Author Archives: Kokanai Digital

आमच्या रेग्युलर लोकल्स बंद करून त्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करू नका.. कळवा आंदोलन…

ठाणे : तुम्हाला AC लोकल्स वाढवायच्या असतिल तर खुशाल वाढवा, पण त्यासाठी आमच्या रेग्युलर लोकल बंद करून त्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करू नका असे सामान्य लोकल प्रवाशांचे म्हणने आहे. आधीच मध्य रेल्वेच्या 56 रेग्युलर गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित केलेल्या होत्या आणि ह्या आठवड्यात आजून 10 सामान्य गाड्या AC लोकल्स मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला त्यामुळे आज कळवा येथे AC लोकल्स थांबवून प्रवाशांनी आंदोलन केले.

सव्वा आठची कळवा कारशेड मधून सुटणारी ठाणे- सीएसमटी लोकल आहे. जी पूर्वी साधी होती. त्यामुळे कळव्यातील अनेक प्रवासी या गाडीतून कारशेडने प्रवास करत होते. आता ही लोकल एसी केल्याने प्रवाशांना लोकल मिळाली नाही. त्यामुळे कारशेडजवळ सुमारे पाऊण तास लोकल थांबवून ठेवली होती.

Related news: मध्य रेल्वेच्या ‘ह्या’ गाड्या AC Locals मध्ये परावर्तित होणार.

संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. मात्र त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना तिथून हटवलं. यानंतर लोकल वाहतूक पूर्ववत केली गेली. याशिवाय, रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांना ताब्यात देखील घेतले आहे.

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांची ट्विट

राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर च्या माध्यमातून सामान्य लोकल्स AC लोकल्स मध्ये परावर्तित केल्याचा विरोध केला आहे.

Loading

‘सुपर वासुकी’ देशातील सर्वात लांबीची मालगाडी..

देशातील सर्वात लांबीची मालगाडी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेद्वारे चालवली जात असून ती देशातील सर्वात लांबीची मालगाडी मानली जाते. हि मालगाडी छत्तीसगडमधील बिलासपूर सेक्शनमध्ये भिलाई ते कोर्बा ह्या स्टेशन दरम्यान चालवली जाते. ह्या मार्गाची लांबी सुमारे २२४ किलोमीटर आहे.

ह्या मालगाडी ला एकूण २९५ डबे आहेत तर एकूण ६ इंजिन्स जोडली आहेत. ह्या मलगाडीची लांबी सुमारे ३.५ किलोमीटर आहे. हि गाडी सुमारे २७००० टन कोळसा एकावेळी वाहून नेते. ह्या मालगाडीचे नाव ‘सुपर वासुकी’ असे देण्यात आले आहे.

ही मालगाडी सुरू करून आपण वेळ, पैसे आणि मनुष्यबळाची बचत केली आहे असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. एवढ्या लांबीची मालगाडी चालवणे हे एक प्रकारे आव्हान होते. अनेक तांत्रिक बाबी पहाव्या लागल्या आहेत, तसेच सुरक्षिततेच्या बाजूने पण विचार करण्यात आलेला आहे.

संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत ऑस्ट्रेलिया येथील The Australian BHP Iron Ore .हि सर्वात लांब मालगाडी म्हणून नोंद केली गेली आहे. हि मालगाडी ७.३५३ किलोमीटर लांबीची असून त्याला ६८२ डबे आहेत.

Loading

निष्ठेचे प्रमाणपत्र हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही.. आमदार राजन साळवी

राजापूर:शिवसेनेचा कोकणातील आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला होता. शिंदे गटात जाऊ शकणारा हा शिवसेनेचा आमदार दुसरा-तिसरा कोणी नसून राजन साळवी हे आहेत ह्या आशयाच्या बातम्या काल प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला अजून एक धक्का बसतो की काय अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. अधिवेशन सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राजन साळवी यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजन साळवी आता शिंदे गटात प्रवेश करतील, या चर्चेने जोर धरला होता.

पण आज ट्विटर च्या माध्यमातून ह्या बातम्या खोट्या आहेत असे जाहीर केले आहे. ”आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी….काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… ”

”निष्ठेचे प्रमाणपत्र दि.15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही….” ह्या ट्विट सोबत त्यांनी स्व. बाळासाहेबांसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे.

राजन साळवी हे कोकणातील लांजा-राजापूर-साखरपा ह्या मतदार संघातून सलग 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत.

Loading

पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनेतील सदनिका विजेत्यांची नावे जाहीर..

मुंबई : पुणे मंडळामार्फत म्हाडा च्या विविध योजनतील २७८ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज पार पाडण्यात आली. ह्या सोडतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला.

विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते.

ह्या सोडतीमधील विजेत्यांचे आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे म्हाडाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित केले असून खालील लिंक वर क्लिक करून आपण ती यादी पाहू शकता.

https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/P17/draw/P17.html

Loading

गोविंदांना ह्या वर्षी ‘विमा संरक्षणच्या’ बदल्यात ‘अर्थसहाय्य’ …जाणून घ्या काय असणार नियम.

मुंबई :दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून  आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शिंदे सरकारने आज घेतला आहे. सरकारने त्याबाबत नियमावली जाहीर केली आहे. आर्थिक सहाय्य फक्त ह्या वर्षासाठी मर्यादित असेल पुढील वर्षी गोविंदा पथकांच्या विम्या बाबत सरकार निर्णय घेईल असे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले आहे.

जर एखादी दुर्दैवी घटना घडल्यास खालील परिस्तिथीमध्ये गोविंदांना आर्थिक साहाय्य दिले जाईल

गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.

दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल.

Loading

भाजपच्या संसदीय बोर्डातपण नितीन गडकरी यांना स्थान नाही… गडकरींचा ‘अडवाणी’ करायचा प्लॅन?

दिल्ली: काल भाजपने आपल्या संसदीय बोर्डची यादी घोषणा करत त्यातील सदस्याची नावे जाहीर केली आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे ह्या समितीमध्ये एकाही महाराष्ट्र राज्यातील नेत्याच्या समावेश केला गेला नाही आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलले गेले आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पण ह्या समितीमध्ये स्थान देण्यात असलेले नाही आहे. त्यामुळे ह्या समितीमध्ये आता एकही मुख्यमंत्री नाही आहे.

ह्या समितीमध्ये जे. पी. नड्डा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांचे खच्चीकरण?

भाजपच्या केंद्रीय संसदीय बोर्ड आणि केंदीय निवडणूक समितीमध्ये भाजपचे कार्यशील आणि वजनदार नेते नितीन नमस्कार यांना स्थान दिले नसल्याने विविध चर्चा होत आहेत.

पक्षाने असे का केले या विषयी काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. ह्या समितीवर निवडीसाठी वयाची अट पाहता ती पक्षाने 75 ठेवली आहे. नितीन गडकरी यांचे वय 65 आहे. त्यांच्या जागी निवड करण्यात आलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांचे वय 77 आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांना का डावलले याचे नेमके कारण आजून समजले नाही.

नितीन गडकरी यांना भावी पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहे. नितीन गडकरी यांचे केंद्रात आणि पक्षात वाढणारे प्राबल्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी त्यांचे जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे बोलले जात आहे. दुसरीकडे नितीन गडकरी यांना त्यांचा स्पष्टवक्तेपणा नडत असल्याचे आणि त्यांच्या मागील काही विधानांमुळे त्यांना दूर करण्यात येत आहे अशी चर्चा आहे. मागेच नितीन गडकरी यांनी आता सत्ताकारणाचा कंटाळा आला आहे असे जाहीरपणे बोलून पण दाखवले होते. कारण काहीही असो पण त्यांना डावलून एकप्रकारे भाजप महाराष्ट्र राज्याचा अपमान करत आहे असे दिसून येत आहे.

Loading

50 खोके-एकदम ओके….आलेरे आले-गद्दार आलेत… आजचा दिवस घोषणांचा….

मुंबई:अधिवेशनाचा पहिल्या दिवशी विरोधक नवीन सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावर धारेवर धरतील अशी चर्चा होत होती. पण पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस विशेष चर्चित राहिला तो विरोधकांनी सभागृहाबाहेर केलेल्या विविध घोषणांनी.

घोषणाबाजी मध्ये सर्वात आघाडीवर होते ते शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे.

विरोधकांची पाहिली घोषणा होती. शिंदे गटासाठी

50 खोके… एकदम ओके..

दुसरी घोषणा होती ती पण शिंदे गटासाठी

आलेरे आले…. गद्दार आलेत.

विरोधकांची तिसरी घोषणा भाजपासाठी, नुकतेच कॅबिनेट मंत्री बनलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्यावरुन होती आणि उपरोधिक होती.

सुधीर भाऊंना चांगले खाते न देणार्‍या या सरकारचा धिक्कार असो…..

चौथीही घोषणा भाजपसाठी, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात करण्यात आलेल्या आशीष शेलार यांच्यावरुन होती. अर्थात ही घोषणा पण उपरोधिक होती.

आशिष शेलार यांना मंत्रिपद न देणार्‍या या सरकारचा विजय असो…

 

यासारख्या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दाणादाण करून सोडला होता.

