मुंबई: कोकणात मूळ असलेले ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे आज २४ जुलै रोजी ठाणे येथे निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला होता. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील अशी विविध पात्र त्यांनी साकारली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळी या घटनेनंतर शोक व्यक्त करत आहेत.
०३ मे १९३६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये जन्मलेल्या सावरकरांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्ष बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम पाहिले होते. सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, शिवाय त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. सावरकर ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याकरता त्यांची निवड बिनविरोध झाली होती. त्यांच्या अलीकडच्या काही दिवसांमधील कामाविषयी बोलायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी कांचन आजींच्या भावाची भूमिका साकारली. शिवाय ‘समांतर’ या स्वप्निल जोशीच्या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विषेश गाजली
कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचे सावट असलेल्या भागातील नागरिकांना सतर्कतेच इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. रविवारी पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करत होती. पहाटे तीन वाजता ३९ फूट ही इशारा पातळी पंचगंगेने गाठली. जिल्ह्यातील पाण्याखालील एकूण बंधाऱ्यांची संख्या ८२ इतकी झाली आहे. पुराचे पाणी आल्यामुळे शिवाजी पूल – गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुतारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते आरवली दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या दि. २५ जुलै २०२३ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळच्या ४ वाजेपर्यंत असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक 24 जुलैला प्रवास सुरू होणारी कोईमतुर -जबलपूर 02197 ही विशेष गाडी मडगाव ते संगमेश्वर दरम्यान सुमारे अडीच तास थांबवून ठेवली जाईल.
2)दिनांक 25 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी रोड -दिवा एक्सप्रेस ही गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर दरम्यान २ तास रोखून जाणार आहे.
3)दिनांक 25 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी क्रमांक 10104 मडगाव -मुंबई सी एस एम टी मांडवी एक्सप्रेस रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान एक तास थांबवून ठेवली जाणार आहे.
Mumbai Pune Expressway Landslide |पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. सुदैवाने दरड कोसळली तेव्हा त्यामध्ये कोणतेही वाहन सापडले नाही. दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पोस्ट केले – दिनांक 23 जुलै – 19:30: बचावकार्य थांबवले; ७८ बेपत्ता व्यक्ती मृत घोषित | दुर्घटनेचा सविस्तर अहवाल जाहीर
इर्शाळवाडी दुर्घटनेच्या बचावकार्याचा आज चौथा आणि शेवटचा दिवस होता. आतापर्यंत एकूण २७ जणांचे मृतदेह सापडले असून अंदाजे ७८ जण अजूनही बेपत्ता आहेत. या बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करून बचाव कार्य आज थांबविण्यात आले आहे. घटनस्थळावरील दुर्गंधीमुळे बचावकार्य थांबविल्याचे समजते. या घटनेबाबत सविस्तर अहवाल उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी प्रसिद्ध केला आहे.
या अहवालानुसार या गावात एकूण ४३ कुटुंबे आणि २२९ व्यक्ती राहत होते. त्यातील २७ मयत,७८ बेपत्ता तर ११४ हयात आहेत. एकूण २२ जण जखमी झाले असून १८ जणांना उपचार करून सोडले आहे.
सविस्तर अहवाल पुढीलप्रमाणे
Ad -
मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंडयेथे नोकरीच्या संधी....
पोस्ट केले – दिनांक 22 जुलै – 11:30: शोध मोहिमेचा ३ रा दिवस; अजूनही १०७ जण बेपत्ता असल्याची माहिती
रायगड : इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण अजूनही बेपत्ता असल्यचं सांगण्यात येतंय. ८ जखमींवरमीं एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. प्रशासनाकडून दिवस-रात्र घटनास्थळी काम सुरु आहे. NDRF ची टीम अजूनही ढिगाऱ्याखालील मृतदेह काढण्यात व्यस्त आहे. मुसळधार पावसामुळे यात अडथळे येत आहेत. इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत.
इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.
पोस्ट केले – दिनांक 22 जुलै – 10:30: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनाग्रस्त मुलांचे पालकत्व स्विकारणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त मुलांचे पालकत्व स्विकारणार असण्याचे जाहीर केले आहे. यासंबंधी त्यांनी ट्विटर पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.
ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत. शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे. हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पोस्ट केले – दिनांक 21 जुलै – 18:15: मृतांची संख्या 22 वर पोहोचली
ईर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. कालपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला होता.
आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू केलं.आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले. त्यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.
पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 11:15:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घटनास्थळी भेट; दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगून आश्वस्त केले. तसेच दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना त्यांनी पाच लाख रुपयांची मदत केली जाहीर.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर उपस्थित होते .
पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 10:45: आतापर्यंत 75 जणांचे रेस्क्यू
या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर चालू असून अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. पाऊस असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. आतापर्यंत 75 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 08:00 : दरड कोसळून मोठी दुर्घटना
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहात असल्याची माहिती मिळत आहे.
Weather Forecast Updates: हवामान विभागाने काळ पुढील ५ दिवसांचे पावसाचे भाकीत जाहीर केले असून कोकणासह राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज दिनांक २३ जुलै रोजी मुंबईसह 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज 23 जुलै रोजी कोकणासह काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला असून, यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, यलो अलर्ट दिला गेला आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम राहणार
24, 25 आणि 26 जुलै पर्यंतचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. यात कोकणात मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा दिला गेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. या जिल्ह्यांना तीनही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात मुसळाधर ते मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
Ad -
मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंडयेथे नोकरीच्या संधी....
