Author Archives: Kokanai Digital

रायगडच्या शाळा बनत आहेत डिजिटल; आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी वापर…

संग्रहित फोटो

रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या 2 हजार 603 शाळांपैकी 2 हजार 12 शाळा डिजिटल झाल्या असून, उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. या शाळाही टप्प्याटप्प्याने पूर्ण डिजिटल करण्याचा मानस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >आता गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगातून शिक्षण घेता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शाळा डिजिटल मोबाईल करण्यात येत आहेत. 

प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भावी आयुष्याचा पाया असल्याने येथे मिळणारे शिक्षणही आधुनिकतेला धरून असणे अत्यावश्यक आहे. त्यातच खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थही प्रयत्न करत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकही यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा सध्या डिजिटल बनल्या आहेत.शाळांतील विद्यार्थी स्मार्ट फोनच्या माध्यमातून गृहपाठ, अध्ययन करत आहेत.

Loading

आता गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

मुंबई | गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

हेही वाचा >बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये गोंधळ; विद्यार्थ्यांना बोनस म्हणून ६ गुण मिळणार?

याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना हा शिधा दिला जाईल. 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हेही वाचा > संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप…

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

Loading

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये गोंधळ; विद्यार्थ्यांना बोनस म्हणून ६ गुण मिळणार?

HSC Exam |राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांसाठी केवळ सूचना देण्यात आल्या, तर एका प्रश्नासाठी प्रश्न न देता थेट उत्तरच देण्यात आले आहे.त्यामुळे या तीन प्रश्नांचे सहा गुण विद्यार्थ्यांना देण्याची मागणी करण्यात आली असून, सलग दुसऱ्या वर्षी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचे समोर आले आहे.
राज्यभरात बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने काटेकोर उपाययोजना केल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. अनेकांना प्रश्नच कळले नाही, तर काहींनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षीही इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मंगळवारच्या इंग्रजी विषयाच्याच प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आल्याने मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading

‘शिंदे गट’ ऐवजी ‘शिवसेना’ असे संबोधले जावे – पत्राद्वारे विनंती

मुंबई : दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात आपल्या पक्षास ‘शिंदे गट’ असे न संबोधता ‘शिवसेना’ असे संबोधले जावे अशी विनंती शिवसेनेतर्फे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.

हे पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे.

 

 

Loading

काजू बागेतील आग विझवताना शेतकर्‍याचा मृत्यू

रत्नागिरी:  रत्नागिरी शहरापासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या हातखंबा तारवे वाडी येथे काजू बागायातीला लागलेल्या भीषण वणव्यात एका शेतकऱ्याचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला आहे. गोविंद विश्राम घवाळी (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

हातखंबा येथील काजूच्या बागेत आचानक वणवा पसरला. त्यामुळे बाग वाचविण्यासाठी शेतकरी गोविंद घवाळी यांनी धाव घेतली. मात्र एवढी आग भीषण होती की त्या आगीत ते होरपळले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली. 

 

Loading

संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप…

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल आहे.

हेही वाचा >Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र आपल्या ट्विटटर हँडलवरून ट्विट केले आहे. आपली सुरक्षा हटवण्यात आल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत यांनी काय लिहिलं आहे पत्रात?

 

Loading

Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

नवी दिल्ली :भारतीय संसदेतील शिवसेना पक्षाचं कार्यालय आता एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आलं आहे. खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे गटनेते आहेत. शेवाळे यांनी केंद्रीय सचिवालयाला यासंदर्भातील पत्र दिलं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्वाळा केल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयावर एकनाथ शिंदे गटाचा ताबा मिळावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. त्यानुसार, राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने आज संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात आज एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी प्रवेश घेतला.

काल महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ताबा मिळवला. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी प्रवेश केला.

Loading

कोकण रेल्वे मार्ग विद्युतीकरण – अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज

संग्रहित फोटो
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे. नाण्याची दुसरी बाजू अशी की विद्युतीकरणामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा आवाज येत नाही. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना नागरिकांचा किंवा प्राण्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हे अपघात टाळण्यासाठी  जे गाव रेल्वे ट्रॅकच्या लगत आहेत अशा गावांना रेल्वे प्रशानाने जाळी बसवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
या आधी गाड्या डिजेल इंजनवर चालायच्या. त्यामुळे त्याचा आवाज मोठा असायचा पण आता आवाज कमी येतो. रेल्वे चालक हॉर्न वाजवतात पण त्यावर पण काही मर्यादा येतात.  रेल्वे पटरीवरून जाते वेळी व येते वेळी विजेवर चालणाऱ्या ट्रेनचा आवाज येत नसल्यामुळे नागरिक व गुरा घोरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.

Loading

मुंबई लोकल ट्रेन – आजपासून ‘हा’ महत्वाचा बदल.

मुंबई :मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा व महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार आज, २० फेब्रुवारी २०२३ पासून मध्य रेल्वेवरील जलद मार्गाच्या गाड्या या १२ डब्ब्यांऐवजी १५ डब्याच्या स्थानी थांबतील. कामाला जाताना आयत्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून हा नवा बदल नेमका काय आहे हे आधीच सविस्तर जाणून घेऊयात.

प्राप्त माहितीन्वये, जलद मार्गावरील रेल्वे अप व डाऊन दिशेने ज्या १२ डब्यांची रेल्वे गाडी पहिल्या प्लॅटफाॅर्मवर जिथे थांबत होती ती आता १५ डब्यांची रेल्वे जिथे थांबते त्या जागी थांबणार आहे. म्हणजेच १२ डब्यांच्या पुढील पहीला मोटर मॅन डब्बा आता ३ डब्बे पुढे जाऊन १५ डब्यांचा मोटर मॅन डबा जिथे थांबत होता तिथे थांबेल. कल्याण, डोबिंवली , दिवा , ठाणे , मुलुंड , भाडूंप , घाटकोपर , कुर्ला , दादर , भायखळा या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे बदल लागू असतील.

दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या स्थानकात हे नवे बदल अंमलात आणण्यात आले आहेत. या स्थानकांवरील गर्दी पाहता अनेकदा प्रवाशांनी मध्य रेल्वेने सरब लोकल गाड्या या १२ ऐवजी १५ डब्याच्या कराव्यात अशी मागणी केली होती. अद्यापही या मार्गावर काही ठराविकच गाड्या १५ डब्याच्या आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या म्हणजेच कर्जत- कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या तरी मध्य रेल्वेने १२ डब्याच्या गाडीचे स्थान बदलले आहे पण सर्व गाड्या १५ डब्याच्या करण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.

Loading

पक्षचिन्हासाठी नीलेश राणेंनी उद्धव ठाकरे गटाला दिला उपहासात्मक सल्ला ..

मुंबई : निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालात पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे गटाला निलेश राणे यांनी एक उपहासात्मक नवीन चिन्ह सुचवले आहे.

परिस्थिती पाहता आता उद्धव ठाकरे गटाला ‘फावडे’ हे चिन्ह योग्य राहील अशी ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर केली आहे.

उद्धव ठाकरे 25 वर्षे मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे होती मग मराठी माणसाची टक्केवारी 20% पेक्षा खाली का? मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? उद्धव ठाकरे तुम्हाला मराठी माणसाबद्दल बोलायचा अधिकारच नाही. असेही ते अजून एका ट्विट मध्ये म्हणाले आहेत. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search