        

नवी दिल्ली:

कोकण रेल्वे हा कोकणच्या विकासाचा कणा आहे, मात्र सध्या हा मार्ग एकेरी असल्याने विकासाला मर्यादा येत आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे पूर्णतः दुहेरीकरण होत नाही, तोपर्यंत कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेत केले.

​रोहा ते मडगाव दुहेरीकरणासाठी निधीची मागणी

संसदेत २०२५-२६ च्या पुरवणी मागण्यांवर बोलताना वायकरांनी रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे ही आनंदाची बाब आहे, परंतु केवळ विद्युतीकरणाने प्रश्न सुटणार नाही. रोहा ते मडगाव या संपूर्ण पट्ट्यात रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (Double Lining) करणे अत्यंत आवश्यक आहे.” यासाठी केंद्र सरकारने रेल्वे अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.

​प्रवासाचा वेळ वाचणार

कोकण रेल्वेवर गाड्यांची संख्या वाढत असून एकेरी मार्गामुळे गाड्यांना क्रॉसिंगसाठी तासनतास थांबून राहावे लागते. दुहेरीकरणामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि मालवाहतुकीलाही गती मिळेल, ज्याचा थेट फायदा कोकणच्या अर्थव्यवस्थेला होईल असे त्यांचे मत आहे.

​कोकणच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नासह वायकरांनी मुंबईच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरही संसदेत प्रभावीपणे बाजू मांडली.

Railway Updates: रेल्वे आरक्षणासाठी आता ‘आधार प्रमाणीकरण’ सक्तीचे; तीन टप्प्यांत नियमाची अंमलबजावणी

   Follow us on        

नवी दिल्ली:

भारतीय रेल्वेने रेल्वे तिकीट आरक्षणाच्या (Railway Reservation) प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आता आगाऊ आरक्षण कालावधीच्या (ARP) पहिल्या दिवशी तिकीट बुक करण्यासाठी ‘आधार प्रमाणीकरण’ (Aadhar Authentication) बंधनकारक करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून या संदर्भात नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले असून, हा बदल टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार आहे.

​नव्या निर्णयानुसार काय बदलणार?

​आगाऊ आरक्षणाच्या पहिल्या दिवशी ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना त्यांचे आयआरसीटीसी (IRCTC) खाते आधारशी जोडणे आवश्यक असेल. हे नियम खालील तारखांपासून लागू होतील:

 

२९ डिसेंबर २०२५: सकाळी ०८:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत केवळ आधार प्रमाणीकृत युजर्सच तिकीट बुक करू शकतील.

​०५ जानेवारी २०२६: आधार प्रमाणीकरणाची ही वेळ वाढवून सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत करण्यात येईल.

​१२ जानेवारी २०२६: आगाऊ आरक्षणाच्या पहिल्या दिवशी पूर्ण वेळ (सकाळी ०८:०० ते रात्री १२:०० वाजेपर्यंत) केवळ आधार लिंक असलेल्या खात्यांवरूनच बुकिंग करता येईल.

 

​काऊंटर बुकिंगवर परिणाम नाही

​रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, हा बदल केवळ ऑनलाइन आरक्षणासाठी (Online Booking) लागू आहे. रेल्वे स्थानकांवरील संगणकीकृत पीआरएस (PRS) काऊंटरवरून तिकीट बुक करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

​रेल्वे बोर्डाचे संचालक (पॅसेंजर मार्केटिंग) संजय मनोचा यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कोणत्याही अडथळ्याविना तिकीट मिळवण्यासाठी आपले IRCTC खाते वेळेत आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना चाखता येणार स्थानिक खाद्यपदार्थ

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रदेश-विशेष स्थानिक खाद्यपदार्थ (Regional Cuisine) सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध करणे, ज्या भागातून रेल्वे प्रवास करते तिथली सांस्कृतिक ओळख आणि पाककृतींमधील विविधता दर्शवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेतील ऑन-बोर्ड सेवा सुधारण्यासाठी आणि स्थानिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांपर्यंत वाढवली जाईल.

