Category Archives: महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी रेल्वेबरोबर एसटीही सज्ज; कोकणकरांसाठी ४३०० जादा बसेस धावणार

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ७ सप्टेंबरला श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे.
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे,उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

Loading

ऑनलाइन विडिओगेमचे एक टास्क पूर्ण करण्याच्या नादात १६ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

   Follow us on        

पुणे: ऑनलाइन विडिओ गेम मुळे एका १६ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी चिंचवड येथील किवळे या भागात ही घटना घडली आहे. या गेममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

दिनांक 25 जुलै रोजी सुट्टी असल्या कारणाने सदर मुलगा बेडरूम मध्ये लॅपटॉपवर ऑनलाईन गेम खेळत होता. दुपारी एकच्या सुमारास सोसायटीच्या ग्रुपवर एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचा मेसेज आला. मुलाच्या आईला शंका आली म्हणून ती मुलाच्या खोलीत गेली असता तो मुलगा तिथे आढळला नाही. त्यानंतर खाली पाहिले तर तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला दिसला. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता

घरात गेममध्ये असलेल्या कोडची काही कागदपत्रं सापडली आहेत. त्यात उडी मारणं असा टास्क होता. प्राथमिक तपासानुसार हा मुलगा मोठ्या प्रमाणात गेम्स खेळत होता असं निष्पन्न झालं आहे.आत्महत्येआधी मिळालेल्या चिठ्ठीनुसार XD नावाचा एक गेम आहे असं दिसतंय. यासंबंधी आमचे अधिकारी पुढील तपास करत आहे. असं पोलीस म्हणाले.तसेच त्याच्या खोलीतून काही स्केचेस सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याने इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी स्वत:च्या मृत्यूचा प्लान आखला होता. त्याने पेन्सिलिने याचे स्केच तयार केले होते.  तेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

दरम्यान, मोबाइल वापरताना पॅरेंटल कंट्रोल आणि डिजिटल वेलबिंग नावाच्या अ‍ॅपचा वापर करून आपल्या मुलांचा स्क्रीनटाइमचा वापर मर्यादित करा, आणि आपली मुलं काय पाहतात यावर लक्ष ठेवायला हवं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

या मुलाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “गेल्या सहा महिन्यापासून त्याचं वागणं बदललं होतं. त्याच्या हातून लॅपटॉप घेतला की तो एकदम आक्रमक व्हायचा. तो अगदी लहानसहान गोष्टींना घाबरायचा. तो अचानक मला चाकू मागायला लागला. आगीला तो घाबरेनासा झाला. तो हे पाऊल उचलेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. सरकारने याबद्दल काळजी घ्यायला हवी. कारण मुलांना काहीच कळत नाही त्यामुळे मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचू नयेत याची काळजी सरकारने घेणं आवश्यक आहे. VPN वर सगळं दिसू शकतं. माझ्या मुलाबरोबर जे झालं ते इतरांबरोबर होऊ देऊ नका, सगळ्यांना सुरक्षित नेटवर्क पोहोचवा. माझी सरकारलाही कळकळीची विनंती आहे.”

मुलाच्या वडिलांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, “मुलांना आजकाल सगळं समजतं. पॅरेंटल कंट्रोल असला तरी मुलं तो कोड सहज क्रॅक करतात. बरेचदा मुलं ऑनलाइन अभ्यास करण्याच्या नादात लॅपटॉपवर बसतात. त्यामुळे ते नक्की तिथे काय पाहतात हे समजत नाही कारण हिस्ट्रीसुद्धा डिलिट करतात. पालकांना मुलांवर 24 तास लक्ष ठेवणं शक्य नाही.

मुलगा कोणता गेम खेळत होता हे अद्याप आई वडिलांना आणि पोलिसांनाही नीटसं कळलेलं नाही.

त्याबद्दल अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Loading

IMD Rain Alert: विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा परतणार;राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा 

   Follow us on        
Rain Alert from IMD: सध्या केरळमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. वायनाड येथे भुरस्सलन झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. यातच आता भारतीय हवामान खात्याने गुरुवारपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा दक्षतेचा ईशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने IMD पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यामध्ये आज मंगळवार आणि बुधवार या दिवशी काही जिल्ह्यांना सावधानतेचा येलो ईशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून मात्र काही जिल्ह्यांसाठी खस्कसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार दिनांक ०१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना दक्षतेचाऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी  सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पाचव्या दिवशी म्हणजे दिनांक ०३ ऑगस्ट रोजी मुंबई वगळता संपूर्ण कोकण भाग, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Loading

सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील २ गाड्यांच्या अन्य श्रेणीचे काही डबे जनरल डब्यांत परावर्तित होणार