Specials Trains for Ganesha Festival : यंदा गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कोंकण रेल्वे आणि मध्य रेल्वे गणेशोत्सवादरम्यान अजून काही विशेष फेऱ्या चालविणारआहे, त्यामुळे ज्या चाकरमान्यांना याआधी जाहीर केलेल्या गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटे भेटली नाहीत त्यांना तिकिटे मिळवण्याची एक अजून संधी मिळणार आहे. या विशेष फेऱ्या खालीलप्रमाणे असतील.
१) गाडी क्र. ०९००९ / ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाडे:
गाडी क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाड्याने मुंबई सेंट्रल येथून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार १४/०९/२०२३ ते १८/०९/२०२३ आणि २०/०९/२०२३ ते ३०/०९/२०२३ पर्यंत दुपारी १२.०० वाजता सुटेल. गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ०३.०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाड्याने सावंतवाडी रोडवरून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार १५/०९/२०२३ ते १९/०९/२०२३ आणि २१/०९/२०२३ ते ०१/१०/२०२३ पर्यंत सकाळी ०५.०० वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल
डब्यांची रचना: एकूण २४ कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०४ डबे, SLR – ०२.
२) गाडी क्रमांक ०९०१८/ ०९०१७ उधना – मडगाव जं. – उधना (साप्ताहिक) विशेष भाड्यावर विशेष:
गाडी क्र. ०९०१८ उधना – मडगाव जं. (साप्ताहिक) विशेष भाड्यावर उधना येथून शुक्रवार, 15/09/2023, 22/09/2023 आणि 29/09/2023 रोजी १५:२५ वाजता सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०१७ मडगाव जं. – उधना (साप्ताहिक) विशेष भाड्यावर शनिवार, 16/09/2023, 23/09/2023 आणि 30/09/2023 रोजी सकाळी १०:२० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल ती दुसऱ्या दिवशी उधना येथे सकाळी ०५:०० वाजता पोहोचेल.
डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच = संमिश्र (प्रथम एसी + २ टायर एसी) – ०१ कोच, २ टायर एसी – ०२ कोच, ३ टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०३ डबे, एसएलआर – ०१, कार – ०१ कार.
३) ट्रेन क्र. ०९१५० / ०९१४९ विश्वामित्री – कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष भाड्यावर :
गाडी क्र. ०९१५० विश्वामित्री – कुडाळ साप्ताहिक विशेष भाड्यावर सोमवार, 18/09/2023 आणि 25/09/2023 रोजी सकाळी 10 वाजता विश्वामित्री येथून सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:१० वाजता कुडाळला पोहोचेल.
गाडी क्र. ०९१४९ कुडाळ – विश्वामित्री साप्ताहिक विशेष भाड्यावर कुडाळ येथून मंगळवार, १९/०९/२०२३ आणि २६/०९/२०२३ रोजी सकाळी ०६:३० वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री ०१:०० वाजता विश्वामित्रीला पोहोचेल.
रत्नागिरी :कोकणात पावसाचं थैमान सुरूच आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून परशुराम घाटात चार वेळा दरडी कोसळलेल्या आहेत.अशात घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे वीज व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय, जेसीबी व अन्य यंत्रणादेखील सज्ज ठेवली आहे.
बुधवारी परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्या आधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली. त्या पाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. परशुराम घाटातील वाहतूक दरड बाजूला करेपर्यंत थांबवण्यात आली होती. त्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी चिरणीमार्गाने वाहतूक वळवली होती; मात्र त्यानंतर तातडीने रस्त्यावर आलेले दगड व माती हटवून आधी एकेरी व त्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परशुराम घाटातील दरडीचा धोका टळलेला नाही. त्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घाटातील मध्यवर्ती ठिकाणी दरडीचा मोठा धोका असल्याने तेथे वीज उपलब्ध केली आहे. जेणेकरून रात्री -अपरात्री रस्त्यावर आलेली माती किंवा दगड वाहतूकदारांना सहजपणे दिसावे, असे नियोजन केले आहे. त्याशिवाय दरड हटवण्यासाठी जेसीबी व पोकलेनची व्यवस्था तैनात केली असून, घाटातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे.
रायगड: जिल्ह्यातील पोलादपुर महाबळेश्वर जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे पोलादपुर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. प्रतापगड फाट्यापासून जवळच डोंगरानी छोट्या मोठ्या दगडी रस्त्यावर कोसळल्या आहेत. त्यामुळे सध्या घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून दरड हटवण्याचं काम सुरू आहे.
मुंबई : वरीष्ठ नागरिकांना देण्यात आलेली मोफत एसटी प्रवासाची सुविधा आता दिव्यांगांना पण दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना देखील आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना सरसकट अर्धे तिकीट हे दोन निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले होते, त्यानंतर दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात. त्यामध्ये सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलिया यासारख्या प्रकारांचा समावेश होतो. राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो. याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस मार्फत मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे.