Maharashtra SSC Result 2023 l 2022- 23 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर. निकालाची एकूण टक्केवारी 93.86 टक्के. निकालामध्ये कोकण विभागानं मारली बाजी. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागल्याची बोर्डाची माहिती. निकालांमध्ये मुलींनी मारली बाजी.
पुणे: 95.64 टक्के
नागपूर: 92.05 टक्के
औरंगाबाद: 93.23 टक्के
मुंबई: 93.66 टक्के
कोल्हापूर: 96.73 टक्के
अमरावती: 93.22 टक्के
नाशिक: 92.22 टक्के
लातूर: 92.67 टक्के
कोकण: 98.11 टक्के
कोकण विभाग 98.11 टक्के
नागपूर विभाग 92.05 टक्के
SSC Result 2022-23| यंदा दहावीत बसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीचा SSC निकाल उद्या दिनांक ०२ जूनला जाहीर होणार आहे.
दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
असा पाहा निकाल
स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा. स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा
स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
राज्य राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
मुंबई : पश्चिम रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही.
ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. १५ मे रोजी आरपीएफ आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने अलीम खान याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेऊन अंधेरी आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता अलीम खानने सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खान खास २२ मे रोजी आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
६३ गुन्हे दाखल
दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने १ ते २७ मेदरम्यान आरपीएफने ७१ तिकीट दलालांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.
Mansoon Updates |भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहितीच जारी केली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे.
हवामान विभागाने मान्सूनचा चार आठवड्यांचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार देशात काही भागात २६ मे पासून मान्सूनची प्रगती दाखवली आहे.
कोकणात मान्सूनचे आगमन ९ जूनला होणार आहे. कोल्हापूर सातारा जिल्हय़ात याचवेळी तो पोचणार असला तरी तिथे जोर कमी राहणार आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मान्सून १६ जूनपासून आगमन करणार आहे. तसेच याच कालावधीत तो देशातील उत्तर भागात पोहोचणार आहे.
शुक्रवारचा पाऊस मान्सून नव्हे शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
सध्या कुठे आहे मान्सून
सध्या मान्सूनचे वारेही कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअरपासून 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर मान्सून अडकला आहे. त्यामुळे मान्सून चार ते पाच दिवसांच्या विलंबाने देशात पोहोचू शकतो. केरळमध्ये साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो ५ जून दरम्यान दाखल होऊ शकतो.
25 May 2023, The extended range forecast for coming 4 weeks for all India rainfall by IMD. pic.twitter.com/505KP0sGa2
HSC Result 2023 | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि.25 मे रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उद्या दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत.
वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे.
मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे.
मुंबई, दि.१५ : विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध कायद्यात कठोर तजवीज करण्यात येण्याची शक्यता आहे. अशा गुन्ह्यात सापडलेल्या आरोपींना अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.
वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू यासाठी वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बेदरकारपणे तसंच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालिवण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2021 मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या 20 हजार 860 आहे तर त्यात 9829 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई – मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा, एक आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचं बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही. त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याच त्यांनी यावेळी जाहीर केले.
यासंर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर वर मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी विनंती आपण एका पत्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती अशा आशयाची पोस्ट प्रसिद्ध केली आहे. याशिवाय आजून दोन मोठ्या प्रकल्पास महापुरुषांची नवे देण्यात यावी अशीही या पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे.
१) वांद्रे वर्सोवा सी लिंक ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे
२) मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे.
पालघर – आपल्या आईला लांबवर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत असल्याने पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील प्रणव रमेश सालकर या नववी इयत्तेतील, १४ वर्षीय मुलाने स्वतःच्या अंगमेहनतीने घराच्या परिसरात खड्डा खोदत खोदत विहीर खोदली आहे. या विहिरीला १५ फुटावर पाणी लागले आहे. प्रणव च्या कार्यामुळे त्याचे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातून कौतुक होत आहे.
आईची तळमळ पाहून प्रणव ने विहीर खोदायला घेण्याचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद होता. पण कौतुक करताना दुसरी बाजू पण लक्षात घेतली गेली पाहिजे. आई बाबा मजुरीला गेले असताना त्याने चार दिवसात ही विहीर एकट्याने खोदली असल्याचे सांगितले आहे. १४ वर्षाचा एकटा बिनअनुभवी, निरागस मुलाला या कामात असणाऱ्या धोक्याचीही कल्पना नसेल. विहीर खोदताना कठडा कोसळून तो मातीखाली येण्याची शक्यता होती. इतरही काही अपघाताच्या शक्यता होत्या. मुलाचा हेतू चांगला असला तरी पालकांनी अशा गोष्टी करताना मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते.
आजकाल गावोगावी सोशल मीडिया भलताच ट्रेंड आहे. कित्येक मुले सोशल मीडियावरील काही गोष्टींचे अनुकरण करताना दिसतात. प्रसारमाध्यमांनी या बातमीला प्रसिद्धी दिली तसेच सोशल मीडियावर पण ही बातमी खूप प्रसारित झाली. या बातमीमुळे काही लहान मुले प्रणव चे अनुकरण करायचा प्रयत्न करतील. या दरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपली मुले असे काही करत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे.
रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचा आजचा बारसू येथील दौरा रद्द केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकिच्या प्रचारासाठी वेळ देता यावा यासाठी हा दौरा रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज बारसु येथे रिफायनरी समर्थनार्थ एक मोर्चा काढणार होते. मात्र त्यांनी आता या कारणासाठी माघार घेतली आहे. पण माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे या मोर्चात सहभागी होणार आहेत.
पुढच्या आठवड्यात मी रत्नागिरीमध्ये जाऊन जाहीर सभा आणि बैठक घेणार आहे.तारीख येत्या दोन दिवसांत जाहीर करेन असे ते म्हणले आहेत.