नागपूर :वेदांता, ‘टाटा-एअरबस’ हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे.
सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
मुंबई: पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्यासाठी नोव्हेंबर मध्ये होणारी भरती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. हि पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले होते. ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले होते. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.
सदर भरती प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे अशा आशयाचे एक माहितीपत्रक पोलीस महासंचालकांच्या वतीने काढण्यात आलेले आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत. पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी दरवर्षी गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येतात. त्यामुळे वेळापत्रक बदलण्यात येते. कोकण रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या पावसाळी वेळप्रत्रकानुसार चालविण्यात येत असतात. हे पावसाळी वेळापत्रक दि. १ नोव्हेंबरपासून समाप्त होत आहे आणि नवीन वेळापत्रकानुसार सर्व गाड्या चालविण्यात येणार आहेत.
मुंबई : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले आहे.
ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यानुसार खालील प्रवर्गात पदे भरण्यात येतील असे जाहीर करण्यात आलेले आहे.
दिल्ली : चलनी नोटेवर महात्मा गांधींसोबत गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापा अशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारला विनंती केली आहे. केजरीवाल यांच्या या मागणीमुळे केजरीवाल यांच्या भूमिकेविषयी चर्चेला उधाण आलेले आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्शवभीमीवर केजरीवाल यांनी हि मागणी केल्याचे बोलले जात आहे .
आपल्या मागणीचं समर्थन करताना केजरीवाल यांनी इंडोनेशियातल्या चलनी नोटेचे उदाहरण दिलं आहे. इंडोनेशियामध्ये जवळपास 85 टक्के मुस्लिम केवळ दोन टक्के हिंदू पण गणपतीची प्रतिमा नोटेवर- केजरीवाल इंडोनेशियाचे स्वातंत्र्य सेनानी Ki Hajar Dewantara यांच्या फोटो शेजारी हिंदू देवता गणपती चा फोटो आहे.
दापोली :शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील मुरुड इथल्या साई रिसॉर्ट व सी कोंच रिसॉर्ट तोडण्यासाठी बांधकाम विभागाने निविदा मागवल्या आहेत. चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वृत्तपत्रात रविवारी (20 ओक्टोम्बर) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २७ ओक्टोम्बर २०२२ सकाळी १० वाजता ते १० नोव्हेंबर 2022 या कालावधीपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
किरीट सोमय्यांचे आरोप
रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते.
अनिल परब यांची ईडी चौकशी
शिवसेना नेते अनिल परब यांची दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी ईडीने चौकशी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री असताना अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आणि खासगी निवासस्थानी ईडीकडून मे महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल परब यांची तीन वेळा ईडी चौकशी करण्यात आली होती. साई रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा परब यांनी याआधीच केला आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही गाडी आता 31 डिसेंबरपर्यंत धावणार आहे.
ह्या गाडीच्या वेळा पत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीसे बदलही करण्यात आलेले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल.
मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल.
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
ह्या गाडीला 2 Tier AC – 01, 3 Tier AC – 04, Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत.
एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.
ह्या अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षण 23/10/2022 पासून रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सिंधुदुर्ग: आज महाराष्ट्र भाजपचे आमदार,मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ओरस येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पुषपगुच्छ त्यांचे देऊन स्वागत केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मुंबै जिल्हा बँकेच्या समन्वयातून कोकणचा विकास,युवकांना रोजगार व पर्यटन या विषयांवर एकत्रित काम करण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आमदार, भाजपा सचिव प्रमोद जठार, संचालक बाबा परब आदी उपस्थित होते.
रायगड :नेरळ माथेरान ला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. येथील प्रसिद्ध असलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु होणार आहे. उद्या दिनांक २२ ओक्टोम्बर रोजी हि सेवा पुन्हा चालू होणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
येथे पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे होणारे भुरस्सलन ह्यामुळे ह्या मार्गावरील रेल्वे रुळे खराब झाल्याकारणाने हि सेवा बंद करावी लागली होती. मागील ३ वर्षे हि सेवा बंद होती. आता ह्या रेल्वे मार्गात काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
उद्यापासून खालील सेवा चालू होतील
नेरळ-माथेरान-नेरळ ह्या मार्गावर मिनी ट्रेन
नेरळ-माथेरान-नेरळ ह्या मार्गावर मिनी ट्रेन स्वरूपात 4 गाड्या चालवनिण्यात येणार आहेत. त्यापैकी २ नेरळ ते माथेरान आणि २ माथेरान ते नेरळ अशा चालणार आहेत. ह्या सर्व गाड्या ६ कोच सहित धावणार आहेत.
माथेरान ते अमन लॉज (शटल सेवा)
ह्या मार्गावर टॉय ट्रेन स्वरूपात ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ह्या सर्व गाड्या ६ कोच सहित धावणार आहेत.
मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे पत्र आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
काय लिहिले आहे या पत्रात?
“ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
“या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.