Author Archives: Kokanai Digital




Konkan Railway 07:45 PM:
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्थानका जवळ ओव्हरहेड सपोर्ट वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. परिणामी (पेअरींग गाड्या उशिराने धावत असल्याने) मुंबईहून गोव्यासाठी सुटणार्या दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २३ मार्च रोजी पहाटे ४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.
एलटीटी मुंबई या स्थानकावरून दिनांक २३ मार्च रोजी ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी २३ मार्च रोजी सकाळी ०४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.
Konkan Railway 06:15 PM:
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हरहेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली होती. वायर तुटल्याने मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.
आता ही वायर जोडण्यात आली असून रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या गाड्या अजूनही सुमारे दोन ते तीन उशिराने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सध्याची स्थिती.. (06:15 pm)
सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर पोहोचली असून ती सुमारे ४ तास उशिराने धावत आहे तर मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकावरून नुकतीच निघाली असून ती सुमारे चार तास उशिराने धावत आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आताच आडवली स्थानकावर आली असून ती सुमारे साडेतीन तास उशिराने धावत आहे. मडगाव एलटीटी सिंधुदुर्ग स्थानकावर असून ती तीन तास उशिराने धावत आहे.




Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी.
कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली.
माननीय मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या :
- जोगेश्वरीला जंक्शन हे हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले असावे. तसेच तिथे कार पार्किंग, हॉटेल, मॉल आदी सुविधा उपलब्ध असाव्या .
- रेल्वे स्थानकांवरील, विशेषतः कल्याणच्या पुढच्या स्थानकांच्या, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी, पाण्याचा अभाव, स्तनपान कक्षांची अनुपलब्धता इत्यादी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
- मराठी भाषेला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रात सर्वच कारभारात, विशेषतः रेल्वेच्या कारभारात मराठी भाषा अनिवार्य असावी.
- एसी लोकलची फ्रिक्वेन्सी किंवा एसी गाड्यांची संख्या वाढवण्यात याव्या
- उपनगरीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा असूनही कित्येकदा इतर नागरिक त्या डब्यात प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या या गैरसोयींवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोकण रेल्वे
- प्रवाशांची वाढती गर्दी आणि कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक यामुळे होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प पुढे नेण्यात यावा.
- अनेक स्थानकांची स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नाही. आजही अनेक स्थानकांवर छत नसल्याने प्रवाशांना नाहक ऊन, पावसाचा सामना करावा लागत आहे.
- कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर सोलर पॅनल बसवावेत.
- कोकण रेल्वे मार्गावरील सर्व जुने बोगदे व पुलांचे सर्वेक्षण करून वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात यावे.
- मालगाड्यांचे वेळापत्रक अशा प्रकारे ठरवावे की त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येणार नाही.
आजचे पंचांग
- तिथि-अष्टमी – 29:26:23 पर्यंत
- नक्षत्र-मूळ – 27:24:09 पर्यंत
- करण-बालव – 17:01:48 पर्यंत, कौलव – 29:26:23 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-व्यतापता – 18:35:04 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:43
- सूर्यास्त- 18:48
- चन्द्र-राशि-धनु
- चंद्रोदय- 25:48:59
- चंद्रास्त- 11:50:00
- ऋतु- वसंत
- World Water Day – जागतिक पाणी दिवस
- Bihar Diwas – बिहार दिवस
- 1739 : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
- 1933 : डखाऊ छळछावणीची सुरुवात झाली, डखाउची छळछावणी म्युनिकच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या काळातील छळछावणी होती.
- 1945 : अरब लीगची स्थापना झाली.
- 1970 : हमीद दलवाई यांनी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
- 1980 : पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (PETA) प्राणी हक्क संस्थाची स्थापना
- 1996 : नासाचे स्पेस शटल अटलांटिस त्याच्या 16व्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले
- 1999 : लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर.
- 2020 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 च्या प्रसाराशी लढा देण्यासाठी देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कर्फ्यूची घोषणा केली.
- 1797 : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1888)
- 1924 : अल नेउहार्थ ( Allen Harold “Al” Neuharth) – यूए.एस.ए. टुडे चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2013)
- 1924 : ‘मधुसूदन कालेलकर’ – नाटककार आणि पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1985)
- 1930 : ‘पॅट रॉबर्टसन’ – ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक यांचा जन्म.
- 1933 : ‘अबोलहसन बनीसद्र’ – इराण चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
- 1832 : ‘योहान वूल्फगाँग गटें’ – जर्मन महाकवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1749)
- 1984 : ‘प्रभाकर पाध्ये’ – लेखक आणि पत्रकार यांचे निधन.
- 2004 : ‘व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1909)




Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आहे या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४ मार्च २०२५ रोजी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी- करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ कोच : दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १० कोच, जनरल – ०४ कोच , SLR – ०२
२) गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरेटर कार – ०२
३) गाडी क्रमांक ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक:
गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.




