Author Archives: Kokanai Digital

रत्नागिरीत वर्षअखेरीस चालणार ‘रत्नागिरी दर्शन’ हि विशेष बस फेरी..फक्त ३०० रुपयात पाहता येणार ‘ही’ पर्यटनस्थळे …

   Follow us on        

रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘रत्नागिरी दर्शन‘ हि बस फेरी चालविण्यात येणार आहे. दिनांक २८ डिसेंबर ते ०१ जानेवारी दरम्यान दररोज हि सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.

खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
आडिवरे,कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, लोकमान्य टिळक जन्मस्थान, आरेवारे समुद्रकिनारा आणि गणपतीपुळे ह्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता रत्नागिरी स्थानकावर हा प्रवास संपवला जाणार आहे.

(Also Read>सिंधुदुर्ग विमानतळचे ‘बॅ. नाथ पै विमानतळ सिंधुदुर्ग’ असे नामकरण होणार…)

तिकीट दर
ह्या फेरीचा दर अगदी माफक ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण प्रवासासाठी पौढांसाठी तिकीटदर ३०० रुपये तर लहान मुलांसाठी १५० दर आकारण्यात येणार आहे.

संपर्क
अधिक माहितीसाठी रत्नागिरी स्थानकाच्या कार्यालयास भेट द्यावी किंवा आगारव्यवस्थापक ७५८८१९३७७४ ह्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा

Loading

सिंधुदुर्ग विमानतळचे ‘बॅ. नाथ पै विमानतळ सिंधुदुर्ग’ असे नामकरण होणार…

नागपूर:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास आज विधानपरिषदेत मंजुरी मिळाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत शासकीय ठराव मांडला. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीमुळे आता हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव योग्य 

बॅरिस्टर नाथ पै हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र होते. नाथ पै यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना यासाठी अनेकवेळा कारावास भोगावा लागला होता. गोवा मुक्ती संग्रामातही ते अग्रभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी लोकसभेच्या राजापूर मतदारसंघातून १९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकीत विजय मिळवत १९५७ ते १९७१ अशी पंधरा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केले. कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. तसेच नाथ पै यांचे विमानतळाला नाव देण्याची सर्व पक्षांनी मागणी केली होती.

(Also Read>उद्योजकांसाठी खुशखबर! रत्नागिरी MIDC क्षेत्रातील भूखंड वाटपासाठी तयार…अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जानेवारी)

या विमानतळ परिसरात बॅ. नाथ पै यांचे जीवन चरित्र पुढील पिढीला कळावे यासाठी विस्तृत माहितीचे शिलालेख तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक बांधून त्यांना गौरविण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.

(Also Read>कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.)

Loading

उद्योजकांसाठी खुशखबर! रत्नागिरी MIDC क्षेत्रातील भूखंड वाटपासाठी तयार…अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जानेवारी

रत्नागिरी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळतर्फे (MIDC) रत्नागिरी येथे २ औद्योगिक क्षेत्रांकरिता उपलब्ध भूखंड वाटप केले जाणार आहे. हे वाटप “जसे आहे तसे व जेथे आहे तेथे” ह्या तत्वावर (सामान्य/अ.जा./अ.ज. ह्या प्रवगासाठी राखीव) ऑनलाईन सरळ पद्धतीने केले जाणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४/०१/२०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

खालील औद्योगिक क्षेत्राकरिता अर्ज मागवले आहेत.

औद्योगिक क्षेत्र वाटपास उपलब्ध क्षेत्र
(हे. आर)
भूखंडाची संख्या 
अतिरिक्त लोटे परशुराम 10.24 12
अडाळी 32.02 210

वाटप केल्या जाणाऱ्या भूखंडाचे दर,क्षेत्र आणि इतर माहितीसाठी खालील पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. 

(Also Read>कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.)

अर्ज करण्यासाठी आणि इतर सविस्तर माहितीकरिता https://www.midcindia.org ह्या संकेतस्थळास भेट द्यावी

   Follow us on        

Loading

कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.

