Author Archives: Kokanai Digital

‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यास यूआरएल फाऊंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर

   Follow us on        
कोकणातील शाश्वत जीवन शैलीचे महत्व देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, तळकोकणातील ‘रानमाणूस’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रसाद गावडे यास यूआरएल फाऊंडेशनचा यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील, सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडेने आज कोकणी रानमाणूस म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातील पर्यटन, इथली खाद्यसंस्कृती, जीवनशैली, शेती याबद्दलची माहिती प्रसाद आपल्या कोकणी रानमाणूस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून या इंजिनिअर तरुणाने इकोटूरिझमच्या माध्यमातून स्वंयरोजगाराची वाट धरली. कोकणाच्या शाश्वत विकासाबद्दल बोलताना प्रसाद तितक्याच परखडपणे स्थानिक प्रश्नही प्रशासनासमोर मांडतो म्हणूनच तो असामान्य ठरत आहे. त्याच्या या कार्याची दखल घेण्यात आली असून त्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रोख रक्कम रुपये एक लाख आणि सन्मानचिन्ह असे या  पुरस्काराचे स्वरूप आहे. दिनांक २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
युआरएल फाउंडेशनबाबत 
उदयदादा लाड यांनी स्थापना केलेल्या युआरएल (उदयदादा राजारामशेठ लाड) फाउंडेशनतर्फे  मुख्यत्वेकरून समाजातील साहित्य आणि सामाजिक कार्य करणाऱ्या निस्वार्थी व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक निधीतून हे पुरस्कार दरवर्षी वितरित केले जातात. महाराष्ट्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पात्र सामाजिक कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना ‘१,००,००० (एक लाख)’ बक्षीस देण्याचा वारसा यूआरएल फाउंडेशनने सुरू ठेवला आहे.

New Railway Line: महाराष्ट्रात अजून एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

   Follow us on        
New Railway Line:महाराष्ट्रात अजून एका नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. शनिशिंगणापूरला थेट रेल्वे नसल्याने राहुरी-शनिशिंगणापूर या नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देण्यात आली आहे. 22 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शनिशिंगणापूर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. शनि दर्शनासाठी दररोज सुमारे 45 हजार भाविक दर्शनासाठी येतात.
शनिशिंगणापूर राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर, पैस खांब यांसारख्या धार्मिक स्थळांना हा रेल्वे मार्ग सोयीस्कर होणार आहे. त्यातून परिसरात स्थानिक पर्यटनवाढ आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. दररोज चार रेल्वे या मार्गावर धावण्याचे प्रस्तावित असून, त्यातून वर्षाकाठी 18 लाख प्रवासी रेल्वे प्रवास करतील, असा अंदाज रेल्वे मंत्रालयाने वर्तविला आहे.
विकास आणि अध्यात्मिक केंद्र जोडण्यासाठी हा रेल्वेमार्ग एक दिशादर्शक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकल्पाला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे.

Panvel: पनवेल स्थानकावरून जाणार्‍या गाड्यांची वाहतुक जलद करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

   Follow us on        
पनवेल: मुंबईत रेल्वेची क्षमता वाढवणे आणि रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखलीदरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठी ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाईल. पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे. उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत महत्त्वाचे जंक्शन आहे. सध्या, ग्रेड सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सने वाहतुकीसाठी विलंब होतो. यावर मात करण्यासाठी, दोन कॉर्ड लाइन्स प्रस्तावित केल्या होत्या. आता त्यांना मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पनवेल स्थानकाहून होणारी वाहतूक जलदगतीने होणार आहे.
खालील दोन कॉर्ड लाइन्सना मान्यता देण्यात आली आहे. 
१)जेएनपीटी ते कर्जत कॉरिडॉरवर दिवा-पनवेल लाइन फ्लायओव्हर मार्गे कॉर्ड लाइन
२) काळटुंरीगाव केबिन आणि सोमाटणे स्थानकादरम्यान कॉर्ड लाइन

