Ganesh Chaturthi 2023 | गणेश चतुर्थीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेचे आरक्षण मिळण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे. येथे दलालांचा सुळसुळाट असल्याने कसरत करूनही तिकीट मिळणे कठीण झाले आहे. शेवटी दुसरा कोणता पर्याय नसल्याने दुप्पट ते तिप्पट भावात याच दलालांकडून तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो. पण एसी वगळता ईतर श्रेणीतुन प्रवास करताना आरक्षण असूनही मोठा त्रास सहन करावा लागतो. या डब्यांना जनरल डब्यांचे स्वरुप येते.
दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग अजूनपर्यंत अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी अजूनही एकेरी मार्गाने वाहतुक सुरू आहे. या कारणांमुळे गणेश चतुर्थी उत्सवा दरम्यान या मार्गावर वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण होणार आहेत.
या सर्व गोष्टीचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो तो तळकोकणातील चाकरमान्यांना. कारण अशा स्थितीत 500 किलोमीटर प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. मात्र आता त्यांना एक प्रवासाचा सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवर पेडणे MOPA येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने आता मुंबईवरून तळकोकणात काही तासांत पोहचणे शक्य झाले आहे. या विमानतळावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुके जवळ आहेत, त्यामुळे या तालुक्यातील प्रवाशांसाठी गावी पोहोचण्यासाठी हा एक सोयीचा व जलद पर्याय होऊ शकतो.
आमच्या प्रतिनिधीने https://www.ixigo.com/ या ऑनलाईन फ्लाईट बुकिंग करणाऱ्या वेब पोर्टल वर चेक केले असता मुंबई ते गोवा SpiceJet या विमानसेवा देणार्या कंपनीचा तिकीटदर किमान १८१८ रुपये एव्हढा दाखवत आहे. त्यात INSTANT हा कुपन कोडे अप्लाय केल्यावर ३०० रुपये सूट मिळत आहे. मात्र सुविधा शुल्क पकडून एक तिकीट १८१७ रुपये एवढ्या वाजवी दराला मिळत आहे.
टीप – बातमीत दिलेले तिकीट दर दिनांक 24 मे रोजी चेक करण्यात आले आहेत . विमानसेवेच्या तिकिटांचे दर काही बाबींवर अवलंबून असून ते अस्थिर असतात याची कृपया नोंद घ्यावी
Block "ad1" not found
Facebook Comments Box






