Author Archives: Kokanai Digital

अलिबाग मधे ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार…दीडपट पैशाच्या अमीषाने हजारो कंगाल, करोडोंचा गंडा

अलिबाग: अलिबाग तालुक्यात एक सामुदायिक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. अलिबागमधील चार हजारांहून अधिक नागरिकांना २५ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. नॅसडॅक या अमेरिकन शेअर मार्केटमधील नावाजलेल्या कंपनीचा वापर करून हा हायटेक गंडा घालण्यात आला. सुरुवातीला ५०० रुपयांच्या बदल्यात १,२०० रुपये घेतल्यानंतर लोकांचा विश्‍वास बसला आणि त्‍यांनी जास्‍त गुंतवणूक केली. चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून या कंपनीने १४ दिवसांत १ लाखांवर २ लाख ४० हजार परतीची योजना काढली. अनेकांनी दागिणे गहाण ठेवून पैसे गुंतवले आणि काही दिवसातच कंपनीने वेब पोर्टल बंद झाले.

फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी अलिबाग पोलिस ठाण्यात येत सामुहीक तक्रार दाखल केली; मात्र, पोलिसांसमोर या हायटेक फसवणुकीचा गुंता सोडविण्याचे मोठे आव्हान आहे. फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वेब पोर्टलचा आय पी ऍड्रेसहा कॅलिफोर्नियामधील आहे, तर गुंतवणुकीसाठी जे संपर्क क्रमांक वापरले होते, ते बंद आहे. बहुतांश वेळा व्हॉट्‌सॲप आणि चॅटिंगद्वारे गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यात आला होता. आता कोणीही त्यास प्रतिसाद देत नसल्याने गुंतवणुकदारांना हवालदिल झाले आहेत.

अशाच प्रकारे नॅशडॅक कंपनीच्या नावाचा वापर करून नाशिक, शिक्रापूर, पुणे, डोंबिवली आणि आता अलिबागमध्ये फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. आश्‍चर्याची गोष्‍ट म्हणजे फसवणूक झालेल्यांपैकी अनेकांना ही बोगस कंपनी आहे, हे माहिती होते. मात्र हमखास मोबदल्‍याच्या मोहाने त्‍यांचा घात केला. अनेकांनी दागिने, उसनवारी आणि इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक काढून या कंपनीत पैसे टाकले. शिवाय मित्र, नातेवाइकांनाही पैसे गुंतवण्यास सांगितले. केवळ तीन महिन्यात २५ कोटी रुपयांचा गंडा या बोगस कंपनीने घातला.

गुंतवणुकदारांशी संपर्क साधण्यासाठी ५०० जणांचा एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला होता. अलिबाग तालुक्यातील एकट्या कुरूळ गावामध्ये असे चार ग्रुप कार्यरत होते. या गावातील लोकांनी लगतच्या गावातील आपले नातेवाईक, मित्रमंडळींनाही गुंतवणूक करण्यास सांगितले. आपल्‍यासह तिघांना सहभागी केल्‍यावर पहिल्या लेवलसाठी १ हजार रुपये, सहा जणांना सहभागी करून घेतल्यानंतर दोन हजार रुपये, मासिक पगार सुरू केल्यानंतर जास्तीत जास्त गुंतवणुकदारांना सहभागी करून घेण्याची चढाओढ पंचक्रोशीत सुरू होती. तीन महिन्यात या स्कीममध्ये अलिबाग तालुक्यात ५ हजारांहून अधिक लोकांनी पैसे गुंतवल्याचे उघड होत आहे.

दोनच दिवसात दुसरा वेब पोर्टल कार्यान्वित
फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला गुगल पे वरून थेट पैसे ट्रान्स्फर करता यायचे. परंतु त्यानंतर युटीआर पासवर्ड वापरावा लागत असे. यासाठी दररोज संध्याकाळी बोनस जाहीर केला जायचा, व्हॉट्‌सॲपवरून मॅसेज करून कंपनीच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली जायची. नॅशडॅक कंपनीच्या नावाने सुरू केलेला वेबपोर्टल बंद केल्यानंतर हीच पद्धत वापरून फसवणूक करण्यासाठी एनवायएससी नावाचा नवा वेबपोर्टल सुरू करण्यात आला आहे. त्याच्या वेबलिंक येथील नागरिकांच्या मोबाईलवर येऊ लागल्या आहेत.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

मुंबईकरांसाठी BEST ची दिवाळीसाठी BEST ऑफर. जाणून घ्या पूर्ण माहिती.

मुंबई: मुंबईकरांसाठी बेस्टने एक नवीन offer आणली आहे. या ऑफरमध्ये प्रवाशांना कोणत्याही मार्गावर 5 फेर्‍या फक्त 9 रुपयांमध्ये करता येतील. ही ऑफर 7 दिवसांसाठी वैध असेल. बेस्ट चलो या application द्वारे प्रथमच व्यवहार करणार्‍या वापरकर्त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दिनांक 12 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत ही ऑफर असेल. 

