Author Archives: Kokanai Digital

कोकण किनारपट्टीबाबत सिडकोला दिलेल्या अधिकारांत कपात

मुंबई : ठाणे वगळता पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील ७२० किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरील १ हजार ६३५ गावांच्या नियोजनाचे सिडकोला दिलेले काही अधिकार मागे घेण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू झाल्या आहेत. त्यानुसार या गावातील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे या भागात केवळ नियोजनाचे काम सिडकोला दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य सरकारने गेल्या सोमवारी पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील ७२० किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरील १ हजार ६३५ गावांच्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला देण्याचा निर्णय घेतला होता. या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था नेमण्याचा निर्णय घेत लोकांच्या हरकती सूचनांसाठी याबाबतची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार किनारा नियमन क्षेत्र, कांदळवनांचा विस्तीर्ण पट्टा, अभयारण्य, खार जमिनी, पाणथळींसह पश्चिम घाटातील जैववैविध्याने समृद्ध असलेल्या या संवेदनशील विभागाचा विकास सिडको करणार होती.
कोकण किनारपट्टी पर्यावरणदृष्टया संवेदनशील असून सिडकोला हे नियोजनाचे अधिकार देऊ नयेत अशी भूमिका या भागातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी घेतली होती. त्यानुसार बांधकाम परवानगीचे अधिकार पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुळातच ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका याचे बांधकाम परवानगीचे अधिकार कायम होते. या क्षेत्राबाहेरच्या बांधकामाचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार सिडकोला देण्यात आले होते. आता तेही अधिकार पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात येणार असून केवळ या भागाच्या नियोजनाची आखणी सिडको करेल अशी माहिती नगरविकास विभागातील सूत्रांनी दिली.

Loading

महत्त्वाचे: कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी चालविण्यात येणारी विशेष गाडी रद्द

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यंदा होळीसाठी चालविण्यात येणार्‍या रोहा – चिपळूण मेमू या गाडीच्या फेर्‍या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीच्या दिनांक 15 मार्च ते 30 मार्च पर्यंतच्या सर्व फेर्‍या रद्द करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

रोहा – चिपळूण – रोहा मेमू विशेष ०१५९७/०१५९८ ही गाडी यावर्षी दिनांक ०८ मार्च ते ३० मार्च पर्यंत चालविली जाणार होती. आता ती फक्त १४ मार्च पर्यंत चालविण्यात येणार आहे. त्यानंतर ती रद्द करण्यात येणार आहे.

प्रवासी संघटनांनी केली होती मागणी 

सध्या दिवा ते रोहा दरम्यान चालविण्यात येणार्‍या मेमू गाडी क्रमांक ०१३४७/०१३४८ चा विस्तार करून रोहा चिपळूण ०१५९७/०१५९८ ही गाडी चालविण्यात येणार होती. मात्र या विस्ताराला रोहा रेल्वे प्रवासी महासंघ आणि कोकण विकास समिती या संघटनांनी विरोध दर्शविला होता. कारण सध्या चालविण्यात येणारी दिवा – रोहा अनारक्षित मेमू रोजीरोटीसाठी कित्येक जणांची जिवनवाहिनी बनली आहे. या गाडीचा विस्तार झाल्यामुळे त्याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन गाडी तीन /तीन तास उशिराने धावत आहे. त्यामुळे हा विस्तार रद्द करून रेल्वे प्रशासनाने दादर ते चिपळूण दरम्यान नवीन मेमू गाडी सोडावी अशी मागणी या संघटनांनी केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने ही मागणी अंशतः मान्य केली असून नवीन गाडीची घोषणा अजून केली नाही आहे.

 

 

 

Loading

Megalock on Konkan Railway | सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दोन तास उशिराने सुटणार

Megalock on Konkan Railway : कोकण रेल्वेवर देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त येत्या शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून त्यामुळे इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.

