Category Archives: महाराष्ट्र

Save Konkan | भूमिपुत्र जागा होतोय……

दापोली, दि. २९: कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्यामुळे परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  गावागावातील जमिनीची खरेदी परप्रांतीय तसेच बाहेरील मंडळींनी केलेली आहे.परप्रांतीय मंडळींनी कोकणातील जमिनीची किंमत आणि महत्व ओळखल्याने ते दलालांच्या माध्यमातून जमिनी खरेदी करत आहेत.आपल्या वडीलोपार्जित जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात असल्याची जाणीव आता कोकणी माणसाला झाली  आहे. गेल्याच महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावातील ग्रामस्थांनी परप्रांतीयांनी गैरव्यवहारातून केलेल्या जमीन खरेदीविरोधात आवाज उठवला होता. अशीच सुरवात आता  रत्नागिरी तालुक्यातील दापोलीतील छोट्याशा ओळगावातून झाली आहे.
ओळगावातील एक जमिनी बाहेरील व्यक्तीने खरेदी केल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच गावकरी एकवटले आणि त्यांनी यापुढे गावातील जमिन परप्रांतीयांना तसेच गावाबाहेरील व्यक्तीला विकायची नाही असा कठोर निर्णय घेतला. त्या आशयाचे गावकऱ्यांनी फलकही गावात लावले आहेत.त्या फलकावर ठळक अक्षरात असे लिहिण्यात आले आहे की “ओळगाव मधील जमीन बाहेरील व्यक्तीला खरेदी करण्यास सक्त मनाई आहे”. हे फलक गावकऱ्यांनीच गावात लावले असल्याने कोकणाला जमिनीचे महत्व कळले असून गावकरी जागे झाल्याची चर्चा रंगली आहे.ओळगावातील ग्रामस्थ मंडळाने एकत्र येत हा कठोर निर्णय घेतला आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी बाहेरील मढळी विकत घेतात आणि जागेला कुंपण घालतात अशावेळी अन्य गावकऱ्यांचा रस्ता बंद होतो.अशाप्रकारच्या अनेक घटना घडून गावचे गावपण निघून जाऊन सामाजिक संतुलनही बिघडते.अनेकवेळा दलालांच्या अमिषाला बळी पडून गावकरी जमीन कवडीमोलाने विकतात आणि फसतात.अशा घटना घडू नयेत म्हणून गावकरी एकवटले आहेत.

Loading

Loksabha Election 2024: शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी शिंदेंकडून जाहीर

Loksabha Election 2024:लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. 22 जागा मिळाव्यात यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना 12 ते 13 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. अशातच पहिल्या यादीत शिंदे गटाने केवळ आठच उमेदवार जाहीर केले आहे.

जाहीर केलेले उमेदवार

मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे

कोल्हापूर – संजय मंडलिक

शिर्डी – सदाशिव लोखंडे

बुलढाणा – प्रतापराव जाधव

हिंगोली – हेमंत पाटील

रामटेक – राजू पारवे

हातकणंगले – धैर्यशील माने

मावळ – श्रीरंग आप्पा बारणे

हे आठ उमेदवार शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.

 

Loading

Breaking | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.”

ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या रिंगणात? 

  • बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  • यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
  • मावळ – संजोग वाघेरे-पाटील
  • सांगली -चंद्रहार पाटील
  • हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
  • छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  • शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
  • नाशिक – राजाभाई वाजे
  • रायगड – अनंत गीते
  • सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
  • ठाणे – राजन विचारे
  • मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
  • मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
  • मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
  • परभणी – संजय जाधव
  • मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई 

 

Loading

लोकसभेच्या उमेदवारांची पाचवी यादी भाजपतर्फे जाहीर; महाराष्ट्राच्या तीन उमेदवारांचा समावेश.

   Follow us on        
नवी दिल्ली; भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाचवी यादी यादी नुकतीच  जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्राच्या ३ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. या उमेदवारांची नवे खालीलप्रमाणे
१) श्री. सुनील बाबुराव मेंढे ( भंडारा – गोंदिया मतदार संघ)
२) श्री. अशोक महादेव राव नेते ( गडचिरोली-चिमूर अजजा)
३)  श्री. राम सातपुते (सोलापूर अजा)
राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर
भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे. सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते लढणार आहेत.

 

Loading

Breaking | मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही

   Follow us on        
Loksabha Election 2024 : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मनसे निवडणूक लढवत नसली तरीही ती युतीचा भाग असणार आहे. मनसेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्यात येतील असे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.
मनसे महायुतीत सामील होणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले होते. मनसेला युतीत दोन जागा दिल्या जातील अशी चर्चा होत होती. दक्षिण मुंबई आणि शिर्डी  मतदारसंघ मनसेला मिळणार असे बोलले जात होते. आता मात्र मनसे या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे समोर आले आहे. परंतु मनसे या निवडणुकीत महायुतीचाच भाग राहणार असून महायुतीच्या उमेदवारांना सर्वोतपरी सहकार्य करणार आहे. या बदल्यात मनसेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading

Breaking | वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक चालू; आज महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता

Loksabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपासंदर्भात एक मोठी  बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर एक महत्वाची बैठक काही वेळातच होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे आणि  इतर काही नेते वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. बैठक झाल्यावर काही  वेळातच पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या उरलेल्या जागेंच्या उमेदवारांची  यादी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या कालच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महायुतीच्या नेत्यांची मुंबईत आज पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक जागावाटपासाठी अंतिम असल्याचं मानलं जात आहे. या बैठकीत दोन-तीन जागांच्या आदलाबदलीवर चर्चा होणार आहे.  बैठक लवकर झाली तर आजच पत्रकार परिषद घेऊन युतीचा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. बैठकीला उशीर झाला तर घोषणा उद्या जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Loading

उन्हाळी हंगामासाठी मध्यरेल्वेच्या २२ विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार; कोकण रेल्वे मार्गावरील एका गाडीचा समावेश

   Follow us on        
Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी  मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी जूनपर्यंत विस्तारित  करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा तब्ब्ल १२०० अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणारी  ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या मार्च अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने या गाडीच्या एकूण ५४ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक ०३ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक ०४ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी

 

Loading

Nagpur Goa Highway Updates | शेतकरी आक्रमक; प्रति एकरी कमीत कमी दोन कोटी मोबदला देण्याची मागणी

   Follow us on        
Nagpur Goa Highway Updates:सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 7 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढण्यात आली असून त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या हरकती, आक्षेप 21 दिवसात अर्जाद्वारे लिखित स्वरूपात कारणासह कळविणेबाबत नमूद केले आहे. या अधिसुचनेनुसार, शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे वतीने सांगोला तालुक्यातील १३ गावांतील  शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी  बुधवारी हरकती व आक्षेप अर्ज व मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मंगळवेढा यांना देण्यात आले. महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
बाधित शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रमुख एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनीमधून महामार्ग गेला आहे. कुटुंब वाढीमुळे एकराच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब भूमिहीन होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या 6 ऑक्टोबर 2021 रोजीचे मोबदल्या बाबतच्या परिपत्रकेनुसार गुणांक एक नुसार मोबदला मिळणार आहे व तोही रेडीरेकनरनुसार त्यामुळे आमची एक एकर जमीन घेवूनही शासन मोबदल्यात एक गुंठा पण जमीन मिळणार नाही. यामुळे बाधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
शक्तिपीठ महामार्गांचे भूसंपादन अधिनियम 1955 नुसार सार्वजनिक हितार्थ म्हणून सक्तीने करणार असल्याचे नमूद केले आहे, त्यामुळे बाधीत क्षेत्राचे मूल्यांकन करीत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर खासगी वाटाघाटी करून थेट खरेदी ने एकसमान सरसकट कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला, जिथे एमआयडीसी झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे कमीत – कमी चार कोटी रुपये द्यावा आणि मगच सार्वजनिक हितार्थ महामार्ग करावा अशी मागणी महामार्ग बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Loading

नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसवेला कोकणातूनही विरोध

महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले जात असल्याचा वनशक्ती संस्थेचा आरोप. 
   Follow us on        
सावंतवाडी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.  या महामार्गामुळे येथील अल्पभूधारक भमिहीन होतील तसेच महामार्ग झाल्यास पुराचा धोका वाढेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणून तेथील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आता तर कोकणातही या महामार्गास विरोध होण्यास सुरवात झाली आहे. 
या महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग कोकणावर लादला जात आहे. हा महामार्ग ज्या भागातून जाणार त्या भागातील निसर्गाला मोठी हानी पोचणार आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणार आहोत असे येथील वनशक्ती संस्थेने जाहीर केले आहे  
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील गावातून हा मार्ग जात असल्याने या दोन्ही तालुक्यांसाठी हा महामार्ग विनाशकारी ठरणार आहे. त्यामुळे गरज नसलेल्या या महामार्गाविरोधात न्यायालयात आव्हान देणार आहे. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले गेले आहे. त्यामुळे कोकणाला गुलामगिरीमध्ये आणायचं का? हा विचार करून येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Loading

Nagpur Goa Expressway | महामार्गावर हरकती नोंदविण्यास २१ दिवसांची मुदत

Nagpur Goa Expressway: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गावर हरकती नोंदविण्यासाठी शासनातर्फे २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत या महामार्गाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे दिनांक ७ मार्च ते २८ मार्च अशी असणार आहे. या हरकती त्या त्या तालुक्यातील भूसंपादन प्रांताधिकाऱ्यांकडे या मुदतीत दाखल करता येतील. 

राज्यातील सर्वात मोठा महामार्ग ठरणाऱ्या या महामार्गास काही जिल्ह्यातून विरोध व्हायला सुरु झाला आहे. मुख्यत्वेकरून सांगली आणि कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. या महामार्गाने सध्या कसल्या जाणाऱ्या जमिनी जातील आणि येथील शेतकरी भूमिहीन होईल. त्याचप्रमाणे या महामार्गामुळे येथे पुराचा धोका निर्माण होईल असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. हा महामार्ग होऊ नये किंवा आपल्या भागातून जाऊ नये अशा मागण्यासाठी शेतकऱ्यांकडून आंदोलनाचे हत्यार बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे शासनास हा महामार्ग पूर्णत्वास नेण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search