मध्य रेल्वेची सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठी भेट; मुंबई-मडगाव आणि मुंबई-नागपूर दरम्यान ८ विशेष गाड्या जाहीर
मुंबई:
ऐन सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात कोकण आणि विदर्भाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते मडगाव आणि मुंबई ते नागपूर या दोन प्रमुख मार्गांवर ८ साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग आणि सर्व थांब्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
१) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एलटीटी ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
गाडी क्रमांक ०१०२९ (एलटीटी ते मडगाव):
ही गाडी ०२ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ०४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. (एकूण २ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१०३० (मडगाव ते एलटीटी):
ही गाडी ०२ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ०४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी मडगाव येथून दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता पोहोचेल. (एकूण २ फेऱ्या)
मार्ग आणि थांबे:
> लोकमान्य टिळक टर्मिनस (आरंभ/शेवट) ➔ ठाणे ➔ पनवेल ➔ पेण ➔ रोहा ➔ माणगाव ➔ वीर ➔ खेड ➔ चिपळूण ➔ सावर्डी ➔ संगमेश्वर रोड ➔ रत्नगिरी ➔ अडावली ➔ राजापूर रोड ➔ वैभववाडी रोड ➔ कणकवली ➔ सिंधुदुर्ग ➔ कुडाळ ➔ सावंतवाडी रोड ➔ थिवि ➔ करमळी ➔ मडगाव (शेवट/आरंभ).
२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – CSMT साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (४ फेऱ्या)
विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सीएसएमटी ते नागपूर दरम्यान सुपरफास्ट विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक ०२१४१ (CSMT ते नागपूर):
ही गाडी ०२ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ०४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री ००:२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी १५:३५ वाजता पोहोचेल. (एकूण २ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०२१४२ (नागपूर ते CSMT):
ही गाडी ०२ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ०४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी नागपूर येथून सायंकाळी १६:५० वाजता सुटेल आणि CSMT येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:२० वाजता पोहोचेल. (एकूण २ फेऱ्या)
मार्ग आणि र्थांबे:
> छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (आरंभ/शेवट) ➔ दादर ➔ ठाणे ➔ कल्याण ➔ इगतपुरी (केवळ गाडी क्र. ०२१४२ साठी) ➔ नाशिक रोड ➔ मनमाड ➔ जळगाव ➔ भुसावळ ➔ मलकापूर ➔ शेगाव ➔ अकोला ➔ मूर्तिजापूर ➔ बडनेरा ➔ धामणगाव ➔ वर्धा ➔ नागपूर (शेवट/आरंभ).
डब्यांची रचना (Coach Composition)
या सर्व विशेष गाड्यांना २२ डबे जोडण्यात येणार आहेत:
* ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी (3AC)
* ११ शयनयान श्रेणी (Sleeper Class)
* ५ सामान्य द्वितीय श्रेणी (General Unreserved)
* २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन (SLRD)
आरक्षणाची माहिती आणि ॲप्स
आरक्षण सुरुवात: गाडी क्रमांक ०१०२९, ०२१४१ आणि ०२१४२ साठीचे विशेष बुकिंग ०१ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व पीआरएस (PRS) संगणकीय केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
अनारक्षित तिकिटे: सामान्य प्रवासासाठीची तिकिटे युटीएस (UTS) प्रणाली तसेच ‘RailOne’ ॲपद्वारे आरक्षित करता येतील.
वेळापत्रक तपासण्यासाठी: गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा मोबाईलमध्ये NTES ॲप डाऊनलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