कोकण रेल्वेवर देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत २.३० तासांचा राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत

1)गाडी क्रमांक ५०१०८ मडगाव – सावंतवाडी रोड पॅसेंजर गाडी १.२० तास उशिरा सुटेल.

2)गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस २ तास उशिरा सुटेल.

3)गाडी क्रमांक १०१०४ मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस करमळी – सावंतवाडी रोड दरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येईल.

4)गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी – राजापूर रोड दरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येईल.

5)गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरी – राजापूर दरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Loading

APMC Market | सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून दररोज हापूसच्या १४ हजार पेट्यांची आवक; दर काय आहे?

नवी मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हय़ात दिवसा उन्हाचा ताप जाणवत आहे. त्यामुळे आंबा काढणीयोग्य झालेला आहे. दोन्ही जिल्ह्यांतून दिवसाला १४ हजार पेट्या वाशी बाजार समितीमध्ये पाठविल्या जात आहेत. आवक स्थिर असल्यामुळे पेटीचे दर २ हजारांपासून ५ हजार रुपयांपर्यंत आहेत.
पहिल्या पंधरवड्यात पेट्यांची संख्या कमी होती; मात्र त्यानंतर त्यात वाढ होऊ लागली. मार्चच्या सुरवातीला उन्हाचा कडाका जाणवू लागल्यानंतर फळे तयार होण्याचा वेगही वाढला.
पहिल्या टप्प्यातील उत्पादन मार्चअखेरपर्यंत राहील, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात काही दिवस पेट्यांची संख्या कमी राहील. पुन्हा काही दिवस आंबा मिळेल, पण ते प्रमाणही तुलनेत कमी राहील. गेल्या काही दिवसांत पुन्हा झाडांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामधून प्रत्यक्ष उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस मिळेल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.

Loading

PDF: कोकण किनारपट्टीसाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती; कोणत्या गावांचा विकास होणार? येथे वाचा

मुंबई :राज्याच्या नगरविकास विभागाने एक अधिसूचना जारी करून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी जिल्ह्यांसाठी ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा’ची (सिडको) विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या कोकण प्रदेशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने मासेमारी, सुपारी, नारळ, आंबा आणि काजू तसेच पर्यटनाच्या आर्थिक वाढीवर आधारित आहे. समुद्र किनारे, पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण करताना पर्यटन आणि प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्मिती वाढविण्यास या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्याचबरोबर कोकणातील बंदरांमधून आयात-निर्यात व्यवसाय आणि गेल्या आर्थिक वर्षात ७३ अब्ज डॉलरचा झालेला निर्यात व्यवसाय आणखी वाढवण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा मानस आहे. त्याद्वारे पुढील पाच वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत (पाच लाख कोटी) पोहोचवण्याचे महाराष्ट्र सरकारचे लक्ष्य आहे.
रायगडमधील रेवस आणि सिंधुदुर्गातील पत्रादेवीदरम्यान प्रगतिपथावर असलेला सागरी मार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, केंद्र सरकारच्या धोरणानुरूप या किनारपट्टीत विकसित होणारी नवनवीन बंदरे व पर्यायाने मुंबई तसेच सभोवतालच्या राज्यांशी या क्षेत्राची वाढत असलेली दळणवळण व्यवस्था आदी प्रकल्प कोकणच्या विकासाला चालना देणारे आहेत.
पर्यटन, फलोत्पादन आणि मासेमारी ही तिन्ही क्षेत्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून राज्याच्या आर्थिक विकासास हातभार लागणार आहे. अशा नैसर्गिक वरदान लाभलेल्या, तसेच सृष्टी सौंदर्याने नटलेल्या एकजिनसी वर्णाच्या क्षेत्राचा एकात्मिक विकास साध्य करून हे क्षेत्र जागतिक दर्जाचे एक नामांकित गंतव्य स्थान म्हणून नावारूपास आणण्याचा सरकारचा मानस आहे.
अधिसूचना वाचण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा

Loading

Sindhudurg | देवगड तालुक्यातील पडेल गावात सापडली पुरातन काळातील मूर्ती

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ नळपाणी योजनेच्या खुदाई कामादरम्यान देवीची मूर्ती सापडली.जलजीवन मिशन योजने अंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम सुरु असताना ही मुर्ती सापडली आहे. मूर्तीची उंची 3 फुटाच्या आसपास असून डाव्या हातात शंख,उजव्या हातात गदा आहे, उजव्या पायाशी गरुड असून डाव्या बाजूला लक्ष्मी देवी आहे.
पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती खोदाईच्या दरम्यान सापडली आहे. ही देवीची मूर्ती सापडताच शंकरेश्वर मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीय, पडेल सरपंच भूषण पोकळे व गावातील ग्रामस्थांनी देवीची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली. ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीयांनी दिली आहे. शंकराचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे. हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Loading

Vande Bharat Sleeper | रेल्वेमंत्र्यांनी केले वंदे भारत स्लीपरच्या कारबॉडीचे उद्घाटन; सुविधांच्या बाबतीत ठरणार राजधानी एक्सप्रेसपेक्षाही सरस

Vande Bharat Sleeper Train: भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेस स्लीपर गाडीचे उत्पादन सुरू केले आहे. ही गाडी प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करतीलच आणि  प्रवाशांना आराम आणि सुविधा देतील .उत्तम बर्थ, सेन्सर-आधारित प्रकाश आणि सुधारित रात्रीची प्रकाशयोजना अशा एकूण १० वैशिष्ट्यांसह ही गाडी  राजधानी एक्स्प्रेस गाड्यांच्या मानकांना मागे टाकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी (9 मार्च) बंगळुरूमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनसेटच्या कारबॉडी स्ट्रक्चरचे उद्घाटन केले. हा ट्रेनसेट भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) ने त्यांच्या बंगळुरू येथील रेल्वे युनिटमध्ये तयार केला आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वंदे भारत स्लीपरमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करण्यात आले आहेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन बर्थच्या दरम्यान योग्य उंची देता यावी यासाठी खास छताची रचना करण्यात आली आहे. वातानुकूलन सुधारले आहे.
याशिवाय ट्रेनमध्ये व्हायरस नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. जी 99.99% व्हायरस नष्ट करेल. ट्रेनमध्ये कोणतेही धक्के, आवाज आणि कंपन होणार नाहीत. कारबॉडी पूर्ण आहे. आता फर्निशिंग करायची आहे, त्यानंतर लवकरच ट्रेन सुरू होईल.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग ताशी 160 किमी असेल
स्लीपर वंदे भारत हे कंसोर्टियम म्हणजेच दोन कंपन्यांनी मिळून बांधले आहे. यामध्ये रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) आणि रशियाच्या TMH समूहाचा समावेश आहे. या संघाने 200 पैकी 120 स्लीपर वंदे भारत चालवण्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती. उर्वरित 80 गाड्या टिटागड वॅगन्स आणि भेल यांच्या संघाद्वारे पुरवल्या जातील.
RVNL GM (मेकॅनिकल) आलोक कुमार मिश्रा यांनी ऑगस्ट 2023 मध्ये सांगितले होते की वंदे भारत स्लीपर ट्रेनचा वेग ताशी 160 किमी असेल. यात 11 एसी3, चार एसी2 आणि एक एसी1 कोच असे 16 डबे असतील. ते म्हणाले की, कोचची संख्या 20 किंवा 24 पर्यंत वाढवता येऊ शकते.

