Author Archives: Kokanai Digital

‘एप्रिल फुल आमदार गुल’; मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात अनोखे आंदोलन…

सावंतवाडी – शिवसेना ठाकरे गटाने काल दिनांक 1 एप्रिल रोजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे एप्रिल फुल आमदार गुल अशा घोषणा देत ढोल बडवून केसरकर यांचा निषेध नोंदवला.शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याच्या नेतृत्वाखाली येथील एसटी बसस्थानकात आंदोलन करण्यात आले. 

सावंतवाडीतील जगन्नाथ उद्यानात मोनोरेल सुरू, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंचायत समिती इमारत नवीन जागेत स्थलांतर, एक लाख सेट टॉप बॉक्स आदिची घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच नाही. मंत्री केसरकर हे पंधरा वर्षे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप करुन यापुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाही. यासाठी आम्ही ठाकरे गट म्हणून प्रयत्न करणार असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.

या आंदोलनात मायकल डिसोजा, बाळा गावडे, गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, भारती कासार, श्रृतिका दळवी, श्रेया कासार, अर्चना बोंद्रे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पर्यटनासाठी गोव्यात जात असाल तर ही बातमी वाचा; पणजीत एक महिन्यांचा लॉकडाऊन जाहीर..

गोवा वार्ता – एप्रिल महिन्यात गोवा राज्याला भेट देणार असाल तर तुमच्या साठी एक महत्त्वाची बातमी आहे. गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्याच्या रात्रीच विशेष मंत्रिमंडळ बैठकीत गोवा सरकारने एका महिन्याचा पणजी बंद लॉकडाऊन आज जाहीर केला आहे. त्याची कार्यवाही 1 एप्रिलच्या पहाटेपासून सुरू केली जाईल.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बेदरकारपणे चाललेल्या बांधकामांमुळे मेटाकुटीस आलेल्या राजधानीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी गोवा सरकारने हा लॉकडाऊन लावला आहे. 

शनिवारी सर्व वाहने पणजीमध्ये येण्यापासून रोखून ठेवली जातील. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना दुपारी एकपर्यंत मुभा राहील. केवळ अग्निशामक व रुग्णवाहिका यांना शहरात फिरण्यास अनुमती आहे.

एक वाजल्यानंतर मात्र लॉकडाऊनची कठोर कारवाई सुरू होणार आहे. त्यात मच्छी व भाजी मार्केट बंद ठेवण्याचाही निर्णय समाविष्ट आहे.

‘पोलिस खात्‍याच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना शहराचे शेरीफ म्हणून एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लॉकडाऊनची कडक कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ अशी माहिती एका अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

 

पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता

महाराष्ट्र :राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून १ किलोमीटर पेक्षा पेक्षा अधिक तर ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून ३ किलोमीटर, आणि ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून ५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे.
खेडेगावांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे हाल होतात. बस सेवा उपलब्ध नसते अशा सगळ्या दिव्यातून वाट काढत खेडेगावातील मुलांना शिक्षण घ्यावे लागते. त्याचमुळे ज्या मुलांची शाळा एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे  अशा विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता दिला जाणार आहे.
हा भत्ता किती रुपये भेटणार आहे आणि त्याबाबत कोणत्या अटी असतिल या बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. 

सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल; ‘असे’ आहे सुधारित वेळापत्रक…..

सिंधुदुर्ग कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकातून सुटणारी ट्रेन क्र. ११००३ दादर सावंतवाडी रोड  तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यास कोकण रेल्वेने मंजुरी दिली आहे. या बदलामुळे प्रवाशांचा जवळपास १ तास वाचणार आहे.  याबाबतचे प्रसिद्धी पत्रक कोकण प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.सध्या ही गाडी सावंतवाडी रोड मळगाव स्थानकातून सायंकाळी ७ वाजून १० ( १९.१०) मिनिटांनी निघत आहे. या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यात येत असून ती रात्री ८ वाजता निघणार आहे. 