देवगड: हापूस आंबा, विशेषतः देवगड हापूस, याच्या अस्सलपणाची खात्री करण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आता युनिक आयडी (UID) कोड वापरला जाणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या युनिक आयडी कोडद्वारे ग्राहकांना खात्रीशीरपणे खरा देवगड हापूस आंबा मिळू शकेल.
हा कोड आंब्याच्या पेटीवर आणि उत्पादनावर लावला जाईल, ज्यामुळे बनावट किंवा इतर प्रजातींच्या आंब्यांना हापूस म्हणून विकण्याच्या प्रकारांना आळा बसेल. हा उपक्रम या वर्षाच्या हंगामापासून प्रभावीपणे लागू होत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदीची पडताळणी करता येईल आणि हापूसच्या नावाने होणारी तोतयागिरी थांबेल.
हापूस आंब्यासाठी युनिक आयडी (UID) प्रक्रिया
ही देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने सुरू केलेली एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांना अस्सल देवगड हापूस आंब्याची खात्री देणे आणि बनावट आंब्यांना बाजारातून हद्दपार करणे हा आहे.
नोंदणी आणि कोड निर्मिती:
देवगडमधील प्रमाणित आंबा उत्पादक आणि विक्रेते यांची नोंदणी संस्थेकडे केली जाते. नोंदणीकृत उत्पादकाला संस्थेकडून त्याच्या उत्पादन क्षमतेच्या संख्येनुसार स्टिकर देण्यात येतील. या स्टिकर वर त्या शेतकर्याची माहिती असलेला UID नंबर असणार आहे.
आंब्यावर कोड लावणे:
हा युनिक आयडी कोड आंब्याच्या पेटीवर किंवा काही प्रकरणांमध्ये थेट आंब्याच्या स्टिकरवर लावला जाईल.
कोडमध्ये उत्पादकाची माहिती, आंब्याचा हंगाम, आणि उत्पत्तीचा तपशील (उदा., देवगड) समाविष्ट असणार आहे.
ग्राहकाद्वारे पडताळणी:
ग्राहक हा कोड स्कॅन करून (QR कोड असल्यास मोबाइलद्वारे) किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर/अॅपवर टाकून आंब्याची अस्सलता तपासू शकतील.
यामुळे आंबा खरोखर देवगडचा हापूस आहे की नाही, याची खात्री पटेल.
या उपक्रमाचा उद्देश:
- बनावट हापूस आंब्यांची विक्री रोखणे.
- ग्राहकांचा विश्वास वाढवणे आणि हापूसच्या ब्रँडचे संरक्षण करणे.
- उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळवून देणे.
आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 28:26:39 पर्यंत
- नक्षत्र-ज्येष्ठा – 25:46:15 पर्यंत
- करण-विष्टि – 15:41:50 पर्यंत, भाव – 28:26:39 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सिद्वि – 18:40:05 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 06:44
- सूर्यास्त- 18:48
- चन्द्र-राशि-वृश्चिक – 25:46:15 पर्यंत
- चंद्रोदय- 24:55:00
- चंद्रास्त- 10:58:00
- ऋतु- वसंत
- आंतरराष्ट्रीय वन दिवस
- 1680 : शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
- 1858 : ब्रिटीश जनरल सर ह्यू रोज यांनी झाशीला वेढा घातला.
- 1871 : ओटो फॉन बिस्मार्क जर्मनीचे चांसलर बनले
- 1935 : शाह रजा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव इराण ठेवण्याची मागणी केली.
- 1977 : भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
- 1780 : अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
- 1990 : नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 2000 : भारताचा इनसॅट 3B उपग्रह एरियन 505 ने कौरॉक्स, फ्रेंच गयाना येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.
- 2003 : जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
- 2006 : सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
- 1768 : ‘जोसेफ फोरियर’ – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1830)
- 1847 : ‘बाळाजी प्रभाकर मोडक’ – मराठी लेखक,त्यांनी विज्ञान व इतिहास ह्या विषयांवर ग्रंथलेखन केले यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1906)
- 1887 : ‘मानवेंद्रनाथ रॉय’ – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 1954)
- 1916 : ‘बिस्मिल्ला खान’ – भारतरत्न शहनाईवादक यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑगस्ट 2006)
- 1923 : ‘निर्मला श्रीवास्तव’ – सहजयोगच्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 2011)
- 1978 : ‘राणी मुखर्जी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- 1973 : कोशकार ‘यशवंत रामकृष्ण दाते’ – यांचे निधन. (जन्म: 17 एप्रिल 1891)
- 1973 : आतुन कीर्तन वरुण तमाशा या नाटकाची तालीम सुरू असताना नटवर्य ‘शंकर घाणेकर’ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- 1985 : सर ‘मायकेल रेडग्रेव्ह’ – ब्रिटिश अभिनेता यांचे निधन. (जन्म: 20 मार्च 1908)
- 2001 : ‘चुंग जू-युंग’ – दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई ग्रुप चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 नोव्हेंबर 1915)
- 2003 : ‘शिवानी’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1923)
- 2005 : ‘दिनकर द. पाटील’ – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1915)
- 2010 : पांडुरंग लक्ष्मण तथा ‘बाळ गाडगीळ’ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 29 मार्च 1926)