Loading

Shaktipeeth Expressway Updates | भूसंपादन करण्यासाठी सर्व तालुक्यांतून अधिकारी नियुक्त; राजपत्र जारी

Shaktipeeth Expressway Updates: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रीयेच्या हालचालींना सुरवात झाली आहे. हा महामार्ग जात असलेल्या तालुक्यांसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे राजपत्र गुरुवारी जारी करण्यात आले आहे.
संपूर्ण महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस एकूण २७ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ५ विभागातून ५ विभागीय आयुक्तांची लवाद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांतील भूसंपादनासाठी सावंतवाडीचे उप विभागाचे उपविभागीय अधिकारी काम पाहतील. ७ मार्च पासून त्यांची नियुक्ती झाल्याचे या राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महामार्गाची संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. शासनाने निर्धारित केलेल्या गुणांकनानुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाईल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लवाद म्हणून कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.
राजपत्र Gazette वाचण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा
Gazette

Loading

Mumbai Goa Highway | प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे परशुराम घाटात निर्माण झाला खतरनाक स्पॉट; अपघाताची दाट शक्यता

Mumbai Goa Highway | मुंबई गोवा महामार्ग हा कोकणवासियांचे अवघड जागेचे दुखणे होऊन बसला आहे. १३/१४ वर्षे रखडलेला हा महामार्ग पूर्ण होण्याचे नावच घेत नाही आहे. त्यात  महामार्गाचे करण्यात येत असणारे सुमार काम आणि घेतली जाणारा निष्काळजीपणाची स्थिती अधिक गंभीर बनवत आहेत. या मार्गावर काही ठिकाणी केलेल्या चुकांमुळे ती ठिकाणे अपघातप्रवण क्षेत्रे बनली आहेत. जनआक्रोश समितीचे अजय यादव यांनी परशुराम घाटातील असाच एक स्पॉट जिथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तो समाज माध्यमाच्या साहाय्याने निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट नुसार ते म्हणत आहेत …. 
कोकण हायवेवर अपघात का होत आहेत अथवा कसा होवू शकतो याचा अतिशय उत्तम नमुना म्हणजे हा खतरनाक स्पॉट परशुराम घाटात… राम भरोसे कारभार! घाट उतरताना एका ब्लाइंड स्पॉटवरच चक्क डायवर्जन दिलं आहे. काय विचार करून ही लोक काम करत आहेत? लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.
परशुराम घाटात गाडी सांभाळून चालवा खासकरून घाट उतरताना… Diversion चे क्लिअर सूचना देणारे कोणतही फलक नसल्याने अश्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आपणच काळजी घ्या भावांनो…
या संदर्भात पुढे जावून मी पोलिसांच्या चौकीवर ही गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्यांनी त्वरित मान्य करून त्या संबंधित कल्याण टोल कॉन्ट्रॅक्टरचा माणूस ला फोन लावून माझ्याशी बोलणे करून दिले. मी त्यांना सदर कल्पना दिली. यावर त्यांनी हे काम माझ्या अखत्यारीत येत नसून ईगल कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर सोबत बोला असे सांगितले. त्यांनी तसे केले आहे. आता यावर अधिक काय बोलावे मला सुचत नाही. पण याला तिथली प्रशासन व्यवस्था जबाबदार इतके मला कळले. तूर्तास तुम्ही या रस्त्याने जाणाऱ्या मंडळींनी काळजी घ्या. उद्या परत चेक करतो काय परिस्थिती आहे. त्यानुसार काय ॲक्शन घेता येईल पाहतो…

 

 

Loading

Konkan Railway | मध्य रेल्वे तर्फे होळीसाठी विशेष गाड्यांची खैरात; ८ गाड्यांच्या एकूण ६८ फेऱ्या

Konakn Railway News: यंदा उशिरा का होईना मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. एक/ दोन नव्हे तर मुंबई, पुण्याहून एकूण 8 गाड्या यंदा होळीसाठी विशेष गाड्या म्हणुन चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये रोहा चिपळूण या अनारक्षित मेमू गाडीचा देखील समावेश आहे. त्याच प्रमाणे पुणे – सावंतवाडी, पुणे – थिवी या दोन विशेष गाड्यांमुळे पुणे स्थायिक चाकरमान्यांची मोठी सोय झाली आहे.

१) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ११८७/११८८

गाडी क्र. ०११८७ एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष 

ही गाडी गुरूवार दि.१४ मार्च,२१ मार्च व २८ मार्च २०२४ ला मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री.१०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर  दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०११८८  थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष

 परतीच्या प्रवासात थिविवरून शुक्रवार दि.१५ मार्च,२२ मार्च व २९ मार्च रोजी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी  पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल

थांबे

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, या स्थानकावर थांबेल.

डब्यांची संरचना

एकूण २० एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०१

 

2) पुणे जं. – सावंतवाडी –  पुणे जं. साप्ताहिक विशेष ०१४४१/०१४४२

गाडी क्र. ०१४४१  पुणे जं. – सावंतवाडी  साप्ताहिक विशेष

ही गाडी मंगळवार दि.१२ मार्च,१९ मार्च व २६ मार्च २०२४ या दिवशी  पुणे जं. या स्थानकावरून सकाळी ०९:३५  वाजता सुटेल ती सावंतवाडी स्थानकावर रात्री १०:३० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०१४४२ सावंतवाडी – पुणे जं. साप्ताहिक विशेष

ही गाडी बुधवार दि.१३ मार्च,२० मार्च व २७ मार्च २०२४ या दिवशी  सावंतवाडी या स्थानकावरून रात्री ११:२५ वाजता सुटेल ती पुणे जं. स्थानकावर दुसऱ्या दिवशी  दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल.

थांबे

ही गाडी लोणावळा, खंडाळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड,  कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकावर थांबेल.

डब्यांची संरचना

एकूण २० एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०१

 

3) सावंतवाडी –  पनवेल – सावंतवाडी  साप्ताहिक विशेष ०१४४४/०१४४३

गाडी क्र. ०१४४४  सावंतवाडी –  पनवेल  साप्ताहिक विशेष

ही गाडी मंगळवार दि.१२ मार्च,१९ मार्च व २६ मार्च २०२४ या दिवशी  सावंतवाडी रोड या स्थानकावरून रात्री  २३:२५ वाजता सुटेल ती पनवेल स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी  ०८:४० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०१४४३ पनवेल – सावंतवाडी  साप्ताहिक विशेष

ही गाडी बुधवार दि.१३ मार्च,२० मार्च व २७ मार्च २०२४ या दिवशी  पनवेल या स्थानकावरून सकाळी ०९:४० वाजता सुटेल ती सावंतवाडी स्थानकावर त्याच दिवशी रात्री ०८:०५ वाजता पोहोचेल.

थांबे

ही गाडी रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड,  कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकावर थांबेल.

डब्यांची संरचना

एकूण २० एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०१

 

4) एलटीटी –  थिवी  – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११०७/०११०८

गाडी क्र. ०११०७  एलटीटी –  थिवी  साप्ताहिक विशेष

ही गाडी शुक्रवार दि.१५ मार्च,२२ मार्च व २९ मार्च २०२४ या दिवशी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून रात्री  १०:१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:५० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०११०८ थिवी – एलटीटी  साप्ताहिक विशेष

ही गाडी रविवार दि.१७ मार्च,२४ मार्च व ३१ मार्च २०२४ या दिवशी थिवी या स्थानकावरून सकाळी ११:०० वाजता सुटेल ती मुंबई एलटीटी स्थानकावर त्याच दिवशी रात्री ११:५५ वाजता पोहोचेल.

थांबे

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, या स्थानकावर थांबेल.

