
आजचे पंचांग
आजचे पंचांग
Shaktipeeth Expressway Updates:वर्धा जिल्ह्यापासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला जनता पूर्ण पाठिंबा देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी नंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन सुरू करून पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हा द्रुतगती मार्ग ज्या 12 जिल्ह्यांतून जातो, त्यापैकी केवळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातच विरोध आहे, ज्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल आणि या महामार्गाचे काम लवकरच सुरू केले जाईल असे ते म्हणालेत.
11 जिल्हय़ातून जाणार्या सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गाला शेतकर्यांनी विरोध केला होता. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यामुळे मोठा फटकाही बसला होता. त्यामुळ सावधानता म्हणुन विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे भेटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास हालचाली झाल्या आहेत.
शक्तीपीठ एक्स्प्रेसमध्ये 802 किमी लांबीमध्ये 26 इंटरचेंज असतील.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलवसुली बंद केल्याचा निर्णय ताजा असतानाच मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’वरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्याने टोलमुक्तीचा फटका ‘अटल सेतू’ला बसल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. ॲाक्टोबर महिन्यात अटल सेतूवरुन सात लाख सात हजार १०४ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद झाली. ही संख्या नोव्हेंबर महिन्यात सहा लाख ६९ हजार ९२ पर्यत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोलमाफी हे कारण यामागे असू शकते का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात अटल सेतूवरुन हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक घटली आहे.
मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – न्हावाशेवा असा २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर जेमतेम १२ ते १५ मिनिटांत कापणे यामुळे शक्य झाले. नवी मुंबईच्या दक्षिणेकडील उलवे, उरण, द्रोणागिरी, जासई, पनवेल, गव्हाण यासारख्या उपनगरांमधील रहिवाशांसाठी मुंबई या सेतूमुळे जवळ आल्याने येथील प्रवासी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अटल सेतूला मिळेल असे दावेही केले जात होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा सेतू सुरु करताना एका बाजूस प्रवासासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि नियमित कामानिमित्त मुंबईत येजा करणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. तशा प्रतिक्रियाही या उपनगरांमध्ये उमटल्या. असे असले तरी पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू सोयीचा ठरल्याचे चित्र आहे. असे असले तरी अजूनही नजिकच्या महिन्यांमध्ये या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दहा लाखांच्या पलिकडे पोहोचलेली नाही. राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेताच अटल सेतूवरील प्रवाशी वाहनांची संख्या आणखी कमी झाली असून यामध्ये हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.
आजचे पंचांग
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना ही सुटी लागू राहणार आहे. बुधवारी या सुटीचे परिपत्रक काढण्यात आले.
चैत्यभूमी परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय्यत तयारी सुरु आहे. ६ डिसेंबर रोजी राज्यभरातून मोठ्या संख्येने चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. दरम्यान, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, शुक्रवारी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार असून दादर-वरळी परिसरात २ दिवस ड्राय-डे घोषित करण्यात आला आहे.
देवरुख: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कोकण विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रोहित तांबे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील सभापती निवास मध्ये, देवरुख पोलीस स्टेशनसमोर करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्या रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवता भासत असून रक्तदान शिबिराद्वारे समाजहितासाठी रक्तदानाची चळवळ पुढे नेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आरोग्य तपासणीसाठी आणि रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. “समाजासाठी ही एक छोटी सेवा आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारी आहे,” असे रोहित तांबे यांनी सांगितले.
शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास हातभार लागतो.
Content Protected! Please Share it instead.