आयआरसीटीसी (IRCTC) तिकीट प्रणालीतील सुधारणा:

रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसी (IRCTC) तिकीट प्लॅटफॉर्मवरील सेवांच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. कठोर ओळख पडताळणी आणि प्रगत तपास यंत्रणा लागू केल्यामुळे बनावट युजर खात्यांवर मोठी कारवाई करण्यात यश आले असून, आतापर्यंत ३.०३ कोटी बनावट खाती निष्क्रिय करण्यात आली आहेत. या सुधारणांमुळे दररोज तयार होणाऱ्या नवीन युजर आयडीची संख्या एक लाखावरून सुमारे ५,००० पर्यंत खाली आली आहे, ज्यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणे अपेक्षित आहे.

‘मेक इन लातूर’; ‘वंदे भारत’चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल-दुरुस्ती राजस्थानात होणार

   Follow us on        

जोधपूर : देशातील पहिला ‘वंदे भारत स्लीपर कोच’ आता मराठवाड्यातील लातूर येथे तयार केला जात आहे. ही रेल्वे कोच निर्मिती भारतातील मोठा औद्योगिक टप्पा मानला जात असून, या कोचची देखभाल आणि दुरुस्ती मात्र राजस्थानातील जोधपूर येथे करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पहिल्या स्लीपर कोचचे काम जून २६ पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यानंतर हे स्लीपर कोच प्रवाशांच्या सेवेसाठी तयार होतील. सध्या लातूर येथे या कोचचे उत्पादन जलदगतीने सुरू आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या स्लीपर आवृत्तीमुळे देशांतर्गत लांब पल्ल्याच्या प्रवासाला नवीन वेग आणि आराम मिळणार आहे.

देखभाल-दुरुस्ती साठी राजस्थानात डेपो तयार

जोधपूर येथे ‘वंदे भारत स्लीपर कोच’च्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी विशेष डेपो तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या चार नवीन डेपो देशभरात उभारण्याचा प्रस्ताव आहे. हे डेपो दिल्ली, बिजनौर, मंगळुरू आणि मुंबईजवळ तयार करण्यात येतील.

या डेपोंमधून ट्रेनचे नियमित तांत्रिक तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल केली जाईल. जोधपूर डेपोचे पहिले टप्पेचे काम २०२६ च्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कंपनीकडे कंत्राट

डेपो निर्मितीचे कंत्राट पुण्यातील नामांकित खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. या कंपनीने आधीच प्राथमिक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू केले आहे. जोधपूर डेपोमध्ये कोचची तांत्रिक तपासणी, सफाई, आणि लहान-मोठ्या दुरुस्तींचे काम होईल.

‘मेक इन लातूर’चा अभिमान

लातूर रेल कोच फॅक्टरीमध्ये तयार होणाऱ्या ‘वंदे भारत स्लीपर कोच’ला ‘मेक इन लातूर’ अशी ओळख मिळाली आहे. देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे कोच बनवले जात आहेत. या कोचमध्ये उत्तम गुणवत्ता, जास्त सुरक्षा आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी सुविधा देण्यात आल्या आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, पहिल्या टप्प्यात ११० स्लीपर कोच तयार होणार असून, दुसऱ्या टप्प्यात ही संख्या २०० पर्यंत वाढवली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत देशभरात वंदे भारत स्लीपर ट्रेनचे जाळे मजबूत होईल.

एकंदरीत, लातूर येथे तयार होणारे स्लीपर कोच आणि राजस्थानात होणारी त्यांची देखभाल ही भारतीय रेल्वेच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेतील मोठी झेप ठरत आहे. ‘मेक इन लातूर’चा हा प्रकल्प मराठवाड्यासाठीही औद्योगिक विकासाचे नवे दार उघडणारा ठरणार आहे.

