Category Archives: महाराष्ट्र

महत्वाचे – रेशनकार्ड धारकांनी ‘हा’ अर्ज दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत जमा करणे गरजचे, अन्यथा कारवाई होणार.

अंतोदय / प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

ज्या लाभार्थ्यांचे उत्त्पन्न जास्त आहे त्यांनी ह्या योजनेतून बाहेर पडा असे आवाहनवजा इशारा देण्यात आला आहे, त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ हि अंतिम तारीख दिली आहे. ह्या  लाभार्थ्यांनी दिनांक ३१/०८/२०२२ पूर्वी  ह्या योजनेतून बाहेर पडा GIVE IT UP फॉर्म स्वइच्छेने भरून देणे गरजेचे आहे. हा अर्ज भरून तो तहसीलदार, पुरवठा निरक्षण अधिकारी किंवा पुरवठा निरीक्षक ह्यांच्याकडे जमा करायचा आहे.

सदरचा फॉर्म दिनांक ३१.०८.२०२२ भरून देणार नाहीत अशा लाभार्थी बाबत दिनांक ०१.०९.२०२२ पासून तलाठी व मंडल अधिकारी शहनिशा करून अपात्र लाभार्थीवर आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभावाप्रमाणे रक्कम वसूल करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल होऊ शकतो असे जाहीर करण्यात आले आहे.

खालील लाभार्थ्यांना हा अर्ज भरणे गजरेचे आहे असे पत्रकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

१.शासकीय नोकर, निमशासकीय नोकर, 

२. व्यावसायिक, किराणादुकानदार,

३. पेन्शन धारक,

४. ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी, 

५. मोठ मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे,

६. साखर कारखान्यात Permenant असणारे कामगार.

७. आयकर भरणारे 

८. पक्के (स्लॅपचे) घर असणारे .

९. चार चाकी वाहन (घरगुती किंवा व्यायसायिक) धारक 

१०. घरात एअर कंडिशनर (AC ) असणारे 

११. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून ५९,००० हजारापेक्षा जास्त असल्यास.

 

Download form here > opt form

 

RELATED

१ सप्टेंबर रोजी सर्व रेशनधारकांची पडताळणी होणार, चुकीच्या माहिती दिलेली आढळल्यास कारवाई होणार

Loading

पाश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर AC आणि Non-AC फेऱ्यांमध्ये वाढ होणार..

मुंबई : पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढती गर्दी आणि AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन पाश्चिम रेल्वे प्रशासनाने AC आणि Non-AC फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ऑक्टोबरपासून 20 AC लोकल्स आणि 10 Non-AC लोकल्स ह्या मार्गावर वाढविण्यात येतील.

सध्या चर्चगेट ते डहाणू ह्या मार्गावर एकूण 1375 लोकल्स फेर्‍या चालविण्यात येत आहेत त्यामधे 48 फेर्‍या AC लोकल्स च्या आहेत. ह्या मार्गावर सुमारे 30 लाख प्रवाशी दररोज प्रवास करतात त्यामधे सुमारे 1 लाख प्रवासी AC लोकल्सने प्रवास करतात. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात AC लोकल्सने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 25% वाढली आहे. मध्य उपनगरीय रेल्वेशी तुलना करता ह्या मार्गावर AC लोकल्सना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ह्या मार्गावर 20 AC लोकल्स वाढवायच्या निर्णय घेतला आहे.

ह्या सर्व वाढिव सेवांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Loading

अखेर ‘त्या’ AC लोकल्स रद्द करून Non-AC स्वरुपातच चालवण्याचा निर्णय.

मुंबई : मध्य रेल्वेच्या 10 सेवा AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात येत आहे. त्या १० सेवा २५.०८.२०२२ पासून आधी पूर्वीप्रमाणे Non AC स्वरुपात चालविण्यात येतील. AC सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख पुनरावलोकनानंतर कळविण्यात येईल असे आज मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

मागील आठवडय़ात मध्य रेल्वेच्या 10 गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्या गेल्या होत्या. ह्या निर्णयाचा प्रवाशांकडून विरोध झाला होता. कळवा आणि बदलापुरात आंदोलने पण करण्यात आली होती. सोशल मीडियावर पण ह्या संदर्भात विरोध दर्शवला गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पण विधी मंडळात ह्या विरुद्ध आवाज उठवला होता. ह्या गाड्या पुन्हा सामान्य स्वरुपात चालविण्यात याव्यात म्हणुन प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी निवेदने दिली. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

Loading

मुख्यमंत्र्यांचे राज्यातील शेतकऱ्यांना ‘भावनिक पत्र’

राज्यात शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या आपल्याला खूप दुःख होत आहे. तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला अस्मानी संकटातून, सावकारी दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा आशयाचे भावनिक आवाहन त्यांनी आज एका पत्राद्वारे केले आहे. त्यांनी लिहिलेले पत्र खाली वाचा त्यांचाच शब्दात.