Loading

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर, देवेंद्र फडणवीस यांचा समावेश, नितीन गडकरी यांना डावलले

नवी दिल्ली :भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे. यामध्ये भाजपच्या देशातील १५ बड्या नेत्यांचा समावेश केला गेला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर समितीच्या सदस्यपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह सह देशातील इतर नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश ह्या समितीत केला गेला आहे. ह्यापूर्वी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले होते. दुसरीकडे नितीन गडकरी यांना ह्या समितीत स्थान देण्यात आले नाही त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.

केंद्रीय निवडणूक समिती

Sr. No. नाव पद पत्ता
1 श्री जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष) भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली
2 श्री नरेन्द्र मोदी प्रधानमंत्री, भारत दिल्ली
3 श्री राजनाथ सिंह कैबिनेट मंत्री,भारत सरकार दिल्ली
4 श्री अमित शाह कैबिनेट मंत्री,भारत सरकार दिल्ली
5 श्री बी. एस. येदियुरप्पा पूर्व सीएम, कर्नाटक कर्नाटक
6 श्री सर्बानंद सोनोवाल युनियन मिनिस्टर आसाम
7 डॉ. के. लक्ष्मण राष्ट्रीय अध्यक्ष - अन्य पिछड़ा वर्ग मोर्चा तेलंगाना 
8 डॉ. इकबाल सिंह लालपुरा संसदीय बोर्ड सदस्य पंजाब
9 डॉ सुधा यादव संसदीय बोर्ड सदस्य हरियाणा
10 डॉ सत्यनारायण जटिया संसदीय बोर्ड सदस्य दिल्ली
11 श्री भूपेंद्र यादव युनियन मिनिस्टर दिल्ली
12 श्री देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री महाराष्ट्र 
13 श्री ओम प्रकाश माथुर खासदार दिल्ली 
14 श्री बी एल संतोष राष्ट्रीय महासचिव (संगठन) कर्नाटक 
15 श्रीमती वनथी श्रीनिवासनी राष्ट्रीय अध्यक्ष - महिला मोर्चा नई दिल्ली 

Loading

भाजपनेते मोहित कंबोज यांचे ट्विटर बॉम्ब.. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा नेता रडारवर

भाजप नेते मोहित कंबोज यांनी कालपासून केलेल्या काही ट्विटस चर्चेचा विषय बनल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या यादीत जोडला जाणार आहे असे त्यांनी काल एका ट्विट मध्ये म्हंटले आहे.

आजच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. नवीन सरकारला 3 विरोधी पक्षाचे आव्हान आहे. त्यात काल राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर खूप परखड भाषेत नवीन सरकारातील काही नेत्यांवर टीका केली होती. ह्या सर्व धर्तीवर मोहित कंबोज यांनी केलेल्या ह्या ट्विट मुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे. अधिवेशनामध्ये विरोध पक्षाचा विरोध दाबण्यासाठी हे सर्व केले जात आहे असे बोलले जात आहे.

आज सकाळी पुन्हा मोहित कंबोज यांनी पुन्हा ह्या विषयावर अजून एक ट्विट केले आहे.

1:- Anil Deshmukh
2:- Nawab Malik
3:- Sanjay Panday
4:- Sanjay Raut
5:- __अपना 100% Strike Rate Hai !

असे हे ट्विट आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक होण्याचा काही दिवस आधी पण तशा आशयाचे ट्विट मोहित कंबोज यांनी केले होते आणि संजय राऊत यांना काही दिवसांत अटक झाली. आता ह्या ट्विट द्वारे त्यांचा रडार वर कोणता नेता आहे ते लवकरच समजेल. 

Loading

मध्य रेल्वेच्या ‘ह्या’ गाड्या AC Locals मध्ये परावर्तित होणार.

मुंबई: मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील एकूण 10 गाड्या वातानुकूलित (AC locals) मध्ये परावृत्त करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने आज एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

AC locals ना वाढता प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला काहीसे महाग असलेले तिकीट कमी केल्याने ह्या गाड्यांच्या प्रतिसादात वाढ झाली आहे, त्यामुळे ह्या वातानुकूलित गाड्यांचा फेर्‍यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.

दिनांक 19 ऑगस्ट 2022 पासून खालील गाड्या AC locals म्हणुन चालविण्यात येतील.

 

 

 ह्या वाढलेल्या 10 लोकल्स पकडून आता मध्य उपनगरीय मार्गावर चालणार्‍या AC लोकल्सची संख्या एकूण 66 एवढी झाली आहे. पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून pdf फाइल डाऊनलोड करा. 

Mumbai-AC-Main-Line-Suburban-Time-Table-19.08.2022

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search