![]()
Author Archives: Kokanai Digital
सिंधुदुर्ग – कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकातून सुटणारी ट्रेन क्र. ११००३ दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यास कोकण रेल्वेने मंजुरी दिली आहे. या बदलामुळे प्रवाशांचा जवळपास १ तास वाचणार आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्रक कोकण प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.सध्या ही गाडी सावंतवाडी रोड मळगाव स्थानकातून सायंकाळी ७ वाजून १० ( १९.१०) मिनिटांनी निघत आहे. या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यात येत असून ती रात्री ८ वाजता निघणार आहे.
1) गाडी क्र. 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस चे वेळापत्रक
| स्थानकाचे नाव | सध्याची वेळ | सुधारित वेळ |
| सावंतवाडी रोड | 19:10 | 20:00 |
| कुडाळ | 19:26 | 20:14 |
| सिंधुदुर्ग | 19:38 | 20:28 |
| कणकवली | 19:56 | 20:45 |
| वैभववाडी रोड | 20:22 | 21:12 |
| राजापूर रोड | 20:42 | 21:40 |
| विलवडे | 21:00 | 21:56 |
| आडवली | 21:20 | 22:12 |
| रत्नागिरी | 22:00 | 22:55 |
| संगमेश्वर रोड | 22:50 | 23:24 |
| आरवली रोड | 23:04 | 23:36 |
| सावर्डे | 23:16 | 23:46 |
| चिपळूण | 23:32 | 23:57 |
| खेड | 00:18 | 00:28 |
| वीर | 01:38 | 01:38 |
| माणगाव | 01:56 | 01:56 |
| पनवेल | 04:45 | 04:45 |
| ठाणे | 05:48 | 05:48 |
| दादर | 06:40 | 06:40 |
2) गाडी क्र. 11003 दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस च्या वेळापत्रकात जास्त बदल झालेले नाही आहेत. ही गाडी सावंतवाडी स्थानकावर येण्याच्या वेळेत बदल झाला आहे. ही गाडी १०.४० च्या जागी १०.२५ ला पोहोचणार आहे.
Vision Abroad
![]()
![]()
मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन करण्यात आले असून. या महोत्सवमध्ये भारतीय तसेच परदेशी भाषिक लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना ” ईंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक आहे. या महोत्सवमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख २३ एप्रिल २०२३ असून सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या सर्व लघुपटांना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. अधिक माहितीकरता 7021642822 / 8108889100 यावर संपर्क साधायचा आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
![]()
![]()
पालघर : वसई – विरार भागातील कोकणवासीयांसाठी एक चांगली बातमी आहे. मागील कित्येक गुढीपाडव्यानिमित्त विरार येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत खासदार श्री. गावित यांनी वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेचेच अध्यक्ष शांताराम नाईक यांची भेट घेऊन वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुरू होणार असल्याचे सांगितले. आपली मागणी लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्याबद्दल श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. पण गाडी लवकर सुरू झाली नाही, तर नाइलाजाने उग्र आंदोलन करावे, लागेल, असा इशाराही त्यांनी श्री. गावित यांना दिला. मात्र तशी वेळच येऊ देणार नाही. गाडी लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही श्री. गावित यांनी दिली.
बोरिवली ते विरार या पट्ट्यात कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्या वसईमार्गे जातात. पण या गाड्या नियमित नाही आहेत. तसेच या गाड्या कोकणातील काही मोजकेच थांबे घेतात.शिवाय त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना दादर या स्थानकावर यावे लागत आहे. वेळेचा अपव्यय तर होतोच पण खूप त्रास सहन करावा लागत आहे.
वसई टर्मिनसहून रत्नागिरी, सावंतवाडीकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कित्येक वर्षे केली जात आहे. खासदार श्री. गावित यांनी ती मागणी पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे.
![]()
मुंबई- कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाड गाव, ता.पनवेल येथे गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता संपन्न होणार आहे.
या भूमीपूजन सोहळा कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य खासदार श्री.कुमार केतकर, लोकसभा सदस्य, मावळ खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, रायगड खासदार श्री.सुनिल तटकरे, विधानपरिषद सदस्य, सर्वश्री आमदार श्री.निरंजन डावखरे, श्री.अनिकेत तटकरे, श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार श्री.भरत गोगावले, श्री.प्रशांत ठाकूर, श्री.रविंद्र पाटील, श्रीमती आदिती तटकरे, श्री.महेंद्र थोरवे, श्री.महेश बालदी, श्री.महेंद्र दळवी यांची उपस्थिती राहणार आहे. ![]()

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी काही गाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गाडी क्र. २२९०८ हापा ते मडगाव एक्स्प्रेसला २९ मार्च रोजी स्लीपर कोच१ , परतीसाठी गाडी क्र. २२९०७ मडगाव हापा एक्स्प्रेसला ३१ मार्च रोजी एक डबा जोडण्यात येणार आहे.
गाडी क्र. २२४७५ हिसार ते कोइम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला टू टायर एसी एक कोच दिनांक ०५ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. परतीसाठी २२४७६ कोईम्बतूर जं.- हिसार जं. साप्ताहिक एक्स्प्रेसला दिनांक ०८ एप्रिल ते २९ एप्रिल पर्यंत जादा डबा जोडण्यात येणार आहे.
![]()
मुंबई –कोकणात रिफायनरी प्रकल्प उभारणाऱ्या सौदी अर्माको ही कंपनी आता आपले लक्ष ईतर देशातील प्रकल्पामध्ये वळवताना दिसत आहे. या कंपनीने चीनमध्ये मोठा रिफायनरी प्रकल्प उभा करण्यासाठी नुकताच करार केला असून, चीनमधीलच आणखी एका प्रकल्पाचा विस्तार करण्याचीही घोषणा केली आहे.त्यामुळे कोकणातील वादग्रस्त रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अंधारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोकणात रिफायनरी प्रकल्प उभा करण्याची घोषणा २०१६ साली झाली होती. आधी हा प्रकल्प नाणार इथे होणार होता. स्थानिकांचा विरोध झाल्याने नंतर बारसू इथे हा प्रकल्प करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र बारसू इथेही विरोध होत आहे. त्यात अजून या प्रकल्पासाठी तीन हजार एकर जागा संपादित व्हायची आहे. या सर्व प्रकारामुळे प्रकल्पाला दिरंगाई होत आहे. त्यामुळे सौदी आर्माको या कंपनीने आपले लक्ष आपल्या इतर देशातील प्रकल्पाकडे वळविल्याचे दिसत आहे.
मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या गोष्टीचा परिणाम बारसू येथील रिफायनरीवर होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रिफायनरीला होणारा विरोध कमी झाला असून प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल असे ते म्हणाले.
![]()
Vision Abroad
![]()
