1) गाडी क्र. 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस चे वेळापत्रक

स्थानकाचे नाव सध्याची वेळ  सुधारित वेळ 
सावंतवाडी रोड 19:10 20:00
कुडाळ 19:26 20:14
सिंधुदुर्ग 19:38 20:28
कणकवली 19:56 20:45
वैभववाडी रोड 20:22 21:12
राजापूर रोड 20:42 21:40
विलवडे 21:00 21:56
आडवली 21:20 22:12
रत्नागिरी 22:00 22:55
संगमेश्वर रोड 22:50 23:24
आरवली रोड 23:04 23:36
सावर्डे 23:16 23:46
चिपळूण 23:32 23:57
खेड 00:18 00:28
वीर 01:38 01:38
माणगाव 01:56 01:56
पनवेल 04:45 04:45
ठाणे 05:48 05:48
दादर 06:40 06:40

 

2) गाडी क्र. 11003 दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस च्या वेळापत्रकात जास्त बदल झालेले नाही आहेत. ही गाडी सावंतवाडी स्थानकावर येण्याच्या वेळेत बदल झाला आहे. ही गाडी १०.४० च्या जागी १०.२५ ला पोहोचणार आहे.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

मुंबई-गोवा महामार्गाच्या फलकांवर चिपळूणचे ‘चिपलून’ आणि पेणचे ‘पेन’

रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरील फलक आणि मैलाच्या दगडांवर कोकणातील शहरांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहली जात असल्याने मराठी भाषा प्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या फलकांवर चिपळूणचे ‘चिपलून” व पेणचे ‘पेन” असे -लिहिल्याने मराठीची शुद्धता लोप पावली असल्यासारखे वाटत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील फलक तयार करणारी टीम ही हिंदी भाषिक असल्याने असल्याने शहर व ठिकाणांचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख होत आहे. अशी  मराठीची मोडतोड ही खेदाची बाब असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
मुंबई-पुण्यामध्ये हिंदी भाषिक लोकांची संख्या जास्त आहे. हिंदी भाषिक येथील शहरांची नावाचा चुकीच्या पद्धतिने उच्चार करताना सर्रास दिसतात.उदाहरण द्यायचं झाले तर पुण्याचे ‘पुना’ तर ठाण्याचे ‘थाना’ हे चुकीचे उच्चार होतात. तोच प्रकार आता कोकणात निदर्शनास येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ चे आयोजन

मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन करण्यात आले असून. या महोत्सवमध्ये भारतीय तसेच परदेशी भाषिक लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना ” ईंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक आहे. या महोत्सवमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख २३ एप्रिल २०२३ असून सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या सर्व लघुपटांना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. अधिक माहितीकरता 7021642822 / 8108889100 यावर संपर्क साधायचा आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेच्या मुंबई-पुण्यावरून चार विशेष गाड्या; आरक्षण ३१ मार्चपासून

Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीकरिता गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने उन्हाळी हंगामादरम्यान काही अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पुणे-सावंतवाडी, पनवेल- सावंतवाडी,पनवेल-करमाळी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते कन्याकुमारी दरम्यान चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 01211 / 01212 Pune Jn. – Sawantwadi Road – Pune Jn. Special (Weekly): 
Train no. 01211 Pune Jn. – Sawantwadi Road Special (Weekly) 
दिनांक ०२/०४/२०२३ ते ०४/०६/२०२३ दरम्यान दर रविवारी ही गाडी पुणे या स्थानकावरुन रात्री २१:३०  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01212 Sawantwadi Road – Pune Jn.Special (Weekly) 
दिनांक ०५/०४/२०२३ ते ०७/०६/२०२३ दरम्यान दर बुधवारी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी  १०:१०  वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:५५ वाजता पुणे  या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा,आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची संरचना
एसएलआर – 02 +  सेकंड सीटिंग – 06 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 22  डबे
2)  Train no. 01216 / 01215 Sawantwadi Road – Panvel – Sawantwadi Road Special (Weekly): 
Train no. 01216 Sawantwadi Road – Panvel Special (Weekly)
दिनांक ०३/०४/२०२३ ते ०५/०६/२०२३ दरम्यान दर सोमवारी ही गाडी सावंतवाडी या स्थानकावरुन सकाळी  १०:१०  वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २० :३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01215 Panvel – Sawantwadi Road Special (Weekly)
दिनांक ०४/०४/२०२३ ते ०६/०६/२०२३ दरम्यान दर मंगळवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २१:३०  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता सावंतवाडी या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, ,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची संरचना
एसएलआर – 02 +  सेकंड सीटिंग – 06 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 22  डबे
3) Train no. 01213 / 01214 Panvel – Karmali – Panvel Special (Weekly): 
Train no. 01213 Panvel – Karmali Special (Weekly) 
दिनांक ०३/०४/२०२३ ते ०५/०६/२०२३ दरम्यान दर सोमवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २१:३०  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01214 Karmali – Panvel Special (Weekly)
दिनांक ०४/०४/२०२३ ते ०६/०६/२०२३ दरम्यान दर मंगळवारी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी  ०९:२०  वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २०:३० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड,  कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम
डब्यांची संरचना
एसएलआर – 02 +  सेकंड सीटिंग – 06 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 22  डबे
4) Train No. 01463 / 01464 Lokmanya Tilak (T) – Kanniyakumari – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01463 Lokmanya Tilak (T) – Kanniyakumari Special (Weekly)
दिनांक ०६/०४/२०२३ ते ०१/०६/२०२३ दरम्यान दर गुरुवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई  या स्थानकावरुन संध्याकाळी १६:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री  २३:२० वाजता कन्याकुमारी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01464 Kanniyakumari – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)
दिनांक ०८/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी कन्याकुमारी या स्थानकावरुन दुपारी  १४:१५  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री  २१ :५०  वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे,पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड,मडगाव, कारवार, उडपी, मंगुळुरु, कासारगोड, कन्नूर, कालिकत, तिरुर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगान्नूर, कायानकुलम, कोल्लम, तिरुअनंतपुरम सेंट्रल आणि नागरकॉइल स्टेशन,
डब्यांची संरचना
एसएलआर – 02 +  सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 17  डबे
आरक्षण
गाडी नंबर  01211 , 01216 ,01213 या गाड्यांचे आरक्षण दिनांक ३१/०३/२०२३ रोजी रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर चालू होतील असे रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी लवकरच सुरू होणार – खा. गावित यांची ग्वाही..

