Category Archives: महाराष्ट्र

धोक्याच्या ठिकाणी रील बनवणे जिवावर बेतले; रायगडमध्ये धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रायगड: इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल संबंधित पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ रायगडमध्ये एका धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. तिने आपल्या या आवडीला करियर बनवले होते. प्रारंभिक तपासात समोर आले आहे की रायगडमध्ये कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात अन्वीचा हा अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्वी कामदार यांच्या इंस्टाग्रामवर दोन लाख ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डिलॉइट या कंपनीत नोकरीही केली होती. मुंबईत राहणाऱ्या अन्वी कामदार मान्सूनमध्ये कुंभे धबधब्याची शूटिंग करण्यासाठी पोहोचल्या होत्या.

३०० फुट खोल दरीत पडल्याने मृत्यू

अधिकार्यांनी सांगितले की, अन्वी कामदार एक रील शूट करत असताना ३०० फुट खोल्या दरीत पडल्या. हा अपघात रायगडजवळ कुंभे धबधब्यावर घडला. अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्याच्या सैर करायला गेल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता हा प्रवास दुर्दैवी वाटेवर गेला. जेव्हा अन्वी व्हिडिओ शूट करत असताना एका खोल दरीत पडल्या. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आणि एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तटरक्षक दलांच्या सोबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांची अतिरिक्त मदत मागवण्यात आली पण अन्वीला वाचवता आले नाही. अन्वीने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये स्वत:चा परिचय देताना “यात्रा जासूस” असे लिहिले आहे. अन्वीला प्रवासाच्या सोबत चांगल्या स्थळांची माहिती देण्याचीही आवड होती.

 

Loading

Rain Alert: कोकण आणि पश्चिम महाराष्टात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस – हवामान खात्याचा इशारा

   Follow us on        
Rain Alert:मागील दोन दिवसात कोकणात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खात्याने पुढील चार दिवसहि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. खास करून कोकण पट्टा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सावधानतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Block "ganesh-makar-1" not found

हवामान खात्याने खालील जिल्ह्यांत मुसळधार पावसाची  शक्यता वर्तवली आहे. 
आज दिनांक 16 जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर तसेच इतर विभागातून  अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
उद्या दिनांक १७ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
दिनांक १८ जुलै रोजी रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
दिनांक १९ जुलै रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे

Loading

Konkan Railway | आजच्या रद्द, पुनर्नियोजित आणि उशिराने धावत असलेल्या गाड्या

   Follow us on        
रत्नागिरी दि.१६ जुलै: दिवाणखवटी जवळ रेल्वे मार्गावरील आलेला मोठा अडथळा बाजूला केला असून रेल्वे मार्गावरील वाहतूक काल संध्याकाळी चालू करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण वाहतूक पूर्वपदावर येण्यास अजूनही काही अवधी लागेल. आज दिनांक १६ जुलै रोजी काही गाड्या आपले वेळापत्रक सोडून चालत असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द, पुनर्नियोजित आणि उशिराने चालविण्यात येत आहेत.
पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या

आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु जाणाऱ्या खालील गाड्या पूर्णतः रद्द काण्यात आल्या आहेत.

  • गाडी क्र. २०११२  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “कोकण कन्या” एक्सप्रेस
  • गाडी क्र. ११००४  सावंतवाडी रोड – दादर –  “तुतारी” एक्स्प्रेस
  • गाडी क्र. ५०१०४  रत्नागिरी – दिवा पॅसेंजर .
  • गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेस
  • गाडी क्र. २२२३० मडगाव जं. – सीएसएमटी “वंदे भारत” एक्सप्रेस
  • गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – सीएसएमटी एक्सप्रेस
दिनांक १७ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४६  तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
दिनांक १८ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी  गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
पुर्ननियोजीत Reschedule करण्यात करण्यात आलेल्या गाड्या  
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३११ श्री गंगानगर – कोचुवेली एक्स्प्रेस दिनांक १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता श्रीगंगानगर या स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “तेजस” एक्स्प्रेस दिनांक १६ जुलै रोजी सकाळी 9 वाजता या सीएसएमटी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी  क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस तिरुनेलवेलीवरून आज सकाळी ०७:३५ वाजता प्रस्थान करणार आहे.
  • दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी  क्रमांक १८०४७ शालीमार – वास्को दा गामा एक्सप्रेस शालिमार येथून आज सकाळी ( दिनांक १६ जुलै रोजी) ०५:३० वाजता प्रस्थान करणार आहे.
उशिराने धावत असलेल्या गाड्या 
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस २४० मिनिटे उशिराने धावत आहे.
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस ७४५  मिनिटे उशिराने धावत आहे.
  • दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११४  कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस प्रवास 845 मिनिटे उशिराने धावत आहे

