गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये मोठी कारवाई; बेवारस बॅगेतून १०० दारूच्या बाटल्या जप्त

   Follow us on        

रेल्वेगाड्यांमधून होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून सातत्याने विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून रत्नागिरी रेल्वे स्थानकात आरपीएफच्या पथकाने मोठी यशस्वी कारवाई करून अवैध दारूचा साठा हस्तगत केला आहे.

​३० सप्टेंबर रोजी गाडी क्रमांक १२४४९ गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर पोहोचली. त्या वेळी नेहमीच्या तपासणीनुसार सुरक्षारक्षक सर्व डब्यांची पाहणी करत असताना इंजिनमागील दुसऱ्या सामान्य (जनरल) डब्यात त्यांना एक संशयास्पद पिशवी दिसून आली.

​त्या प्रवाशांच्या डब्यात असलेल्या लोकांकडे या बेवारस पिशवीबद्दल चौकशी करण्यात आली, मात्र कोणीही त्यावर स्वतःचा हक्क सांगितला नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरपीएफच्या जवानांनी तात्काळ ती पिशवी आपल्या ताब्यात घेतली आणि रत्नागिरी आरपीएफ ठाण्यात आणली.

​ठाण्यात पंचांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत पिशवी उघडून तपासण्यात आली. त्या वेळी त्यात गोवा निर्मित दारूच्या १०० लहान बाटल्या व्यवस्थित ठेवलेल्या आढळल्या. अधिकाऱ्यांनी सर्व नियमांचे पालन करून या दारूच्या साठ्याचा पंचनामा पूर्ण केला.

​जप्त करण्यात आलेला हा सर्व दारूचा साठा पुढील चौकशी व कायदेशीर प्रक्रियेसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी शहर शाखेकडे सुपूर्द केला जाणार आहे. सहाय्यक उपनिरीक्षक अशोक आर्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने ही मोहीम फत्ते केली.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search