Category Archives: देश
काँग्रेस अध्यक्ष निवडणूक :काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा अखेर विजय झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं.9,385 सदस्यांनी यासाठी मतदान केलं. यापैकी 416 मतं बाद झाली. मल्लिकार्जून खरगे यांना 7897 एवढी मतं मिळाली तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली.
तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यापूर्वी सीताराम सीताराम केसरी हे गांधी घराण्याव्यतिरिक्तचे अध्यक्ष होते.शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जून खरगे यांचं अभिनंदन केलं आहे.
नाव | सन | |
1 | पट्टाभी सीतारामय्या | 1948-1949 |
2 | पुरुषोत्तम दास टंडन | 1950 |
3 | इंदिरा गांधी | 1959, 1966-67, 1978-84 |
4 | नीलम संजीव रेड्डी | 1960-1963 |
5 | के कामराज | 1964-1967 |
6 | एस सिद्धवनल्ली निजलिंगप्पा | 1968-1969 |
7 | जगजीवन राम | 1970-1971 |
8 | शंकरदयाल शर्मा | 1972-1974 |
9 | देवकांत बरुआ | 1975-1977 |
10 | पी.व्ही. नरसिंह राव | 1992-96 |
11 | सीताराम केसरी | 1996-1998 |
12 | सोनिया गांधी | 1998-2017 आणि 2019 |
13 | राहुल गांधी | 2017-2019 |
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या काँग्रेसच्या अध्यक्षांची यादी
तामिळनाडू : दिवाळी आली की नोकरदार वर्गाला उत्सुकता असते ती बोनसची. दिवाळीत एक किंवा दीड अतिरिक्त पगार बहुतेक ठिकाणी दिला जातो. पण काही मालक एवढे दिलदार असतात की ते ह्यापुढे जाऊन आपल्या कर्मचार्यांना खुश करारात. अशाच एका मालकाने या वर्षाच्या दिवाळीला आपल्या कर्मचार्यांना चक्क कार आणि बाईक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडू येथील या जयंती लाल चयांति या ज्वेलरी शॉप मालकाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने 20 मोटर बाईक्स आणि 10 कार खरेदी केल्या आहेत. ह्या सर्वाचा खर्च 1 कोटी पेक्षा जास्त होणार आहे.
“ह्या सर्व कर्मचार्यांनी मला माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेत साथ दिली आहे. ह्या भेटीने त्यांना प्रोत्साहन भेटेल” असे जयंती यांचे म्हणने आहे.
आग्रा: प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अशीही क्लृप्ती. कॉलनीचे नाव बदलून चक्क ‘नरक नगरी’
वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने आग्रा येथील रहिवाशांनी निषेधासाठी एक आगळी वेगळी आणि जरा हटके शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क आपल्या परिसराचे नाव बदलून नवीन नाव ठेवले आहे. ही नवीन नावे पण अशी आहेत की ती वाचून सरकारला पण लाज वाटावी.
काय आहेत ही नवीन नावे?
नरक पुरी
किचड नगर
दुर्गंधी शील
नाला सरोवर कॉलनी
बदबू विहार
जागोजागी घाणीचे साम्राज्य, खड्डेमय रस्ते अशा प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा आयडिया आपल्या परिसरात पण करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटते?
Uttar Pradesh | Residents of various colonies in Agra renamed their colonies as 'Narak Puri', Keechad Nagar', Ghinona Nagar, Nala Sarovar' in order to protest against various issues including bad conditions of roads, waterlogging pic.twitter.com/CrEZiu3gkV
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 10, 2022
Vision Abroad
मुंबई :भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड (Meden Pharmaceutical) या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपमुळे आतापर्यंत गांबिया नावाच्या देशात 66 कोवळ्या जिवांच्या मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या या कफ सिरप बद्दल पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय.
या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या सिरपचं वितरण गांबियासोबत इतरही अनेक देशात झालेलं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण चार सिरप बाबत जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केला आहे.
कोणती आहेत ही सिरप
प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती.
संशयास्पद चार सिरपमुळे पोटदुखी, उलट्या होणं, लघवीला न होणं, डोकेदुखी, कीडनीचे विकार बळावणं, अशी लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे या सर्व उत्पादनांची तातडीने सखोल चौकशी आणि तपास केला जाईल. तोपर्यंत हे सर्व कफ सिरप असुरक्षित मानले जातील, असं WHO ने म्हटलं आहे.
Vision Abroad
एलपीजी सिलिंडर बातमी :आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे.
नव्या नियमानुसार आता घरगुती स्वयंपाक सिलिंडर ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करताना आता कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन (Non Subsidy Connection) असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलिंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार याला आता बंधन आले आहे. त्यामुळे वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत.
अनुदानित सिलिंडरही ठराविक मिळणार आहे. तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षभरात फक्त 12 सिलिंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज लागल्यास विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागतील.
पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. ही बंदी पुढील पाच वर्षासाठी आहे.
२२ सप्टेंबर रोजी एनआयए तसंच ईडी अशा काही तपास यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर कारवाई केली होती. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता या तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे केलेल्या शिफारसीनुसार गृहमंत्रालयाने पाच वर्षांसाठी पीएफआयवर बंदी घातली आहे.
Central Government declares PFI (Popular Front of India) and its associates or affiliates or fronts as an unlawful association with immediate effect, for a period of five years. pic.twitter.com/ZVuDcBw8EL
— ANI (@ANI) September 28, 2022
दिल्ली: काल भाजपने आपल्या संसदीय बोर्डची यादी घोषणा करत त्यातील सदस्याची नावे जाहीर केली आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे ह्या समितीमध्ये एकाही महाराष्ट्र राज्यातील नेत्याच्या समावेश केला गेला नाही आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलले गेले आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पण ह्या समितीमध्ये स्थान देण्यात असलेले नाही आहे. त्यामुळे ह्या समितीमध्ये आता एकही मुख्यमंत्री नाही आहे.
ह्या समितीमध्ये जे. पी. नड्डा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांचे खच्चीकरण?
भाजपच्या केंद्रीय संसदीय बोर्ड आणि केंदीय निवडणूक समितीमध्ये भाजपचे कार्यशील आणि वजनदार नेते नितीन नमस्कार यांना स्थान दिले नसल्याने विविध चर्चा होत आहेत.
पक्षाने असे का केले या विषयी काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. ह्या समितीवर निवडीसाठी वयाची अट पाहता ती पक्षाने 75 ठेवली आहे. नितीन गडकरी यांचे वय 65 आहे. त्यांच्या जागी निवड करण्यात आलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांचे वय 77 आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांना का डावलले याचे नेमके कारण आजून समजले नाही.
नितीन गडकरी यांना भावी पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहे. नितीन गडकरी यांचे केंद्रात आणि पक्षात वाढणारे प्राबल्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी त्यांचे जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे बोलले जात आहे. दुसरीकडे नितीन गडकरी यांना त्यांचा स्पष्टवक्तेपणा नडत असल्याचे आणि त्यांच्या मागील काही विधानांमुळे त्यांना दूर करण्यात येत आहे अशी चर्चा आहे. मागेच नितीन गडकरी यांनी आता सत्ताकारणाचा कंटाळा आला आहे असे जाहीरपणे बोलून पण दाखवले होते. कारण काहीही असो पण त्यांना डावलून एकप्रकारे भाजप महाराष्ट्र राज्याचा अपमान करत आहे असे दिसून येत आहे.
नवी दिल्ली :भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपच्या देशातील १५ बड्या नेत्यांचा समावेश केला गेला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर समितीच्या सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह सह देशातील इतर नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश ह्या समितीत केला गेला आहे. ह्यापूर्वी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले होते. दुसरीकडे नितीन गडकरी यांना ह्या समितीत स्थान देण्यात आले नाही त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
केंद्रीय निवडणूक समिती
Sr. No. | नाव | पद | पत्ता |
---|---|---|---|
1 | श्री जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष) | भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष | दिल्ली |
2 | श्री नरेन्द्र मोदी | प्रधानमंत्री, भारत | दिल्ली |
3 | श्री राजनाथ सिंह | कैबिनेट मंत्री,भारत सरकार | दिल्ली |
4 | श्री अमित शाह | कैबिनेट मंत्री,भारत सरकार | दिल्ली |
5 | श्री बी. एस. येदियुरप्पा | पूर्व सीएम, कर्नाटक | कर्नाटक |
6 | श्री सर्बानंद सोनोवाल | युनियन मिनिस्टर | आसाम |
7 | डॉ. के. लक्ष्मण | राष्ट्रीय अध्यक्ष - अन्य पिछड़ा वर्ग मोर्चा | तेलंगाना |
8 | डॉ. इकबाल सिंह लालपुरा | संसदीय बोर्ड सदस्य | पंजाब |
9 | डॉ सुधा यादव | संसदीय बोर्ड सदस्य | हरियाणा |
10 | डॉ सत्यनारायण जटिया | संसदीय बोर्ड सदस्य | दिल्ली |
11 | श्री भूपेंद्र यादव | युनियन मिनिस्टर | दिल्ली |
12 | श्री देवेंद्र फडणवीस | उप मुख्यमंत्री | महाराष्ट्र |
13 | श्री ओम प्रकाश माथुर | खासदार | दिल्ली |
14 | श्री बी एल संतोष | राष्ट्रीय महासचिव (संगठन) | कर्नाटक |
15 | श्रीमती वनथी श्रीनिवासनी | राष्ट्रीय अध्यक्ष - महिला मोर्चा | नई दिल्ली |