   Follow us on        
Kokan Railway News: भारतीय रेल्वेने अलीकडे सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करण्यास सुरु केला असून त्यांच्यासाठी काही हिताचे निर्णय घेत आहे. जनरल डब्यांत होणारी गर्दी विचारात घेऊन रेल्वेने काही गर्दीच्या मार्गावरील इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.         
1) गाडी क्रमांक ११०९९ / १११००  लोकमान्य टिळक (T) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (T) एक्सप्रेस
सध्याची रचना: फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१,एसएलआर  – ०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०७, जनरल – ०४, पॅन्ट्री कार – ०१,एसएलआर  – ०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका स्लीपर कोचचे आणि एका थ्री टियर एसी कोच असे मिळून २ डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक २६ नोव्हेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल

2) गाडी क्रमांक. २२११३ /२२११४  लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस

सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, जनरल – ०३ जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०७, स्लीपर – ०८, जनरल – ०४, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे. दिनांक १६ नोव्हेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल

 

 

 

Loading

धोक्याच्या ठिकाणी रील बनवणे जिवावर बेतले; रायगडमध्ये धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रायगड: इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल संबंधित पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ रायगडमध्ये एका धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. तिने आपल्या या आवडीला करियर बनवले होते. प्रारंभिक तपासात समोर आले आहे की रायगडमध्ये कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात अन्वीचा हा अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्वी कामदार यांच्या इंस्टाग्रामवर दोन लाख ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डिलॉइट या कंपनीत नोकरीही केली होती. मुंबईत राहणाऱ्या अन्वी कामदार मान्सूनमध्ये कुंभे धबधब्याची शूटिंग करण्यासाठी पोहोचल्या होत्या.

३०० फुट खोल दरीत पडल्याने मृत्यू

अधिकार्यांनी सांगितले की, अन्वी कामदार एक रील शूट करत असताना ३०० फुट खोल्या दरीत पडल्या. हा अपघात रायगडजवळ कुंभे धबधब्यावर घडला. अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्याच्या सैर करायला गेल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता हा प्रवास दुर्दैवी वाटेवर गेला. जेव्हा अन्वी व्हिडिओ शूट करत असताना एका खोल दरीत पडल्या. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आणि एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तटरक्षक दलांच्या सोबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांची अतिरिक्त मदत मागवण्यात आली पण अन्वीला वाचवता आले नाही. अन्वीने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये स्वत:चा परिचय देताना “यात्रा जासूस” असे लिहिले आहे. अन्वीला प्रवासाच्या सोबत चांगल्या स्थळांची माहिती देण्याचीही आवड होती.

 

Loading

Rain Alert: कोकण आणि पश्चिम महाराष्टात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस – हवामान खात्याचा इशारा

   Follow us on        
Rain Alert:मागील दोन दिवसात कोकणात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खात्याने पुढील चार दिवसहि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खास करून कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सावधानतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Block "ganesh-makar-1" not found

हवामान खात्याने खालील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची  शक्यता वर्तवली आहे. 
आज दिनांक 16 जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर तसेच इतर विभागातून  अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
उद्या दिनांक १७ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
दिनांक १८ जुलै रोजी रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
दिनांक १९ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

Loading

Konkan Railway | आजच्या रद्द, पुनर्नियोजित आणि उशिराने धावत असलेल्या गाड्या

   Follow us on        
रत्नागिरी दि.१६ जुलै: दिवाणखवटी जवळ रेल्वे मार्गावरील आलेला मोठा अडथळा बाजूला केला असून रेल्वे मार्गावरील वाहतूक काल संध्याकाळी चालू करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण वाहतूक पूर्वपदावर येण्यास अजूनही काही अवधी लागेल. आज दिनांक १६ जुलै रोजी काही गाड्या आपले वेळापत्रक सोडून चालत असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द, पुनर्नियोजित आणि उशिराने चालविण्यात येत आहेत.
पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या

आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु जाणाऱ्या खालील गाड्या पूर्णतः रद्द काण्यात आल्या आहेत.

  • गाडी क्र. २०११२  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “कोकण कन्या” एक्सप्रेस
  • गाडी क्र. ११००४  सावंतवाडी रोड – दादर –  “तुतारी” एक्स्प्रेस
  • गाडी क्र. ५०१०४  रत्नागिरी – दिवा पॅसेंजर .
  • गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेस
  • गाडी क्र. २२२३० मडगाव जं. – सीएसएमटी “वंदे भारत” एक्सप्रेस
  • गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – सीएसएमटी एक्सप्रेस
दिनांक १७ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४६  तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
दिनांक १८ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
पुर्ननियोजीत Reschedule करण्यात करण्यात आलेल्या गाड्या  
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३११ श्री गंगानगर – कोचुवेली एक्स्प्रेस दिनांक १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता श्रीगंगानगर या स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “तेजस” एक्स्प्रेस दिनांक १६ जुलै रोजी सकाळी 9 वाजता या सीएसएमटी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी  क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस तिरुनेलवेलीवरून आज सकाळी ०७:३५ वाजता प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी  क्रमांक १८०४७ शालीमार – वास्को दा गामा एक्सप्रेस शालिमार येथून आज सकाळी ( दिनांक १६ जुलै रोजी) ०५:३० वाजता प्रस्थान करणार आहे.
उशिराने धावत असलेल्या गाड्या 
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस २४० मिनिटे उशिराने धावत आहे.
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस ७४५  मिनिटे उशिराने धावत आहे.
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११४  कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस प्रवास 845 मिनिटे उशिराने धावत आहे