 

 

Loading

संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा

   Follow us on        
सिंधुदुर्ग, दि.१३ जुलै: आंबोली घाटातून जाणारा संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता वेगाने होणार आहे. या मार्गाची आंबोली ते सावंतवाडी व तेथून इन्सुली ते बांदा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरिता ४२ कोटी रकमेची निविदाही काढण्यात आली आहे.
आंबोली घटवून येणार हा महामार्ग दुपदरी असून सिमेंट – काँक्रीटचा असणार आहे. तो आंबोली घाटातून पुढे सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. अधिकृत माहितीसाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,आताच या महामार्गाची  हस्तांतरण प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे अधिकृत माहिती देवू शकत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्राकडून जाहीर करण्यात आलेला संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की दाणोली, बावळाट येथून जाणार हा गेले अनेक दिवस प्रश्न होता. परंतु या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे.
हा महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली माडखोल ते सावंतवाडी गवळीतिठा आणि तेथून इन्सुली ते बांदा असा जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ४२ कोटीची निविदा काढण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणाला वर्कऑर्डर देण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत संकेश्वर पासून आजरा फाटा येथे पर्यंत हे काम सुरू आहे. आंबोली ते सावंतवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला भाग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भातले पत्र संबंधित विभागाला लवकरच देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

Loading

Konkan Railway | सामान्य प्रवाशांना दिलासा, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या गाडीच्या जनरल डब्यांत वाढ…

   Follow us on        
KR updates: कोकण रेल्वेच्या सामान्य प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामान्य General  डब्यांत होणारी जीवघेणी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका गाडीच्या जनरल डब्यांत वाढ केली आहे. रेल्वेने दिनांक १२ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार.
गाडी क्रमांक १६३३७/१६३३८ ओखा – एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस या गाडीच्या दोन  थ्री-टायर एसी डबे सामान्य कोच मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. या आधी ही गाडी २ जनरल डब्यांसहित चालवली  जात होती ती १५ नोव्हेंबर पासून ४ जनरल डब्यांसहित चालवली जाणार आहे.
Coach Discriptions Existing Revised
Second Sleeper 12 12
Two Tier AC 2 2
Three Tier AC 3 1
Pantry Car 1 1
Generator Van 1 1
SLR 1 1
General 2 4
Total 22 22

 

Loading

आंबोली घाटमार्गाला पर्यायी मार्ग लवकरच

   Follow us on        
सिंधुदुर्ग:पावसाळ्यात आंबोली घाट प्रवासासाठी खूपच धोकादायक बनतो, अनेकदा सुरक्षिततेसाठी अवजड वाहतूक बंद करावी लागते. त्यामुळे आंबोली घाटातील मार्गाला पर्यायी मार्ग असावा ही मागणी होत होती. आता या मार्गाला पर्यायी मार्ग मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली
महाराष्ट्र, कर्नाटक , गोवा असा तीन राज्यांना जोडणारा आंबोली घाटमार्गाला पर्यायी मार्ग केसरी, फणसवडे, नेनेवाडी ,चौकुळ, आंबोली, अशा कमी अंतराच्या मार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये 70 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून मंजुरीही देण्यात आली आहे. जिल्हा मार्ग क्रमांक 60 असे या मार्गाचे नाव असून 9.2 किमी अंतराच्या या मार्गासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे .त्यामुळे गेली कित्येक वर्ष प्रतीक्षेत असलेला हा पर्यायी मार्ग आता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा पर्यायी मार्ग अखेर मार्गी लागला आहे. अशी माहिती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेत आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थसंकल्प बजेट मांडण्यात आले.या अर्थसंकल्पामध्ये केसरी फणसवडे ते नेनेवाडी असा 9.2 किमीच्या मार्गाला 60 कोटी रुपयांची तरतूद करून निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तर या मार्गामध्ये वनखाते अथवा इतर आरक्षित जागे संदर्भात दहा कोटी रुपये असे एकूण 70 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. हा पर्यायी घाट मार्ग व्हावा यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून अनेक लोकांची मागणी होती. मात्र, या मागणीला आज खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सत्यात उतरवले आहे.

Loading

महत्त्वाचे: माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ; नियमांतही बदल

   Follow us on        

मुंबई:राज्यातल्या महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. कोणते नियम शिथिल करण्यात आले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. शिवाय जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे.

या योजने अंतर्गत महिलांना दर महीना दिड हजार रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत, याची नियमावली सरकारने जाहीर केली होती त्यामध्ये आता काहीसा बदल केला गेला आहे. यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत.

