Author Archives: Kokanai Digital

शिमगोत्सवासाठी मध्यरेल्वेच्या कोंकण रेल्वे मार्गावर ६ विशेष गाड्या

Holi Special Trains | प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोंकण रेल्वेमार्गावर ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी कोंकण रेल्वे मार्फत काही अतिरिक्त गाड्या सोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोकणात शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आरामदायक होईल हे नक्की
1) Train no. 09057 / 09058 Udhana Jn  –  Mangaluru  Jn   – Udhana Jn  Special on  Special Fare
Train no. 09057 Udhana Jn  –  Mangaluru  Jn
ही गाडी दिनांक  ०१/०३/२०२३ (बुधवार), ०५/०३/२०२३ (रविवार) या दिवशी ही गाडी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058  –  Mangaluru  Jn  – Udhana Jn
ही गाडी दिनांक  ०२/०३/२०२३ (गुरुवार), ०६/०३/२०२३ (सोमवार) या दिवशी ही गाडी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५  वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा (RN), माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल, तोकुर
डब्यांची संरचना
दिनांक  ०१/०३/२०२३ (बुधवार) मंगळुरूसाठी प्रस्थान करणारी आणि दिनांक  ०२ /०३/०२२३ (गुरुवार) परत येणाऱ्या गाडीच्या डब्यांची स्थिती
एसएलआर – ०1 + जेनेरेटर वॅन – 01 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 02  असे मिळून एकूण LBH  22  डबे
दिनांक  ०५/०३/२०२३ (बुधवार) मंगळुरूसाठी प्रस्थान करणारी आणि दिनांक  ०६  /०३/२०२३ (गुरुवार) परत येणाऱ्या गाडीच्या डब्यांची स्थिती
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण  22  डबे
2) Train no. 09412 / 09411 Ahmedabad  –  Karmali  – Ahmedabad Jn  Special on  Special Fare
Train no. 09412 Ahmedabad – Karmali
ही गाडी दिनांक  ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी अहमदाबाद  या स्थानकावरुन सकाळी  ०९:३०  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:२५ वाजता करमाळी  या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411 – karmali  – Ahmedabad
ही गाडी दिनांक  ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी करमाळी  या स्थानकावरुन सकाळी  ०९:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता अहमदाबाद  या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
गेरातपुर, वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा (RN), माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड,  संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,  कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 05+ स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण  24  डबे
आरक्षण 
गाडी क्रमांक 09411 या गाडीचे आरक्षण दिनांक २६/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.

एका रात्रीत ३ मंदिरात चोरी; चोरट्यांसाठी कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’

बांदा : काल रात्री सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील एक नव्हे तर तीन मंदिरात चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.  मडुरा, रोणापाल व इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. सर्वप्रथम चोरट्यांनी मडुरा माऊली मंदिराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फंडपेटी फोडून रोकड लंपास केली. त्यानंतर रोणापाल माऊली मंदिरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास इन्सुली माऊली मंदिर फोडले. त्यात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
इन्सुली व रोणापाल मंदिरात चोरी करताना दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंदाजे विशीतील दोघे युवक दिसत आहेत. बांदा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बांदा पोलीसांसमोर चोरट्याने पकडण्याचे आव्हान आहे.
कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’
तळकोकणतील मंदिरे काही अपवाद वगळता गाववस्तीपासून दूर असतात. रात्री मंदिरपरिसर निर्मनुष्य असतो. चोरट्यांना ती ईझी टार्गेट वाटायला लागली आहेत त्यामुळे या ठिकाणी  चोरीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. चोरीचे प्रकार वाढल्याने अनेक मंदिरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. पण सुरक्षेच्या या उपाययोजना पण कमी पडताना दिसत आहेत.  

जुगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून कणकवलीत रिक्षा जाळण्याचा प्रकार

कणकवली | जुगाराच्या पैशाची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरासमोर लावलेली रिक्षा जाळून टाकल्याची खळबळ जनक घटना कलमठ मठकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडली. या संदर्भात सुरज जाधव (कणकवली – कलमठ मठकर कॉम्प्लेक्स) यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते रमेश  चव्हाण यांच्यासह आप्पा शिर्के याच्या विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा जाळण्याच्या या प्रकाराने मात्र तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 
याबाबत सुरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज जाधव यांचे जुगाराच्या पैशाच्या देवान घेवाणीवरून वरून काल बुधवारी आप्पा शिर्के यांच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी रिमेश चव्हाण, सुनील काणेकर व चेतन पाटील यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच रिक्षाच्या मडगळ वर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी सुरज जाधव यांनी कणकवली पोलिसात बुधवारी रात्री चौघां विरोधात तक्रार दाखल केली होती. सुरज जाधव हे घरी जात असताना रिमेश चव्हाण यांनी तू रिक्षा घेऊन घरी जा तुझी वाटत लावतो अशी धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादी हे घरी गेले. व रात्री झोपत असताना त्यांना घराच्या खिडकीतून बाहेर ज्वाळा दिसू लागल्या. त्यावेळी त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता रीमेश चव्हाण व आप्पा शिर्के हे पळताना दिसून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पाणी मारून रिक्षाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीत रिक्षा जळून बेचिराख झाली होती. तर या रिक्षाच्या बाजूला संकेत फोंडेकर यांच्या असलेल्या दोन दुचाकी ना देखील आगीची झळ बसली. या आगीत रीक्षेचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कणकवली पोलिसात संशयित आरोपींच्या विरोधात 435 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होळीसाठी मुंबई-पुण्यावरून कोंकण रेल्वेच्या २२ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरु ….

Konkan Railway News | पुढील महिन्यात येणाऱ्या होळी सणाकरिता कोकण रेल्वेने या मार्गावर काही अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 
  
1) Train no. 01459 / 01460 Lokmanya Tilak (T) –  Madgaon Jn   – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01459 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn Special (Weekly)
ही गाडी दिनांक  २६/०२/०२२३ , ०५/०३/२०२३ आणि  १२/०३/२०२३ या दिवशी (रविवारी) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री  २२:१५  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी  १०:३० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01460 Madgaon Jn – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly)
ही गाडी दिनांक  २७/०२/०२२३ , ०६/०३/२०२३ आणि १३/०३/२०२३ या दिवशी (सोमवारी) ही गाडी मडगाव या स्थानकावरुन सकाळी ११:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री  २३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे,पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी,
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 17   डबे
2) Train no. 01445 / 01446 Pune Jn  –  Karmali  – Pune Jn  Special (Weekly):
Train no. 01445  Pune Jn  –  Karmali  Special (Weekly)
ही गाडी दिनांक  २४/०२/०२२३ , ०३/०३/२०२३, १०/०३/२०२३ आणि  १७/०३/२०२३ या दिवशी (शुक्रवारी) ही गाडी पुणे या स्थानकावरुन संध्याकाळी १७:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी  ०८:३०  वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01446 Karmali – Pune Jn  Special (Weekly)
ही गाडी दिनांक  २६/०२/०२२३ ,०५/०३/२०२३, १२/०३/२०२३ आणि  १९/०३/२०२३ या दिवशी (रविवारी ) ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री  २३:३५  वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
लोणावळा,  कल्याण,पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम,
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग(जनरल)  – 04  + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 22 डबे
3) Train no. 01448 / 01447 Karmali  – Panvel  –  Karmali  Special (Weekly):
Train no. 01448  Karmali – Panvel  Special (Weekly)
ही गाडी दिनांक  २५/०२/०२२३ , ०४/०३/२०२३, ११/०३/२०२३ आणि  १८/०३/२०२३ या दिवशी (शनिवारी) ही गाडी करमाळी  या स्थानकावरुन संध्याकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री  २०:१५ वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01447 panvel  – Karmali   Special (Weekly)
ही गाडी दिनांक  २५/०२/०२२३ , ०४/०३/२०२३, ११/०३/२०२३ आणि  १८/०३/२०२३ या दिवशी (शनिवारी) ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २२:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी  ०८:३० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली , राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, 
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग(जनरल)  – 04  + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 22 डबे
आरक्षण
Train no. 01446 Karmali – Pune Jn या गाडीचे आरक्षण दिनांक २३/०२/२०२३ पासून, तर Train no. 01448 Karmali – Panvel आणि Train no. 01460 Madgaon Jn – Lokmanya Tilak (T) या गाड्यांचे आरक्षण २४/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेत्स्थानवर उपलब्ध होईल अशी माहिती कोंकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.

रायगडच्या शाळा बनत आहेत डिजिटल; आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी वापर…

संग्रहित फोटो

रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या 2 हजार 603 शाळांपैकी 2 हजार 12 शाळा डिजिटल झाल्या असून, उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. या शाळाही टप्प्याटप्प्याने पूर्ण डिजिटल करण्याचा मानस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >आता गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगातून शिक्षण घेता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शाळा डिजिटल मोबाईल करण्यात येत आहेत. 

प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भावी आयुष्याचा पाया असल्याने येथे मिळणारे शिक्षणही आधुनिकतेला धरून असणे अत्यावश्यक आहे. त्यातच खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थही प्रयत्न करत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकही यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा सध्या डिजिटल बनल्या आहेत.शाळांतील विद्यार्थी स्मार्ट फोनच्या माध्यमातून गृहपाठ, अध्ययन करत आहेत.

आता गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

मुंबई | गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

हेही वाचा >बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये गोंधळ; विद्यार्थ्यांना बोनस म्हणून ६ गुण मिळणार?

याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना हा शिधा दिला जाईल. 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

हेही वाचा > संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप…

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर मध्ये गोंधळ; विद्यार्थ्यांना बोनस म्हणून ६ गुण मिळणार?

HSC Exam |राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांसाठी केवळ सूचना देण्यात आल्या, तर एका प्रश्नासाठी प्रश्न न देता थेट उत्तरच देण्यात आले आहे.त्यामुळे या तीन प्रश्नांचे सहा गुण विद्यार्थ्यांना देण्याची मागणी करण्यात आली असून, सलग दुसऱ्या वर्षी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचे समोर आले आहे.
राज्यभरात बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने काटेकोर उपाययोजना केल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. अनेकांना प्रश्नच कळले नाही, तर काहींनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षीही इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मंगळवारच्या इंग्रजी विषयाच्याच प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आल्याने मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘शिंदे गट’ ऐवजी ‘शिवसेना’ असे संबोधले जावे – पत्राद्वारे विनंती

मुंबई : दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात आपल्या पक्षास ‘शिंदे गट’ असे न संबोधता ‘शिवसेना’ असे संबोधले जावे अशी विनंती शिवसेनेतर्फे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.

हे पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे.

 

 

काजू बागेतील आग विझवताना शेतकर्‍याचा मृत्यू

रत्नागिरी:  रत्नागिरी शहरापासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या हातखंबा तारवे वाडी येथे काजू बागायातीला लागलेल्या भीषण वणव्यात एका शेतकऱ्याचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला आहे. गोविंद विश्राम घवाळी (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

हातखंबा येथील काजूच्या बागेत आचानक वणवा पसरला. त्यामुळे बाग वाचविण्यासाठी शेतकरी गोविंद घवाळी यांनी धाव घेतली. मात्र एवढी आग भीषण होती की त्या आगीत ते होरपळले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली. 

 

संजय राऊत यांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप…

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल आहे.

हेही वाचा >Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र आपल्या ट्विटटर हँडलवरून ट्विट केले आहे. आपली सुरक्षा हटवण्यात आल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे.

राऊत यांनी काय लिहिलं आहे पत्रात?

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search