Category Archives: नोकरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्ग:  जिल्ह्यातील तरुण पिढीसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील तरुणांना रोजगार देण्यासाठी ‘ॲडमिशन’, ‘व्हॅरेनियम क्लाउड’ आणि ‘सिक्योर क्रेडेंशियल्स’ या कंपन्यांनी संयुक्तरित्या गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल. या रोजगार मेळाव्यात ‘आजच मुलाखत; आजच निवड’ या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी मिळेल. तसेच यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल.

या रोजगार मेळाव्यात पुणे, गोवा आणि कोल्हापूर येथील खालील कंपन्या सहभागी होणार आहेत.

एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सामील झाल्या आहेत.

(हेही वाचा >पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजूगर बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा)

या मेळाव्यात बॅक ऑफिस, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मेकॅनिक्स, डाटा ऑपरेटर, सेल्स एक्सिक्युटीव्ह, आयटी, एज्युकेशन, टेक्निशियन, हॉटेल सर्व्हिसेस या क्षेत्रात नोकरीच्या ससंधी उपलब्ध होतील. त्यामुळे सिंधुदुर्गातील अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

राज्यात तलाठी भरती होणार.. जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या …

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचा एक शासन निर्णय जाहीर झाला आहे.  

 

   Follow us on        

Mumbai :राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.

श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.

तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.

संपूर्ण जिल्हावार भरली जाणारी पदसंख्या पाहण्यासाठी खालील फाईल ओपन करून शासननिर्णय पहावा.

तलाठी भरती (नवनिर्मीत पदासह).Pdf







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या नोकरभरतीमध्ये अधिवास प्रमाणपत्राची अट नाही – रोहित पवार यांचा आक्षेप

 

MAHAGENCO RECRUITMENT NEWS : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही. परिणामी खुल्या प्रवर्गाच्या २३९ जागांसाठी सर्व देशभरातून अर्ज येतील आणि राज्याच्या युवकांना मर्यादित संधी मिळेल. एकीकडं राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याने युवांना आधीच नोकऱ्या नाहीत, अशा स्थितीत राज्याच्या हक्काच्या भरती प्रक्रियेत तरी किमान राज्यातील युवांना न्याय मिळायला हवा.

त्यामुळं शासनाने या परीक्षेसाठी अधिवास प्रमाणपत्र सर्वांना अनिवार्य करण्याबाबत महाजेनकोस निर्देश द्यावेत, अशी विनंती राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे केली आहे. 

 

राज्यातील नोव्हेंबर महिन्यात होणारी पोलीस भरती स्थगित ….

मुंबई: पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्यासाठी नोव्हेंबर मध्ये होणारी भरती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे.

हि पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले होते. ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले होते. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.


सदर भरती प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे अशा आशयाचे एक माहितीपत्रक पोलीस महासंचालकांच्या वतीने काढण्यात आलेले आहे.

 

Related : महाराष्ट्र पोलीस दलातील १४,९५६ रिक्त पदांसाठी भरती…पहा जिल्ह्यानुसार पदांची संख्या 

महाराष्ट्र पोलीस दलातील १४,९५६ रिक्त पदांसाठी भरती…पहा जिल्ह्यानुसार पदांची संख्या 

मुंबई : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले आहे.
ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले  आहेत.
जिल्ह्यानुसार खालील प्रवर्गात पदे भरण्यात येतील असे जाहीर करण्यात आलेले आहे. 
j

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मोठी नोकरभरती.

सिंधुदुर्ग: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त वैद्यकीय अधिकारी आणि इतर असे एकूण १५ पदांच्या  ८५ जागा  कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ ओक्टोम्बर २०२२ आहे.  इच्छुक उमेदवारांनी दिनांक १४/१०/२०२२ ते २७/१०/२०२२ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ ह्या वेळेत ह्या बातमीसोबत जोडलेल्या जाहिरातीतील अर्ज भरून सीआरयु कक्ष(टपाल शाखा) मुख्य प्रशाकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM , SINDHUDURG ), व पदाच्या नावाचे स्पष्ट उल्लेख करून सादर करावेत. 
ह्या पदांसाठी पात्रता,अटी,वेतनश्रेणी आणि इतर माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करावी.
   Click here to download>>>>>>>>>>    जाहिरात आणि अर्ज  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

परदेशात जॉब करण्याची सुवर्णसंधी; व्हिजन ॲब्रॉड ने उचलले मोलाचे पाऊल

दरमहा ३ लाख रुपये पर्यंत कमावण्यासाठी मराठी तरुण-तरुणींना पुढे येण्याचे आवाहन..

 

मुंबई : ‘व्हिजन ॲब्रॉड’च्या माध्यमातून मर्यादित वयोगटातील मराठी युवक-युवतींना कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशात परमनंट रेसि. व्हिसा व कोणत्याही फिल्डमध्ये दरमहा २ ते ३ लाख रुपये पर्यंत जॉब उपलब्ध आहेत. यासंबंधीची सर्व माहिती विनामूल्य देण्यासाठी मराठी माणसांनीच पुढाकार घेतला आहे. यासाठी आवश्यक मार्गदर्शन व मदत करण्यात येत आहे.