सावंतवाडी: सावंतवाडी शहरात कचरा गोळा करण्यासाठी आता ई-रिक्षा दिसणार आहेत. ह्या आधी घंटा गाडीतून कचरा गोळा केला जात होता त्याची जागा आता ह्या ई-रिक्षा घेणार आहेत. आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या साडे अठरा लाखाच्या निधीतून हया गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. ई-रिक्षांमुळे पालिकेचा मोठा इंधनखर्च वाचणार असून मनुष्यबळ देखील कमी लागेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

   Follow us on        

(हेही वाचा >कोकणरेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर-मडगाव विशेष गाडीची मुदत वाढवली)

दोन दिवसांपूर्वी या गाड्या सावंतवाडीत दाखल झाल्या आहेत.  घंटागाडी मधून कचरा गोळा करण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेता विजेवर धावणाऱ्या कचरा गाड्यांमुळे कचरा गोळा करण्याची प्रक्रिया सुद्धा जलद गतीने होईल, त्यामुळे नागरिकांना कचरा जास्त वेळ साठून राहिल्याने करावा लागणारा दुर्गंधीचा सामना सुद्धा कमी होणार आहे. ह्या गाड्यांनी प्रदूषणाचा प्रश्न पण येत नाही. अगदी गल्ली बोळात पण ही रिक्षा नेता येईल अशी तिची रचना आहे त्यामुळे कचरा गोळा करण्यास या एक अधिक लवचिक आणि कार्यक्षम पर्याय आहे. ह्या आधी बहुतेक पालिकांनी आपल्या ताफ्यात अशा गाड्या सामील केल्या आहेत. त्यात  आता सावंतवाडी नगरपालिकेचा समावेश झाला आहे. हा गाड्यांचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून जलद गतीने या गाड्या नागरिकांच्या सेवेत येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Loading

देवगड समुद्रात आगीचा थरार….मच्छीमारांची नौका पेटली

सिंधुदुर्ग :आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान देवगड येथे समुद्रात अचानक एका नौकेने पेट घेतला.नौकेवरील मच्छिमारांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण नौकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गणपत निकम यांच्या मालकीची पुण्यश्री नावाची हि नौका पहाटे ४ वाजता समुद्रात मच्छिमारीसाठी नेण्यात आली होती. सकाळी आठ वाजताच्या सुमारास ह्या नौकेला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच नौकेवरील मच्छिमारांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचा प्रयत्नांना यश आले नाही आणि आग अजून भडकत गेली. पुढील धोका ओळखून मच्छिमारांनी जीव वाचविण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या आणि जवळपासच्या नौकेंचा आश्रय घेतला.

येथील स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने सुमारे ४ तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आणि हि नौका किनाऱ्यावर आणण्यात आली. महेश सागवेकर, बापू सागवेकर, हितेश हरम, आकाश हरम, बाबू वाडेकर, अक्षय हरम, चेतन पाटील, नागेश परब, बाबू कदम यांनी आग विझवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती.

आगीचे नेमके कारण समजले नाही.ह्या आगीमध्ये २ मच्छिमार किरकोळ जखमी झाले आहेत त्यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार केले आहेत.

 

Loading

नागपूर-मडगाव गाडीच्या वाढिव फेर्‍यांचे आरक्षण उद्यापासून…. …

Konkan Railway News: प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ह्या गाडीचे आरक्षण उद्यापासुन म्हणजे 27/12/2022 पासून सुरू होत आहे.

ह्या गाडीच्या वेळापत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीही बदल न करता ही गाडी ह्या अतिरिक्त कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे..

01139 Nagpur – Madgaon Jn ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:45 वाजता पोहोचेल. ही गाडी 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत धावेल.

(Also Read > नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा न दिल्यास बेमुदत उपोषण… संगमेश्‍वरवासियांचा इशारा)

01140 Madgaon Jn – Nagpur – मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल. ही गाडी 26 फेब्रुवारी पर्यंत धावणार आहे.

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवीम तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

ह्या गाडीला 2 Tier AC – 01,  3 Tier AC – 04,  Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत.

अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ह्या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनानेतर्फे करण्यात आले आहे.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

घाबरून जाऊ नका! अशा लाटेंविरुद्ध लढण्याचा आपल्याला ३ वर्षाचा अनुभव… केंदीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली :चीन, आणि इतर देशांमध्ये कोरोनाची वाढत्या पार्श्वभूमीवर. आजच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियायांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यासोबत एक बैठक घेतली आहे.

या बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे.

राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, टेस्टिंग, उपचार आणि ट्रेसिंग यांच्यावर अधिक जोर देण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यातील सर्व नागरीकांनी प्रिकॉशनरी म्हणजेच बूस्टर डोस घ्यावा, याकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

ह्या बैठकीनंतर केंदीय आरोग्यमंत्र्यांनी एक ट्विट पोस्ट केले आहे. आपण सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्याकडे ३ वर्षाचा अशा लाटे विरुद्ध लढण्याचा अनुभव आहे. केंद सरकारकडून ह्या लढ्याकरिता राज्यांना पूर्ण सहाय्यता केली जाईल. तसेच भविष्यातील परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय घेतले जातील.