प्रवाशांनी बसच्या तिकींटां साठी डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही ऑफर आणली गेली आहे.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

कान्होजी आंग्रे यांच्या बद्दल केलेली ती चूक शेवटी Google ने सुधारली….शिवभक्तांच्या मोहिमेला यश

Google या सर्च इंजिन वर कान्होजी आंग्रे यांच्या बद्दल चुकीची माहिती लिहिली गेली होती ही बाब लक्षात घेऊन शिवभक्तांनी आणि इतिहास प्रेमीं संघटनांनी यावर आक्षेप घेण्यासाठी मोहीम राबवली होती. दोन दिवसात हजारो आक्षेप गुगलकडे नोंदविण्यात आले होते. यानंतर गुगलने या संदर्भातील दुरुस्ती केली आहे. कान्होजी राजे आंग्रे यांच्या समोरील पायरेट्स म्हणजे समुद्री डाकू असा उल्लेख हटविण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे

हेही वाचा धक्कादायक: स्वराज्याच्या आरमाराच्या प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती- कान्होजी आंग्रे यांचा ‘समुद्री डाकू’ असा उल्लेख







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

शिवसेनेतर्फे निवडणूक चिन्हाचे प्राथमिक स्वरुप प्रसिद्ध… असे असेल हे स्वरूप…

मुंबई :निवडणुक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिले आहे तर मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. 

शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’हे नाव मिळालं तर चिन्हासाठी तीन नवे पर्याय द्यायला सांगितले आहे.

उद्धव ठाकरे गटाने 3 चिन्हे दिली होती. शेवटी मशाल हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या पदरी पडले आहे. 

 

निवडणूक आयोगाचा निकाल

  •  त्रिशूल नाकारलं- कारण ते धार्मिक आहे, दोन्ही गटांचा दावाही
  • उगवता सूर्य नाकारलं- कारण ते डीएमके पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. दोन्ही गटांचा दावाही
  •  मशाल मिळाली कारण- समता पक्षाचे चिन्ह होतं, 2004 नंतर समता पक्ष नोंदणी रद्द, त्यामुळे फ्री सिम्बॉल

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

धक्कादायक:युवा दशावतारी कलाकार शांती कलिंगण यांचे अकाली निधन

सिंधुदर्ग :जिल्ह्यातील युवा दशावतारी कलाकार ओंकार रामचंद्र उर्फ शांती कलिंगण (वय ३० वर्षे) यांचे आज गोवा येथील बांबुळी रुग्णालयात सोमवारी सकाळी उपचार चालू असताना निधन झाले. त्यांचा अकाली निधनाने दशावतार क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 
विनोदी आशयाचा खलनायक अशी त्यांची ओळख होती. कलेश्वर दशावतारी ह्या त्यांचा नाट्यमंडळात ते कार्यरत होते. नेरूर  येथील देसाईवाडा येथील ते रहिवासी होते. कैलासवासी बाबी कलिंगण यांचे ते नातू होते. अलीकडेच शांती कलिंगण यांचे काका सुधीर कलिंगण यांचे निधन झाले होते त्या धक्क्यातून सावरत असताना कलिंगण कुटुंबाला अजून एक धक्का लागला आहे. त्यांचा जाण्याने कोकणातील दशावतार क्षेत्राचे  मोठे नुकसान झाले आहे  

Loading

प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अशीही क्लृप्ती. कॉलनीचे नाव बदलून चक्क ‘नरक पुरी’ 

आग्रा: प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अशीही क्लृप्ती. कॉलनीचे नाव बदलून चक्क ‘नरक नगरी’ 

वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने आग्रा येथील रहिवाशांनी निषेधासाठी एक आगळी वेगळी आणि जरा हटके शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क आपल्या परिसराचे नाव बदलून नवीन नाव ठेवले आहे. ही नवीन नावे पण अशी आहेत की ती वाचून सरकारला पण लाज वाटावी.

 

काय आहेत ही नवीन नावे?

नरक पुरी 

किचड नगर 

दुर्गंधी शील 

नाला सरोवर कॉलनी 

बदबू विहार 

 

जागोजागी घाणीचे साम्राज्य, खड्डेमय रस्ते अशा प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा आयडिया आपल्या परिसरात पण करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटते?







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

 

Loading

धक्कादायक: स्वराज्याच्या आरमाराच्या प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती- कान्होजी आंग्रे यांचा ‘समुद्री डाकू’ असा उल्लेख

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी  स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुखांबद्दल गुगलवर चुकीची माहिती येत असल्याने शिवप्रेमी संतापले आहेत. सर्च इंजिन असलेल्या गुगलवर कान्होजी आंग्रे असं सर्च केल्यावर त्यांचे वर्णन ‘Pirate’ म्हणजे ‘समुद्री डाकू’ असं येत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. कान्होजी आंग्रे यांनी स्वराज्यावर परकीयांनी केलेली आक्रमण परतावून लावलीत. त्यासोबत कित्येक मोहिमा फत्ते केल्या, या मातब्बर स्वराज्यरक्षकाबाबत गुगलवर सर्च केल्यावर चुकीची माहिती आल्यावर तळपायाची आग मस्तकात जाणं साहजिकच आहे. 

स्वराज्य उभारणी त्यानंतर स्वराज्याच्या रक्षणासाठी कित्येकदा आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या सरदाराविषयी गुगल ‘पायरेट’ म्हणून दाखवत आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू असून शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.  

GOOGLE मॅनॅजमेन्ट ला त्यांची चूक दाखवून सुधारवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फीडबॅक गेले पाहिजेत. त्यासाठी खालील स्टेप द्वारे तुमचा फीडबॅक पाठवा.

1. गुगल वर ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा !

2. नावा पुढे दिसणारे तीन डॉट वर क्लीक करून ‘send feedback’ क्लिक करा !

3. नवीन window open झाल्यावर तिथे ‘incorrect’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’ असे लिहून सेंड करा ! लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा !

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

सिंधुदुर्गातील उद्योजकांसाठी महत्वाची बातमी – महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे (2022) कुडाळ येथे आयोजन

सिंधुदुर्ग :महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ च्या उद्धिष्टपुर्तीचा एक भाग म्हणून तळागाळातील नाव उद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाचे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्र (BOOTCAMP ) १३ ओक्टोम्बर रोजी कुडाळ येथे संत राऊळ महाराज महाविद्यालयात संपन्न होणार आहे. या उपराक्रमात नवउद्योजकांना तज्ञ् मार्गदर्शन, प्रोत्साहन, निधी व पाठबळ या संबधी आवश्यक ती माहिती आणि मार्गदर्शन करण्यात येईल. तरी या उपक्रमात नवसंकल्पना असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन तसेच शिबिराच्या दिवशी ऑफलाईन नावनोंदणी करून सहभागी होण्यासाठी शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.
अधिक माहितीकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. 
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेची ठळक वैशिष्टे:-
महाराष्ट्रातील तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यनपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. नवसंकल्पनाना तसेच सुरुवातीच्या टप्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे. राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे.  महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कल्पना असणारे सर्व नागरिक या यात्रेत सहभागी होण्यास पात्र असतील.
प्रत्येक जिल्हयामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जाणार आहेत यामध्ये रु 10,000/- ते 1,00,000 पर्यंतचे पारितोषिक रक्कम अदा करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व क्षेत्रांचा(sector) समावेश असेल उदा. कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास(sustainability),smart Infrastructure &mobility), इ. प्रशासन आणि इतर कुठलाही उपाय अथवा समाधान जो नाविन्यपूर्ण आहे इत्यादी. 
राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल निधीसाठी सहाय, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन सत्रे तसेच सॉप्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड केडीटस,क्लाऊड क्रेडीटस सारखे इतर लाभ पुरविण्यात येतील. 






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ‘वाघ’ ह्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही

मुंबई :अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेकडून वाघ किंवा वाघाचा चेहरा हे चिन्ह निशाणी म्हणून निवडणूक आयोगाकडे मागण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणं हे चिन्ह फ्रिज केलं अंधेरीच्या पोट निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे. 

 

वाघ ह्या चिन्हासाठी शिवसेना का आग्रही? 

धनुष्यबाण हे जरी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असले तरी वाघाचा चेहरा आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक जाहिरातीत, बॅनर वर राहिला आहे. त्यामुळे हे चिन्ह शिवसेनेचे नवीन निवडणूक चिन्ह झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. 

निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नाही 

निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नसल्याची माहिती मिळत आहे. निवडणुक आयोगाकडे हत्ती किंवा सिंह ही चिन्हे उपलब्ध आहे, त्यामुळे शिवसेनेला वाघ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Loading

आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी

 

सिंधुदुर्ग :अ‍ार्थिकगैरव्यवहाराप्रकरणी सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरेंच्या गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने चौकशी केली आहे.एसीबीने तब्बल अर्धा तास चौकशी केली, यानंतर 20 वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना आठ दिवसांची मुदत दिली आहे.वैभव नाईक हे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत.

रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाई यांच्या मालमत्तेविषयी चौकशी केली. कणकवलीतील शासकीय विश्रामगृहात ही चौकशी झाली.  यावेळी एसीबीने वैभव नाईक यांना 2002 ते 2022 या कालावधीतील उत्पन्नाची चौकशी केली. तसेच नाईक यांना उत्पन्नाचा तपशील देण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे.रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाकडून ही चौकशी करण्यात आली. यानंतर एसीबीने 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थितराहण्यासंदर्भात नोटीस दिली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांची नजर आता कोकणाकडे वळल्याचे दिसत आहे

[block id=”ad1″

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search