भारतातील मराठी युवक-युवतींना व्हिजन ॲब्रॉड ने प्रगतीचे व्यासपीठ परदेशात निर्माण करून दिले आहे. यामध्ये भारतीय मुले परदेशी जाऊन नोकरी व्यवसाय करू शकतात. भारतात दहावी-बारावी तसेच ग्रॅज्युएट झालेली मुले-मुली मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र ती महिन्याला फक्त १५-२० ते २५ हजार रुपये पर्यंत कमाई करू शकतात. परंतु तीच मुले परदेशात गेली तर पार्टटाईम १ लाख तर फुल टाईम २ ते ३ लाख रुपये पर्यंत महिन्याला कमवू शकतात. तसेच इथली मुले परदेशात शिक्षण सुद्धा घेऊ शकतात. त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी बँकांजवळ कर्जाची सुविधा उपलब्ध आहे आणि शिक्षण घेत असताना मासिक ७० हजार रुपये पर्यंतचा जॉब करू शकतात. त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा सर्वांनी घ्यावा, असे व्हिजन ॲब्रॉड ने म्हटले आहे.

सन २०१० पासून सर्व आवश्यक प्रोसिजरसाठी मार्गदर्शन व मदत करण्याचे कार्य सुरु केले आहे. यामध्ये पासपोर्ट, इव्हॅल्युऐशन, परमनंट व्हिसा, IELTS युनिव्हर्सिटी, पोलीस, मेडिकल, प्रुफ ऑफ फंड, परदेशात विमानतळावर उतरवून घेण्याची व राहण्याची व्यवस्था आदी बऱ्याच सुविधांचा समावेश आहे. असे व्हिजन ॲब्रॉड कडून सांगण्यात आले आहे. याबाबतची सर्व माहिती प्रत्यक्ष भेटूनच घ्यावी, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. 

परदेशात जाऊन जॉब करून किंवा व्यवसाय करून श्रीमंत झालेले भारतीय खूप आहेत. पण त्यामध्ये मराठी माणसांची संख्या फारच कमी आहे. मात्र पंजाबी (सर्वात जास्त) गुजराती-मारवाडी, तामिळ-केरळीयन यांची संख्या मोठी आहे, त्यांना ते जमते तर मराठी माणसांना का जमू नये? त्यांनीही जावे भरपूर पैसे मिळवावेत चांगल्या लाईफ स्टाईल मध्ये राहावे, असे आम्हाला मनापासून वाटते. हि एक चांगली संधी आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, माहीतच नाही असे होऊ नये म्हणून आमचा हा प्रयत्न आहे, याचा सर्वांनी प्रसार व प्रचार करुन स्वतःसोबत इतरांनाही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती देखील व्हिजन ॲब्रॉड कडून करण्यात आली आहे.

 

 

व्हिजन ॲब्रॉडशी संपर्क साधण्यासाठी खालील फॉर्मवर आपली माहिती भरावी


 

 

नाबार्ड बँकेत विकास सहाय्य्क/विकास सहाय्य्क(हिंदी) ह्या पदांसाठी भरती. महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त जागा.

NABARD RECRUITMENT :  NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT नाबार्डने Development Assistant विकास सहाय्य्क/विकास सहाय्य्क(हिंदी) ह्या पदांसाठी पूर्ण देशांतून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४ ओक्टोम्बर २०२२ आहे. इच्छुक उमेदवारांना www.nabard.org ह्या बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरता येईल.

महाराष्ट्रासाठी सर्वात जास्त जागा.
विकास सहाय्य्क ह्या पदासाठी सर्व वर्गातून एकूण १७३ जागेपैकी ७५ तर विकास सहाय्य्क(हिंदी) ४ जागांपैकी १ अशा मिळून एकूण ७६ जागा महाराष्ट्रासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 
पात्रता 
कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि नाबार्डने ह्या पदासाठी पात्र ठरवण्यासाठी ठेवलेल्या अटी
वेतन 
विकास सहाय्यक/विकास सहाय्यक (हिंदी) (Development Assistant/ Development Assistant Hindi) ह्या दोन्ही पदांसाठी – 13,150/- – 34,990/- रुपये प्रतिमहिना ह्या दरम्यान वेतन निश्चित केले जाईल 
भरती तीन टप्प्यात होईल.
पहिला टप्पा  – दिनांक १५ सप्टेंबर ते १० ओक्टोम्बर – ऑनलाईन अर्ज,परीक्षा फी भरणे
दुसरा टप्पा – दिनांक ६ नोव्हेंबर – ऑनलाईन पूर्वपरीक्षा 
तिसरा टप्पा – मुख्य परीक्षा (ह्या परीक्षेची तारीख बँकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल)
निर्धारित केलेल्या तारखा, स्वरूप  बदलण्याचा अधिकार पूर्णपणे नाबार्ड ने राखून ठेवण्यात आलेला आहे. हे बदल नाबार्ड च्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येतील. 
 अधिक माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search