Author Archives: Kokanai Digital




वैभववाडी: वैभववाडी रेल्वे स्थानक येथे वैभववाडी रेल्वे कर्मचारीवृंद तर्फे काल सालाबादाप्रमाणे सत्यनारायण पूजा आणि शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात सर्वात मोठे आकर्षण ठरले ते सत्यनारायण पूजेच्या मखरासाठी केळीच्या खोडा आणि पानांपासून पूजेच्या मखरासाठी बनविण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा.
सावंतवाडीच्या निरवडे कोनापाल या गावातील आनंद यशवंत मेस्त्री या तरुणाने कल्पकतेने ही प्रतिमा साकारली होती. यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी नावीन्यपूर्ण आणि आकर्षक मखर बनवले आहेत. त्याने श्री देव विठ्ठल, कोल्हापूरची महालक्ष्मी तसेच ईतर बर्याच कलाकृतींचे मखर बनवले आहेत आणि प्रशंसाही मिळवली आहे. एक छंद म्हणुन त्याने ही कला जोपासली आहे.
या उत्सवा दरम्यान दिवसभरात सत्यनारायण महापूजा, हळदीकुंकू आणि भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री ९ वाजता रेंबो फ्रेंड सर्कल, कवठणी प्रस्तुत “गावय” या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती वैभववाडी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी नारायण नाईक यांनी दिली.
आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 10:01:16 पर्यंत
- नक्षत्र-विशाखा – 13:30:55 पर्यंत
- करण-भाव – 10:01:16 पर्यंत, बालव – 23:05:00 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-घ्रुव – 11:32:47 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07:06
- सूर्यास्त- 18:39
- चन्द्र-राशि-वृश्चिक
- चंद्रोदय- 25:12:59
- चंद्रास्त- 11:33:00
- ऋतु- वसंत
- सामाजिक न्याय दिवस
- 1792: अमेरिकेत पोस्टल सर्व्हिस सुरू झाली.
- 1935: कॅरोलिन मिकेलसेन – डॅनिश-नॉर्वेजियन एक्सप्लोरर, अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवणारी पहिली महिला बनली.
- 1962: जॉन ग्लेन – अमेरिकन मरीन कॉर्प्स एव्हिएटर, अंतराळवीर, पृथ्वीभोवती फिरणारे पहिले अमेरिकन बनले, त्यांनी चार तास, 55 मिनिटांत तीन कक्षा पूर्ण केल्या.
- 1978: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी पुरस्कार लिओनिड ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
- 1986: मीर अंतराळयान – सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केले.
- 1987: मिझोराम हे भारताचे 23 वे राज्य बनले.
- 2014: तेलंगणा हे भारताचे 29 वे राज्य बनले.
- 1901: ‘मिसर मुहम्मद नागुईब’ – इजिप्त चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑगस्ट 1984)
- 1904: ‘अलेक्सी कोसिजीन’ – रशियाचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 18 डिसेंबर 1980)
- 1923: ‘फोर्ब्स बर्नहॅम’ – गयानीज वकील आणि राजकारणी, गयाना देशाचे 2रे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1985)
- 1951: ‘गॉर्डन ब्राऊन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म.
- 1962: ‘अतुल चिटणीस’ – भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 2013)
- 1920: ‘कार्ल अल्ब्रेक्ट’ – जर्मन व्यापारी, अल्दी सुपरमार्केट कंपनीचे सह-स्थापना यांचा जन्म. (मृत्यू : 16 जुलै 2014)
- 1950: ‘बॅ. शरदचंद्र बोस’ – स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे बंधू यांचे निधन.(जन्म: 6 सप्टेंबर 1889)
- 1974: ‘के. नारायण काळे’ – नाट्यसमीक्षक यांचे निधन.
- 1997: ‘श्री. ग. माजगावकर’ – पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक यांचे निधन.
- 2001: ‘इंद्रजित गुप्ता’ – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1919)
- 2012: ‘डॉ. रत्नाकर मंचरकर’ – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1943)
- 2015: ‘गोविंद पानसरे’ – भारतीय लेखक आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 26 नोव्हेंबर 1933)
- 2023: ‘एस. के. भगवान’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक – यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1933)


CSMT to KHED | Fare for Regular Train | Fare for Special Train |
Sleeper (SL) | ₹ 190 | ₹ 385 |
Three Tier AC (3A)
|
₹ 505 | ₹ 1,050 |
Two Tier AC (2A) | ₹ 710 | ₹ 1,440 |




