खाकीतील माणुसकी! नातेवाइकांनी फिरवली पाठ; देवगड पोलिसांनी केला तरुणावर अंत्यसंस्कार

   Follow us on        

आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या माणसांची साथ मिळावी अशी अपेक्षा असते, मात्र देवगड परिसरात नातेवाइकांनी पाठ फिरवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चांदोशी येथे मृत तरुणाची ओळख पटवून नातेवाइकांना माहिती देऊनही अंत्यसंस्कारासाठी कोणीही उपस्थित राहिले नाही.

​बुधवारी सकाळी चांदोशी येथील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये एक तरुण निपचित पडलेला आढळला. स्थानिक नागरिक सतीश जाधव व पोलीस पाटलांच्या मदतीने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

​सोशल मीडिया मोहिमेद्वारे मृत तरुणाचे नाव दीपक परब असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली.

​मात्र अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांपैकी कोणीही न आल्याने देवगड पोलिसांनी स्वतः जबाबदारी स्वीकारली. पोलिसांनी देवगड स्मशानभूमीत त्या तरुणाच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंतिम संस्कार पार पाडले.

​पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने हे सामाजिक कर्तव्य बजावले. रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे दाखवून देत पोलिसांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search