Category Archives: शिक्षण
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता पाचवी आणि आठवीच्या वर्गातही मुलांना नापास केलं जाऊ शकतं. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. त्यातही ते नापास झाले तर नापास होतील आणि पुन्हा त्याच वर्गात शिकावे लागेल.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता नो डिटेंशन पॉलिसीला समाप्त करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद केले जाणार आहे. या नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र ते जर दुसऱ्यांदाही नापास झाले तर त्यांना वरच्या वर्गात जाण्याची द्वार बंद केले जाणार आहे. मात्र तरीही आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नाही असेही सरकारने म्हटले आहे.
नापास मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला 2 महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, मात्र त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार नाही, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र या काळात पुन्हा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्याकडे शिक्षक विशेष लक्ष देतील आणि पालकांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतील.
नो डिटेन्शन पॉलिसी ही शिक्षण हक्क कायदा 2009 चे महत्त्वाचे धोरण होते. या धोरणांतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मुलांना वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले नाही. या धोरणांतर्गत पारंपारिक परीक्षांना सामोरे न जाता सर्व विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती देण्यात आली. या धोरणात मुलांचे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला होता.
CBSE Board 12th Result Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने यंदाच्या वर्षातील इयत्ता आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये बारावीच्या परीक्षेत एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या या परीक्षेत सुमारे 17 लाख विद्यार्थी बसले होते.या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 91% मुलीं या परीक्षेत पास झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल 85.12% एवढा लागला आहे.
या लिंकवर पाहा तुमचा निकाल
HSC and SSC result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 6 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात देण्यात आली आहे.
उत्तर पत्रिका तपासण्याचे काम जोरात चालू असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकालाची नेमकी तारीख जाहीर करणार असून बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 06 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात.
दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.