सिंधुदुर्ग: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी रात्री 1 वा.च्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. सुदैवाने रुग्णाला तात्काळ बाहेर काढल्यामुळे अनर्थ टळला.
गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला. त्यामुळे रुग्णांसह सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यानंतर म्हापसा येथील अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. रुग्णांना अन्य एका रुग्णवाहिकेने उपचारासाठी बांबोळीकडे नेण्यात आले. संबंधित रुग्णवाहिका ही दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या वेंगुर्ला -वजराठ येथील एका रुग्णाला लघवीचा त्रास जाणवत असल्यामुळे ती मागविण्यात आली होती. मात्र, तो रुग्ण स्टेबल असल्यामुळे घटना घडल्यानंतर चालत बाहेर आला. नेमकी कशामुळे रुग्णवाहिकेने पेट घेतला हे समजू शकलेले नाही.
आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – 07:35:29 पर्यंत
- नक्षत्र-स्वाति – 10:40:35 पर्यंत
- करण-वणिज – 07:35:29 पर्यंत, विष्टि – 20:50:53 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वृद्वि – 10:47:20 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 07:07
- सूर्यास्त- 18:39
- चन्द्र-राशि-तुळ – 30:50:22 पर्यंत
- चंद्रोदय- 24:18:59
- चंद्रास्त- 10:52:59
- ऋतु- वसंत
- रस्सीखेच दिवस
- 1819: ब्रिटिश संशोधक विल्यम स्मिथ यांनी दक्षिण शेटलँड बेटे शोधून काढली.
- 1878: थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले.
- 1913: पेड्रो लास्कुरेन – 45 मिनिटांसाठी मेक्सिकोचे अध्यक्ष बनले; कोणत्याही देशाच्या राष्ट्रपती म्हणून कोणत्याही व्यक्तीचा हा सर्वात कमी कालावधीचा कार्यकाळ आहे 1726: रशिया मध्ये सर्वोच्च प्रिव्ही कौन्सिलची स्थापना झाली.
- 1942: पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी जपानी-अमेरिकन लोकांना बंदिवासात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
- 1960: चीनने आपले पहिले संशोधन रॉकेट, टी-7 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
- 1985: विल्यम जे. श्रोडर हे रुग्णालयातून बाहेर पडणारे कृत्रिम हृदयाचे पहिले प्राप्तकर्ता बनले.
- 2003: केंद्रीय मंत्रिमंडळाने तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला मान्यता दिली.
- 1473: ‘निकोलस कोपर्निकस’ – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1543)
- 1630: ‘छत्रपती शिवाजी महाराज’ – यांचा जन्म. (मृत्यू: 3 एप्रिल 1680)
- 1899: ‘बळवंतराय मेहता’ – गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1901: ‘मुहम्मद नगीब’ – इजिप्त देशाचे 1ले राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑगस्ट 1984)
- 1906: ‘माधव सदाशिव गोळवलकर’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 5 जून 1973)
- 1919: ‘अरविंद गोखले’ – मराठी नवकथेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर 1992)
- 1922: ‘सरदार बियंत सिंग’ – पंजाबचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 1995)
- 1941: ‘डेव्हिड ग्रॉस’ – नोबेल पारितोषिक विजेते, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1943: ‘टिम हंट’ – नोबेल पारितोषिक विजेते, इंग्रजी बायोकेमिस्ट यांचा जन्म.
- 1947: ‘मोहम्मद अकबर लोन’ – भारतीय राजकारणी, खासदार, जम्मू आणि काश्मीरचे आमदार यांचा जन्म. (मृत्यू : 5 मे 2022)
- 1952: ‘डॅनिलो तुर्क’ – स्लोव्हेनिया देशाचे 3रे अध्यक्ष यांचा जन्म.
- 1953: ‘क्रिस्टीना फर्नांडीझ डी किर्चनर’ – अर्जेंटिना देशाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा जन्म.
- 1956: ‘रॉडरिक मॅककिनन’ – नोबेल पारितोषिक विजेते, अमेरिकन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1818: ‘सरदार बापू गोखले’ – पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती यांचे निधन.
- 1915: ‘गोपाळ कृष्ण गोखले’ – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 9 मे 1866)
- 1956: ‘केशव लक्ष्मण दफ्तरी’ – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि विचारवंत यांचे निधन. (जन्म: 22 नोव्हेंबर 1880)
- 1978: ‘पंकज मलिक’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म: 10 मे 1905)
- 1997: ‘राम कदम’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1918)
- 2003: ‘अनंत मराठे’ – पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
- 2015: ‘नीरद महापात्रा’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक यांचे निधन.( (जन्म: 12 नोव्हेंबर 1947)
- 2023: ‘मायिल सामी’ – भारतीय अभिनेते यांचे निधन.(जन्म: 2 ऑक्टोबर 1965)




सिंधुदुर्ग: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे, माजी मंत्रीआ णि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली आहे.
राजकोट किल्ल्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभा करण्यात येत आहे. शिवरायांच्याहा तातील तलवार २३ फुटांची असून चबुतऱ्याची उंची ३ मीटर असेल. पुतळा मजबूत करण्यासाठी ३.७० मीटरचा पाया तयार करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून असून पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची ९३ फुट असेल. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. तर चबुतरा अन् पायाच्या कामासाठी एम ५० हे हायग्रीड काँक्रीट वापरण्यात येत असून, आयआयटी मुंबईकडून
पुतळ्याचे डिझाईन बनवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे. ताशी २०० किमी वाऱ्याच्या वेगातही पुतळ्याला हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या नोयडा येथील कारखान्यात ब्रान्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात असून राजकोट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचा पाया आणि चबुतरा बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे.