२५ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-त्रयोदशी – 15:54:02 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 11:13:20 पर्यंत
  • करण-वणिज – 15:54:02 पर्यंत, विष्टि – 26:04:59 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-सौभाग्य – 11:05:56 पर्यंत
  • वार-रविवार
  • सूर्योदय-06:04
  • सूर्यास्त-19:08
  • चन्द्र राशि-मेष
  • चंद्रोदय-28:52:59
  • चंद्रास्त-17:22:00
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक थायरॉईड दिवस
  • जागतिक मासे स्थलांतर दिन
  • जागतिक फुटबाल दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1666 : शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
  • 1953 : अमेरिकेच्या पहिल्या सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशनने अधिकृत पृष्ठे प्रसारित करण्यास सुरुवात केली.
  • 1955 : कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर ब्रिटिश गिर्यारोहक जो ब्राउन आणि जॉर्ज बँड यांनी सर केले.
  • 1961 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात येईल असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
  • 1963 : आफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापना अदिस अबाबा, इथियोपिया येथे झाली.
  • 1977 : चिनी सरकारने विल्यम शेक्सपियरच्या कलाकृतींवरील बंदी उठवली. ही बंदी सुमारे 10 वर्षे लागू होती.
  • 1981 : सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि UAE हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
  • 1985 : बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1992 : प्रख्यात बंगाली लेखक सुभाष मुखोपाध्याय यांना ज्ञानपीठ पुरस्कार 1991 जाहीर.
  • 1999 : पंढरपूरला सुमारे 100 वर्षे लाखो भाविक आणि नागरिकांची सेवा करणाऱ्या पंढरपूर-कुर्डूवाडी नॅरोगेज रेल्वेचा निरोप देण्यात आला.
  • 2010 : भारतीय वंशाच्या 59 वर्षीय कमला प्रसाद बिसेसर यांची त्रिनिदाद आणि टोबॅगोचे माजी पंतप्रधान पॅट्रिक मॅनिंग यांचा पराभव करून प्रथम महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली.
  • 2012 : SpaceX ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासह यशस्वीरित्या डॉक करणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
  • 2014 : मालवथ पूर्णा ही जगातील सर्वात कमी वयात (13 वर्षे) एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला ठरली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 803 : ‘राल्फ वाल्डो इमर्सन’ – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1882)
  • 1831 : ‘सर जॉन इलियट’ – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 मार्च 1908)
  • 1886 : ‘रास बिहारी घोष’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1945)
  • 1895 : ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर’ – इतिहासकार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 28 नोव्हेंबर 1963)
  • 1899 : स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1976)
  • 1927 : ‘नझरुल इस्लाम’ – अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म. (मृत्यू : 12 मार्च 2001)
  • 1936 : ‘रुसी सुरती’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 13 जानेवारी 2013)
  • 1954 : ‘मुरली’ – भारतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 2009)
  • 1972 : ‘करण जोहर’ – भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1954 : ‘गजानन यशवंत ताम्हणे’ तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 31 डिसेंबर 1878)
  • 1998 : ‘लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर’ – लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1937)
  • 1999 : बाळ दत्तात्रय तथा ‘बी. डी. टिळक’ – संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक यांचे निधन.
  • 2005 : ‘सुनील दत्त’ – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री यांचे निधन. (जन्म : 6 जून 1929)
  • 2013 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. ( जन्म : 5 ऑगस्ट 1950)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Remote control lifebuoy: पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणाऱ्या यंत्राचे नवबाग येथे प्रात्यक्षिक

   Follow us on        
सिंधुदुर्ग: समुद्र किनारपट्टीवर पाण्याचा अंदाज न आल्याने नागरिक बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा बुडणाऱ्या व्यक्तींना मनुष्याचा सहभाग न घेता रिमोट द्वारे वाचविण्याचे यंत्र पुणे येथील एका कंपनी द्वारे बनवण्यात आले आहे. समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) रिमोट द्वारे नियंत्रित करून बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवते.  पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ले नवाबाग समुद्र किनारी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
स्वतः जिल्हाधिकारी यांनीही रिमोट द्वारे या यंत्राची माहिती घेऊन कृतीद्वारे अनुभव प्रात्यक्षिक अनुभवले. कंपनीचे पुणे येथील भूषण चिंचोले यांनी वेंगुर्ले नवाबाग समुद्रात या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांना करून दाखविले. यावेळी रिमोट वर चालणाऱ्या या यंत्राचे प्रात्यक्षिक बघितल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी त्याच स्वतः वापरून प्रात्यक्षिक केले आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, तहसीलदार ओंकार ओतारी, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, मंडळ अधिकारी विनायक कोदे, तलाठी सायली आदुर्लेकर, भाजप वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तसेच पोलीस पाटील, कोतवाल, नागरिक उपस्थित होते.
हे यंत्र समुद्रात दीड किलो मीटर पर्यंत बुडणाऱ्या व्यक्ती पर्यंत जाऊ शकते. एका वेळी तीन व्यक्तींना समुद्राच्या पाण्यावर आपल्या सोबत तरंगत ठेऊ शकते. तसेच एक व्यक्ती बुडत असेल तर त्या व्यक्तीला तरंगत पकडून किनाऱ्यापर्यंत आणू शकते.