पालघर : वसई – विरार भागातील कोकणवासीयांसाठी एक चांगली बातमी आहे. मागील कित्येक गुढीपाडव्यानिमित्त विरार येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत खासदार श्री. गावित  यांनी वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेचेच अध्यक्ष शांताराम नाईक यांची भेट घेऊन वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुरू होणार असल्याचे सांगितले. आपली मागणी लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्याबद्दल श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. पण गाडी लवकर सुरू झाली नाही, तर नाइलाजाने उग्र आंदोलन करावे, लागेल, असा इशाराही त्यांनी श्री. गावित यांना दिला. मात्र तशी वेळच येऊ देणार नाही. गाडी लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही श्री. गावित यांनी दिली.

बोरिवली ते विरार या पट्ट्यात कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्या वसईमार्गे जातात. पण या गाड्या नियमित नाही आहेत. तसेच या गाड्या कोकणातील काही मोजकेच थांबे घेतात.शिवाय त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना दादर या स्थानकावर यावे लागत आहे. वेळेचा अपव्यय तर होतोच पण खूप त्रास सहन करावा लागत आहे.

वसई टर्मिनसहून रत्नागिरी, सावंतवाडीकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कित्येक वर्षे केली जात आहे. खासदार श्री. गावित यांनी ती मागणी पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे. 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्या मुंबई- गोवा महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे भूमीपूजन

मुंबई- कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाड गाव, ता.पनवेल येथे गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता संपन्न होणार आहे.

या भूमीपूजन सोहळा कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य खासदार श्री.कुमार केतकर, लोकसभा सदस्य, मावळ खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, रायगड खासदार श्री.सुनिल तटकरे, विधानपरिषद सदस्य, सर्वश्री आमदार श्री.निरंजन डावखरे, श्री.अनिकेत तटकरे, श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार श्री.भरत गोगावले, श्री.प्रशांत ठाकूर, श्री.रविंद्र पाटील, श्रीमती आदिती तटकरे, श्री.महेंद्र थोरवे, श्री.महेश बालदी, श्री.महेंद्र दळवी यांची उपस्थिती राहणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना अतिरिक्त डबे

संग्रहित फोटो

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी काही गाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्र. २२९०८ हापा ते मडगाव एक्स्प्रेसला २९ मार्च रोजी  स्लीपर  कोच१ , परतीसाठी गाडी क्र. २२९०७ मडगाव हापा एक्स्प्रेसला ३१ मार्च रोजी एक डबा जोडण्यात येणार आहे.

गाडी क्र. २२४७५ हिसार ते कोइम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला टू टायर एसी एक कोच दिनांक ०५ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. परतीसाठी २२४७६ कोईम्बतूर जं.- हिसार जं. साप्ताहिक एक्स्प्रेसला दिनांक ०८ एप्रिल ते २९ एप्रिल पर्यंत जादा डबा जोडण्यात येणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search