Author Archives: Kokanai Digital
आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 25:10:39 पर्यंत
- नक्षत्र-श्रवण – 23:11:21 पर्यंत
- करण-तैतिल – 13:50:27 पर्यंत, गर – 25:10:39 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-हर्शण – 14:57:30 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07:14
- सूर्यास्त- 18:11
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 09:15:00
- चंद्रास्त- 20:37:59
- ऋतु- शिशिर
- १७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
- १८३९: लुई दागुएरे यांनी चंद्राचा पहिला फोटो प्रदर्शित केला होता.
- १८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.
- १८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
- १९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.
- १९३६: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना
- १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.
- १९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.
- १९५४: राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.
- १९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.
- १९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या
- १९९१: तिरुअनंतपुरम च्या विमानतळाला आंतराष्ट्रीय चा दर्जा देण्यात आला.
- १९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान
- १९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये१४ इंच टर शिकोगामध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -१३°F इतके कमी झाले.
- २०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
- २०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.
- १८७८: भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते मन्नत्तु पद्मनाभन यांचा जन्म.
- १९०५: भारताचे पद्मभूषण पुरस्कार विजेते जैनेंद्र कुमार यांचा जन्म.
- १९०६: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी. एन. खुरोदे यांचा जन्म.
- १९२०: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल १९९२)
- १९३२: हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)
- १९३२: भारतीय चित्रपट निर्माते जॉनी बक्षी यांचा जन्म.
- १९४०: अमेरिकी-भारतीय वैज्ञानिक एस. आर.श्रीनिवास वर्धन यांचा जन्म.
- १९५९: किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि खासदार
- १९६०: रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)
- १९७०: स्विमर बुला चौधरी यांचा जन्म.
- १३१६: अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान (जन्म: ? ? ????)
- १९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)
- १९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल (जन्म: ? ? ????)
- १९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३)
- १९५०: समाज सेविका तसेच स्वातंत्र्य सैनिकांमधील एक डॉ.राधाबाई यांचे निधन.
- १९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.
- १९८८: भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार अन्वर हुसेन यांचे निधन.
- १९८९: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४)
- १९९९: विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
- २००२: अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: ? ? १९४७)
- २०१०: गुजराती कवी राजेंद्र शहा यांचे निधन.
- २०१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.
Mumbai: विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईनच्या अप मार्गावर काल मंगळवारी रेल्वे रुळ वाकल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे विरार चर्चगेट एसी ट्रेनचा जागच्या जागी ब्रेक मारल्यानं वेस्टर्न लाईनवर मोठा अनर्थ टळलाय. ट्रेनचा मोटरमन रुळावर लक्ष ठेवून होता आणि त्याला वाकलेला ट्रॅक दिसताच त्याने गाडी थांबवली. पुढील दुर्घटना होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित कळवले. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. परंतू ट्रॅक नक्की कशामुळे वाकला? याचे नेमके कारण स्पष्ट होऊ न शकल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.
मंगळवारी दुपारी 12.45 ला विरारहून सुटलेली एसी लोकल विरार-नालासोपारा स्थानकादरम्यान आली असता मोटरमनच्या लक्षात वाकलेला रेल्वे रुळ आला. त्याने तत्काळ लोकल थांबवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर मागून येणाऱ्या जनरल लोकललाही थांबवण्यात आले. दोन्ही लोकल थांबल्याने अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून पायी नालासोपारा स्थानक गाठले. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत फास्ट ट्रॅकवरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वाकलेला रुळ पूर्णपणे बदलला, त्यानंतर फास्ट लाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ट्रॅक वाकण्याचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या घटनेमुळे प्रवाशांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप राहिले. त्याच्या वेगवान निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांनी मोटरमनचे आभार मानले असून, त्यांच्या सतर्कतेची प्रशंसा केली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून, ट्रॅक वाकण्याचे कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी रेल्वे ट्रॅकच्या देखभालीवर अधिक भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. मोटरमनच्या निर्णयामुळे एका मोठ्या दुर्घटनेची टांगती तलवार टळली आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाकडून अधिक मजबूत सुरक्षा उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम येथे रविवारी २० हून अधिक वाहने टायर पंक्चर झाल्याने बंद पडली. काही समाजकंटक समृद्धी महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करीत असल्याचा आरोप यानिमित्ताने होत होता. मात्र, हा आरोप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेटाळून लावला आहे. समृद्धी महामार्गावर कोणीही खिळे टाकलेले नाही. समृद्धी महामार्गावर वाशिम येथे रविवारी रात्री एक अतिशय वजनदार पत्रा पडला होता. या लोखंडी पत्र्यावरून वाहने गेल्यामुळे टायर पंक्चर झाल्याचे उघडकीस आले आहे.