Konkan Railway : मत्स्यगंधा एक्सप्रेस काल 17 फेब्रुवारी रोजी नव्याने जोडण्यात आलेल्या LHB (लिंक हॉफमन बुश) डब्यांसह पहिल्यांदा चालविण्यात आली. उडुपी-चिक्कमगालुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी LHB डब्यांमध्ये प्रवास करून या नवीन रेकचे उद्घाटन केले.
25 वर्षांपासून सुरू असलेल्या या ट्रेनला आता जुने डबे बदलून नवीन डबे बसवण्यात आले आहेत. अपग्रेड केलेल्या ट्रेनचे उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी झाले. उडुपी-चिक्कमगालुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी LHB स्वरुपात चालविण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.
“मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील समस्यांवर प्रकाश टाकणारा धीरजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री सोमन्ना यांच्याशी संपर्क साधला आणि विनंती केली. युनियनच्या मान्यतेने, जर्मन मॉडेलवर आधारित सुधारित मत्स्यगंधा ट्रेन सुरू करण्यात आली. ट्रेनमध्ये आता तात्काळ अपघाताचे संकेत दिले गेले आहेत आणि ते अधिक प्रवासी-अनुकूल आणि कमी गोंगाट करणारे डिझाइन केले आहे. याशिवाय, कोकण रेल्वे स्थानकासाठी 30 ते 40 कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून त्यात सुधारित पार्किंग आणि इतर सुविधांचा समावेश आहे. डिझाईन 1 मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रियेकडे जाईल. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये समाविष्ट करणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.” असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी आमदार यशपाल सुवर्णा, रेल्वेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – पूर्ण रात्र पर्यंत
- नक्षत्र-चित्रा – 07:36:32 पर्यंत
- करण-गर – 18:16:51 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-गण्ड – 09:51:08 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:07
- सूर्यास्त- 18:38
- चन्द्र-राशि-तुळ
- चंद्रोदय- 23:27:59
- चंद्रास्त- 10:18:00
- ऋतु- शिशिर
- प्लूटो डे
- 1965: गांबियाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1998: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- 2001: संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले.
- 2002: नासाच्या मार्स ओडिसी स्पेस प्रोबने त्याच्या थर्मल एमिशन इमेजिंग सिस्टमचा वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यास सुरुवात केली.
- 1486:’ योगी चैतन्य महाप्रभू’ – यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1534)
- 1745: ‘अलासांड्रो व्होल्टा’ – बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 5 मार्च 1827)
- 1823: ‘रावबहादूर गोपाळ हरी देशमुख’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1892)
- 1836: ‘रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्यायस्वामी विवेकानंदांचे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 1886 – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
- 1871: ‘बॅ. विठ्ठलभाई पटेल’ – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑक्टोबर 1933)
- 1883: ‘मदनलाल धिंग्रा’ – क्रांतिवीर यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑगस्ट 1909)
- 1898: ‘एन्झो फेरारी’ – फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 1988)
- 1911: ‘कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर’ – ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 2000)
- 1914: ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1976)
- 1922: ‘एरिक गेयरी’ – ग्रेनेडा देशाचे 1ले पंतप्रधान, ग्रेनेडियन शिक्षक आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑगस्ट 1997)
- 1926: ‘नलिनी जयवंत’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 2010)
- 1927: ‘मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी’ – संगीतकार यांचा जन्म.
- 1931: ‘टोनी मॉरिसन’ – अमेरिकन लेखक, – नोबेल, पुलित्झर पुरस्कार यांचा जन्म. (मृत्यु: 5 ऑगस्ट 2019)
- 1933: ‘नवाब बानू’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- 1294: ‘कुबलाई खान’ – मंगोल सम्राट यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1215)
- 1405: ‘तैमूरलंग’ – मंगोल सरदार यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1336)
- 1564: ‘मायकेल अँजेलो’ – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 6 मार्च 1475)
- 1967: ‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर’ – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1904)
- 1992: ‘नारायण श्रीधर बेन्द्रे’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1910)
- 1994: ‘पंडित गोपीकृष्ण’ – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1935)
- 2015: ‘डी. रामनाडू’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन. (जन्म: 6 जून 1936)




Konkan Railway: महाकुंभमेळ्यासाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडीच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्र. ०११९२ / ०११९१ उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष या गाडीला स्लीपर श्रेणीचे २ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ होणार आहे. प्रवाशांनी या गाडीला दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात आली आहे.
गाडी क्र. ०११९२ उडुपी – टुंडला जं. महाकुंभ विशेष ही गाडी सोमवार, १७/०२/२०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून सुटेल आणि टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी १३:०० वाजता (बुधवार) पोहोचेल.
गाडी क्र. ०११९१ तुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष गाडी तुंडला जंक्शन येथून गुरुवार, २०/०२/२०२५ रोजी सकाळी ०९:३० रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी १८:१० वाजता (शनिवार) उडुपीला पोहोचेल.
ही गाडी बरकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वरा, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जंयपुरी, माणिकपूर, मणिकपूर, मणिकपूर प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
या गाडीच्या डब्यांची सुधारित रचना : एकूण 22 कोच : दोन टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 12 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.