राजापूर : सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आलेले असताना फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचे आगमन झाले असून मूळ प्रवाह प्रवाहित झाला आहे.
सध्या स्थानिकांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आहे. अजून अडीच महिने कसे काढायचे हा प्रश्न तमाम कोकणवासीयांसमोर असतानाच राजापूर उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगामाईचे आज 24 मार्च 2024 रोजी सकाळी आगमन झाले आहे.
मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले आहे, यातील काही कुंडे फुल भरले आहेत. पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकनां दिलासा देणारा आहे.आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद घेता येणार आहे
नवी दिल्ली;भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाचवी यादी यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्राच्या ३ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. या उमेदवारांची नवे खालीलप्रमाणे
२) श्री. अशोक महादेव राव नेते ( गडचिरोली-चिमूर अजजा)
३) श्री. राम सातपुते (सोलापूर अजा)
राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर
भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे. सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते लढणार आहेत.
BJP releases 5th list of candidates for the upcoming Lok Sabha elections.
Nityanand Rai to contest from Ujiarpur. Giriraj Singh from Begusarai. Ravi Shankar Prasad from Patna Sahib. Kangana Ranaut from Mandi. Naveen Jindal from Kurukshetra. Sita Soren from Dumka. Jagadish… pic.twitter.com/xQOR2BDpA0
Loksabha Election 2024 : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी माहिती समोर आली आहे. मनसे निवडणूक लढवत नसली तरीही ती युतीचा भाग असणार आहे. मनसेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्यात येतील असे ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.
मनसे महायुतीत सामील होणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले होते. मनसेला युतीत दोन जागा दिल्या जातील अशी चर्चा होत होती. दक्षिण मुंबई आणि शिर्डी मतदारसंघ मनसेला मिळणार असे बोलले जात होते. आता मात्र मनसे या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे समोर आले आहे. परंतु मनसे या निवडणुकीत महायुतीचाच भाग राहणार असून महायुतीच्या उमेदवारांना सर्वोतपरी सहकार्य करणार आहे. या बदल्यात मनसेला विधान परिषदेच्या दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
Savarkar Contribution’s for Marathi Language :स्वात्रंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट कालच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्याचे देश प्रेम, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गोष्टी आताच्या प्रेक्षकवर्गाला चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या शिवाय अजून एक महत्वाची गोष्ट जी अनेकांना माहितीही नसेल ती म्हणजे त्यांचे मराठी प्रेम आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेले शेकडो शब्द.
सावरकरांनी दिलेले हे शब्द त्यांच्याकडून मरठी भाषेला दिलेलं एक गिफ्ट्च आहे..
कारण मराठी भाषेची व्याप्ती ही वेळीच वाढविणे खूप गरजेचे आहे हे सावरकरांनी आधीच ओळखले होते..त्यामुळे रोजच्या वापरात असे काही शब्द होते की जे उर्दू,हिंदी याची सरमिसळ असणारे शब्द होते.. त्यामुळे मराठी भाषेचे सौंदर्य खुलवायचे असेल तर त्या भाषेला साजेशी अशी शब्दरचना असायला हवी ही सावरकरांची इचछा होती.
सर्वसामान्य माणसाच्या संवादाचे माध्यम असणारी आपली ही सुंदर भाषा जर त्याच शैलीत बोलल्या गेली नाही तर त्याचे सौंदर्य हे खुलत नाही असे सावरकरांचे म्हणणे होते..अनेक इंग्रजी शब्द आपण आजही मराठी भाषेत वापरतो हे सावरकरांना मान्य नव्हतं.. आणि त्यातूनच त्यांनी अशी काही मराठी शब्दरचना केली की जी आजही आपण वापरतो..
दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
वेतन (पगार)
असे शेकडो शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिले आहेत. असं असलं तरी, परभाषेबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. फक्त कुठलीही भाषा शुद्ध असावी, इतकंच त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला. मराठी भाषेतलं त्यांचं हे योगदान निश्चितच अतुलनीय आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या भाषाशुद्धीची आजही खरंच गरज आहे.
Loksabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर एक महत्वाची बैठक काही वेळातच होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे आणि इतर काही नेते वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. बैठक झाल्यावर काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या उरलेल्या जागेंच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या कालच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर आज मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महायुतीच्या नेत्यांची मुंबईत आज पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक जागावाटपासाठी अंतिम असल्याचं मानलं जात आहे. या बैठकीत दोन-तीन जागांच्या आदलाबदलीवर चर्चा होणार आहे. बैठक लवकर झाली तर आजच पत्रकार परिषद घेऊन युतीचा फॉर्म्युला जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. बैठकीला उशीर झाला तर घोषणा उद्या जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
Railway News: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी जूनपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा तब्ब्ल १२०० अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणारी ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या मार्च अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने या गाडीच्या एकूण ५४ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक ०३ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक ०४ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
सावंतवाडी, दि. २३ मार्च :शहराच्या पर्यटन वाढीसाठी नरेंद्र डोंगरावर सुरू केलेली जंगल सफारी दिनांक ३१ मार्च पर्यंत मोफत करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
या सफारीच्या उद्घाटन प्रसंगी पर्यटकांना ही सेवा दिनांक ३१ मार्चपर्यंत मोफत देण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सफारी आता मोफत सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आली आहे.
आशिष सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री केसरकर यांनी एका कार्यक्रमात ही सफर मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्या ठिकाणी वन विभागाकडून लहान मुलांसाठी ५० रुपये तर मोठ्यांसाठी १०० रुपये असा दर आकारण्यात आला होता. त्यानंतर ४ दिवस पैसे घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याची दखल केसरकर यांच्याकडून घेण्यात आली असून, ही सफारी मोफत देण्यात यावी, अशा सूचना त्यांच्याकडून वन विभाग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोफत सफर सुरू केली असून, या सफारीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे
Nagpur Goa Highway Updates:सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाकडून 7 मार्च 2024 रोजी अधिसूचना काढण्यात आली असून त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांच्या हरकती, आक्षेप 21 दिवसात अर्जाद्वारे लिखित स्वरूपात कारणासह कळविणेबाबत नमूद केले आहे. या अधिसुचनेनुसार, शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे वतीने सांगोला तालुक्यातील १३ गावांतील शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांनी बुधवारी हरकती व आक्षेप अर्ज व मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी मंगळवेढा यांना देण्यात आले. महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.
बाधित शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रमुख एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनीमधून महामार्ग गेला आहे. कुटुंब वाढीमुळे एकराच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब भूमिहीन होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या 6 ऑक्टोबर 2021 रोजीचे मोबदल्या बाबतच्या परिपत्रकेनुसार गुणांक एक नुसार मोबदला मिळणार आहे व तोही रेडीरेकनरनुसार त्यामुळे आमची एक एकर जमीन घेवूनही शासन मोबदल्यात एक गुंठा पण जमीन मिळणार नाही. यामुळे बाधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.
शक्तिपीठ महामार्गांचे भूसंपादन अधिनियम 1955 नुसार सार्वजनिक हितार्थ म्हणून सक्तीने करणार असल्याचे नमूद केले आहे, त्यामुळे बाधीत क्षेत्राचे मूल्यांकन करीत असताना शेतकऱ्यांच्या बरोबर खासगी वाटाघाटी करून थेट खरेदी ने एकसमान सरसकट कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला, जिथे एमआयडीसी झोन व महानगरपालिका क्षेत्र असेल तिथे कमीत – कमी चार कोटी रुपये द्यावा आणि मगच सार्वजनिक हितार्थ महामार्ग करावा अशी मागणी महामार्ग बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरीसह राज्यातील विविध ठिकाणाहून नागरिक आता मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध शहराच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. मात्र शहराकडील हे स्थलांतर वेळीच थांबणे शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे. यासाठी कोकणातील तरुणांनी आपल्या गावाकडे लक्ष देऊन आधुनिक शेतीकडे लक्ष दयायला हवे. विविध जोडधंदे करुन स्वःतासह कुटूंबाचा विकास साधायला हवा.
कोकणात छोटी-मोठी गांव, वाड्या आहेत. परंतु अशा ठिकाणी केवळ वयोवृद्ध आजी-आजोबा व क्वचित तरुणवर्ग दिसतो. बहुसंख्य घरे ही कुलूपबंद आहेत. तर शेती ओसाड पडली आहे. साहजिकच रोजगार नसल्याने तरुणवर्ग हा छोटी- मोठी नोकरी करण्यासाठी शहराकडे वळत आहे. गणेशोत्सव, होळी, दसरा, जत्रा असे पारंपारिक सण आले तरच हा तरुणवर्ग गावाकडे हजेरी लावतो. एरवी सगळीकडे शांतताच-शांतता पसरलेली असते. हे सर्व भयानक आहे, काही वर्षांत ही गावे स्मशानागत बनायला वेळ लागणार नाही.म्हणून कोकणातील तरुण-तरुणी यांनी खेड्यापाड्यातच राहून करण्या योग्य स्वंयरोजगार करुन समृद्ध कोकण बनविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
गावे, गावातील शाळा बंद होत आहेत. हे सर्व का घडतंय? कारण रोजगार नाही, शेती आहे पण चांगले पीक नाही. वर्षभर पुरेल इतके उत्पन्न नाही, मुलांना चांगले शिक्षण नाही, वैद्यकीय उपचार पुरेसे नाही, असे बरेच प्रश्न नागरिकांच्या मनात भेडसावत आहेत.
किंबहुना या भागामध्ये शेती करायला कोणी तयार होत नाही, शेती करावी तर मुबलक पाण्याचा साठा नाही, शेतीविषयक मार्गदर्शक नाही, शेती करण्यास शासनाकडून कोणतीच मदत नाही, मजूर मिळत नाही, शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत, रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे, असे अनेक प्रश्न पदरात पडलेली आहेत. त्यामुळे ना-इलाजाने स्थानिक नागरिकांना शहराची वाट धरावी लागत आहे. पण भविष्यात असेच होत राहिले तर गाव ओस पडतील.
चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळत नाही म्हणून भुमिपुत्र आपली शेती, जागा कवडीमोल किंमतीत विकून मोकळे होतील. पण याचा फायदा परप्रातियांना होईल. सर्वांत धक्कादायक म्हणजे भुमिपुत्र आज परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यातून बाहेरून आलेले लोंढे स्वतःचे व्यवसाय टाकून घर करून बसले आहेत. सरकार कोणाचेही असो, कायम या ठिकाणी दुर्लक्ष झालेला आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं ; पण या पुढे सर्व प्रश्नाची दखल घेऊन काळजीने लक्ष दिले पाहिजे.
जेवढ्याही शासकीय योजना असतील त्या लोकांसमोर आणून लोकांपर्यंत खेड्या-पाड्यात पोहचवाव्यात. रुग्णालयात सुविधा देणे यावर विशेष भर दिले पाहिजे. विशेषतः खेड्यांमध्ये वैद्यकीय उपकेंद्रे जी वाळवी खात बसलेली आहेत, ती पुन्हा चालू करावी, शैक्षणिकदृष्ट्या बळकट करणे गरजेचे आहे. छोटे-मोठे उद्योग आणले पाहिजे, जेणेकरून स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल, पर्यटन स्थळ यांचा विकास करणे गरजेचे आहे, पर्यटकांची वाढलेली गर्दी ही स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो. “तुज आहे तुझ्या पाशी पण वेड्या तु जागा चुकलाशी” या प्रमाणेच कोकण भुमिपुत्रचे झाले आहे. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यामधील गावा-गावात, वाडी-वाडीपर्यंत नागरिकांना भेडसावणार्या प्रश्नांवर सरकारने, सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन, येथील जनतेच्या हितासाठी एकत्रित येऊन, या सर्व अडचणी दूर करणे काळाची गरज आहे. वेळ न दडवता आतापासूनच अंमलबजावणीला सुरुवात व्हायला पाहिजे. नाही तर उद्या उशिर झालेला असेल. अशी परिस्थिती निर्माण झाली तरच शहराकडे जाणारे नागरिक थांबतील व छोटी-मोठी गावे, वाड्या हे सर्व ठिकतील, अन्यथा पुढील येणारा काळ खूप कठीण असेल हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. तेव्हा कोकणातील तरुणांनो जागे व्हा… आपल्या जमिनी न विकता विकसित करा. आपली मानसिकता बदलून योग्य मार्गदर्शन घ्या. स्वंयरोजगारचे हजारो प्रकल्प उभे कसे करता येतील व स्थानिकांना रोजगार कसे