Special Trains: मुंबई – गुजरात दरम्यान धावणार अतिजलद तेजस विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई :प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती मागणी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि मुंबई सेंट्रल ते गांधीधाम दरम्यान विशेष भाड्याने अतिजलद तेजस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने विशेष भाड्याने दोन विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे .

ट्रेन क्रमांक ०९००५ मुंबई सेंट्रल -राजकोट स्पेशल दर बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ .४५ वाजता राजकोटला पोहोचेल. ही ट्रेन ३० मे ते २७ जून पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे,

ट्रेन क्र. ०९००६ राजकोट-मुंबई सेंट्रल स्पेशल दर गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता राजकोटहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ३१ मे ते २८ जून पर्यंत धावेल.ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर आणि वांकानेर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर कोच असतील.

ट्रेन क्रमांक ०९०१७ मुंबई सेंट्रल – गांधीधाम स्पेशल ही गाडी दर सोमवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११. २० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन ०२ जून ते ३० जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१८ गांधीधाम-मुंबई सेंट्रल स्पेशल दर मंगळवारी गांधीधामहून संध्याकाळी ६. ५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ०३ जून ते ०१ जुलैपर्यंत धावेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समख्याली आणि भचाऊ स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर
कोच आहेत.

कालावधी वाढवण्यात आलेल्या विशेष गाड्या: ट्रेन क्रमांक ०९०६७ उधना-जयनगर अनारक्षित विशेष गाडी २९ जून पर्यंत,ट्रेन क्रमांक ०९०६८ जयनगर-उधना अनारक्षित विशेष गाडी ३० जून पर्यंत , ट्रेन क्रमांक ०६०९६ उधना-समस्तीपूर स्पेशल २८ जून पर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०९०७० समस्तीपूर-उधना स्पेशल ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर मोठे भगदाड; वाहतुकीस धोका निर्माण

   Follow us on        
Mumbai Goa Highway: मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुड़व टेंब येथे एक भला मोठा भगदाड, असा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा खड्डा दिसणे कठीण असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गांवर प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहुन आपला प्रवास करावा.
निगुडे येथील माजी सरपंच झेवियर फर्नांडीस यांनी या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तात्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

Metro Line14: मुंबई मेट्रोचा अंबरनाथ-बदलापूर पर्यंत विस्तार होणार; असा असेल मार्ग

   Follow us on        
Metro Line14: अंबरनाथ -बदलापूर लोकल प्रवाशांसाठी  एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून मेट्रो थेट बदलापूरपर्यंत धावणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
एमएमआरडीएने कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गाच्या कामासाठी पाऊल टाकले आहे. या मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महिन्या अखेरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहेत. पीपीपी म्हणजेच सार्वजनिक – खाजगी भागीदारी तत्त्वावर ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला मेट्रोच्या कामासाठी पीपीपी तत्त्वावर उभारणीसाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात येणार आहेत.
कसा असेल कांजूरमार्ग – बदलापूर मार्ग?
  • मेट्रो 14 ही कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर धावणार आहे.
  • हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे
  • कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गावर एकूण 15 स्थानके असणार आहेत
  • मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असणार आहे.
  • हा मार्ग घणसोलीपर्यंत भूमिगत असणार आहे. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावणार आहे.
  • घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असणार आहे.
  • या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल येथून जाणार आहे.
  • कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे.
  • हा मेट्रो मार्ग ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या क्षेत्रातून जाणार आहे.
मेट्रो मार्गामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाटी एमएमआरडीएन यापूर्वीच सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे.

