Author Archives: Kokanai Digital

Kokan Railway: कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळी सुट्टी साठी कोकण रेल्वे मार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी विचारात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी- करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ कोच : दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १० कोच, जनरल – ०४ कोच , SLR – ०२

२) गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरेटर कार – ०२

३) गाडी क्रमांक ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक: 

गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

New Traffic Rules Fine: ट्रॅफिक नियम मोडणे आता परवडणार नाही… दंडाचे नवीन दर जाहीर..

   Follow us on        

New Traffic Rules Fine : बेदरकार वाहतूक करून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जरब बसवण्यासाठी सरकारने आता कडक पाऊले उचलली आहेत. दिनांक 1 मार्च 2025 पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडलेल्या गुन्हेगारांना वाढीव दंड, संभाव्य तुरुंगवास आणि अनिवार्य समुदाय सेवेसह कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल. वाहतूक नियम दंडात आता दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीचे उद्दिष्ट निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या वर्तनांना आळा घालणे आणि देशभरातील रस्ते सुरक्षा वाढवणे हे आहे.

नियमभंग करुन वाहन चालवल्याबद्दलच्या दंडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सुरुवातीला, अशा गुन्ह्यांसाठी 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत दंड आकारला जात होता. आता नवीन नियमांनुसार, प्रथमच नियम मोडणारांसाठी 10 हजार रुपयांपर्यंत दंड वाढला आहे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. ज्यांच्या नियमभंग करुन वाहन चालवताना वारंवार पकडले जाणाऱ्यांसाठी, दंडाची रक्कम 15 हजारांपर्यंत वाढली आहे. तर दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ही होऊ शकतो.

असे असणार सुधारित आहे दंड

वैध परवाना किंवा विमा यासारख्या आवश्यक कागदपत्रे नसताना वाहन चालवल्यास अनुक्रमे 5 हजार आणि 2 हजार रुपये दंड आकारला जाईल.

याच नियमभंगाची पुनरावृत्ती करणाऱ्यांना अतिरिक्त दंड बसू शकतो, त्यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो

विशेष म्हणजे, प्रदूषण प्रमाणपत्र (PoC) नसल्याबद्दलचा दंड 10 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. संभाव्यत: सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.

ओव्हरलोडिंग वाहनचालकांकडून जर नियमभंग झाला तर पूर्वी 2 हजार रुपये दंड होता, परंतु आता तो 20 हजारांपर्यंत वाढला आहे.

अल्पवयीन मुलांसंदर्भात वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणात दंड आणखीनच कठोर करण्यात आला आहे. त्यांना 25 हजारांचा दंड, तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही असा नियम आहे

मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल सुधारित दंडामध्ये आता 10 हजार रुपये दंड आणि पहिल्या गुन्ह्यासाठी 15 हजार रुपये आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10,000 रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाचा समावेश आहे.

हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास 1,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना निलंबन

वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास दंडाची रक्कम 5 हजार रुपये झाली आहे.

वैध कागदपत्रांशिवाय वाहन चालवल्यास लायसन्स नसल्यास 5 हजार रुपये आणि विमा नसल्यास 2 हजार रुपये दंड होऊ शकतो.

 

१९ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 24:40:13 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 20:50:54 पर्यंत
  • करण-कौलव – 11:28:10 पर्यंत, तैतुल – 24:40:13 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-हर्शण – 17:36:38 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:46
  • सूर्यास्त- 18:47
  • चन्द्र-राशि-तुळ – 14:07:31 पर्यंत
  • चंद्रोदय- 23:04:59
  • चंद्रास्त- 09:30:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय पोल्ट्री दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1822 : अमेरिकेतील ‘बॉस्टन’ हे शहर म्हणून प्रस्थापित करण्यात आले.
  • 1848 : लोकहितवादी ‘गोपाळ हरी देशमुख’ यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईतील प्रभाकर वृत्तपत्रात प्रकाशित झाले.
  • 1932: ऑस्ट्रेलिया मधील सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला, याचे काम 28 जुलै 1923 रोजी सुरु करण्यात आले होते.
  • 1972 : भारत -बांगलादेश यांच्यात मैत्री, सहकार्य आणि शांतता हा 25 वर्षांचा करार करण्यात आला.
  • 1998 : भारतीय जनता पार्टीचे सदस्य अटल बिहारी वाजपेयी यांची दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाली.
  • 2003: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकवर युद्ध घोषित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1821 : सर ‘रिचर्ड बर्टन’ – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑक्टोबर 1890)
  • 1897 : शंकर विष्णू तथा दादा चांदेकर – चित्रपट संगीतकार यांचा जन्म.
  • 1900 : ‘जीन फ्रेडरिक जोलिओट’ – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 1958)
  • 1924 : ‘फकीरचंद कोहली’ – पद्म भूषण, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक (TCS)
  • 1936 : ‘ऊर्सुला अँड्रेस’ – स्विस अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1938 : ‘सई परांजपे’ – बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1982 : ‘एड्वार्डो सावेरीन’ – फेसबुक चे सहसंस्थापक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1674 : ‘काशीबाई’ – ‘शिवाजी महाराजांच्या’ सर्वात धाकट्या यांचे निधन.
  • 1884 : ‘केरुनाना लक्ष्मण छत्रे’ – आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 16 मे 1825)
  • 1978 : ‘एम. ए. अय्यंगार’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 4 फेब्रुवारी 1891)
  • 1982 : ‘जीवटराम भगवानदास’ तथा आचार्य कॄपलानी स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1888)
  • 1998 : ‘इ. एम. एस. नंबूद्रीपाद’ – केरळचे माजी मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म: 13 जून 1909)
  • 2002 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1931)
  • 2005 : ‘जॉन डेलोरेअन’ – डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1925)
  • 2008 : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक यांचे निधन. (जन्म: 16 डिसेंबर 1917)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Bank Holiday Cancelled: या दिवशीची सार्वजनिक सुट्टी रद्द; बॅंका राहणार चालू

   Follow us on        

Bank Holiday March 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

 

३१ मार्च २०२५ रोजी कोणत्या बँकिंग सुविधा सुरू असणार?

प्राप्तिकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कासह सरकारी कर देयके.

पेन्शन पेमेंट आणि सरकारी अनुदाने

सरकारी वेतन आणि भत्त्यांचे वितरण

सरकारी योजना आणि अनुदानांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार

कोकण रेल्वेच्या ‘गर्दी’ ने घेतला तरुणाचा बळी

   Follow us on        
रत्नागिरी: होळीच्या सणाला गावी गेलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा मुंबईला परतत असताना ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नांत तोल गेल्याने गाडी खाली येवून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी स्थानकावर घडली आहे.
नोकरी निमित्त मुंबईत वास्तव्यास असलेला रुपेश आणि त्याचे काही मित्र मुंबईला परत जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले. गर्दी अधिक असल्याने सुपरफास्ट गाडीत चढण्यासाठी धडपड सुरू होती. गाडी स्थानकात शिरताच सर्वत्र गोंधळ उडाला. प्रत्येक जण चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच क्षणी रुपेशनेही गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात त्याचा हात निसटला, तोल गेला आणि तो रेल्वेखाली गेला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुपेशला तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.
होळी साठी मोठ्या प्रमाणात कोकणकर कोकणात आपल्या गावांत जातात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत मोठी गर्दी होत आहे. मध्य रेल्वे आणि पाश्चिम रेल्वे प्रशासनाने या मार्गावर विशेष गाड्या चालविल्या आहेत. तरीसुद्धा नियमित गाड्यांतून प्रवास करण्यास प्रवासी पसंदी देत असताना दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांसाठी चुकीचे नियोजन झाले असल्याने या गाड्यांना प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे.

१८ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 22:12:37 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 17:52:41 पर्यंत
  • करण-भाव – 08:54:54 पर्यंत, बालव – 22:12:37 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-व्याघात – 16:42:42 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:47
  • सूर्यास्त- 18:47
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 22:11:59
  • चंद्रास्त- 08:52:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक पुनर्वापर दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1801 : ऑर्डनन्स फॅक्टरी स्थापना.
  • 1850: हेन्री वेल्स, विल्यम फार्गो आणि जॉन वॉरेन यांनी अमेरिकन एक्सप्रेस — एक जागतिक वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीची स्थापना केली.
  • 1922 : असहकार आंदोलनासाठी महात्मा गांधींना 6 वर्षांचा तुरुंगवास.
  • 1944 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने भारतातून कूच करून भारताच्या पश्चिम सीमेवर ब्रिटिशांचा पराभव करून तिरंगा फडकावला.
  • 1965: अंतराळवीर ॲलेक्सी लिओनोव्ह 12 मिनिटे अंतराळात चालणारी पहिली व्यक्ती ठरली.
  • 2001: सरोद वादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार आणि बंगाली अभिनेत्री सावित्री चॅटर्जी यांना अप्सरा पुरस्काराने घोषित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1594 : ‘शहाजी राजे भोसले’ – यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1664)
  • 1858 : ‘रुडॉल्फ डिझेल’ – डिझेल इंजिनचा संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 29 सप्टेंबर 1913)
  • 1867 : ‘महादेव विश्वनाथ धुरंधर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1944)
  • 1869: ‘नेव्हिल चेंबरलेन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1940)
  • 1881 : ‘वामन गोपाळ  जोशी’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 1956)
  • 1901 : ‘कृष्णाजी भास्कर वीरकर’ – शब्दकोशकार यांचा जन्म.
  • 1919 : ‘इंद्रजित गुप्ता’ – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 2001)
  • 1921 : ‘नरेंद्र कुमार प्रसादराव साळवे’  – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 2012)
  • 1938 : ‘शशी कपूर’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1948: ‘एकनाथ सोलकर’ – अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 26 जून 2005)
  • 1989 : ‘श्रीवत्स गोस्वामी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1908 : सर ‘जॉन इलियट’ – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 मे 1831)
  • 1947 : ‘विलियम सी. डुरंट’ – जनरल मोटर्स (जीएम) आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1861)
  • 2001 : ‘विश्वनाथ नागेशकर’ – चित्रकार यांचे निधन.
  • 2003 : ‘एडम ओसबोर्न ’ – एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक, सॉफ्टवेअर प्रकाशक आणि संगणक डिझायनर यांचे निधन. (जन्म: 6 मार्च 1939)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Nagpur Violence: नेमके काय घडले?

   Follow us on        

नागपूर: नागपूरमध्ये काल सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सध्या बहुतेक भागात तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत.

सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून महाल परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. काल रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत.

महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा हात जायबंदी झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील एसटी सेवेबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी नितेश राणे यांची परिवहन मंत्र्यासोबत बैठक संपन्न

   Follow us on        

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन महामंडळाची बस स्थानके व बसगाडयांच्या विविध अडचणीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज बैठक घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग डोंगराळ, दुर्गम जिल्हा असून एस टी बस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे बस सेवा सुरळीतपणे चालू रहावी व प्रवाशांची गैरसोय टाळून सुलभ रित्या त्यांना एसटी बसची सेवा मिळावी, अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली. या मागणीला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती नितीश राणे यांनी दिली, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानक व बस गाड्यांच्या विविध अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले

१७ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 19:36:19 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 14:47:56 पर्यंत
  • करण-विष्टि – 19:36:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-घ्रुव – 15:44:04 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:47
  • सूर्यास्त- 18:47
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 21:22:00
  • चंद्रास्त- 08:18:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • डॉक्टर-पेशेंट विश्वास दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1957: अमेरिकेचा पहिला सौरऊर्जेवर चालणारा उपग्रह व्हॅनगार्ड-1 प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1969: गोल्ड मीर इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
  • 1997: मुंबईत वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1864: ‘जोसेफ बाप्टीस्ता’ – भारतीय अभियंता यांचा जन्म.
  • 1909 : ‘रामचंद्र नारायण दांडेकर’ – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 2001)
  • 1910 : ‘अनुताई वाघ’ – समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ , पद्मश्री, आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, , सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1992)
  • 1920 : ‘शेख मुजिबुर रहमान’ – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑगस्ट 1975)
  • 1927 : ‘विश्वास’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र यांचा जन्म.
  • 1946 : ‘पृथ्वीराज चव्हाण’ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
  • 1962 : ‘कल्पना चावला’ – भारतीय वंशाच्या अमेरिकिन अंतराळवीर(निधन: 1 फेब्रुवारी 2003)
  • 1975 : ‘पुनीथ राजकुमार’ – भारतीय अभिनेता, गायक यांचा जन्म.
  • 1979 : ‘शर्मन जोशी’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1990 : ‘सायना नेहवाल’ – भारतीय बॅडमिंटनपटू, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1210 : ‘मत्स्येन्द्रनाथ’ (मच्छिंद्रनाथ) – आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.
  • 1782 : ‘डॅनियल बर्नोली’ – डच गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1700)
  • 1882 : ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 मे 1850)
  • 1937 : ‘चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे’ – बडोद्याचे राजकवी  यांचे निधन. (जन्म: 26 जानेवारी 1891)
  • 2019 : ‘मनोहर पर्रीकर’ – गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री  यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1955)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

“मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरू पर्यंत नेण्यापेक्षा…..” कोकण विकास समितीने रेल्वेला दिला हा पर्याय..

   Follow us on        

Konkan Railway: मुंबई मडगाव वंदेभारत एक्सप्रेसचा मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता कर्नाटक राज्यातून होत आहे. मात्र या मागणीला महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रवासी संघटनांनी आपला विरोध दर्शवला आहे. कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे. त्यामुळे ती बंद करण्याची नामुष्की येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र कर्नाटक राज्यातील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी बंद न करता तिचा रेक वापरून 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी पुढे मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली आहे.

मात्र महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सध्या जवळपास आपल्या 98% क्षमतेने चालत आहे. ही गाडी पुढे दक्षिणेकडे विस्तारित केल्यास महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांना या गाडीच्या आसन उपलब्धतेच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येईल. त्याच बरोबर स्थानकांना मिळालेल्या आसन कोट्यात परिणाम होऊन खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थीवी या स्थानकांच्या प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण होईल. तसेच या गाडीचा लांब मार्ग असल्यास गाडीची देखभाल, दिरंगाई या सारख्या समस्या निर्माण होऊन ही गाडी आपली सध्याची लोकप्रियता गमावून बसेल.

दक्षिणेकडील राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाबद्दल अपेक्षा, मागण्या भिन्न आहेत. ही गाडी दक्षिणेकडे विस्तारित केल्यास भविष्यात दोन्ही प्रवासी गटांत या गाडीवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर उपाय म्हणजे ही गाडी विस्तारित न करता कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मंगळुरु पर्यंत नवीन वंदेभारत गाडी या मार्गावर चालवली जावी. मुंबई ते मंगळुरु अंतर पाहता (९०० किलोमीटर) दुसरा आणि उत्तम पर्याय म्हणजे या दोन्ही स्थानका दरम्यान नवीन स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस किंवा अमृत भारत एक्सप्रेस चालविण्यात यावी आणि तिला चिपळूण, कुडाळ आणि सावंतवाडी या वंदे भारत एक्सप्रेस सेवेपासून वगळण्यात आलेल्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्राधान्याने थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात जयवंत दरेकर यांनी केली आहे.

 

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search