Railway Updates: एसी कोचमधील ब्लँकेटसाठी ‘न्यू सांगानेरी कव्हर’; प्रवाशांना मिळणार स्वच्छतेचा आणि आरामाचा नवा अनुभव

   Follow us on        

Railway Updates: रेल्वेने एसी कोचमधील प्रवास आणखी स्वच्छ आणि आरामदायी करण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. जयपूर-असरवा (अहमदाबाद) ट्रेनमध्ये आता ब्लँकेटसाठी जयपूरची प्रसिद्ध सांगानेरी प्रिंट असलेली कव्हर्स वापरण्यात येणार आहेत. ही कव्हर्स दिसायला आकर्षक असून साफसफाईलाही सोपी आहेत.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नवीन कव्हरमुळे प्रवाशांच्या ब्लँकेटबाबतच्या तक्रारी कमी होतील आणि प्रवासाचा दर्जाही उंचावेल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “या ब्लँकेट कव्हर सुविधेमुळे प्रवाशी स्वच्छतेबाबत निश्चिंत राहू शकतील.”

सांगानेरी प्रिंटची खासियत म्हणजे ती टिकाऊ, आकर्षक आणि रंग न फिके होणारी असते. अनेक वेळा धुतल्यानंतरही या प्रिंटची सुंदरता टिकून राहते. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी ब्लँकेटचा अनुभव मिळणार आहे.

सध्या ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली असून ती यशस्वी ठरल्यास देशातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

 

Video: अरे बापरे! रेल्वेच्या एसी डक्टमध्ये सापडल्या तब्बल ३०० दारूच्या बाटल्या; रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण

   Follow us on        

Liquor Smuggling: रेल्वेच्या एसी कोचमध्ये एसी डक्टमध्ये दारूची तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लखनौ – लखनौ–बरौनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या ”एसी व्यवस्थित थंडावा देत नाही” तक्रारीनंतर रेल्वे तंत्रज्ञांनी तपासणी केली असता गाडीच्या एसी कोचमध्ये अवैध दारूच्या तस्करीचा मोठा प्रकार उघड झाला आहे. एसी डक्टमध्ये तब्बल ३०० हून अधिक दारूच्या बाटल्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या.

गाडीतील काही प्रवाशांनी “एसी व्यवस्थित थंडावा देत नाही” अशी तक्रार कर्मचाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर तंत्रज्ञांनी एसीची तपासणी केली असता डक्टच्या आत प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या दारूच्या बाटल्या आढळल्या.

संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत हा साठा अवैध दारू तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाने या प्रकाराला गांभीर्याने घेतले असून जबाबदारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवासी वर्गातही चिंता व्यक्त होत आहे. रेल्वे मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर दारूचा साठा लपविला जातो तर स्फोटके सुद्धा लपवली जाऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Railway Updates: रेल्वे गाड्यांमधील गुन्हेगारी आणि चोरींच्या घटनेला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

   Follow us on        

Railway Updates । प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे ७४,००० प्रवासी कोच आणि १५,००० लोकोमोटिव्हमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे. निवडक कोच आणि लोकोमोटिव्हमध्ये यशस्वी पायलट प्रोजेक्टनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बऱ्याच काळापासून अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेता रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे रेल्वेतील गैरप्रकार रोखण्यात येतील अशी आशा रेल्वेला आहे.