२४ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-द्वादशी – 19:23:09 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 13:49:19 पर्यंत
  • करण-कौलव – 09:00:56 पर्यंत, तैतुल – 19:23:09 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-आयुष्मान – 14:59:51 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय-06:04
  • सूर्यास्त-19:07
  • चन्द्र राशि-मीन – 13:49:19 पर्यंत
  • चंद्रोदय-28:03:59
  • चंद्रास्त-16:17:00
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • शांतता आणि नि:शस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन
  • राष्ट्रीय बंधू दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1626 : पीटर मिनुएटने स्थानिकांकडून मॅनहॅटन बेट $24 मध्ये विकत घेतले.
  • 1830 : युनायटेड स्टेट्समधील पहिली प्रवासी रोड रेल्वे सेवा सुरू झाली.
  • 1844 : तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी त्यांनी विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
  • 1883 : न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
  • 1923 : आयरिश गृहयुद्ध संपले.
  • 1940 : इगोर सिकोरसकी यांनी सिंगल-रोटर हेलिकॉप्टर यशस्वीपणे उडवले.
  • 1976 : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या कॉनकॉर्ड या सुपरसॉनिक विमानाने लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू केली.
  • 1991 : एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1993 : मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
  • 1994 : 26 फेब्रुवारी 1993 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या चार दहशतवाद्यांना प्रत्येकी 240 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • 2000 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेला Insat-3B हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
  • 2001 : 18 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
  • 2004 : उत्तर कोरियाने आपल्या देशात मोबाईल फोनवर बंदी घातली.
  • 2010 : सात सिलिकॉन रेणूंच्या आकाराचे जगातील सर्वात लहान ट्रान्झिस्टर बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1686 : ‘डॅनियल फॅरनहाइट’ – फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1736)
  • 1819 : ‘व्हिक्टोरिया’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1901)
  • 1924 : ‘रघुवीर भोपळे’ ऊर्फ जादूगार रघुवीर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 1984)
  • 1933 : ‘हेमचंद्र तुकाराम’ तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1999)
  • 1942 : ‘माधव गाडगीळ’ – पर्यावरणतज्ञ यांचा जन्म.
  • 1955 : ‘राजेश रोशन’ – संगीतकार यांचा जन्म.
  • 1973 : ‘शिरीष कुंदर’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1543 : ‘निकोलस कोपर्निकस’ – पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1473)
  • 1950 : ‘आर्चिबाल्ड वावेल’ – भारताचे 43वे गर्वनर जनरल यांचे निधन. (जन्म: 5 मे 1883)
  • 1984 : ‘विन्स मॅकमोहन सीनिय’ – डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1914)
  • 1990 : ‘के. ऎस. हेगडे’ – लोकसभेचे माजी अध्यक्ष यांचा मृत्यू.
  • 1993 : ‘बुलो चंदीराम रामचंदानी’ ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक यांचे निधन. (जन्म: 6 मे 1920 – हैदराबाद)
  • 1995 : ‘हॅरॉल्ड विल्सन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 11 मार्च 1916)
  • 1999 : ‘विजयपाल लालाराम’ तथा गुरू हनुमान – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1901)
  • 2000 : ‘मजरुह सुलतानपुरी’ – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी यांचे निधन. (जन्म: 1 ऑक्टोबर 1919)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

फक्त १९९१ रुपयामंध्ये विमान प्रवास! फ्लाय-९१ कंपनीची गोवा, हैद्राबाद, बेंगळुरु आणि सिंधुदुर्ग प्रवासासाठी खास ऑफर

   Follow us on        
Fly-91 Offer: मूळची गोव्याची असणाऱ्या Fly91 या विमान कंपनीने सोमवारी चार शहरांतून उड्डाणासह व्यावसायिक ऑपरेशन्सला सुरूवात केली आहे. कंपनीने गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणे सुरू केली आहेत. Fly91 एप्रिलमध्ये आगती, जळगाव आणि पुणे येथे उड्डाणे सुरू करणार आहे. यावेळी कंपनीने 1,991 रुपये विमान भाडे या विशेष ऑफर देखील लॉन्च केली आहे
Fly91 एअरलाइनच्या विमानाने गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 7.55 वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण घेतले. एअरलाइनने बेंगळुरू ते सिंधुदुर्ग हे पहिले उड्डाणही चालवले आहे. गोवा आणि बेंगळुरू दरम्यान सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी उड्डाणे कार्यरत करण्याची कंपनीची योजना आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंपनीचे व्यावसायिक उड्डाण सुरू करणे एअरलाइनच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. कंपनीने लॉन्च केलेली 1,991 रुपये विमान भाड्याची विशेष ऑफर सर्व ठिकाणांसाठी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विमान कंपनी सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी गोवा आणि बेंगळुरू दरम्यान उड्डाणे चालवेल. त्याचप्रमाणे, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान दर आठवड्याला समान संख्येने उड्डाणे चालविली जातील. याशिवाय गोवा ते हैदराबाद आणि सिंधुदुर्ग ते हैदराबाद दरम्यान आठवड्यातून दोनदा विमानसेवा चालणार आहे, असे चाको म्हणाले.
लक्षद्वीप आणि गोवा सारख्या लोकप्रिय स्थळांशी प्रवाशांना जोडणे हा Fly91 चा उद्देश आहे. भारतातील टियर आणि शहरांशी हवाई संपर्क वाढवण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे, असे चाको म्हणाले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search