![]()
Author Archives: Kokanai Digital
मुंबई :मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा व महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार आज, २० फेब्रुवारी २०२३ पासून मध्य रेल्वेवरील जलद मार्गाच्या गाड्या या १२ डब्ब्यांऐवजी १५ डब्याच्या स्थानी थांबतील. कामाला जाताना आयत्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून हा नवा बदल नेमका काय आहे हे आधीच सविस्तर जाणून घेऊयात.
प्राप्त माहितीन्वये, जलद मार्गावरील रेल्वे अप व डाऊन दिशेने ज्या १२ डब्यांची रेल्वे गाडी पहिल्या प्लॅटफाॅर्मवर जिथे थांबत होती ती आता १५ डब्यांची रेल्वे जिथे थांबते त्या जागी थांबणार आहे. म्हणजेच १२ डब्यांच्या पुढील पहीला मोटर मॅन डब्बा आता ३ डब्बे पुढे जाऊन १५ डब्यांचा मोटर मॅन डबा जिथे थांबत होता तिथे थांबेल. कल्याण, डोबिंवली , दिवा , ठाणे , मुलुंड , भाडूंप , घाटकोपर , कुर्ला , दादर , भायखळा या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे बदल लागू असतील.
दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या स्थानकात हे नवे बदल अंमलात आणण्यात आले आहेत. या स्थानकांवरील गर्दी पाहता अनेकदा प्रवाशांनी मध्य रेल्वेने सरब लोकल गाड्या या १२ ऐवजी १५ डब्याच्या कराव्यात अशी मागणी केली होती. अद्यापही या मार्गावर काही ठराविकच गाड्या १५ डब्याच्या आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या म्हणजेच कर्जत- कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या तरी मध्य रेल्वेने १२ डब्याच्या गाडीचे स्थान बदलले आहे पण सर्व गाड्या १५ डब्याच्या करण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.
![]()
मुंबई : निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालात पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे गटाला निलेश राणे यांनी एक उपहासात्मक नवीन चिन्ह सुचवले आहे.
परिस्थिती पाहता आता उद्धव ठाकरे गटाला ‘फावडे’ हे चिन्ह योग्य राहील अशी ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर केली आहे.
उद्धव ठाकरे 25 वर्षे मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे होती मग मराठी माणसाची टक्केवारी 20% पेक्षा खाली का? मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? उद्धव ठाकरे तुम्हाला मराठी माणसाबद्दल बोलायचा अधिकारच नाही. असेही ते अजून एका ट्विट मध्ये म्हणाले आहेत.
मी ऐकलं उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षासाठी नवीन चिन्ह आणि नाव शोधतायत, माझ्या डोळ्यासमोर त्यांच्यासाठी एकच ऑप्शन आलं. pic.twitter.com/i1RO1iD1Vk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 20, 2023
![]()
- 22655 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक २२/०२/२०२३
- 22656 – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक २४/०२/२०२३
- 22633 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, २२/०२/२०२३
- 22634 – कोयंबटूर एक्सप्रेस, २४/०२/२०२३
- 22653 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, २५/०२/२०२३
- 22654 – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस, २७/०२/२०२३
![]()
रत्नागिरी: रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा अंतिम प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. अंतिम अधिसूचना काढल्यानंतर आठह कातळ शिल्पे राज्य संरक्षित होणार आहे.
खाली नमूद केलेली कातळशिल्पे संरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
- भगवतीनगर,
- चवे,
- देवीहसोळ,
- कापडगाव,
- उक्षी,
- कशेळी,
- वाढारूणदे,
- बारसू
या रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.
ही शिल्प एका विशिष्ठ जागेत न आढळता समुद्र किनार्यालगत सुमारे ३०० कि.मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. कोकणातील या कातळशिल्पावर अश्मयुगी संस्कृती रूजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांच्या भोवती गूढकथा परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास संरक्षण आणि जतन होवू शकते. म्हणून सुधीर रिसबूड, त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.
![]()
संगमेश्वर: मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून २ ते ३ वर्षे अंदाजे वय असलेल्या या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार करत आहेत. वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थ श्री.सुर्वे व पोलिस पाटील यांनी कळविल्या नंतर परिक्षेत्र वन अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्यासमवेत घटनास्थळी समक्ष पाहणी केली. त्यावेळी सदर बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले व ती मादी आहे.
या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसा पूर्वी झाला असावा. बिबट्याचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला असावा असा अंदाज आहे
![]()
Konkan Railway News:प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत चालविण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला जुलै -२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
नियमित वेळापत्रक
01139/Nagpur – Madgaon Bi-weekly Special
आठवड्यातून दर बुधवार आणि शनिवारी धावणारी हि गाडी २५/०२/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती ती ०७ जून २०२३ पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.
01140/Madgaon – Nagpur Bi-weekly Special
आठवड्यातून दर शुक्रवार आणि रविवारी धावणारी हि गाडी २६/०२/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती ती ०८ जून २०२३ पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.
पावसाळी वेळापत्रक
या गाड्या १० जून २०२३ ते ०२ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहेत.
01139/Nagpur – Madgaon Bi-weekly Special
ही गाडी १० जून २०२३ ते ०१ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार गाडी नागपूर स्थानकावरून दुपारी १५:०५ ला निघेल ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:४५ ला मडगाव स्थानकावर पोहोचेल.
01140/Madgaon – Nagpur Bi-weekly Special
ही गाडी ११ जून २०२३ ते ०२ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार हि गाडी मडगाव स्थानकावरून संध्याकाळी १९:०० वाजता निघेल ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:३० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, शेंगाव, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवीम तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीला 2 Tier AC – 01, 3 Tier AC – 04, Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत.
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आलेले आहे.
Vision Abroad
![]()
![]()

KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा जून -२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३१/०३/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०२ जून २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०३/०४/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०५ जुन २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
या गाड्यांचे मडगावपर्यंत कोकणातील थांबे
- पनवेल,रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,कुडाळ, थिवीम, मडगाव
![]()
Breaking News :केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने ज्या बहुमतावर शिंदे हेच खरे शिवसेनेचे नेते आणि त्यांच्याच गटाला धनुष्यबाण दिले आहे ती आकडेवारी पुढीलप्रमाणे
![]()