नव्या नियमा नुसार कोणात्या महिला पात्र? 

आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत.  त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे. जा महिलांचे वय 65 वर्षे आहे त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. पहिल्यांदा वयाची अट ही 21 ते 60 वर्षापर्यंत होती. त्यात आता बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पर्यंता आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे. ज्या महिलेकडे किंवी तिच्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती. मात्र त्यातही आता बदल करण्यात आला आहे. जमिनीबाबतची अट आता वगळण्यात आली आहे. या योजनेत पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ
सदर योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 01 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यंत होता. आता हा कालावधी 2 महिने केला असून दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजचे निवेदन.. 👇🏻

Loading

Central Railway: मध्य रेल्वेची वेटिंग लिस्ट प्रवाशांना ‘नो एन्ट्री’

आरक्षित डब्यांतील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचं मोठं पाऊल. 

   Follow us on        

Waiting list passenger not allowed: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील Waiting List तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी विनातिकीट आणि प्रतीक्षायादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकांवर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीत होत आहे. गर्दीमुळे तिकीटधारक प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करता येत नाही. डब्यात प्रवेश केल्यानंतर आरक्षित आसनापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. प्रतीक्षायादीतील प्रवाशांमुळे होणार्‍या गर्दीच्या सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या व्हिडीओंची व्हिडीओची गंभीर दखल रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.

तिकीट खिडक्यांवर काढलेले तिकीट रद्द प्रवाशांना रद्द करावे लागणार. 

ऑनलाईन प्रतीक्षायादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होऊन त्याचा परतावा प्रवाशांच्या थेट बँक खात्यात जमा होतो. तिकीट खिडकीवरील कन्फर्म नसलेले तिकीट प्रवाशांना रद्द करावे लागणार आहे. रेल्वेगाडीचा चार्ट साधारण चारतास आधी तयार होतो. त्याचवेळी तिकीट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती प्रवाशांना समजते. गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी प्रतीक्षायादीतील तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास त्याचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. गाडी गेल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.

प्रतीक्षायादीतील तिकीट असलेले प्रवासी आरक्षित डब्यांतून प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता त्यांना पुढील स्टेशन आल्यावर त्या डब्यातून उतरविण्यात येत आहे. .‘गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा एक्स्प्रेसमधून सर्वाधिक २८२ प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.(११०६१) जयानगर एक्स्प्रेसमधून २०० प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ३१ मेल-एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर सुमारे १,६०० प्रवाशांना विविध स्थानकात उतरवण्यात आले आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिसूचना GR प्रसिद्ध केली नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मुंबई उपनगरीय स्थानकावर याबाबत अनॉसमेंट होत आहे.

वाचकांचा प्रतिसाद

अशी कारवाई करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कित्येकदा आरक्षित तिकीट भेटत नसल्याने नाईलाजाने वेटिंग तिकीट काढून प्रवास करावा लागतो. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने त्या त्या गाडीच्या वेटिंग तिकिटांच्या संख्येवर मर्यादा घातल्या पाहिजेत.-प्राजक्ता परब, भांडुप

जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल. आपल्याकडे जनरल डब्यांची खूपच खराब आहे. डब्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट प्रवासी या डब्यांतून प्रवास करतात. हा त्रास काही प्रमाणात वाचविण्यासाठी प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटांवरुन प्रवास करतात. आता सुद्धा पर्याय नाहीसा झाल्याने प्रवाशांकडे जनरल कोचमधून प्रवास करण्याचा पर्याय राहिल्याने जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल.-राजेश धुरी, विरार 

 

 

Loading

मालवण: बांदिवडे त्रिंबक रस्त्याची अवस्था झाली दयनीय

   Follow us on        

मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.

बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.

Loading

मोठी बातमी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सरकारकडून स्थगिती

Nagpur Goa Shaktipeeth Highway Updates:नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या ८०२ किमीचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आले आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्प राबवला जात होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभेतील पराभवानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावर या प्रकल्पाबाबतन निर्णय घेईल असे ठरविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
“या प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि इतर ग्रामस्थ या प्रकल्पाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करत असल्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. किमान पुढील ३-४ महिने जमीन संपादित करू नयेत असे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (ऑक्टोबरमध्ये) नवीन सरकार या प्रकल्पाचे भवितव्य ठरवेल”, असे या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाच्या कामामुळे शेतकरी वर्गासह कष्टकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून याला विरोध आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रोखणे आवश्यक असून या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १२ जिल्हे या प्रकल्पामुळे बाधित होणार असून या १२ जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी असे तब्बल २०० लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले आहेत.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search