Category Archives: शिक्षण

‘वन्स मोअर’ शब्द वापरणे योग्यच, दीपक केसरकर यांचे ‘त्या’ कवितेला समर्थन

   Follow us on        
मुंबई: सोशल मीडियावर इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेवरून सध्या वाद होतोय. या कवितेवरून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या दर्जावर, निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कवितेत अस्वल, हत्ती, कोल्हा, वाघ, लांडगा, मुंगी, ससा, अशा प्राण्यांचा उल्लेख आहे. पण, या कवितेत काही हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये बात, शोर असे हिंदी शब्द, तर माउस, वन्समोअर अशा इंग्रजी शब्दांचा वापर झालाय. त्यामुळे या कवितेवर आक्षेप घेतला जातोय. ही कविता कोणत्या निकषांवर बालभारतीच्या पुस्तकात निवडण्यात आली? असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जातोय. ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजे’ या नावानं फेसबुकवर ग्रुप आहे. या ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी सोमवारी सकाळी या कवितेचा फोटो या ग्रुपमध्ये शेअर केला होता
दीपक केकसरकर यांचे समर्थन 
समाज माध्यमांवर मराठी भाषा प्रेमींनी मोठ्या यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसकर यांनी मात्र या कवितेचे समर्थन केले आहे. “वन्स मोअर” या शब्दाला पर्यायी मराठी शब्द आहे का? यमक जुळवण्यासाठी इंग्रजी शब्द वापरला तर त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. आपण ‘टेबल’ हा इंग्रजी शब्द मराठीत सर्रास वापरतोय” अशा शब्दात त्यांनी या कवितेचं  समर्थन केले आहे.

Loading

10th Result 2024: मराठी भाषा ‘नापास’ होत आहे

   Follow us on        
10th Result 2024: दोन दिवसांपूर्वीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागच्या या वर्षी या परीक्षेचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे. मागच्यावर्षी पेक्षा साधारण 1.98 % ने यामध्ये वाढ झाली असली तरीही या निकालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मातृभाषेच्या विषयातच  हजारो विद्यार्थ्यांनी  गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
प्रथम भाषा इंग्रजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण हे मराठी प्रथम भाषा निवडून नापास होणाऱ्यांपेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच राज्यामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.
वाचकांच्या प्रतिक्रिया 
“एक काळ होता जेव्हा परकीयांची इंग्रजी भाषा दहावी बारावी परीक्षा पास होण्याकरता सर्वात मोठा अडथळा ठरत होती. आता मात्र चित्र उलट दिसत आहे. मराठी भाषा परकी होत चाललेली दिसत आहे.”
श्री. दिगंबर गणपत राणे, माहीम 
“राज्य शिक्षण मंडळाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी विषय अवघड का जात आहे याबाबत सविस्तर विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल केला गेला पाहिजे.”
सौ. आश्विनी रा. गवस, विरार

Loading

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; कुठे चेक कराल?

   Follow us on        

CBSE Board 12th Result Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने यंदाच्या वर्षातील इयत्ता आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये बारावीच्या परीक्षेत एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या या परीक्षेत सुमारे 17 लाख विद्यार्थी बसले होते.या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 91% मुलीं या परीक्षेत पास झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल 85.12% एवढा लागला आहे.

या लिंकवर पाहा तुमचा निकाल

cbseresults.nic.in

results.cbse.nic.in

cbse.nic.in

cbse.gov.in

digilocker.gov.in

results.gov.in

Loading

HSC & SSC Results | दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखांबाबत मोठी अपडेट

   Follow us on        

HSC and SSC result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 6 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात देण्यात आली आहे.

उत्तर पत्रिका तपासण्याचे काम जोरात चालू असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकालाची नेमकी तारीख जाहीर करणार असून बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 06 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात.

दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.

Loading

Sindhudurg | ‘डोंगराळ’ च्या सवलतींमुळे जिल्ह्यातील शाळा वाचतील

   Follow us on        
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात येतो. शाळांच्या सुधारित संचमान्यतेत हा उल्लेख चुकून राहिला होता. या संदर्भात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सुधारित संच मान्यतेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगराळ भागाची सवलत मिळेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले.
सध्या शाळांच्या सुधारित सुधारित संच मान्यतेमुळे सिंधुदुर्गातील शाळा अडचणीत येणार असल्याची भीती शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहेत. या संदर्भात केसरकर यांना विचारले असता, सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भाग आहे. दुर्गम भागातील शाळांना वीसच काय, त्याखालील पटसंख्या भरणे मुश्कील आहे. मान्यतेत या जिल्ह्याला पूर्वी सवलत देण्यात आली होती. डोंगराळ भागाचा उल्लेख सुधारित संचमान्यतेत करण्यात आला नव्हता. ती सुधारणा आता करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांबाबतही अशी सुधारणा करण्यात येणार आहे. या शाळांनाही पटसंख्येचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांनाही पूर्वीची सवलत राहणार आहे. सध्याच्या शाळांचे मुख्याध्यापकपद सुधारित संचमान्यतेमुळे निष्कासित होणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Loading