Loading

नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा न दिल्यास बेमुदत उपोषण… संगमेश्‍वरवासियांचा इशारा

   Follow us on        

रत्नागिरी: नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्‍वर रोड स्थानकात थांबा मिळावा यासाठी तीन वर्षापासून पत्रव्यवहार आणि आंदोलन करूनही जाग येत नसलेल्या रेल्वे प्रशासनाविरोधात २६ जानेवारी २०२३ म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून निसर्गरम्य चिपळूण-संगेमश्‍वर ग्रुप तसेच संगमेश्‍वरवासियांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

(Also Read>उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस सेवा… जाणून घ्या आपल्या स्थानकापर्यंतचे प्रवासभाडे)

संगमेश्‍वर रोड स्थानकातून रेल्वेला दर महिन्याला चांगला महसूल मिळत असतानाही कोकण रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव का केला जातो, असा प्रश्‍न संगमेश्‍वरमधील जनता विचारत आहे. कोकणवासियांचे मुंबईत मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यात संगमेश्‍वर तालुक्यात १९६ गावातील चाकरमानी कामधंद्यानिमित्त कोकण ते मुंबई असा नेहमी प्रवास करत असतात. संगमेश्‍वर स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या थांबाव्यात यासाठी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्‍वर फेसबुक ग्रुपवर वारंवार रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करत आहे. त्यास स्थानिकांचीही मोठी साथ लाभली आहे. जनतेच्या या मागणीकडे कोकण रेल्वे प्रशासन लक्ष देवून जनतेवर होणारा अन्याय दूर करेल असे वाटले होते. असे आंदोलनाची हाक दिलेल्या संदेश जिमन यांनी म्हटले आहे.

(Also Read>कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे)

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस सेवा… जाणून घ्या आपल्या स्थानकापर्यंतचे प्रवासभाडे

   Follow us on        

मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्या, शुक्रवार दिनांक 23/12/2022 पासून सुरू होत आहे.

या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. पुढील आठवड्यात खासगीचे भाडे दोन ते अडीच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होत आहे. याचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

(Also Read :नेत्रावती व मत्स्यगंधा एक्स्प्रेसला थांबा न दिल्यास बेमुदत उपोषण… संगमेश्‍वरवासियांचा इशारा

अशी आहे सेवा…
मुंबई सेंट्रल ह्या स्थानकावरून सुटून पनवेल पर्यंत मार्गात येणारी महत्त्वाची स्थानके घेऊन ही गाडी चिपळूण, लांजा, राजापूर, खारेपाटण, तारला, कणकवली, कसाल, आरोस, कुडाळ,सावंतवाडी, इन्सुलि, बांदा, पत्रादेवी, म्हापसा आणि पणजी ह्या स्थानकांवर थांबणार आहे.

सुटणार : मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : पणजीमध्ये सकाळी ७ वाजता

परतीचा प्रवास
सुटणार : पणजीहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : मुंबईसेंट्रल येथे सकाळी ७ वाजता

मुंबई सेंट्रल ते काही महत्त्वाच्या स्थानकापर्यंत प्रवासी भाडे 

मुंबई सेंट्रल – चिपळूण > ५९५ रुपये
मुंबई सेंट्रल – राजापूर > ८८० रुपये
मुंबई सेंट्रल – कणकवली > १००५ रुपये
मुंबई सेंट्रल – कुडाळ > १०८५ रुपये
मुंबई सेंट्रल – सावंतवाडी > ११२५ रुपये
मुंबई सेंट्रल – बांदा > ११५० रुपये
मुंबई सेंट्रल – पत्रादेवी > ११६० रुपये
मुंबई सेंट्रल – पणजी > १२५५ रुपये

(Also Read > कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे)

वर्षाखेरीस शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी कोकण तसेच गोवा ह्या ठिकाणी नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत त्यांना ही सेवा फायदेशीर ठरेल अशी आशा एसटी महामंडळाने केली आहे.

ह्या गाडीचे आरक्षण MSRTC च्या पोर्टल वर आणि मोबाईल अॅ प वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

Loading

कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटचे भारतात 3 रुग्ण

BF7 Variant Threat :चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे व्हेरियंटचे 3 रुग्ण भारतात आढळल्याची बातमी NDTV वृत्तवाहिनीने PTI वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिली.भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल एक बैठक घेतली आणि जगातील अनेक देशांमध्ये सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

   Follow us on        

मांडविया म्हणाले, काही देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पाहाता आज तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोव्हिड अद्याप संपलेला नाही. या संदर्भातील सर्व घटकांना सतर्क राहून लक्ष ठेवण्याचे आदेश मी दिले आहेत. कोणतीही स्थिती हाताळण्यास आम्ही तयार आहोत

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search