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत, जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभा महाराष्ट्र देशाची भूक भागवण्याचेही काम करत आहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचं असेल तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.

परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातील काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवून आत्त्महत्येचा मार्ग पत्करतात.. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषन्न होऊन जातं….वाटतं, कि आपल्याच घरातील कुणी आपण गमावलंय…..

लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे…..तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही आहे. तुम्ही आमची संपत्ती आहात, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना नेहमी म्हणायचे कि, ”रडायचं नाही लढायचं”

शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका….आत्महत्या करू नका…मी तुमच्यासारखा रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात. या आस्मानी संकटातून, या सावकारी दृष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश सामावलेले असते……

मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा…जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेंकाना….

चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधुयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया….

जय महाराष्ट्र!

 

Loading

१ सप्टेंबर रोजी सर्व रेशनधारकांची पडताळणी होणार, चुकीच्या माहिती दिलेली आढळल्यास कारवाई होणार

सरकारद्वारे रास्त दराने दिले जाणारे रेशनकार्ड वरील धान्य घेणारी व्यक्ती खरोखर गरजू आहे का, त्याचे उपन्न त्या कसोटी मध्ये बसत आहे का नाही ह्याची पडताळणी पुढच्या महिन्यात होणार आहे. उत्पन्न वाढलेल्या धारकाचे रेशनवरील धान्य ह्या पडताळणीनंतर बंद करण्यात येणार आहे.

कमी उत्त्पन्न गटामध्ये मोडत असलेली गरीब जनता उपाशी राहू नये म्हणून सरकराद्वारे गरीब कुटुंबाना स्वस्त  दरात रेशन दिले जाते. मात्र काही लोकांचे उत्पन्न वाढले तरी त्यांचे ह्या सुविधेमध्ये नाव असल्याने त्याचा दुरुपयोग होताना दिसत आहे. काही लोक हेच धान्य त्यांना मिळालेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विकून ह्या सुविधेचा गैरवापर करत आहेत. काही लोक तर चक्क जनावरांना हे धान्य खायला घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

ह्या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व प्रत्येक रेशनधारकांची धान्य निरीक्षकांमार्फत पडताळणी होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. खोट्या माहितीद्वारे कमी उत्पन्न दाखवून जर कोणी ह्या सुविधेचा दुरुपयोग केला असेल तर त्यांच्याकडून मागील धान्याची किंमत वसूल केली जाणार आहे.

 

Loading

आमच्या रेग्युलर लोकल्स बंद करून त्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करू नका.. कळवा आंदोलन…

ठाणे : तुम्हाला AC लोकल्स वाढवायच्या असतिल तर खुशाल वाढवा, पण त्यासाठी आमच्या रेग्युलर लोकल बंद करून त्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करू नका असे सामान्य लोकल प्रवाशांचे म्हणने आहे. आधीच मध्य रेल्वेच्या 56 रेग्युलर गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केलेल्या होत्या आणि ह्या आठवड्यात आजून 10 सामान्य गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला त्यामुळे आज कळवा येथे AC लोकल्स थांबवून प्रवाशांनी आंदोलन केले.

सव्वा आठची कळवा कारशेड मधून सुटणारी ठाणे- सीएसमटी लोकल आहे. जी पूर्वी साधी होती. त्यामुळे कळव्यातील अनेक प्रवासी या गाडीतून कारशेडने प्रवास करत होते. आता ही लोकल एसी केल्याने प्रवाशांना लोकल मिळाली नाही. त्यामुळे कारशेडजवळ सुमारे पाऊण तास लोकल थांबवून ठेवली होती.

Related news: मध्य रेल्वेच्या ‘ह्या’ गाड्या AC Locals मध्ये परावर्तित होणार.

संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. मात्र त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना तिथून हटवलं. यानंतर लोकल वाहतूक पूर्ववत केली गेली. याशिवाय, रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांना ताब्यात देखील घेतले आहे.

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांची ट्विट

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर च्या माध्यमातून सामान्य लोकल्स AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्याचा विरोध केला आहे.

Loading

निष्ठेचे प्रमाणपत्र हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही.. आमदार राजन साळवी

राजापूर:शिवसेनेचा कोकणातील आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला होता. शिंदे गटात जाऊ शकणारा हा शिवसेनेचा आमदार दुसरा-तिसरा कोणी नसून राजन साळवी हे आहेत ह्या आशयाच्या बातम्या काल प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला अजून एक धक्का बसतो की काय अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. अधिवेशन सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राजन साळवी यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजन साळवी आता शिंदे गटात प्रवेश करतील, या चर्चेने जोर धरला होता.

पण आज ट्विटर च्या माध्यमातून ह्या बातम्या खोट्या आहेत असे जाहीर केले आहे. ”आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी….काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… ”

”निष्ठेचे प्रमाणपत्र दि.15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही….” ह्या ट्विट सोबत त्यांनी स्व. बाळासाहेबांसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे.

राजन साळवी हे कोकणातील लांजा-राजापूर-साखरपा ह्या मतदार संघातून सलग 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत.

Loading

पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनेतील सदनिका विजेत्यांची नावे जाहीर..

मुंबई : पुणे मंडळामार्फत म्हाडा च्या विविध योजनतील २७८ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज पार पाडण्यात आली. ह्या सोडतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला.

विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते.

ह्या सोडतीमधील विजेत्यांचे आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे म्हाडाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित केले असून खालील लिंक वर क्लिक करून आपण ती यादी पाहू शकता.

https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/P17/draw/P17.html

Loading

गोविंदांना ह्या वर्षी ‘विमा संरक्षणच्या’ बदल्यात ‘अर्थसहाय्य’ …जाणून घ्या काय असणार नियम.

मुंबई :दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून  आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शिंदे सरकारने आज घेतला आहे. सरकारने त्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. आर्थिक सहाय्य फक्त ह्या वर्षासाठी मर्यादित असेल पुढील वर्षी गोविंदा पथकांच्या विम्या बाबत सरकार निर्णय घेईल असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले आहे.

जर एखादी दुर्दैवी घटना घडल्यास खालील परिस्तिथीमध्ये गोविंदांना आर्थिक साहाय्य दिले जाईल

गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.

दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

Loading

भाजपच्या संसदीय बोर्डातपण नितीन गडकरी यांना स्थान नाही… गडकरींचा ‘अडवाणी’ करायचा प्लॅन?

दिल्ली: काल भाजपने आपल्या संसदीय बोर्डची यादी घोषणा करत त्यातील सदस्याची नावे जाहीर केली आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे ह्या समितीमध्ये एकाही महाराष्ट्र राज्यातील नेत्याच्या समावेश केला गेला नाही आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलले गेले आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पण ह्या समितीमध्ये स्थान देण्यात असलेले नाही आहे. त्यामुळे ह्या समितीमध्ये आता एकही मुख्यमंत्री नाही आहे.

ह्या समितीमध्ये जे. पी. नड्डा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांचे खच्चीकरण?

भाजपच्या केंद्रीय संसदीय बोर्ड आणि केंदीय निवडणूक समितीमध्ये भाजपचे कार्यशील आणि वजनदार नेते नितीन नमस्कार यांना स्थान दिले नसल्याने विविध चर्चा होत आहेत.

पक्षाने असे का केले या विषयी काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. ह्या समितीवर निवडीसाठी वयाची अट पाहता ती पक्षाने 75 ठेवली आहे. नितीन गडकरी यांचे वय 65 आहे. त्यांच्या जागी निवड करण्यात आलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांचे वय 77 आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांना का डावलले याचे नेमके कारण आजून समजले नाही.

नितीन गडकरी यांना भावी पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहे. नितीन गडकरी यांचे केंद्रात आणि पक्षात वाढणारे प्राबल्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी त्यांचे जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे बोलले जात आहे. दुसरीकडे नितीन गडकरी यांना त्यांचा स्पष्टवक्तेपणा नडत असल्याचे आणि त्यांच्या मागील काही विधानांमुळे त्यांना दूर करण्यात येत आहे अशी चर्चा आहे. मागेच नितीन गडकरी यांनी आता सत्ताकारणाचा कंटाळा आला आहे असे जाहीरपणे बोलून पण दाखवले होते. कारण काहीही असो पण त्यांना डावलून एकप्रकारे भाजप महाराष्ट्र राज्याचा अपमान करत आहे असे दिसून येत आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search