 

 

Loading

संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा

   Follow us on        
सिंधुदुर्ग, दि.१३ जुलै: आंबोली घाटातून जाणारा संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता वेगाने होणार आहे. या मार्गाची आंबोली ते सावंतवाडी व तेथून इन्सुली ते बांदा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरिता ४२ कोटी रकमेची निविदाही काढण्यात आली आहे.
आंबोली घटवून येणार हा महामार्ग दुपदरी असून सिमेंट – काँक्रीटचा असणार आहे. तो आंबोली घाटातून पुढे सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. अधिकृत माहितीसाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,आताच या महामार्गाची  हस्तांतरण प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे अधिकृत माहिती देवू शकत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्राकडून जाहीर करण्यात आलेला संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की दाणोली, बावळाट येथून जाणार हा गेले अनेक दिवस प्रश्न होता. परंतु या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे.
हा महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली माडखोल ते सावंतवाडी गवळीतिठा आणि तेथून इन्सुली ते बांदा असा जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ४२ कोटीची निविदा काढण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणाला वर्कऑर्डर देण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत संकेश्वर पासून आजरा फाटा येथे पर्यंत हे काम सुरू आहे. आंबोली ते सावंतवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला भाग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भातले पत्र संबंधित विभागाला लवकरच देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

Loading

Konkan Railway | सामान्य प्रवाशांना दिलासा, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या गाडीच्या जनरल डब्यांत वाढ…

   Follow us on        
KR updates: कोकण रेल्वेच्या सामान्य प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामान्य General  डब्यांत होणारी जीवघेणी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका गाडीच्या जनरल डब्यांत वाढ केली आहे. रेल्वेने दिनांक १२ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार.
गाडी क्रमांक १६३३७/१६३३८ ओखा – एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस या गाडीच्या दोन  थ्री-टायर एसी डबे सामान्य कोच मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. या आधी ही गाडी २ जनरल डब्यांसहित चालवली  जात होती ती १५ नोव्हेंबर पासून ४ जनरल डब्यांसहित चालवली जाणार आहे.
Coach Discriptions Existing Revised
Second Sleeper 12 12
Two Tier AC 2 2
Three Tier AC 3 1
Pantry Car 1 1
Generator Van 1 1
SLR 1 1
General 2 4
Total 22 22

 

Loading

आंबोली घाटमार्गाला पर्यायी मार्ग लवकरच

   Follow us on        
सिंधुदुर्ग:पावसाळ्यात आंबोली घाट प्रवासासाठी खूपच धोकादायक बनतो, अनेकदा सुरक्षिततेसाठी अवजड वाहतूक बंद करावी लागते. त्यामुळे आंबोली घाटातील मार्गाला पर्यायी मार्ग असावा ही मागणी होत होती. आता या मार्गाला पर्यायी मार्ग मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली
महाराष्ट्र, कर्नाटक , गोवा असा तीन राज्यांना जोडणारा आंबोली घाटमार्गाला पर्यायी मार्ग केसरी, फणसवडे, नेनेवाडी ,चौकुळ, आंबोली, अशा कमी अंतराच्या मार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये 70 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून मंजुरीही देण्यात आली आहे. जिल्हा मार्ग क्रमांक 60 असे या मार्गाचे नाव असून 9.2 किमी अंतराच्या या मार्गासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे .त्यामुळे गेली कित्येक वर्ष प्रतीक्षेत असलेला हा पर्यायी मार्ग आता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा पर्यायी मार्ग अखेर मार्गी लागला आहे. अशी माहिती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेत आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थसंकल्प बजेट मांडण्यात आले.या अर्थसंकल्पामध्ये केसरी फणसवडे ते नेनेवाडी असा 9.2 किमीच्या मार्गाला 60 कोटी रुपयांची तरतूद करून निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तर या मार्गामध्ये वनखाते अथवा इतर आरक्षित जागे संदर्भात दहा कोटी रुपये असे एकूण 70 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. हा पर्यायी घाट मार्ग व्हावा यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून अनेक लोकांची मागणी होती. मात्र, या मागणीला आज खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सत्यात उतरवले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search