उपलब्ध होतील याकडे लक्ष द्या. प्रकल्प उभारणीसाठी योग्य प्रशिक्षण घ्या. निर्माण होणाऱ्या अनेक अडचणी संघटीतपणे सोडण्यासाठी एकत्र या. हापूस आंबा, कृषी उत्पादने, पर्यटन, फलोद्यान, इ. संघटीत मार्केटिंग करा. त्यासाठी व्यावसायिक संघटना निर्माण करा. पुढील १५-२० वर्षांत कोकण जागतिक दर्जाचे आर्थिक विकासाचे केंद्र कसे करता येईल यासाठी प्रमाणिक प्रयत्न करा. कोकणाता नद्या, निसर्ग, धबधबे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विविध तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटकांना आकर्षित करणे होते आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करा. मत्स्योद्योग, शेती, पर्यटन, फलोद्यान इ. क्षेत्रात कोकण जागतिक स्तरावर जाणे सोपे आहे. गरज आहे ती तुमच्या प्रमाणिक प्रयत्नांची. तुम्ही कोकण भुमिपुत्र आहात… भुमिपुत्र राहा… नाही तर उद्या आपल्याला आपल्याच गावात… वाडीत पाहुणे व्हावे लागेल. तेव्हा तरुण-तरुणींनो पुन्हा खेड्याकडे चला…आधुनिक शेती, व्यवसाय, स्वयंरोजगार करा. आपले कोकण समृद्ध करा.
Loksabha Election 2024|लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अजून जाहीर करण्यात आला नसून हा विषय महायुतीसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरणभैय्या सामंत ही दोन नाव प्रामुख्याने या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. आज भाजपची महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या जागेसाठी दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आजतरी या ही उत्सुकता संपणार अशी आशा निर्माण झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जनसंपर्क मोठा आहे. सर्वपक्षीय असलेले राणे यांचे संबंध, राणे यांची काहीशी आक्रमक शैली, तसेच राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले निलेश राणे याच मतदारसंघात यापूर्वी खासदार राहिले आहेत. त्यांचाही संपर्क आजवर या मतदारसंघात कायम राहिला आहे. या नारायण राणे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.
शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू असलेले किरण भैय्या सावंत हे शासनाच्या रत्न सिंधू योजनेचे सदस्य आहेत. त्यांनी गेले काही महिने लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी संपर्क सुरू केला आहे. इतकेच नाही तर उदय सामंत यांच्या यशस्वी कारकिर्दीमागे आणि उदय सामंत यांच्या प्रत्येक निवडणुकीत किरणभैय्या सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ही दोन वेळा भेट घेत किरण सामंत यांनी आशीर्वाद घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नारायण राणे यांच्या ऐवजी किरणभैय्या सामंत यांना मिळू शकते.
दिपक केसरकर यांचे विधान चर्चेत..
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी आंगणेवाडी यात्रेच्या दरम्यान माध्यमांजवळ बोलताना मोठे वक्तव्य केलं होतं. महायुती जेव्हा मजबूत आहे त्यावेळेला कोण कोणाच्या चिन्हावर लढलं याला फार महत्त्व नसतं, कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला पालघरची सीट शिवसेनेला दिली त्यावेळेला भाजपने आपला उमेदवार सुद्धा दिला होता, त्यामुळे जिथे जे चिन्ह चालतं आणि निवडून येण्याची शक्यता अधिक असते तिथे आपला उमेदवार द्यायला कोणताच कमीपणा नसतो, नाहीतर मग युती कशाला म्हणायची? असं मोठे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यामुळे किरणभैय्या सामंत यांना लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, तरी ते भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू शकतात, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.