आजचे पंचांग
- तिथि-द्वितीया – 26:26:25 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 23:46:54 पर्यंत
- करण-बालव – 14:57:55 पर्यंत, कौलव – 26:26:25 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-व्याघात – 17:06:01 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 07:11:46
- सूर्यास्त- 18:12:09
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 08:26:00
- चंद्रास्त- 19:37:00
- ऋतु- शिशिर
- नववर्ष दिन
- जागतिक शांतता दिन
- जागतिक कौटुंबिक दिवस
- १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.
- १७८५: डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.
- १८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
- १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
- १८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
- १८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
- १८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
- १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
- १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
- १८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
- १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
- १९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
- १९१२: याच दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.
- १९१५: ला महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.
- १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
- १९२०: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
- १९२३: ला चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.
- १९३२: डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
- १९६४: मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.
- १९७२: वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.
- १९७३: मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.
- १९९५: WTO ची स्थापना झाली.
- २०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
- २००१: कलकत्ता ला अधिकृत रित्या कोलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
- २००४: चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- १६६२: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
- १८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७०)
- १८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
- १८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
- १९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
- १९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
- १९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
- १९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
- १९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)
- १९३५: ला भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.
- १९३६: राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७)
- १९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार
- १९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
- १९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
- १९५१: नाना पाटेकर – अभिनेता
- १९५३: ला भारताचे माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांचा जन्म.
- १९६१: ला मणिपूर चे माजी मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचा जन्म.
- १९७१: संसद चे माजी सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म.
- १९७५: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.
- १९७९: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री विद्या बालन यांचा जन्म.
- १५१५: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १४६२)
- १७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७)
- १८९४: हेन्रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
- १९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९)
- १९५५: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
- १९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. (जन्म: ८ आक्टोबर १८९१)
- १९८३: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन.
- १९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
- २००८: ला भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन.
- २००९: रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 27:24:15 पर्यंत
- नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 24:04:19 पर्यंत
- करण-किन्स्तुघ्ना – 15:44:43 पर्यंत, भाव – 27:24:15 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-घ्रुव – 18:58:44 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:14
- सूर्यास्त- 18:10
- चन्द्र-राशि-धनु – 30:01:57 पर्यंत
- चंद्रोदय- 07:33:59
- चंद्रास्त- 18:34:59
- ऋतु- शिशिर
- १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना
- १७८१: अमेरिकेमध्ये अमेरिकेची पहिली बँक ऑफ उत्तर अमेरिका उघडली.
- १८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
- १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १९२९: महात्मा गांधी आणि कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी लाहोर मध्ये पूर्ण स्वराज साठी आंदोलनाला सुरुवात केली.
- १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
- १९९७: मोहम्मद रफ़ीक तरार पाकिस्तान चे नववे राष्ट्रपती बनले.
- १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
- १९८४: राजीव गांधी हे भारताचे सातवे प्रधान मंत्री बनले.
- १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
- २००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.
- २००८: ईश्वरदास रोहिणी यांना दुसऱ्यांना मध्य प्रदेश च्या विधानसभेचे अध्यक्ष बनविण्याची घोषणा करण्यात आली.
- १८७१: गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक, बडोद्याचे मल्लविद्या विशारद (मृत्यू: २५ मे १९५४)
- १९१०: पं. मल्लिकार्जुन मन्सूर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, (ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य) नीलकंठबुवा अलुरमठ आणि (जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र) मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले, पद्मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)
- १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)
- १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.