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार

पुणे: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
परीक्षेपूर्वी ३० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात ११ वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तसेच दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Loading

दहावी व बारावीच्या परीक्षा होणार वर्षातून दोनदा

पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे. आता त्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये त्या परीक्षांची नेहमीच चिंता असते आणि पालकांवरही ताण असतो. अनेकजण विशेषत: मुली अनुत्तीर्ण झाल्यावर अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात.या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागविली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर त्यांची मते मागवून घेतली आहेत. त्याचा विचार करून दोन वर्षांत नवीन पद्धत अवलंबली जाणार आहे.पाठांतराची सवय कमी करण्याचा प्रयत्ननवीन अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

नवीन बदल असा असणार… शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करतील. पण, पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीनेच होतील. पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेले जाणार असून पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. तत्पूर्वी, त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.सेमिस्टर पॅटर्नचा हेतू…विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होईलएका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात त्यांना जास्त अभ्यास करण्याची संधीअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा सोडणे थांबेल

Loading

दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

पुणेः माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून २३ मार्च २०२४पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.

Loading

यापुढे बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा; ११वी आणि १२वीच्या अभ्यासक्रमातही बदल

नवी दिल्ली:देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने शालेय शिक्षणाबाबत मोठे बदल जाहीर केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण-परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.शिक्षण मंत्रालयाने बुधवार ही महत्वाची माहिती दिली.
शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार , बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्याचसोबत ११वी आणि १२वीच्या अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत. तसंच, विद्यार्थ्यांना दोन्ही सेमिस्टरचे सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल.
पीटीआय या वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्रालयाच्या नवीन परीक्षा पॅटर्नवर आधारित बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या विषयांचे आकलन आणि त्यांच्या स्पर्धात्मक कामगिरीचे (अचिव्हमेंट ऑफ कॉम्पिटेंसीज) मूल्यांकन करेल. मंत्रालयाने हे मान्य केले आहे की, सध्या बोर्डाच्या परीक्षा या केवळ महिन्यांपर्यंत कोचिंगद्वारे केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता यावरच आधारित असते.
शिक्षण मंत्रालयाने केलेल्या महत्त्वाच्या बदलांनुसार आता इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना स्ट्रीम निवडण्याची सक्ती आता काढून टाकण्यात आली आहे. अशा स्थितीत या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्यास मोकळेपणा मिळेल. सध्या सर्वच मंडळांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक इत्यादींपैकी एकाची निवड करावी लागते.
तसंच, २०२४ च्या शैक्षणिक अभ्यासक्रामासाठी त्याप्रमाणेच पाठ्यपुस्तके विकसित केली जातील असे देखील शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यापैकी किमान एक भाषा भारतीय असणं आवश्यक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Loading

आता सर्व विषयांसाठी एकच पुस्तक; विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे हलके होणार

संग्रहित छायाचित्र

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर एक नवीन प्रयोग हाती घेत आहेत. आता विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्गात दर तीन महिन्याने सेमिस्टरमध्ये 3 ते 4 पुस्तक एकत्र करुन एकच पुस्तक शाळेत आणावे लागणार आहे. प्रयोग पहिली ते सातवी पर्यंतच्या इयत्तेसाठी असणार आहे

पहिले ते पाचवीतील विद्यार्थ्यांना वर्षातून तीन महिन्याला 1 पुस्तक अशी तीन पुस्तकं असतील. यामध्ये सर्व विषयाचा अभ्यासक्रम एकत्र केला जाणार आहे. तर सहावी आणि सातवीसाठी वर्षभरात चार पुस्तकामध्ये या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण असणार आहे. त्यामुळे वर्षात 3 ते 4 पुस्तकं दर तीन महिन्यात बदलावी जरी लागत असली तरी वर्गात मात्र शिकण्यासाठी एकच पुस्तक घेऊन जावं लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा विषय सातत्याने चर्चेत असतो. न्यायालयाने या मुद्द्यावरुन शिक्षण विभागाला वारंवार फटकारले आहे.

सध्या शाळेचे वेळापत्रक पाहून विद्यार्थी रोज पाच ते सहा पुस्तके , वह्या दप्तरात घेऊन जातात. आता मात्र हा प्रयोग प्रत्यक्षात आला तर विद्यार्थ्यांना दप्तरात एकच पुस्तक न्यावं लागणार आहे.

सुरुवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपाय अमलात येणार आहे. सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल नाशिक मध्ये दिली..

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search