Mumbai Local: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मुंबई लोकलविषयी महत्वाची माहिती दिली आहे. ‘मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली आहे. तसेच मुंबईतील जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येणार आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा लाखो मुंबईकरांना होणार आहेकमी भाड्यात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दलही माहिती दिली आहे. ‘प्रवासाचा खर्च प्रति किलोमीटर 1.38 रुपये आहे, मात्र आम्ही प्रवाशांकडून फक्त 73 पैसे घेतो. म्हणजेच आम्ही 47 % अनुदान देतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवाशांना 57 हजार कोटींचे अनुदान दिले होते, ते 2023-24 मध्ये वाढून सुमारे 60 हजार कोटी झाले होते. आमचे ध्येय कमी भाड्यात सुरक्षित आणि उत्तम सेवा पुरवणे हे आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे..
- आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – 26:48:21 पर्यंत
- नक्षत्र-अनुराधा – 23:32:11 पर्यंत
- करण-गर – 13:47:24 पर्यंत, वणिज – 26:48:21 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वज्र – 18:18:18 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:45
- सूर्यास्त- 18:48
- चन्द्र-राशि-वृश्चिक
- चंद्रोदय- 24:00:00
- चंद्रास्त- 10:11:00
- ऋतु- वसंत
- जागतिक चिमणी दिवस
- जागतिक मौखिक स्वास्थ्य दिवस
- 1602 : डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
- 1739 : नादिरशहाने दिल्ली बरखास्त केली. मयुरासनासह नवरत्न लुटून इराणला पाठवले.
- 1854 : रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिकाची स्थापना झाली.
- 1904 : चर्च ऑफ इंग्लंडचे धर्मगुरू चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज हे महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी भारतात आले.
- 1916 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत मांडला.
- 1917 : महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
- 1956 : ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- 1982 : फ्रान्सने अणुचाचणी केली.
- 2015 : सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
- 1828 : ‘हेनरिक इब्सेन’ – नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू: 23 मे 1906)
- 1908 : ‘मायकेल रेडग्रेव्ह’ – ब्रिटिश अभिनेता सर यांचा जन्म. (मृत्यू: 21 मार्च 1985)
- 1920 : ‘वसंत कानेटकर’ – नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 31 जानेवारी 2000)
- 1966 : ‘अलका याज्ञिक’ – पार्श्वगायिका यांचा जन्म.
- 1973 : ‘अर्जुन अटवाल’ – भारतीय गॉल्फ़र खेळाडू यांचा जन्मदिन.
- 1726 : ‘आयझॅक न्युटन’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1642)
- 1925 : ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: 11 जानेवारी 1859)
- 1956 : मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: 1 डिसेंबर 1909)
- 1970 : माजी भारतीय हॉकी खेळाडू जयपालसिंग मुंडा यांचे निधन.
- 2014 : भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: 2 फेब्रुवारी 1915)