सिंधुदुर्ग:ग्रामिण भागातील नागरीकांना आपल्या घराच्या जवळ चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या उददेशाने श्री.मंगेशजी सांवत यांच्या प्रेरणेतून मंगळवार, 21 डिसेंबर 2022 रोजी साईलिला हॉस्पिटल नाटळ, प्रथमेश हॉटेल्स प्रा.ली. मुंबई आणि माता वैष्णोदवी महाविद्यालय ओसरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा > कोकण आणि कोल्हापुरातील काजू उत्पादकांसाठी खुशखबर, राज्यात काजू फळपीक विकास योजना
हे शिबीर माता वैष्णोदेवी महाविद्यालय, ओसरगांव, मुंबई-गोवा हायवे, ओसरगांव तलाव शेजारी आयोजीत करण्यात आले आहे. शिबीराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 02 अशी आहे. तरी कणकवली, ओसरगांव,कसाल, आंब्रड, हेवाळे, पोखरण, कुंदे, बोर्डवे या पंचक्रोशीतील सर्व नागरीकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहीती व नावनोंदणी करीता साईलिला हॉस्पिटल नाटळ संपर्क क्रमांक 02367 246099 / 246100 / 8275137575 यावर संपर्क करावा.