डब्यांची संरचना

एकूण १८ कोच: फर्स्ट एसी -०१, संयुक्त (फर्स्ट एसी + टू टायर एसी) – ०१, टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५ , जनरल – ०८, एसएलआर   – ०२

 

5) थिवी – पनवेल – थिवी  साप्ताहिक विशेष ०१११० /०११०९ 

गाडी क्र. ०१११० थिवी – पनवेल  साप्ताहिक विशेष

ही गाडी शुक्रवार दि.१६ मार्च,२३  मार्च व ३० मार्च २०२४ या दिवशी थिवी या स्थानकावरून सकाळी ११:०० वाजता सुटेल ती पनवेल स्थानकावर त्याच दिवशी रात्री  १०:१५ वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०११०९ पनवेल – थिवी  साप्ताहिक विशेष

ही गाडी शुक्रवार दि.१६ मार्च,२३ मार्च व ३० मार्च २०२४ या दिवशी पनवेल या स्थानकावरून रात्री ११:५५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी  ०९:५० वाजता पोहोचेल.

थांबे

ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची संरचना

एकूण १८ कोच: फर्स्ट एसी -०१, संयुक्त (फर्स्ट एसी + टू टायर एसी) – ०१, टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५ , जनरल – ०८, एसएलआर   – ०२

 

6) पुणे  – थिवी – पुणे  साप्ताहिक विशेष ०१४४५/०१४४६

गाडी क्र. ०१४४५ पुणे – थिवी साप्ताहिक विशेष

ही गाडी शुक्रवार दि.०८ मार्च,१५ मार्च, २२ आणि २९ मार्च २०२४ या दिवशी पुणे या स्थानकावरून संध्याकाळी १८:४५  वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०१४४६ थिवी – पुणे साप्ताहिक विशेष

ही गाडी रविवार दि.१० मार्च,१७ मार्च, २४ आणि ३१  मार्च २०२४ या दिवशी थिवी या स्थानकावरून सकाळी  ०९:४५ वाजता सुटेल ती पुणे स्थानकावर त्याच दिवशी रात्री ११:५५ वाजता पोहोचेल.

थांबे

ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची संरचना

एकूण २२ कोच: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४, स्लीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर   – ०२

 

7) थिवी – पनवेल – साप्ताहिक विशेष ०१४४८/०१४४७   

गाडी क्र. ०१४४८ थिवी – पनवेल साप्ताहिक विशेष

ही गाडी शनिवार दि.०९ मार्च,१६ मार्च, २३ आणि ३० मार्च २०२४ या दिवशी थिवी या स्थानकावरून सकाळी  ०९:४५ वाजता सुटेल ती पनवेल स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी रात्री ९ वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०१४४७ पनवेल – थिवी साप्ताहिक विशेष

ही गाडी शनिवार दि.०९ मार्च,१६ मार्च, २३ आणि ३० मार्च २०२४ या दिवशी पनवेल या स्थानकावरून रात्री १० वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी  ०८:३०  वाजता पोहोचेल.

थांबे

ही गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची संरचना

एकूण २२ कोच: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४, स्लीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर   – ०२

 

8) रोहा – चिपळूण – रोहा मेमू विशेष ०१५९७/०१५९८

गाडी क्र. ०१५९७ रोहा – चिपळूण  मेमू विशेष 

ही गाडी शनिवार दि.०८,०९,११,१५,१६,१८,२२,२३,२५,२९,३० मार्च २०२४ या दिवशी रोहा  या स्थानकावरून सकाळी ११:०५ वाजता सुटेल ती चिपळूण स्थानकावर त्याच दिवशी दुपारी रात्री १३:३० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ०१५९८ चिपळूण- रोहा   मेमू विशेष 

ही गाडी शनिवार दि.०८,०९,११,१५,१६,१८,२२,२३,२५,२९,३० मार्च २०२४ या दिवशी चिपळूण या स्थानकावरून सकाळी १३:४५  वाजता सुटेल ती रोहा स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी १६:१० वाजता पोहोचेल.

थांबे

ही गाडी कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे,दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक,  अंजनी या स्थानकांवर थांबे

डब्यांची संरचना

एकूण ८ मेमू कोच

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search