प्रत्येक कोचमध्ये चार डोम -प्रकारचे CCTV कॅमेरे असतील – प्रत्येक प्रवेशद्वारा जवळ दोन कॅमेरे असतील. हे कॅमेरे प्रवाशांच्या कोणत्याही गोपनीयतेला अडथळा न आणता इतर जागा कव्हर करतील. लोकोमोटिव्हमध्ये प्रत्येकी सहा कॅमेरे असतील, जे पुढील, मागील आणि बाजूकडील दृश्यांचे निरीक्षण करण्यासाठी बसवले जातील. रेल्वेत (Indian Railways) बसवले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे सर्वोत्तम तांत्रिक विशिष्टतेसह आणि एसटीक्यूसी प्रमाणित असणार आहेत. यासाठी रेल्वेमंत्र्यांनी सर्वोत्तम दर्जाची उपकरणे वापरण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, १०० किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्ये आणि कमी प्रकाशातही उच्च दर्जाची चित्रीकरण फीत उपलब्ध होईल, याची खात्री करावी.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की सीसीटीव्ही कव्हरेज संघटित गुन्हेगारी आणि किरकोळ चोरीविरुद्ध प्रतिबंधक म्हणून काम करेल. प्रवास करताना प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. रेल्वेमध्ये अनेकदा चोरीच्या मारामारीच्या घटना घडतात अशा घटनांना सुद्धा या नव्या सीसीटीव्ही सिस्टीम मुळे आळा बसेल. प्रवाशांना शिस्त लागेल.

 

 

Bridge Collapse: गुजरातमध्ये पूल कोसळला, अनेक वाहनं पडली

   Follow us on        

अहमदाबाद: गुजरातमध्ये पूल कोसळून भीषण अपघात झाल्याची धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळल्याचं सांगितलं जात आहे. आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा गंभीरा पूल कोसळून हा अपघात झाला. पूल कोसळला तेव्हा त्यावरुन वाहनांची ये-जा सुरु होती. त्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा पूल 45 वर्ष जुना असल्याची माहिती आहे.

महिसागर नदीवरील 45 वर्ष जुना गंभीरा पूल कोसळल्याने वडोदरा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात धक्का बसला. वडोदरा जिल्ह्यातील पदराला आनंद जिल्ह्याशी जोडणारा हा पूल बराच काळापासून जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आहे.

महिसागर नदीवरील गंभीरा पुलाचा एक भाग बुधवारी (9 जुलै) सकाळी कोसळला, ज्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. पदराचे पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महामार्गावर सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या वाहनांमध्ये दोन ट्रक आणि दोन व्हॅनचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत चार जणांना सुरक्षित बचावलं आहे आणि इतर अपघातग्रस्तांचा शोध सुरू आहे.

मुजपूर गावाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. दोन ट्रक, एक बोलेरो जीप, दुसरी एक गाडी पूल ओलांडत असताना अचानक पुलाचा एक भाग कोसळला. त्यामुळे दुधडी भरुन वाहणाऱ्या महिसागर नदीत ही चारही वाहनं कोसळली. स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी जमा झाले आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली

Railway Updates: प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण चार्टिंगच्या वेळेत बदल; सुधारित वेळा अशा असतिल

   Follow us on        

Railway Updates: प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या आरक्षित प्रवाशांचे नाव, कोच आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात आणि मूळ स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी प्रसिद्ध केले जातात.

रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार, १०.०७.२०२५ पासून, ट्रेनचा पहिला आरक्षण चार्ट आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केला जाईल (४ तासांपूर्वीऐवजी).

सुधारित चार्टिंग वेळा पुढीलप्रमाणे:

• ज्या ट्रेन ०५.०० ते १४.०० वाजेदरम्यान प्रस्थान करतील, त्या ट्रेनसाठी पहिली आरक्षण यादी आधीच्या दिवशी २१.०० वाजता तयार केली जाईल.

• ज्या ट्रेन १४.०० ते ०५.०० या वेळेत प्रस्थान करतील, त्यांची पहिली आरक्षण यादी त्या ट्रेनच्या प्रस्थानाच्या ८ तास आधी तयार केली जाईल.

• दुसऱ्या आरक्षण चार्टसाठी सध्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, जो सध्याच्या तरतुदींनुसार सुरू राहील.

• अंतिम आरक्षण चार्ट ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तयार केला जाईल.

प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.

प्रवाशांनी कृपया चार्टिंग वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी.हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे. यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांना दोन्हींचा फायदा होईल असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search