- १९३७: अँथनी हॉपकिन्स – वेल्श अभिनेता
- १९४७: सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश स्वातंत्र कुमार यांचा जन्म.
- १९४८: डोना समर – अमेरिकन गायिका (मृत्यू: १७ मे २०१२)
- १९५१: लोकसभेचे सदस्य अरविंद सावंत यांचा जन्म.
- १८८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.
- १८९८: बिहार चे माजी मुख्यमंत्री कृष्णा बल्लभ सहाय यांचा जन्म.
- ????: शाहीर पिराजीराव सरनाईक (जन्म: ? ? ????)
- १९२६: वि. का. राजवाडे – इतिहासाचार्य (जन्म: १२ जुलै १८६३)
- १९५६: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री यांचे निधन
- १९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
- १९८६: राजनारायण – केंद्रीय आरोग्य मंत्री (जन्म: ? ? १९१७)
- १९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)
- १९९७: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (जन्म: १० मार्च १९१८)
- २००१: भारतीय लेखक टी. एम. चिदंबरा रघुनाथन यांचे निधन.
आजचे पंचांग
- तिथि-अमावस्या – 27:58:36 पर्यंत
- नक्षत्र-मूळ – 23:58:04 पर्यंत
- करण-चतुष्पाद – 16:05:10 पर्यंत, नागा – 27:58:36 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वृद्वि – 20:31:30 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 07:13
- सूर्यास्त- 18:09
- चन्द्र-राशि-धनु
- चंद्रोदय- चंद्रोदय नाही
- चंद्रास्त- 17:34:59
- ऋतु- शिशिर
- ०: रोमन सम्राट टायटस यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
- १८०३: ला ब्रिटन च्या इस्ट इंडिया कंपनी ने दिल्ली,आग्रा आणि भरूच वर आपले नियंत्रण सुरु केले.
- १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
- १९२४: एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
- १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला
- १९७९: ला पश्चिम आफ्रिकेतील एका देशाने संविधानाला स्विकार केले.
- ३९: टायटस – रोमन सम्राट (मृत्यू: १३ सप्टेंबर ८१)
- १८६५: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)
- १८७९: वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)
- १८८७: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)
- १९०२: डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३)
- १९२३: भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७७)
- १९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)
- १९३५: प्रथम भारतीय चेस मास्टर मॅन्युअल आरोन यांचा जन्म.
- १९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.
- १९५०: भारतीय समज सेवक डॉ. हनुमाप्पा सुदर्शन यांचा जन्म.
- १९८३: इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म.
- १९८९: भारतीय क्रिकेटपटू सौरभ तिवारी चा जन्म.
- १९९२: भारताच्या युवा बॅडमिंटन खेळाडू सौरभ वर्मा यांचा जन्म.
- १९९४: भारताच्या आर्चर आणि अर्जुन पुरस्कार विजेता रजत चौहान चा जन्म.
- १६९१: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २५ जानेवारी १६२७)
- १९४४: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म: २९ जानेवारी १८६६)
- १९७१: डॉ. विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)
- १९७४: आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
- १९८२: दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट) (जन्म: २ डिसेंबर १९१३ – कोल्हापूर)
- १९८७: दत्ता नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ – संगीतकार (जन्म: ? ? ????)
- १९९०: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १९२९)
- २००६: इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म: २८ एप्रिल १९३७)
- २०१५: भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९२९)
Mumbai Goa Highway Accident: गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेतएर्टिगा आणि बॅगनर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा (34) मूळ राहणार फरिदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता, तर वॅगनरचालक ओंकार शंकर घाडगे (23), राहणार पाटण (आंबळे) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वॅगनरला समोरासमोर जोरदार धडक दिली.
धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून या एर्टिगाचालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा (58) अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा (24) राहणार अंधेरी) यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागलावॅगनरमधील ओंकार घाडगे (23), अभिजित अशोक खरात (24) राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने (20) राहणार सोलापूर यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले










